नारळाच्या तेलाने होतो weight loss, जाणून घ्या कसं

नारळाच्या तेलाने होतो weight loss, जाणून घ्या कसं

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूपच कष्ट घ्यावे लागतात. यासाठी अनेक उपाय आहेत. पण त्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे नारळाचं तेल. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण हो आपल्या नेहमीच्या वापरातील नारळाच्या तेलाने तुम्ही तुमचा weight loss करण्यासाठी मदत घेऊ शकता. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नारळ तेलामध्ये तयार केलेलं जेवण जेवायला हवं. असं केल्याने तुमचं वाढतं वजन आटोक्यात येईल. आपल्या केसांचं पोषण करण्यासह नारळाचं तेल हे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि आपलं मेटाबॉलिजमची काळजी घेण्यासाठी चांगलं आहे. पण विविध कंपन्यांचं नारळ तेल आणि पदार्थामध्ये  वापरण्यात येणाऱ्या नारळाच्या तेलामध्ये फरक आहे. कंपनी या तेलामध्ये फ्लेवर घालतात जे खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरू शकत नाही. विशेष गोष्ट म्हणजे नारळाचं तेल केसांसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी दोन्हीसाठी वापरू शकता. खाण्यासाठी वापरण्यात येणारं नारळाचं तेल हे कच्च्या नारळापासून तयार होतं आणि हे पूर्ण शुद्ध असतं. 

1. चरबी जमू देत नाही

Shutterstock

आपण नेहमी पदार्थ बनवण्यासाठी जे तेल वापरतो त्यामध्ये बऱ्याच प्रमाण फॅट उपलब्ध असतं. जे आपल्या शरीरात जाऊन चरबीच्या स्वरूपात जमा होतं आणि आपलं वजन वाढून जाडी वाढू लागते. वास्तविक कच्च्या नारळाचं तेल वापरून बनवलेले पदार्थ हे फॅट फ्री असतात. जे आपलं वजन नियंत्रणात राखण्यासाठी मदत करतात. तसंच नारळ्याच्या तेलामध्ये बनलेले पदार्थ हे अधिक चविष्ट असतात. 

2. मेटाबॉलिजम strong करतात

Shutterstock

नारळाचं तेल हे आपल्या शरीरातील metabolism अधिक मजबूत करतात. नारळाचं तेल हे तुमच्या शरीरासाठी लागणाऱ्या मीडियम ट्रायग्लिसराईड लोरिक अॅसिडने बनलेलं आहे. हे एका प्रकारचं फॅटी अॅसिड आहे. आपल्या शरीराला रोजच्या आयुष्यात जितकी फॅटची गरज आहे तितकंच फॅट हे नारळ तेल निर्माण करतं. जे अन्य तेलांच्या तुलनेत खूपच उत्तम आहे. त्यामुळे याचा वजन नियंत्रणात राखायला जास्त फायदा होतो.

वजन घटवण्यासाठी उत्कृष्ट आहेत हे बाबा रामदेवचे घरगुती उपाय

3. एका महिन्यात होतं 3 किलो वजन कमी

Shutterstock

नारळाच्या तेलामध्ये काही नैसर्गिक गुणधर्म असतात जे तुमच्या शरीराला चांगली एनर्जी मिळवून देतात आणि ट्रायग्लिसराईड लोरिक अॅसिडमुळे शरीरामध्ये तेल जमा होऊ देत नाही. रोजच्या जेवणात रोज नारळाच्या तेलाचा वापर करण्यात आला तर एक महिन्यात साधारण तुमचं 3 किलो वजन कमी होऊ शकतं. तसंच रोज याबरोबर व्यायाम करायला हवा. तसंच व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही गरम पाण्यात एक चमचा नारळ तेल मिसळून पिण्याने याचा परिणाम लवकर दिसून येतो.

हेल्दी लाईफस्टाईल आणि वेटलॉससाठी वापरा हे 'नॅचरल स्वीटनर्स'

4. भूक नियंत्रणात राखते

Shutterstock

आपण जर तीन वेळ नारळाच्या तेलामध्ये पदार्थ केले आणि केवळ आठवडाभर तेच खाल्ले  तर बाहेर खाण्याची आपली सवय सुटते. नारळ तेलामध्ये कार्बोहायड्रेट्ससह कॅलरीचं जे संतुलन असतं ते आपल्या शरीरासाठी चांगलं काम करतं आणि आपली बूक नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. 

वजन कमी करण्यासाठी व्यायाम देखील वाचा

5. किती प्रमाणात वापरावं

Shutterstock

हे अर्थातच जेवण बनवणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे की ती व्यक्ती किती तेल वापरते. पण नारळ तेलामध्ये जेव्हा तुम्ही जेवण बनवणार असाल तेव्हा तुम्ही जास्त काळजी करण्याचं कारण नाही. घरामध्ये जेवण बनवताना तिन्ही वेळी खाताना एक एक मोठा चमचा नारळ तेल तुम्ही वापरू शकता. कोणत्याही ग्रोसरीच्या दुकानामध्ये तुम्हाला नारळाचं तेल सहजपणे उपलब्ध होतं. 

आम्ही दिलेला हा सल्ला नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी नक्की नारळाचं तेल तुमच्या घरी वापरून पाहाल असं आम्हाला वाटतं. कारण यामुळे नक्कीच वजन कमी होतं. 

You Might Like These:

नारळाच्या तेलानेही करता येतं Shave, कसं ते जाणून घ्या

डाएटची सुरुवात केल्यानंतर आणि वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन