Hair color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer)

Hair color जास्त काळ टिकण्यासाठी सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer)

सुंदर केस तुमच्या सौंदर्यात अधिकच भर घालत असतात. चमकदार आणि आकर्षक केसांमुळे तुमच्या स्मार्टनेसमध्ये अधिकच भर पडते. काही लोकांचे केस मुळातच सुंदर असतात. मात्र काहींनी यासाठी विविध हेअर ट्रिटमेंट घ्याव्या लागतात. केसांना कलर करण्याची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. काही लोकांना आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी Hair color करतात. केसांना विविध प्रकारच्या रंगाने आणि ब्रॅंडने रंगवता येतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हेअर कलर करू शकता. मात्र कोणताही रंग असला तरी तो टिकवायचा कसा हे फार महत्त्वाचं आहे. या शिवाय आजकाल वाढतं प्रदूषण आणि कामाची दगदग यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होत असतं. ज्यामुळे केस लवकर पांढरे होतात. मग सुंदर दिसण्यासाठी आणि केसांचा पांढरा रंग लपवण्यासाठी आपण  बऱ्याचदा हेअर कलर करतो. मात्र वातावरणातील बदलांमुळे हेअर कलर फार काळ केसांवर टिकत नाही. ज्यामुळे केस पुन्हा बेरंग आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच केसांना कलर करण्यापूर्वीच काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. Hair color जास्त काळ टिकण्यासाठी काही टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. 

केसांचा रंग जास्त दिवस टिकण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स (How To Make Hair Color Last Longer In Marathi)

  • केसांना Hair color करण्याआधी शॅंपू करा. कारण जर तुमचे केस स्वच्छ नसतील तर त्यावर हेअर कलर व्यवस्थित बसणार नाही. जर तुम्ही केसांना शॅंपू न करता अस्वच्छ केसांवरच कलर लावला तर तो जास्त दिवस नक्कीच टिकणार नाही. 
  • Hair color करण्यापूर्वी केसांना मेंदी लावू नका. कारण मेंदीच्या रंगावर Hair color लावल्यास काहीच फायदा होणार नाही. रंग व्यवस्थित न चढल्यामुळे तो जास्त काळ टिकणं शक्य होणार नाही. असं असल्यास आधी मेंदीचा रंग पूर्णपणे उतरू दया मगच केसांना Hair color लावा. 
  •  हेअर कलर लावल्यावर केस धुताना अती गरम पाण्याचा वापर करू नका. कारण अती गरम पाण्यामुळे तुमचे केस खराब होतातच शिवाय केसांचा रंगदेखील लवकर उतरतो. यासाठीच केसांना कलर केल्यावर केस शक्य असल्यास थंड अथवा कोमट पाण्यानेच धुवावे.

वाचा - मराठी मध्ये सिंपल केशरचना

Shutterstock

  • केस धुण्यासाठी Hair color protection shampoo चा वापर करा. असं केल्यास तुमच्या केसांचा कलर नक्कीच जास्त काळ टिकू शकतो. मात्र लक्षात ठेवा कलर केल्यावर केसांवर फार हार्श अथवा अॅंटि डॅंड्रफ शॅंपू मुळीच करू नका. यामुळे तुमच्या केसांचं नुकसान होऊ शकतं.
  • केसांना कलर केल्यावर त्यांच्यावर योग्य हेअर कंडिशनर लावणं गरजेचं असतं. कंडिशनर केसांचा पोत राखण्यासाठी आणि त्यांचे पोषण करण्यासाठी महत्त्वाची असतात. 
  • आठवड्यातून एकदा केसांवर तेल लावून मालिश जरूर करा. असं केल्यामुळे केस मजबूत होतील आणि गळणार नाहीत. शिवाय यामुळे तुमच्या केसांवरील रंगदेखील जास्त दिवस टिकण्यास मदत होईल. 
  • जर तुम्ही केसांवर परमनंट Hair color करणार असाल तर तुम्हाला त्या रंगाची अॅलर्जी नाही याची आधीच काळजी घ्या. कारण केसांना कलर केल्यावर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. 
  • केस रंगवण्यापूर्वी पॅच टेस्ट घ्या. ज्यामुळे तुम्हाला कोणता रंग सूट करतो हे तुम्हाला समजू शकेल. 
  • केसांना वारंवार निरनिराळ्या ब्रॅंडच्या आणि निरनिराळ्या रंगानी कलर करू नका. कारण विविध कंपन्यांची उत्पादने वापरल्यामुळे तुमच्या  केसांचं नुकसान होऊ शकतं. शिवाय त्या रंगाबद्दल माहीत नसल्यामुळे तो फार काळ टिकेलच हे सांगता येत नाही. 

Hair Products

L'Oreal Paris Color Protect Shampoo

INR 150 AT L'Oreal