चेहऱ्याच्या त्वचेची काळजी सगळेच घेतात. पण buttocks अर्थात नितंबाच्या त्वचेची काळजी घ्यायला मात्र आपण मागे पुढे करतो. शरीराच्या या झाकोळलेल्या भागाच्या त्वचेची काळजी घेण्याची गरज काय असे वाटते. शिवाय या विषयावर बोलायलाही नको वाटते. पण प्रत्येक स्त्री buttlocksची त्वचा कशी उजळायची त्याची काळजी कशी घ्यायची याचा शोध घेत असतात. जरी तुम्ही बिकिनी अथवा तत्सम कपडे घालणारे नसलात किंवा तुम्हाला आयुष्यात कधीही तेथील त्वचा दाखवण्याची गरज नसली तरी तुम्ही तुमच्या या नाजूक भागाच्या त्वचेची काळजी शरीराचा भाग म्हणून घ्यायला हवी. जर तुम्हालाही तेथील त्वचा चांगली असावी असे वाटत असेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी काही गोष्टी करु शकता. आज आपण buttlocks च्या त्वचेसंदर्भातील सगळी माहिती घेणार आहोत. मग करायची का सुरुवात
इतर कोणत्याही त्वचेप्रमणे तुम्हाला तुमच्या Buttocks ( नितंब) त्वचेची काळजी घेणं फारचं आवश्यक असतं. जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला त्वचेसंदर्भातील अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकीच एक आहे तो म्हणजे पिंपल्स… नितंबावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी अस्वच्छता एक कारण आहे. या शिवाय तुमचे पोट साफ नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा त्रास हमखास होऊ शकतो.
Buttocks ( नितंब) वर अगदी सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच होणारा त्रास म्हणजे पिंपल्स. खूप जणांना अवघड जागेवर पिंपल्स येतात. या हट्टी पिंपल्स ना काही लावतासुद्धा येत नाही. या शिवाय खूप जणांना नितंबावर उबाळी म्हणजेच मोठ्या फोड्या येतात. यामध्ये पू भरलेला असल्यामुळे जखमा चिघळतातही.
बहुतेक अनेकांच्या नितंबावर काळे डाग असतात. अनेकदा काहीच काळजी न घेतल्यामुळे डेट स्किन साचून राहते आणि त्याचे काळे डाग नितंबावर पडू लागतात. त्यामुळे ही Buttocks ( नितंब)ची त्वचा दिवसेंदिवस काळी आणि रुक्ष दिसू लागते.
कोरड्या Buttocks ( नितंब) चा त्रास अनेकांना असतो. कारण आपण बरेचदा त्या ठिकाणी काहीच लावत नाही. सतत दुर्लक्षित राहिल्यामुळे येथील त्वचा अधिकाधिक कोरडी पडू लागते.त्यामुळे येथील त्वचा निस्तेज होत जाते. शिवाय तुम्ही जर घट्ट कपडे घालत असाल तर मग याचा त्रास तुम्हाला अधिक होतो. कारण तुमच्या नितंबाना आवश्यक असलेला पुरेसा ऑक्सिजन त्यांना मिळत नाही.
आता Buttocks ( नितंब) वर पुरळ आले तर अर्थातच ते योग्य पद्धतीने गेले नाहीत तर त्याचे डाग राहणारच. या डागांकडे दुर्लक्ष केले तर मग त्वचेसंदर्भातील अनेक समस्या आपसुकच उद्धभवू लागतात.
अनेक महिलांना Buttocks ( नितंब) च्या जागी स्ट्रेच मार्क्स हमखास असतात. स्ट्रेच मार्क्स येण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक घट्ट कपडे सुद्धा आहे. घट्ट कपड्यामुळेही स्ट्रेच मार्क्स वाढू शकतात. सर्वसाधारणपणे महिलांमध्ये होणारे बदल पाहता त्यांना हा त्रास हमखास होतो.
आता Buttocks (नितंब) ची चांगली त्वचा मिळवण्यासाठी तुम्हाला फार काही कष्ट घेण्याची गरज नाही.कारणअगदी घरच्या घरी तुम्ही या गोष्टी करु शकता. पाहुयात घरात सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून तुम्हाला Buttlocks ची त्वचा कशी चांगला करता येईल ते
तुमच्या त्वचेवर कमालीचा फरक बदामाचे तेल करते. बदामातील आवश्यक गुणधर्म तुमच्या त्वचेला तजेला आणण्याचे काम करत असतात. रोज रात्री आंघोळ केल्यानंतर आणि Buttocks ( नितंब) येथील त्वचा स्वच्छ कोरडी करुन घेतल्यानंतर तुम्हाला बदामाचे तेल लावता येईल. बदामाचे तेल हातावर घेऊन तुम्हाला ते Buttocks ( नितंब) वर चोळायचे आहे. चेहऱ्याच्या मसाजप्रमाणेच तुम्हाला मसाज करायचा आहे. जर तुम्ही रोज हे तेल लावणार असाल तर अगदी 5 मिनिटांचा मसाज पुरेसा आहे. तेल चांगल मुरल्यानंतर त्यावर कपडे घालण्यास काहीच हरकत नाही.
तोंडाच्या दुर्गंधीपासून अशी मिळवा सुटका (How to get rid of bad breath)
जर तुमच्या Buttocks ( नितंब) त्वचेवर खूपच काळे डाग असतील तर सगळ्यात आधी तुम्हाला या त्याचे डाग कमी करणे गरजेचे आहे. आपण पिंपल्ससाठी ज्या प्रमाणे अॅपल सायडर व्हिनेगर वापरतो अगदी तसेच एका भांड्यात पाणी घेऊन तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात अॅपल सायडर व्हिनेगर टाकायचे आहे. लावायला सोपा पर्याय हवा असेल तर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये ते घेऊन तुम्ही तुमच्या Buttocks ( नितंब) वर हा स्प्रे करायचा आहे. आठवड्यातून किमान दोनदा तुम्ही करायला काहीच हरकत नाही. शिवाय तुम्ही आंघोळीच्यावेळी हे करु शकता. साधारण 5 ते 10 मिनिटे तुम्ही ते त्वचेवर राहू द्या. मग स्वच्छ धुवून घ्या.
जर तुमच्या Buttocks ( नितंब) ची त्वचा फारच कोरडी असेल तर तुम्हाला हा पर्याय नक्कीच अवलंबता येईल. पेट्रोलियम जेलीमुळे तुमच्या त्वचेमध्ये लगेचच बदल होतो. तुम्ही रात्री झोपताना हा प्रयोग करु शकता. पेट्रोलिअम जेली लावून मसाज करुन तुम्हाला ती जेली तशीच ठेवून द्यायची आहे. तुम्हाला कालांतराने तुमच्या Buttocks ( नितंब) वर झालेला फरक जाणवेल. शिवाय जर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स असतील तर तेही कमी होतील.
तुमच्या चेहऱ्याच्या स्क्रबप्रमाणेच Buttocks ( नितंब) वरही डेट स्किन साचते. ती काढून टाकण्यासाठी तुम्हाला माईल्ड स्क्रब हवेच. मध-लिंबू- साखर यांचे मिश्रण एक उत्तम स्क्रब आहे. मध आणि साखर तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. तर लिंबूमधील गुणधर्म तुमच्या काळवंडलेल्या त्वचेला उजळवण्याचे काम करुन तुम्हाला एक सारखी त्वचा देण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही अगदी साधा सोपा स्क्रब करुन तुमच्या Buttocks ( नितंब) साठी वापरायला काहीच हरकत नाही.
नैसर्गिक स्किन केअरमध्ये लिंबू आणि ग्लिसरीनचे मिश्रणही हमखास वापरले जाते. आता मध ज्या प्रमाणे तुमच्या त्वचेला ओलावा देण्याचे काम करते अगदी तसेच लिंबू- ग्लिसरीनचे मिश्रण तुमच्या त्वचेवर काम करत असते. तुम्हाला एखाद्या सिरम प्रमाणेच याचे मिश्रण तयार करुन Buttocks ( नितंब) लावायचे आहे. त्यामुळे तुम्हाला काळवंडलेली त्वचा उजळवणे आणि कोरडी, शुष्क त्वचा तजेलदार करणे असे दुहेरी फायदे मिळू शकतात.
कडुनिंब हे तुमच्या त्वचेवरील समस्यांवर काम करते. अँटीबॅक्टेरिअल अशी कडुनिंबाची ओळख आहे. त्यामुळेच तुम्हाला जर Buttocks ( नितंब) च्या त्वचेवर पिंपल्स, डाग, कोरडेपणा अशा समस्या असतील तर तुम्ही कडुनिंबाच्या तेलाचा पर्याय निवडावा. हल्ली बाजारात अगदी सहजपणे हे तेल मिळते. तुम्हाला इतर तेलाच्या मसाज प्रमाणेच या तेलाचा उपयोग करायचा आहे. जर तुम्ही बदामाचे तेल वापरणार नसाल तर तुम्ही कडुनिंबाच्या तेलाचा उपयोग केला तरी चालू शकतो.
टी ट्री ऑईलचे अगणित फायदे आहे. त्वचेसाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन्सनी ते युक्त आहे. त्यामुळे जर तुम्हाला या तेलाचा वापर करता आला तर फारच छान. तळहातावर अगदी काहीच थेंब या तेलाचे घेऊन तुम्हाला तुमच्या Buttocks ( नितंब) वर हे तेल लावायचे आहे. इतर पर्यायांच्या तुलनेत याची किंमत जरा जास्त आहे.
जर तुम्हाला Buttocks ( नितंब) च्या त्वचेचा फार काही त्रास नसेल तर मग तुम्ही दररोज रात्री मॉश्चरायझरचा वापर करा. तुमच्या त्वचेला सूट होणारे कोणतेही मॉश्चरायझर लावायला विसरु नका. पण जर तुम्ही खूप प्रवास करणार असाल किंवा बाहेर जाणार असाल तर मॉश्चरायझर लावू नका. या मागचे कारण इतकेच की, जर तुम्हाला घाम आला तर त्यामुळे Buttocks ( नितंब)वर खाज येण्याची शक्यता असते.
ओट्स तुमच्या आहारासोबतच तुमच्या त्वचेसाठी किती चांगला आहे. हे आम्ही वारंवार तुम्हाला सांगितले आहे. त्यामुळे ओट्स पाण्यात किंवा दुधात भिजवून त्यात किंचित मध घाला. ओट्स छान भिजल्यावर त्याची पेस्ट किंवा स्क्रब तुमच्या Buttocks ( नितंब) ला लावा. हलक्या हाताने मसाज करा. आंघोळीवेळी हा प्रयोग केला तर फारच उत्तम. नंतर स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला तुमची त्वचा लगेचच कोमल, मुलायम जाणवेल.
जर तुम्हाला फार काही डोकं लावायचं नसेल किंवा खर्च ही करायचा नसेल तर तुमच्यासाठी हमखास असलेला पर्याय म्हणजे नारळाचे तेल. सर्वगूणसंपन्न असे नारळाचे तेल तुम्ही तुमच्या Buttocks ( नितंब) ला लावली तरी देखील तुम्हाला फरक जाणवेल. तुमच्या त्वचेवर आलेले सेल्युलाईट किंवा स्ट्रेच मार्क्सही कमी होतील. शिवाय तुमचे डागही कमी होतील.
शरीरातील सगळ्यात आत झाकोळलेला भाग म्हणजे Buttlocks( नितंब) तरी देखील हा भाग शरीराच्या इतर त्वचेच्या तुलनेत अधिक काळवंडलेला असतो. तुमच्या इतर भागाला ऑक्सिजनचा मुबलक असा पुरवठा होतो. पण शरीराच्या या भागाला म्हणावा तितका ऑक्सिजन मिळत नाही. शिवाय जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट पार्टचे हायजिन नीट राखत नसाल तर तुमची त्वचा दिवसेंदिवस अधिक काळी दिसू लागते.
अनेकदा आपली बरीच काम केवळ बसून असतात. केवळ बसून राहिल्यामुळे तुमचे Buttlocks (नितंब) वरील टिश्यू जास्त चले जातात.शिवाय तुमची त्वचा त्वचेला घासल्यामुळे देखील तुम्हाला Buttlocks दुखण्याचा त्रास होऊ शकतो. Buttlocks दुखण्याची अनेक कारण असू शकतात. पण त्याचा योग्यवेळी इलाज करणे आवश्यक असते.
खूप जणांना Buttlocksला सतत खाज येत असते. या मागे अनेक कारणंही असू शकतात. जर तुम्ही Buttlocks वॅक्स करत असाल आणि त्याची योग्य काळजी घेतली नाही तर पुन्हा केस येताना खाज येऊ शकते. जर तुम्ही तुमच्या नितंबाची जागा स्वच्छ करत नसाल तरी देखील तुम्हाला खाज येऊ शकते. आंघोळीनंतर तुमच्या Buttlocks ची जागा ओली राहिली तरीदेखील तुम्हाला खाज येऊ शकते.
जर तुम्हाला अगदी घरच्या घरी तुमच्या Buttlocksवरील पिंपल्सवर इलाज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणेच त्याची काळजी घ्यायला हवी. Buttlocks वरील पिंपल्ससाठीही क्रिम मिळतात. त्याचा वापरही तुम्ही करु शकता. तुम्ही तुमच्या Buttlocksची त्वचा जितकी स्वच्छ ठेवाल तितका तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल.
You Might Like These:
महाराष्ट्रीयन नववधूवर खुलून दिसतील या '15' हेअरस्टाईल्स