प्रत्येक नववधूसाठी तिचा विवाह सोहळा हा खासच असतो. लग्नसोहळ्यात तिचं रूप अधिकच खुलून येतं. या रूपात भर घालतात ते तिचं वधूवस्त्र आणि केशभूषा. लग्नात प्रत्येकीला काहीतरी वेगळी Bridal hairstyle करावी असं वाटत असतं. पूर्वी नववधूला डोक्यावरून पदर घ्यावा लागयाचा ज्यामुळे तिची हेअरस्टाईल दिसायचीच नाही. मात्र आता काळ बदलला आहे. हळदी समारंभापासून लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत निरनिराळ्या विधींसाठी हेअरस्टाईल करता येते. आम्ही तुम्हाला सध्याच्या ट्रेंडनुसार काही आकर्षक हेअरस्टाईल सूचवत आहोत. ज्या तुम्ही तुमच्या लग्नसोहळ्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता. या हेअरस्टाईल पाहून लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या इतर महिला तुमच्या रूपाकडे पाहातच राहतील.
लग्नसोहळ्यात सर्वाचं लक्ष असतं ते वधू आणि वरांकडे. त्यांनी कोणता पेहराव घातला आहे लग्नाची थीम काय आहे याचीच लग्नात चर्चा असते. म्हणूनच प्रत्येक नववधूला तिची साडी अथवा लेंहगा, मेकअप आणि हेअरस्टाईल सर्वात आकर्षक आणि हटके असावी असं वाटत असतं. लग्नसोहळ्यात ट्राय करता येतील अशा या काही पारंपरिक, आधूनिक, हटके हेअरस्टाईल तुमचं लक्ष नक्कीच वेधून घेतील.
लग्नाच्या दिवशी सकाळी हळदी समारंभ आणि लग्नाच्या सप्तपदींच्या विधीसाठी बऱ्याचदा वधुवस्त्र हे पिवळ्या रंगाचे परिधान केले जाते. या विधींसाठी जर तुम्ही पिवळ्या रंगाची नऊवारी नेसणार असाल तर तुमची हेअरस्टाईल पारंपारिकच ठेवा. कारण त्यामुळे तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल. अंगावरील मोत्यांच्या दागिन्यांना सूट करणारी मोगऱ्यांच्या फुलांची हेअरस्टाईल तुमच्या केसांच्या या अंबाड्यावर अगदी मस्तच दिसेल.
नववधूच्या केसांमध्ये ताज्या फुलांची सजावट नेहमीच खुलून दिसते. कारण त्यामुळे तिच्या आजूबाजूचे वातावरण नकळत प्रसन्न आणि प्रफुल्लित होते. पण जर तुम्हाला पारंपरिक मोगरा अथवा इतर फुलांची सजावट नको असेल तर ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा. कारण यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी नवीन केल्याचा आनंद मिळेल. यासाठी मानेवर केसांची एक बन तयार करा आणि त्यात तुमच्या कपड्यांच्या रंगसंगतीनुसार फुलांची सजावट करा. गुलाबी, जांभळट आणि पांढऱ्या फुलांमुळे या नववधूचा लुक अगदी हटके झाला आहे.
साखरपुड्याच्या दिवशी नेमकी काय हेअरस्टाईल करावी असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मुळीच चिंता करू नका. साखरपुड्याच्या पारंपरिक साडीवर मोगरा आणि गुलाबाच्या फुलांपासून तुम्ही अगदी सोपी आणि साधी हेअरस्टाईल करू शकता. कोणत्याही पारंपरिक लुकवर ही हेअरस्टाईल अगदी छानच दिसेल.
पारंपरिक मोगरा आणि गुलाबाच्या फुलांपेक्षा काहीतरी वेगळे ट्राय करायचं असेल तर केसांमध्ये एका पारंपरिक अंबाड्यावर जास्मिनच्या फुलांच्या गजऱ्यांची ही सजावट नक्कीच आणखी खुलून येईल. मात्र या हेअरस्टाईलसाठी अशीच सिल्कची साडी नक्की घाला ज्यामुळे तुमची ही हेअरस्टाईल जास्त छान वाटेल.
भारतात घरातील सुनेला लक्ष्मीचं रुप मानलं जातं. लक्ष्मीच्या पावलाने नववधू नव्या घरात आगमन करते असं म्हटले जाते. त्यामुळे तुमचं नववधूचं रूपदेखील लक्ष्मीचं प्रतिक दर्शवणारं असेल तर. लग्नातील एखाद्या विधीत साऊथ इंडिअन सिल्कच्या साडीवर ही हेअरस्टाईल अगदी खुलून दिसेल. या हेअरस्टाईलमध्ये लांबसडक वेणी आणि त्यावर फुलं आणि टेम्पल डिझाईनचे हेअर एस्केसरीज वापरून तुम्ही तुमचा लुक खुलवू शकता.
काही जणींना लग्नात पांरपरिक आणि पेशवाई लुक करण्याची हौस असते. जर तुमच्या दोघांचे लग्नातील आऊटफिट तसे असतील सिंपल बन घालण्यापेक्षा केसांमध्ये अशी पेशवाई हेअरस्टाईल करायला काहीच हरकत नाही. मानेवर वेणी बांधून तिचा रोल केलेला ही पेशवाई खोपा हेअरस्टाईल सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे.
लग्न अथवा साखरपुड्याच्या विधींमध्ये अनेकींना केस मोकळेच ठेवावे असं वाटत असतं. नेहमीची सवय नसल्यामुळे बन, अंबाडा अथवा वेणी कॅरी करणं कठीण जाईल असं वाटणं स्वाभाविक आहे. जर तुम्हालादेखील मोकळे केस ठेऊन एखादी हेअरस्टाईल करायची असेल तर साखडपुड्यासाठी ही हेअरस्टाईल अगदी बेस्टच आहे.
आजकाल लांबसडक केस असणं ही तर एक भाग्याचीच गोष्ट आहे असं म्हणावं लागेल. कारण धुळ, प्रदूषण, वातावरणात होणारे बदल, चिंता-काळजी याचा परिणाम नकळत तुमच्या केसांच्या वाढीवर होत असतो. मात्र निसर्गाने तुम्हाला लांबसडक केस दिले असतील तर ही हेअरस्टाईल तुमच्यावर अगदी खुलून दिसेल. शिवाय तुमच्या केसांची लांबी लहान असेल मात्र तुम्हाला लांब केसांची आवड असेल तर आर्टिफिशिअर हेअर एस्कटेंशन लावून तुम्ही ही हेअरस्टाईल लग्नसोहळ्यात करू शकता.
लग्नात अगदी पारंपरिक लुकपेक्षा काहीतरी वेगळा आणि हटके लुक हवा असेल तर हा लुक तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे. नाजूक हेअर एक्सेसरीज वापरून केलेली ही Braided Hairstyle तुमच्यावर अगदी मस्त दिसेल. साखरपुडा अथवा लग्नाच्या रिसेप्शनसाठी तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता.
निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीवर गोल्डन हेअर एक्सेसरीज आणि पेशवाई खोपा असा ग्लॅमरस लुक तुमच्या रूपात अधिकच भर टाकेल. काहीतरी हटके आणि वेगळं ट्राय करण्यासाठी हा लुक अगदी बेस्ट आहे. या लुकमुळे तुमचं नववधूचं रूप साजेसं आणि नाजूकही दिसेल.
लाल पारंपरिक सिल्कची साडी मोत्याचे पण आधूनिक दागदागिने आणि लाल- पांढऱ्या रंगाची ही फ्लोरल हेअरस्टाईल क्या बात है. जर लग्नात तुम्हाला फार जड दागदागिने आणि हेव्ही हेअरस्टाईल नको असेल तर हा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.
फार काही न करता तुमच्या लांबसडक कर्ली केसांमध्ये केलेली ही फुलांची सजावट तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा लुक देऊ शकते. जर लग्नातील विधी आणि पारंपरिक लुकमुळे तुम्ही कंटाळला असाल तर रिसेप्शनला हा लुक नक्की ट्राय करा. आजकाल लग्नानंतर अनेक रिसेप्शन देण्याची पद्धत रूजत आहे. जर एखाद्या रिसेप्शनला तुम्ही हा लुक ट्राय केला तर तुम्हाला तयारी करण्यासाठी फार वेळदेखील लागणार नाही.
केसांचा मानेवर बांधलेला हा बेबी बन आणि त्याबाजूने नाजूक गुलाब आणि पांढऱ्या फुलांची ही डिझाईन तुमच्या नवरीच्या लुकला खुलवून आणेल. तुम्ही तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनला हा लुल ट्राय करू शकता. लग्नानंतर पहिल्यांदाच जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणार असाल तरीदेखील हा लुक तुम्ही ट्राय करू शकता.
नवरीची साडी, मेंदी, हातातील हिरवागार चुडा आणि दागदागिने यामुळे तिचा लुक अगदी खुलून येत असतो. मात्र यात जर अशी पारंपरिक हेअरस्टाईल आणि केसामधील बिंदी असेल तर त्यामध्ये अधिकच भर पडू शकते. तेव्हा तुमच्या लग्नात हा लुक ट्राय करायला काहीच हरकत नाही.
लग्नात मोगरा, गुलाब, जाई, जुई, सायली अशी फुलं हेअरस्टाईलला आणखी खुलवतात. मात्र या पारंपरिक फुलांप्रमाणेच लाल रंगाची ही जास्मिनची फुलं तुमच्या आजूबाजूचे वातावरण नक्कीच प्रसन्न करतील. रेड क्लासिक जास्मिन हेअरस्टाईल या हेअरबनवर केल्यास तुमच्यावरून त्याची नजरच हलणार नाही.
नववधूंसाठी आम्ही सूचवलेल्या या हेअरस्टाईल्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्या तुम्ही ट्राय केल्या का हे आम्हाला जरूर कळवा
अधिक वाचा:
लग्नाच्या साड्यांसाठी ठाण्यामधील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा
नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग 'या' ठिकाणांना जरूर भेट द्या