ADVERTISEMENT
home / Acne
जाणून घ्या तुमच्या त्वचेसाठी कोणते chemical skin peel आहे योग्य

जाणून घ्या तुमच्या त्वचेसाठी कोणते chemical skin peel आहे योग्य

जर तुम्ही त्वचेच्या डॉक्टरांकडे गेलात तर तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी योग्य स्किन ट्रिटमेंट सांगितल्या जातात. पण या ट्रिंटमेंट्ससोबत त्यांनी तुम्हाला कधी chemical skin peelचा सल्ला दिला आहे का? जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी chemical skin peel चा सल्ला दिला असेल तर तुम्हाला chemical skin peell बद्दल योग्य माहिती हवी. कारण जर तुम्हाला याची योग्य माहिती असेल तर तुमच्या त्वचेला त्याचे होणारे फायदे आणि तोटे कळू शकतील. आज आपण माहिती करुन घेऊया वेगवेगळ्या chemical skin peel बदद्ल त्यांचे फायदे आणि तोटे

केसांच्या बाबतीत प्रत्येकजण करतात या चुका

कोणाला दिला जातो chemical skin peel करण्याचा सल्ला ?

सूर्य किरणांमुळे, पिंपल्समुळे तुमची त्वचा डॅमेज झाली असेल किंवा तुमची त्वचा अनइव्हन असेल तर तुम्हाला chemical skin peel चा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत सुधारतो. शिवाय जर तुमच्या त्वचेवर पिंपल्सचे डाग राहिले असतील तर तेही निघून जातात. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच तुम्ही chemical peel करा. त्यामुळे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल.

कॉफीचे दुष्परिणाम देखील वाचा

ADVERTISEMENT

लॅक्टीक पिल (Lactic acid peel )

shutterstock

लॅक्टीक पिलचा वापर करुन जे पील केले जाते त्याला लॅक्टीक पील असे म्हणतात. तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करते. जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर तुम्हाला लॅक्टीक पील सुचवले जाते. पिंपल्स, सुरकुत्या या पीलमुळे कमी होतात. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुमच्यावर त्याचा प्रयोग केला जातो. पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तुम्हाला हे skin peel करण्याचा सल्ला दिला जातो.

Also Read How To Take Steam In Marathi

ADVERTISEMENT

ग्लायको पील (Glycolic acid peel)

shutterstock

ग्लायकोलिक अॅसिडचा उपयोग करुन हे पील केले जाते. तुमच्या त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम हे पील करत असते. हे पील केल्यानंतर तुमची मृत त्वचा निघून जाते. तुमच्या त्वचेच्या पोत सुधारण्यासोबतच तुमचा रंग उजळवण्यास हे पील मदत करते. तुमची त्वचा या पील नंतर अधिक तजेलदार दिसते. ग्लायको पील केल्यानंतर तुम्हाला काही वेळ तुमची त्वचा लाल झालेली जाणवेल.

स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का

ADVERTISEMENT

यल्लो पील (Yellow peel)

तुमच्या त्वचेला नवेपणे देण्याचे काम यल्लो पील करते. इतर कोणत्याही किमतीच्या तुलनेत याची किंमत अधिक असते. हे पील तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा करते. ऑक्सिजनचा पुरवठा योग्य झाल्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते. हे पील तुमच्या त्वचेच्या आतपर्यंत जाते. यामुळे तुमची वरची त्वचाही निघू लागते. साधारण 3 ते 4 दिवस ही त्वचा निघू लागते. त्यानंतर तुम्हाला तुमची बदलेली त्वचा दिसेल.

सध्याच्या घडीला या checmical skin peel ची चांगली चलती आहे.याचे फायदे पाहता तुम्हाला चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही हे skin chemical peel नक्कीच करु शकता. Chemical skin peel करण्यासोबतच तुम्हाला यामुळे होणारे नुकसानही माहीत हवे. जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुमच्या त्वचेला या पीलनंतर थोडासा लालसरपणा येऊ शकतो. तुम्हाला खाजही येऊ शकते. पण जर तुम्ही हे योगय सल्ल्याने करत असाल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही.  कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही हे chemical skin peel कुठेही करु नका. कारण शेवटी हा तुमच्या त्वचेच्या प्रश्न आहे नाही का?

चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

06 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT