घरीच पार्लरप्रमाणे Facial Clean-up कसं कराल

घरीच पार्लरप्रमाणे Facial Clean-up कसं कराल

दिवसेंदिवस जीवन अधिकच धकाधकीचं आणि दगदगीचं  होत चाललं आहे. कामाचा ताण, प्रवास, चिंता-काळजी, वातावरणातील धुळ-प्रदूषण यामुळे चेहऱ्याची त्वचा निस्तेज आणि थकलेली वाटू लागते. पार्लरमध्ये फेस क्लिन-अप (Cleanup) केल्यावर त्वचा पुन्हा तजेलदार आणि सुंदर दिसू लागते. मात्र यासाठी सतत पार्लरमध्ये जाण्यासाठी अनेकजणींना वेळच मिळत नाही. शिवाय पार्लरमध्ये जाऊन क्लिन-अप (Cleanup) करण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करावा लागतो. यासाठी आम्ही तुम्हाला घरच्या घरी क्लिन-अप (Cleanup) करण्यासाठी काही सोप्या क्लिनच्या टिप्स शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्ही घरीच अगदी पार्लरप्रमाणे स्वतःच स्वतःचं क्लिन अप करू शकता.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी टिप्स देखील वाचा

पार्लरप्रमाणे घरीच Facial Clean-up करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

स्टेप 1 - क्लिझिंंग

Clean-up करताना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे चेहरा स्वच्छ करणं. ज्याला आपण क्लिंझिंग असं म्हणतो. क्लिंझिंग करण्यापूर्वी तुमचे हात स्वच्छ करण्यास मुळीच विसरू नका. कारण तुमच्या हातावरील जीवजंतू क्लिन अप करताना तुमच्या चेहऱ्यावर गेले तर तुम्हाला त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. यासाठी आधी एखाद्या चांगल्या हॅंडवॉशने तुमचे हात स्वच्छ करा. त्यानंतर थोडंसं क्लिंझर कॉटन पॅडवर घ्या आणि तुमच्या चेहऱ्यावरील मेकअपचा थर काढून टाका. त्यानंतर तुमच्या आवडत्या फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. असं केल्यामुळे चेहऱ्यावरील मेकअप, धुळ, प्रदूषणाचा थर त्वचेवरून काढून टाकला जाईल. 

Beauty

Garnier Skin Naturals Micellar Cleansing Water

INR 175 AT Garnier

स्टेप 2 - स्टिम घ्या

चेहऱ्याला स्टिम देणं फार गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेच्या छिद्रांमधील धुळ, प्रदूषण बाहेर निघून जाते. त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होऊ शकते.चेहऱ्यावर स्टिमरच्या मदतीने वाफ घेतल्यावर थोड्यावेळाने त्वचेला पुन्हा सामान्य तापमानावर आणण्यासाठी एका सुती कापडामध्ये बर्फाचा तुकडा घ्या आणि तो चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये फिरवा. मात्र जर तुमची त्वचा फार कोरडी असेल तर मात्र चेहऱ्यावर वाफ न घेणंच तुमच्यासाठी उत्तम ठरेल. 

वाचा - घरी मेकअप कसे करावे (How To Do Makeup At Home In Marathi)

स्टेप 3 - स्क्रब करा

चेहऱ्याची त्वचा निरोगी आणि तजेलदार दिसण्यासाठी ही फेशिअल क्लिनअपमधील एक महत्त्वाची स्टेप आहे. यासाठी तुम्ही एखादं चांगलं स्क्रब थोड्या प्रमाणात बोटांवर घेऊन अगदी हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्यावर फिरवू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेडस्किन आणि ब्लॅकहेड्स निघून जाण्यास मदत होऊ शकते. स्क्रबचा खरखरीतपणा तुमच्या त्वचेवरील या गोष्टी काढण्यास उपयुक्त ठरू शकतो. मात्र लक्षात ठेवा स्क्रब करताना तो नेहमी हळूवार हातानेच करा. कारण जर तुम्ही जोरात घासून अथवा रगडून स्क्रब चेहऱ्यावर लावलं तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. मसाज करून झाल्यावर चेहऱ्यावरील स्क्रबर काढून टाकण्यासाठी कॉटन पॅडचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो आणि उजळपणा तुम्हाला लगेच जाणवू लागेल.

Skin Care

Himalaya Herbals Gentle Exfoliating Walnut Scrub

INR 117 AT Himalaya

स्टेप 4 - फेसमास्क लावा

सर्वात शेवटची मात्र अतिशय उपयुक्त अशी ही स्टेप आहे. यासाठी तुमच्या चेहऱ्याला सूट करेल असा फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावर समप्रमाणात लावा. लक्षात ठेवा फेसपॅक चेहरा, मानेच्या संपूर्ण भागावर लावायला हवा. फेसपॅक लावल्यावर पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढा. फेशियल क्लिनअप करताना चेहरा थंड पाण्याने धुतल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. जर ही रोमछिद्रे अथवा पोर्स (pores) बंद झाली नाही तर त्यात धुळ आणि प्रदूषण जाण्याचा धोका वाढतो. चेहरा पुसताना तो एखाद्या सुती कापडाने टिपून घ्या फार जोरात रगडून पुसू नका.

Skin Care

Himalaya cucumber peel of mask

INR 94 AT Himalaya

या अगदी कमी वेळ लागण्याऱ्या स्टेप्स आणि या सोप्या टिप्स वापरून तुम्ही घरीच अगदी पार्लरप्रमाणे Facial Clean-up करू शकता.

अधिक माहितीसाठी POPxo चा हा व्हिडिओ जरूर पहा. 

आम्ही शिफारस केलेली उत्पादने वापरून आणि या  स्टेप्स फॉलो करून तुम्हाला नक्की कसा फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.

अधिक वाचा

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फॉलो करा हे 'मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन'

चेहऱ्यावर काहीही Try करण्यापूर्वी जाणून घ्या आपला Skin Type

चेहऱ्यावरील ओपन पोअर्स तुम्हाला असे करता येतील कमी

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक