पावसाळा हा हंगाम असा तर सगळ्यांचाच आवडता. पण या सीझनमध्ये सर्वात काळजी लागून राहाते ती म्हणजे केसांची. वातावरणातील दमटपणामुळे केसांचं या दिवसांमध्ये खूपच नुकसान होतं. तसंच सतत पावसात भिजल्याने कोंडा आणि केसगळती यासारख्या समस्या तर सुरु होतातच. अशावेळी आपल्या केसांची काळजी नक्की कशी घ्यायची असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. कारण सतत पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करणे हे खिशाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे घरच्या घरी स्वस्त आणि मस्त कशी काळजी घ्यायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशा साध्या आणि सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या केसांची व्यवस्थित काळजी घेऊ शकता आणि तुमचे केस अधिक चमकदार बनवू शकता. जाणून घेऊया पावसाळ्यात केसांची काळजी कशी घेता येते आणि कशा टिप्सचा वापर करता येतो. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे केस सुंदर आणि चमकदार ठेऊ शकता अगदी पावसाळी दिवसातही. चला तर मग जाणून घेऊ.
पावसाचं पाणी हे केसांसाठी अॅसिडिक आणि खराब असतं हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो तुमचे केस पावसाच्या पाण्यापासून कोरडे राहतील याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसात तुमचे केस चांगले ठेवण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि सोपी टिप आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की, केस कोरडे कसे ठेवणार तर तुम्ही जास्तीत जास्त छत्रीचा वापर करा. छत्री पावसाळ्याच्या दिवसात घरात अथवा अन्य ठिकाणी विसरू नका.
पावसात भिजून आल्यानंतर तुमच्या केसातील सर्व खराब पाणी काढून टाकण्यासाठी माईल्ड क्लिन्झिंग शँपूचा वापर करा. पावसाळ्यात सर्वात जास्त केसगळतीची समस्या उभी राहाते. त्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण देण्यासाठी तुम्ही योग्य शँपूचा वापर करणं आवश्यक आहे. तसंच पावसाच्या पाण्याने तुमच्या केसात होणारा फंगल आणि बॅक्टेरिया शँपूचा वापर केल्याने निघून जातो. तसंच हे नेहमी लक्षात ठेवा की, पावसाळा असो वा नसो तुम्ही कधीही हार्ड शँपूचा वापर करू नका. कारण यामुळे केस अधिक खराब होतात आणि त्याची काळजी घेणं शक्य होत नाही.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या केसांना ऑईल मसाज करण्यासारखा दुसरा चांगला पर्याय नाही. ही टिप तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी अप्रतिम आहे. तेलाच्या मसाजमुळे तुमच्या केसांना चांगलं पोषण मिळतं. पण हे नेहमी लक्षात ठेवा की, तेलाचा जास्त वापर करू नका. कारण तेलाचा वापर जास्त झाल्यास, तुमच्या केसांना हानी पोहचू शकते. त्यामुळे केसांना आवश्यक तितकंच तेलाचा वापर करावा.
पावसाळ्यात केस बांधून ठेवणं योग्य नाही. पावसाचं पाणी केसात साठून तुम्हाला कोंड्याचा आणि उवांचा त्रास होण्याची शक्यता असते. तसंच केसांना मोकळा श्वास घेता येत नाही. तुम्हाला केस बांधायचे असतील तर तुम्ही हलक्या रबरने पोनीटेल बांधा. करकचून बांधू नका.
पावसाळ्याच्या दिवसात केस नेहमी भिजत राहतात आणि त्यामुळे केसांमध्ये गुंता होतो. हा गुंता सोडवताना केस तुटतात आणि गळतात. त्यामुळे अशा वेळी भिजलेले केस विंचरण्यासाठी तुम्हाला जाड दातांचा योग्य कंगवा वापरायला हवा. तुम्ही केस विंचरण्यासाठी निदान पावसाच्या दिवसात तरी अशा कंगव्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या केसांची योग्यरित्या काळजी घेऊ शकता.
पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही छत्रीचा वापर तर केसांचं रक्षण करण्यासाठी करताच. पण त्याऐवजी तुम्ही वॉटरप्रूफ जॅकेटचा उपयोग केलात तर तुमच्या केसांसाठी नक्कीच चांगलं ठरेल. यामुळे तुमच्या केसांना पावसाच्या पाण्यात भिजून कुबट वास येणार नाही. तसंच तुमच्या केसांचं जास्त चांगल्या प्रकारे रक्षण होईल.
काही जण कंडिशनरचा वापर केसांसाठी करत नाहीत. पण ते योग्य नाही. तुम्ही जर शँपू नियमित वापरत असाल तर तुम्ही कंडिशनरदेखील चांगल्या प्रतीचं तुमच्या केसांसाठी वापरायला हवं. तुमचे केस मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. कंडिशनर वापरा याचा अर्थ जास्त प्रमाणात ते घ्या असा होत नाही. तुमच्या केसांच्या टोकाला कंडिशनर लावा आणि व्यवस्थित चोळून किमान पाच मिनिट्स तसंच ठेवा. पावसाच्या पाण्याने खराब झालेले केस तुम्ही अशा तऱ्हेने काळजी घेऊन नीट ठेऊ शकता.
कोणताही हंगाम असला तरीही केसांच्या काळजीसाठी तुम्ही योग्य आहार घेणं गरजेचं आहे. प्रोटीन, लोह आणि ओमेगा असणारे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या. तसंच फास्ट फूड खाणं टाळा. त्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळतं. केसगळतीचं प्रमाण कमी होतं आणि तुमच्या केसांमध्ये पदार्थांमधून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे चमकही येते.
पावसाळ्यात केसांची काळजी घेणं ज्यांना त्रासदायक वाटतं त्यांच्यासाठी सोपी टिप म्हणजे पार्लरमध्ये जाऊन नवा हेअरकट करून येणं. केस पावसाळ्यात लहान केले की तुम्हाला त्याची निगा राखणं सोपं जातं. त्यामुळे पावसाळ्यात केस कापणं हा सोपा उपाय आहे.
तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा तुमच्या केसांची काळजी करण्यासाठी उपयोग करता येतो. तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या वस्तूंचाही वापर करून बघायला हवा. घरातील अशा वस्तूंमध्ये रसायनही नसतं. उदाहरणार्थ तुम्ही कंडिशनर म्हणून आवळा, रिठा अथवा शिकाकाई यांचा वापर करू शकता. तसंच तुम्ही घरच्या काही काही हेअर मास्क बनवून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता.
पावसाळ्यात केसांची काळजी घेणं हा प्रत्येकासाठी एक टास्कच असतो. पण तुम्ही घरच्या घरी हेअर मास्क तयार करून केसांवर उपचार करू शकता. त्यासाठी आम्ही तुम्हाला इथे कोणते आणि कसे हेअरमास्क बनवून त्याचा कसा वापर करायचा हे सांगणार आहोत.
हा पदार्थ ऐकून तुम्ही नक्कीच थोडे बुचकळ्यात पडले असणार. पण घाबरू नका. आम्ही तुम्हाला याचा हेअर मास्क बनवण्यासाठी नक्की कसा उपयोग करायचा ते सांगणार आहोत. या मास्कमुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होण्यास मदत तर होतेच शिवाय तुमच्या केसांची गळती थांबवण्यासाठीही याचा उपयोग होतो.
कसे बनवावे आणि वापरावे
या मास्कमध्ये तुमच्या स्काल्पला झालेलं इन्फेक्शन घालवून टाकण्याची आणि तुमचे केस निरोगी आणि सुंदर टिकवून ठेवण्याची ताकद आहे. तसेच केसामध्ये कोणत्याही प्रकारे खाज उठत असल्यास, या मास्कचा चांगला उपयोग करून घेता येतो.
कसे बनवावे आणि वापरावे
बदाम तेल, विटामिन ई तेल आणि ऑलिव्ह ऑईल अशा विविध तेलांचं मिश्रण करून हे हेअर मास्क तुम्ही बनवा. यामुळे तुमच्या केसांमध्ये चमक राहील आणि तुमचे केस पावसाळ्यातही तितकेच सुंदर दिसतील. त्यामध्ये जास्त गुंता होणार नाही. यामुळे तुमच्या केसांचं मूळ आणि स्काल्प यांना अधिक पोषण मिळून केसांची मूळं अधिक घट्ट होतात.
कसे बनवावे आणि वापरावे
व्हिनेगरमध्ये असलेल्या अॅसिडमुळे केसातील अधिक तेल निघून जाण्यास मदत होते. तसंच पावसाळ्यात तेल केसातून पटकन निघत नाही. त्यामुळे अशावेळी याचा वापर करावा. तसंच प्रदूषणाने केसांवर जमलेली धूळ काढून टाकण्यासही या मास्कमुळे मदत मिळते. हा मास्क बनवणं आणि वापरणं अतिशय सोपं आहे.
कसे बनवावे आणि वापरावे
कोल्ड टी अर्थात थंड चहाचा उपयोग तुमच्या केसांसाठी कंडिशनर म्हणून चांगला होतो. तुम्ही बऱ्याचदा उरलेला कोरा चहा फेकून देता. पण तुम्ही त्याचा उपयोग हेअरमास्क म्हणून करू शकता. तुमच्या केसांना चांगली चमक आणून देण्यासाठी याचा उपयोग होतो.
कसे बनवावे आणि वापरावे
तुमचे केस मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी या मास्कचा तुम्हाला उपयोग करून घेता येतो. पावसाळाच्या दिवसात आंबा कुठून मिळणार असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर तुम्हाला आंबा हा साधारण जुलै महिन्यापर्यंत मिळतो. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करून मास्क तयार करून ठेऊ शकता.
कसे बनवावे आणि वापरावे
कुरळ्या केसांची काळजी घेणं आता अजिबात कठीण नाही, जाणून घ्या टिप्स
केळं हे केसांसाठी चांगला पर्याय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तुमच्या केसांना योग्य पोषण देण्यासाठी आणि हायड्रेट करण्यासाठी या मास्कचा चांगला उपयोग होतो. या मास्कमुळे तुमचे केस चमकदार आणि कायम तजेलदार राहतात तसंच केस फ्रिजी होत नाहीत.
कसे बनवावे आणि वापरावे
तुम्हाला घाईघाईमध्ये केसांची काळजी घ्यायला जमत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही लहानशा आणि सोप्या टिप्स आणल्या आहेत. या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या केसांचं रक्षण करू शकता.
तुमच्या केसांना कोणता शँपू सूट होतो हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे तोच शँपू वापरा. पण तरीही शक्यतो शँपू माईल्ड असेल याची काळजी घ्या. पावसाळ्यात केस जास्त फ्रिजी होतात त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागते.
बरेचदा पावसात भिजून आल्यानंतर केस न धुता तसेच सुकवले जातात. तर असं कधीही करू नये. पावसातून भिजून आल्यानंतर केसांवरून आंघोळ करूनच केस सुकवा. म्हणजे केसातून कुबट वास येणार नाही आणि केसांची नीट निगाही राखली जाईल.
केसांना गरम तेलाचा मसाज करणं योग्य आहे. पण आठवड्यातून एकदाच असा मसाज करावा. नेहमी नेहमी केसांना गरम तेल लावणं योग्य नाही. त्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. केसांच्या बाबतीत नेहमी काळजी घ्यावी लागते. अन्यथा केस लवकर खराब होतात.