#MyStory: माझा पहिलावहिला 'तो' अनुभव असा होता…

#MyStory: माझा पहिलावहिला 'तो' अनुभव असा होता…

आजच्या #MyStory मध्ये आहे अनुभव उत्सुकता, फजिती आणि त्यानंतर अचानक मिळालेल्या आनंदाचा. आजची मायस्टोरी इमोशनल नसून आहे #youthful. मग नक्की वाचा आजची ही हलकीफुलकी आणि थोडी इंटीमेट अशी #MyStory.

पहिल्यांदा...जेव्हा दोन लोक जवळ येतात तेव्हा ते एक होणं...ती पहिलीवहिली वेळ काहीशी वेगळीच असते. कोणासाठी अमेझिंग असते कोणासाठी वेदनादायक तर कोणासाठी खास तर कोणासाठी कॅज्युअल. पण माझ्यासाठी तो सेक्सचा पहिलावहिला अनुभव काहीसा असा होता की, आजही आठवल्यावर गालावर हसू येतं.

माझी फँटसी होती की, मी पहिल्यांदा सेक्स त्याच व्यक्तीशी करेन जिच्यावर माझं प्रेम जडेल. ज्याच्यावर माझं खूपखूप प्रेम असेल. एवढं की, बेभान होऊन आम्ही जवळ येऊ आणि ही फँटसी खरीही झाली. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि माझा विश्वासच बसला नव्हता की, जेव्हा मला कळलं की, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. पण मी याचा विचार केला नव्हता की, एक टीएनजर असताना की मोठं झाल्यावर जेव्हा एका व्हर्जिनसोबत दुसरा व्हर्जिनची पहिल्यांदा सेक्सची वेळ येते तेव्हा कोणत्या प्रोब्लेम्सना सामोरं जावं लागेल. तोच हा किस्सा -

जे झालं ते काही अचानक झालं नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून संधीच्या शोधात होतो. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो आणि काही प्रमाणात प्लॅनिंगही केलं होतं. त्याने तर कंडोम्सही विकत घेऊन ठेवले होते आणि इंटरनेटवरून सेक्सबाबतचे डूज आणि डोन्ट्स (do’s and don’ts) आम्ही वाचून ठेवलं होते. आम्ही तर एकत्र पोर्न फिल्म्सही बघितल्या होत्या. म्हणजे आम्हाला याबाबतची सगळी माहिती असेल आणि पहिल्यावेळी काही चूक होणार नाही. आम्ही दोघंही याबाबत बरंच बोललोही होतो. एवढं की, आम्ही एका पॉईंटला त्या क्षणापर्यंत पोचलोही होतो. आम्ही एकमेकांसमोर कपडेही काढले होते. आम्हाला अजिबात काही वेगळं वाटलं नाही आणि ना काही शरम वाटली. अखेर आमची वाट पाहण्याची वेळ संपली होती. तो फर्स्ट टाईम सेक्स करण्याचा क्षण आम्हाला मिळाला होता.

तो क्षण….

जेव्हा त्याचे आईबाबा वीकेंडला शहराबाहेर गेले होते. तेव्हा आम्ही त्या संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं. माझ्या आईला मला एक बॉयफ्रेंड आहे हे माहीत होतं आणि त्याच्यासोबत बाहेर फिरते हे माहीत होतं. पण तरीही सेफर साईड मी तिला सांगितलं की, आम्ही दोघं आधी मॉलला जाणार आहोत आणि त्यानंतर सिनेमा पाहायला जाणार आहोत. त्यामुळे कदाचित माझा फोन लागणार नाहीी. मला असं वाटतं होतं की, मध्येच तिचा फोन येऊ नये आणि नेमक्या क्षणी पचका नको व्हायला. मी सकाळी बरोबर 11 वाजता त्याच्या घरी पोचले. मी खूपच नर्व्हस होते आणि एक्सायटेडसुद्धा. माहीत नेमक्या काय काय भावना मनात येत होत्या. त्याच्या कुक गीता दीदीने दरवाजा उघडला. अरे या घरात कशा काय?? आम्ही तर यांनासुद्धा वीकेंडला सुट्टी द्यायचं ठरवलं होतं.  

नंतर मला कळलं की, गीता दीदी आम्हा दोघांच्या जेवणापर्यंत तिकडे थांबणार होती. आम्ही दोघांनी विचार केला की, पटापट जेवून घेऊया म्हणजे त्या लवकर जातील. आम्ही दोघं गुपचूप जेवायला बसलो. खरंतर मला त्याच्याशी खूप काही बोलायचं होतं. पण त्या सेक्सच्या पहिल्या अनुभवाच्या क्षणामुळे डोक्यात इतकं काही सुरू होतं की, काहीच बोलले नाही. कारण चुकून काही निघालं तर गीता दीदी घाबरायच्या. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघांनी एक-दीड तास वाट पाहिली गीता दीदी भांडी घासत होत्या. आम्ही दोघं त्यांना दाखवण्याकरता टीव्ही बघत होतो. आम्ही फक्त एकत्र बसलो होतो पण आमच्या दोघांचंही लक्ष टीव्हीकडे अजिबात नव्हतं. आम्ही आमच्या पहिल्या सेक्सबाबत घाबरलेले होतो. शेवटी गीता दीदी गेल्या. जाण्याआधी त्या हे सांगायला विसरल्या नाहीत की, फ्रिजमध्ये जेवण आहे आणि वीकेंडला काय काय खाता येईल. 

Shutterstock

गीती दीदी गेल्यावर….

जसं त्या गेल्यावर दरवाजा बंद झाला. आम्ही एकमेकांना किस करायला सुरूवात केली. आम्हाला दोघांनाही जोरात हसू आलं. आम्ही दोघंही सोफ्यावरून उठून बेडरूममध्ये गेलो. घाईघाईने एकमेकांचे कपडे काढले. चल सुरूवात करूया असं तो म्हणाला आणि माझ्याही तोंडातून हो बाहेर पडलं. यानंतर काहीतरी विचित्र गोष्टी घडू लागल्या. 

सर्वात आधी कंडोम काढताना त्याच्या हातातून ते सटकून बेडच्या खाली पडलं. आम्ही दोघं टॉर्च घेऊन ते शोधू लागलो. अखेर ते मिळालं. जसं आम्ही सेक्स करायला सुरूवात केली. मला दुखू लागलं आणि माझ्या तोंडून हलके हलके आवाज निघू लागला “आह आह आह!” माझ्या आवाजाने त्याला चक्रावल्यासारखं झालं. त्याचा सगळा उत्साहच मावळला. मग आम्ही पुन्हा सुरूवात करायचं ठरवलं. पुन्हा पहिल्यापासून. पण पुन्हा माझ्या तोंडातून आवाज बाहेर पडला आणि परत तेच झालं. 

आम्ही असं तीन ते चार वेळा ट्राय केलं आणि ते दुखणं आठवून मी पुन्हा घाबरू लागले. जसं पहिल्यांदा कोणी ड्राईव्ह करत असतं तेव्हा रिकाम्या रस्त्यावर, कोणीही नसताना, ट्रॅफिक नसतानाही घाबरतं आणि हॉर्न मारतं तसं माझं झालं. माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडायची आणि तो माझ्या विचाराने घाबरून जायचा. जोपर्यंत तो पुन्हा मूडमध्ये यायचा तोपर्यंत माझा मूड ऑफ झालेला असायचा. ही गोष्ट तब्बल दहा वर्षापूर्वीची आहे. जेव्हा भारतात सहजासहजी कंडोम खरेदी करता येत नसे. निदान आमच्या शहरात तरी नाही. आम्ही विचार केला होता की, व्हॅसलीन किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करूया. पण आम्ही वाचलं होतं की, त्यामुळे कंडोमला भोक पडू शकतं. त्यामुळे आम्ही ती आईडिया नाही वापरली. आम्ही दोघंही मूर्खासारखं बसलो होतो. ज्यांना फर्स्ट टाईम सेक्सबाबत सगळं माहीत असतं पण प्रॅक्टीकली काहीच माहीत नसतं. 

खूप विचार केल्यावर आम्ही दोघं बाथरूममध्ये गेलो आणि पाण्याचा वापर लुब्रिकंटसारखा करायचा विचार केला. आता आम्हाला फक्त याच गोष्टीचा विचार करायचा होता की, पॅरेंट्सने विचारलं की, बेड ओला कसा झाला तर काय सांगायचं. शॉवरखाली एकही कंफर्टेबल पोझिशन आमच्यासाठी शक्य नव्हती. बाथरूममध्ये उभं राहून सेक्स करणंही शक्य नव्हत कारण पाण्याच्या नळाने किंवा शॉवरमुळे आम्हाला लागलं असतं. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्सचा प्रयत्न करताय आणि दोघंही आधीच घाबरला आहात. 

आणि डोक्यात आईडिया आली...

अचानक आमच्या डोक्यात आईडिया आली. आम्ही दोघंही त्याच्या आईबाबांच्या खोलीत गेलो आणि बाथटबला बेड बनवण्याचा विचार केला. विचार करताना ती आईडिया चांगली वाटत होती पण बाथटबमध्ये बसताना नेमकं माझा हात साबणाला लागला आणि साबण टबमध्ये पडला. साबणावर माझा पाडला आणि नेमकी त्याच्यावर पडले. माझं कोपर नेमकं त्याच्या सेन्सिटीव्ह जागी लागलं. जिथे ते लागणं अगदीच अनावश्यक होतं. 

तरीही सगळा गोंधळ विसरून आम्ही टबमध्ये कोमट पाणी भरलं आणि त्यात अर्धा तास बसून राहिलो. आता आम्ही दोघंही हललो होतो. माझं तर रडूनही झालं होतं. त्याच्या प्रायव्हेट पार्टला तर चांगलंच लागलं होतं. मी इमोशनलपणे घाबरले होते आणि तो बिचारा वेदनेत होता. 

काही वेळाने आम्ही पुन्हा बेडवर गेलो. मी यावेळी माझं तोंड चांगल बंद केलं आणि चादरीने माझा चेहरा झाकून घेतला. ज्यामुळे त्याला माझे एक्सप्रेशन दिसू नये. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा सेक्स केला. साहजिकपणे मला दुखलं आणि भरपूर घामही आला होता. पुन्हा माझ्या तोंडातून आवाज आला. चादरीच्या आतून माझ्या ओरडण्याचा आवाज त्याला ऐकू गेला आणि त्याचं अराऊजल पुन्हा गेलं. यावेळी तो थेट बेडवरून खाली उतरला आणि किचनमध्ये जाऊन त्याने माझ्यासाठी चहा बनवला. 

आम्हाला दोघांनाही माहीत नव्हतं आणि काहीच अनुभव नव्हता की, पहिल्यांदा सेक्स करताना नेमकं कसं फील होतं. आम्ही दोघंही काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. आम्हाला तर हेही कळलं नाही की, आमच्यात पहिला सेक्स झाला की नाही.

Shutterstock

चहा घेताना आम्ही ठरवलं की, आम्ही जगातील सगळ्यात बावळट कपल आहोत. कारण आम्हाला माहीतच नव्हतं की, आमची व्हर्जिनिटी एकमेकांसोबत गेली की नाही. काही तासांनी संध्याकाळ झाल्यावर आम्ही काहीतरी खाण्याचा विचार केला आणि नंतर तो मला घरी सोडणार होता. जसा लंच झाला होता तसाच डिनर झाला. आम्ही दोघं एकदम गप्प होतो आणि कळतंच नव्हतं की आम्हाला एकमेकांशी काय बोलायचं आहे. आम्ही आमच्या फ्रेंड्सना हे सांगितलं असतं तर त्यांनीही आमच्यावर विश्वास ठेवला नसता. 

घरी गेल्यावर मी कितीतरी वेळ बेडवर लोळत पडले होते. आईबाबांनी त्या सिनेमाबाबत विचारलं जो मी दिवसभर बघून आले होते. मी म्हटलं खूपच वाईट सिनेमा होता. मध्यरात्री जेव्हा मी बाथरूममध्ये गेले तेव्हा मी पाहिलं तर मला ब्लीडींग होत होतं. मी लगेच त्याला फोन लावला. 

ऐक ना, मी कुजबूजत त्याला म्हटलं. माझा आवाज बाथरूममध्ये घूमत होता. मला भीती वाटत होती की, माझ्या आईबाबांना माझा आवाज गेला तर. मी आनंद होत त्याला सांगितलं. 

"म्हणजे खरंच पहिल्यांदा आपला सेक्स करून झाला…", तो म्हणाला. 

“हो”

“कूल! खूपच दमलो मी पण जे झालं ते योग्य झालं.”

मी जोरात हसले.

माझं हसणं ऐकून त्यालाही हसू आलं. तो म्हणाला की, “पुढच्या वेळी तरी निदान आपण बरोबर करू.”

तर असा होता माझा #firsttimesexचा अनुभव.