केसांमध्ये स्काल्प आणि कोंडा ही अतिशय कॉमन समस्या आहे. तेलकट स्काल्पमुळे (oily scalp) तुमचे केस नेहमी ओले दिसतात आणि त्याला योग्य फ्लोट येत नाही. त्यामुळे अशा केसांची हेअरस्टाईल करणंही कठीण होतं. हो ना? तसंच बऱ्याचदा तेलकट स्काल्प असणाऱ्या व्यक्तींना तुम्ही पाहिलंत तर त्यांच्या अशा दिसण्यामुळे त्यांना आत्मविश्वासही कमी असतो. पण नक्की अशी स्थिती का उद्भवते. तेलकट स्काल्प म्हणजे नक्की काय? याची कारणं काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी नक्की काय करायला हवं, सतत हेअर सलोनचा आधार घेण्याची गरज भासते का असे असंख्य प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. यातून बाहेर पडण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही ऑईली स्काल्प आणि कोंड्यापासून सुटका करून घेऊ शकता.
बऱ्याचदा लोक कोरड्या स्काल्पच्या कारणांसाठी डॅंड्रफ शँपूचा वापर करतात. पण यामुळे अधिक समस्या निर्माण होतात. यामुळे त्वचेवरील ग्रंथी या तेल अधिक प्रमाणात निर्माण करतात आणि स्काल्प अधिक ऑईली अर्थात तेलकट बनत जातो त्याला ऑईली स्काल्प असं म्हणतात. यामुळे डोक्यात खाज येणं, जळजळ होणं अशी समस्याही निर्माण होते. ऑईली स्काल्पमुळे तुमचे केस सतत तेलकट दिसतात. तर यामुळे केसांची गळती अधिक प्रमाणात होऊन केसांमध्ये जास्त प्रमाणात कोंडा निर्माण होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेलकट स्काल्प हा महिलांपेक्षाही अधिक प्रमाणात पुरुषांना होतो.
स्काल्पची समस्या सर्वांनाच असते. त्यातही ऑईली स्काल्पची समस्या असेल तर ती त्रासदायक ठरते. पण स्काल्प होण्यामागची नक्की कारणं काय असतात हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारणं कळली तर त्यावर योग्य उपाय करू शकता. त्यामुळे याची मुख्य कारणं काय आहेत ते जाणून घेऊया
तुमच्या वयानुसार शरीरामध्ये बदल होत जातात. मुख्यत्वे महिलांमध्ये मासिक पाळी चालू झाल्यानंतर होणारा बदल हा ऑईली स्काल्प निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. या वेळेत त्यांचे चालू असणारे विचार ग्रंथीमधून अधिक तेल निर्माण करतात. तसंच गरोदरपणातही ऑईली स्काल्प जास्त प्रमाणात निर्माण होतो. या काळात सर्वात जास्त मूड स्विंग्ज होत असल्याने ग्रंथी जास्त तेल स्काल्पमध्ये निर्माण करतात.
आजकालच्या आयुष्यात प्रत्येकालाच घरी आणि अगदी ऑफिसमध्येही प्रचंड कामाचा तणाव असतो. तसंच आजकाल नात्यांमध्येही प्रचंड तणाव असतो. या सगळ्यामुळे तुमचा शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊन स्काल्पमध्ये तेल निर्माण होतं आणि त्यामुळे कोंड्याची स्काल्पची समस्या सुरु होते. तसंच या समस्या सुरु झाल्यानंतर आपोआपच केसगळतीचं प्रमाणही वाढतं.
काही जणांना हा त्रास अनुवंशिक असतो. तुमच्या आईवडिलांना स्काल्पचा त्रास असेल तर अनुवंशिकतेने हा त्रास तुम्हाला येतो. जर हा त्रास अनुवंशिक असेल तर त्यावर उपचार होऊ शकणं मात्र कठीण होतं. त्यामुळे जर स्काल्प आणि कोंड्याचं कारण हे अनुवंशिक असेल तर तुम्हाला उपचार मिळणं शक्यतो कठीण आहे.
ऑईली स्काल्प होण्याच्या कारणांमध्ये शरीरामध्ये फॅटी, गोड आणि फास्ट फूड असे स्निग्धजन्य पदार्थ अतिप्रमाणात जाणं हेदेखील एक कारण आहे. यामुळे तुमच्या केसांमध्ये अधिक प्रमाणात तेल निर्माण होतं आणि त्याचा परिणाम ऑईली स्काल्पमध्ये होतो.
हल्ली वातावरणामध्ये सतत बदल होत असतो. त्याव्यतिरिक्त धूळ, प्रदूषण आणि अन्य कारणांमुळे केसांना इजा पोहचते. ती धूळ आणि प्रदूषण तसंच केसांमध्ये चिकटून राहिल्यानेदेखील स्काल्प आणि कोंडा निर्माण होत असतो. हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे. यापासून कोणीच वाचू शकत नाही. कारण शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि प्रदूषणाचीही.
केसांची व्यवस्थित आणि नियमित काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला नियमित केसांवरून आंघोळ करून शँपू आणि कंडिशनरचा वापर करायला हवा. तसंच तुमच्या केसांना कोणतं तेल सूट करतं हेदेखील पाहायला हवं. केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास, तुमच्या केसांमध्ये प्रदूषण आणि अन्य गोष्टींनी कोंडा आणि ऑईली स्काल्प निर्माण होणं साहजिकच आहे.
ऑईली स्काल्प होऊ नये म्हणून आणि जरी झाला तरी तो काढून टाकण्यासाठी म्हणून सतत पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट घेणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. त्यासाठी तुम्हाला घरच्या घरीही अनेक उपाय करता येतात. आम्ही तुम्हाला इथे तुमच्यासाठी उपयोगी उपाय सांगणार आहोत.
अॅप्पल साईड व्हिनेगर हे एक प्रकारचं माईल्ड डिचर्जंट आहे. हे तुमच्या केसातील घाण आणि स्काल्प काढून टाकण्यास मदत करतं. तुमच्या केसांमध्ये तेल अधिक प्रमाणात येत असेल तर ते साफ करण्यासाठी तुम्हाला अॅप्पल साईड व्हिनेगरचा खूपच फायदा होतो. तसंच यामुळे त्वचेला इजा पोहचत नाही. यातील अॅसेटिक अॅसिड हे तुमचे पोअर्स अधिक टाईट करायला फायदेशीर ठरतात.
याचा वापर कसा करावा?
कोणत्याही महाग उत्पादनापेक्षा बेकिंग सोडा हा पर्याय अप्रतिम आहे. बेकिंग सोड्याने तुमच्या केसातील घाण आणि स्काल्प काही काळातच निघून जाण्यास मदत होते. केसातील अधिक तेल शोषून घेण्यासाठी बेकिंग सोड्याची मदत होते.
याचा वापर कसा करावा?
स्काल्पच्या समस्येवरील सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय म्हणजे अंडी. अंड्यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वामुळे केसांना पोषण मिळतं. केसांची वाढ चांगली होण्यासाठी यामध्ये जास्त प्रमाणात असलेलं प्रोटीन फायदेशीर ठरतं. तसंच अंड्यामध्ये विटामिन ए, विटामिन ई आणि विटामिन बी देखील असतं. जे तुमच्या केसांच्या पोषणासाठी अत्यंत उपयुक्त असतं.
याचा वापर कसा करावा?
मेंथॉलमध्ये असणारे घटक हे केसांसाठी पोषक ठरतात. तसंच केसांमध्ये निर्माण झालेल्या स्काल्पसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरतात. केसांमध्ये निर्माण झालेलं अतिरिक्त तेल काढण्यासाठीही याचा चांगला उपयोग करून घेता येतो.
याचा वापर कसा करावा?
हे वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण केसांसाठी बीअरच्या शँपूचा नेहमी वापर केला जातो. तसंच स्काल्पसाठी वाईनही उत्तम उपाय आहे. यामध्ये वाईनचं प्रमाण कमी ठेऊन तुम्ही ग्रीन टी चा वापरही करा. त्यामुळे तुमच्या केसांना चांगलं पोषण मिळतं.
याचा वापर कसा करावा?
ग्रीन टी मध्ये असणारे पॉलिथिन्स, अँटिऑक्सिडंट्स तुमच्या केसातील स्काल्प काढून टाकायला मदत करतात. तसंच यामध्ये असणारं विटामिन बी, फोलेट, मँगनीज, पोटॅशियम आणि कॅफेनही केसांना चांगलं राखण्यासाठी मदत करतात. यातील टॅनिन अॅसिड हे केसातील स्काल्प नियंत्रणात राखण्यास मदत होते.
याचा वापर कसा करावा?
स्काल्पच्या बाबतीत लिंबू हे अतिशय परिणामकारक ठरतं. लिंबामध्ये विटामिन सी चं प्रमाण अधिक असतं. नैसर्गिक अॅसिड असल्याने तुमच्या स्काल्पसाठी हे उपयुक्त ठरतं. तसंच यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
याचा वापर कसा करावा
कोरफड ही केसांसाठी उपयुक्त अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. तसंच तुमचा स्काल्प काढून टाकण्यासाठीही हे फायदेशीर ठरतं. यामुळे तुमच्या केसांची चांगली वाढ होते. तसंच तुमच्या केसातील अतिरिक्त तेल काढून टाकून त्वचा आणि केस चांगले राखण्यास मदत होते.
याचा वापर कसा करावा?
दहीदेखील तुमच्या केसांमधील स्काल्प काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरतं. दह्यातील असणारं अॅसिड केसांचा स्काल्प कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसंच हा अतिशय सोपा उपाय आहे.
याचा वापर कसा करावा?
लिंबू आणि वाईन हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. लिंबामध्ये असणारं विटामिन सी आणि वाईनमधील असणारे गुणधर्म केसांमधील स्काल्प आणि कोंड्यासाठी उपयुक्त ठरतं. याचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर स्काल्पपासून सुटका मिळवू शकता.
याचा वापर कसा करावा?
बेकिंग सोडा केसातील पाणी शोषून घ्यायला उपयोगी ठरतो. नुसता शँपू वापरण्यापेक्षा शँपू बेकिंग सोड्याबरोबर मिक्स करून वापरल्यास, तुमच्या केसातील स्काल्प कमी होण्यास मदत होते. याचा तुमच्या केसांवर विपरित परिणादेखील होत नाही.
याचा वापर कसा करावा?
लिंबू हे नैसर्गिक अँटिमायक्रोबायल असा ऑईली स्काल्पसाठी उपाय आहे आणि अंड्यामुळे केसांना चांगलं पोषण मिळतं. त्यामुळे याचं कॉम्बिनेशन हे केसांमधील स्काल्पसाठी योग्य ठरतं.
याचा वापर कसा करावा?
ऑईली स्काल्पसाठी काय करायला हवं आणि काय नको हे तुम्हाला माहीत आहे का? काही महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तुम्ही जर रोज शँपूने आंघोळ करत असाल तर ते तुमच्या स्काल्पसाठी योग्य नाही. रोज शँपू केल्याने स्काल्प निघून जातो ही चुकीची गोष्ट आहे. रोज शँपू केल्यास, केसामध्ये जास्त तेल निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही साधारण एक दिवस आड केसांना शँपू करणं योग्य आहे. तसंच नेहमी शँपू केल्याने तुमचे केसही लवकर पांढरे होतात.
कोरड्या केसांसाठी कंडिशनर चांगलं असलं तरीही तेलकट केसांसाठी नुकसानदायी ठरतं. त्यामुळे ऑईली स्काल्पसाठी केसांना कंडिशनरने जास्त मॉईस्चराईज करू नका. यामुळे तुमचे केस अधिक पांढरे होतात आणि त्यावर जास्त धूळ जमा होते. तसंच तुमचे केस अधिक तेलकट होऊन अधिक घाण होतात.
तुम्हाला ऑईली स्काल्पचा त्रास जास्त प्रमाणात असल्यास, ड्राय शँपूचा वापर करण्यात येतो. ऑईली स्काल्पमुळे केस अतिशय अस्ताव्यस्त दिसतात. पण ड्राय शँपूचा वापर करून तुम्ही त्यावर नियंत्रण आणू शकता. त्यासाठी तुम्ही तुमचे केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि नंतर केवळ तुमच्या मुळांवर ड्राय शँपू लावा. मग पुन्हा केस विंचरा.
तुम्हाला स्काल्पचा त्रास असल्यास, तुम्ही तुरट पदार्थांचा वापर करा. यासाठी अॅप्पल साईड व्हिनेगर हा उत्तम पर्याय आहे. तुमचे केस धुण्यासाठी याचा वापर केल्यास, तुम्हाला त्याचा फायदा होतो. तुमचा ऑईली स्काल्प निघून जातो. तुम्ही नियमित अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर केल्यास, काळानुसार तुमच्या ऑईली स्काल्पची समस्या कायमची निघून जाते.
तुम्हाला कोणत्याही गोष्टीतून ऑईली स्काल्पने सुटका मिळत नसेल तर तुम्ही मेडिकेटेड शँपू वापरा. नैसर्गिक घटक असणारे हे शँपू तुमच्या केसांमधील ही समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या शँपूमध्ये असणारं सॅलिसिलिक अॅसिड आणि सेलेनियम हे तुमच्या ऑईली स्काल्पची समस्या नष्ट करण्यासाठी मदत करतात. हे शँपू अतिशय स्ट्राँग असून त्यांचा वापर करताना खूप काळजी घ्यावी लागते.
सततची धूळ आणि प्रदूषणातून फिरणं आणि शँपूचा अथवा केमिकलयुक्त गोष्टींचा केसांवर अति वापर केल्यास, ऑईली स्काल्प निर्माण होतात. यामुळे केसगळती आणि केसांच्या अधिक समस्या होतात.
ऑईली स्काल्पमध्ये मुळातच त्वचेवर जास्त तेल निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करताना तुमच्या स्काल्पला त्रास होणार नाही आणि तुमच्या त्वचेला सूट होऊ शकेल असंच तेल वापरा.
पार्लरमध्ये जाऊन सतत उपचार करून घेण्यापेक्षा या लेखामध्ये दिलेले उपाय करणं हे तुमच्यासाठी जास्त सोपं आहे. तुम्हाला जास्त खर्चही होणार नाही आणि तुम्ही वेळच्या वेळी उपचारही करू शकाल.