#MyStory: तो मला सेक्ससाठी ब्लॅकमेल करत होता…

#MyStory: तो मला सेक्ससाठी ब्लॅकमेल करत होता…

जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट नव्याने मिळणार असते, तेव्हा त्याबाबतच्या इतर गोष्टी आपल्याकडून नजरअंदाज केल्या जातात. लक्षात ठेवा...समोरचा व्यक्ती आपल्याशी चांगला बोलला किंवा वागला म्हणजे त्याचंही आपल्यावर प्रेम असेलच असं नाही. अगदी त्याने आपल्या प्रेमात असल्याचं मान्य केलं तरी प्रेमात पडल्यावरही सजगता बाळगणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचीही परिस्थिती आजच्या #MyStory प्रमाणे होऊ शकते. कारण ऐनवेळी तिच्याबाबत जे घडलं ते घडलं नसतं तर…..जाणून घ्या नेमकं काय झालं या #MyStory मध्ये जेव्हा प्रियकरानेच प्रेयसीला सेक्ससाठी ब्लॅकमेलिंग सुरू केलं.

मी एका छोट्या शहरात राहणारी मुलगी होते. जिथे सगळे माझ्या बाबांना आणि भावांना ओळखते होते. आमच्या कुटुंबाची समाजात चांगली प्रतिमा होती. माझं लहानपणापासूनच शिक्षण मुलींच्याच शाळेत झालं होतं. त्यामुळे माझी मैत्रीसुद्धा नेहमी मुलींशीची झाली होती. असं असल्यामुळे कॉलेजमध्ये जेव्हा मी अॅडमिशन घेतलं तेव्हा मला खूपच उत्सुकता होती. मोठ्या शहरातील कॉलेजमध्ये मला अॅडमिशन मिळालं. जिथे मुलींसोबतच मुलंही एकत्र शिकत असत. माझ्यासाठी हे सर्व एखाद्या स्वप्नासारखं होतं. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्यासोबत एकत्र शिकणं.  

पण त्यावेळी मनात असा विचार कधीच आला नव्हता की, मला कोणीतरी सेक्ससाठी ब्लॅकमेल करेल.

मी तशी दिसायला छान होते. पण छोट्या शहरातून आणि पारंपारिक वातावरणात वाढल्यामुळे मोठ्या शहरातील सवयी आत्मसात करणं मला जरा कठीण जात होतं. इथलं सगळं जगच वेगळं होतं. कॉलेजच्या इतर मुली सर्रास क्रॉप टॉप, शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालायच्या. पण मला काही हे जमत नव्हतं. मी आपली रोज कॉलेजला जाताना जीन्स आणि साधासा टीशर्ट असंच घालत असे. दुसऱ्या मुली मात्र अगदी फॅशनेबल कपडे घालून येत असत. पण मी मात्र असं काही घालायची हिम्मत करू शकले नाही. मी कधी मुलांसोबत शिकले नव्हते त्यामुळे या संपूर्ण वातावरणात मला सहज वावरताही यायचं नाही. 

पण या सगळ्यांमध्ये मला भेटला तो. जो काहीतरी हटकेच होता. माझ्या संपूर्ण ग्रुपमधला तो एक गोड मुलगा होता. तो जेव्हा जेव्हा माझ्याकडे बघायचा तेव्हा मला अनकंफर्टेबल वाटू लागायचं. पण तो मात्र मला कंफर्ट फील करून द्यायचा पूरेपर प्रयत्न करायचा. मलाही तो आवडू लागला होता. एक दिवस त्याने मला कॉफीसाठी विचारलं. मीही त्याला लगेच होकार दिला. अशाप्रकारे आमच्या मैत्रीला सुरूवात झाली. कॉलेजच्या पहिल्या वर्षी आम्ही दोघंही सतत एकमेकांसोबतच असायचो.

तो माझा पहिला बॉयफ्रेंड होता. पहिला मुलगा ज्याने माझा हात पकडला होता. पहिला मुलगा ज्याला मी किस केलं. तो कॉलेजजवळच राहायचा. कधी कदी आम्ही दोघं एकमेंकासोबत वेळ घालवण्यासाठी ग्रुपशिवाय वेगळ्या ठिकाणी फिरायला जायचो. कधी कधी त्याच्या घरीही जायचो. आम्ही दोघंही प्रत्येक भेटीत एकमेकांच्या जवळ येत गेलो. आमच्या प्रेमाने आम्हाला हळूहळू फिजीकलीही जवळ आणलं. एक दिवस त्याच्या घरी मेकआऊट सेशननंतर मी घाबरले आणि काहीतरी कारण काढून तिथून बाहेर पडले. माझं त्याच्यावर प्रेम होतं पण मी यापेक्षा जास्त काही करण्यासाठी तयार नव्हते. 

त्यावेळी त्याने असं जाहीर केलं की, त्याला काहीच प्रोब्लेम नाहीयं आणि त्याला कळतंय की, मी पूर्णपणे फिजीकल होण्यासाठी अजून तयार नाहीयं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पुन्हा माझ्या छोट्या शहरातल्या घरी आले. इथे आल्यावर मला चैनच पडत नव्हतं. मी तासंतास त्याच्याशी फोनवर बोलत असे, त्याला मेसेज करत असे किंवा फेसबुकवर आम्ही चॅट करायचो.

एका रात्री उशिरा त्याने मला मेसेज केला, तू काय करत्येस?

काही खास नाही, मी उत्तर दिलं. 

मला तुझा एखादा फोटो पाठव ना तुझी खूप आठवण येतेय, हा मेसेज वाचून मला बरं वाटलं आणि मी त्याला माझा एक सेल्फी पाठवला. 

आता मला तुझा एक खास फोटो पाठव, असं तो म्हणाला. मी खूपच बोल्ड फील करत होते. म्हणून मग मी पण माझा एक रिव्हीलींग फोटो त्याला पाठवला. 

मला खरोखरचं असं वाटू लागलं होतं की, त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आमचं प्रेम खरंच खरं होतं का हे मात्र कळायला मला नंतर कळलं. 

Shutterstock

कॉलेजचं दुसरं वर्ष सुरू झालं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी खूपच एक्सायटेड होते. मी कॉलेजमध्ये गेल्यावर त्याला माझ्याकडे येताना पाहिलं. त्याला बघून माझ्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. त्याने माझ्याजवळ येऊन सांगितलं की, इकडे ये मला तुझ्याशी बोलायचं आहे. 

तो मला एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि म्हणाला की, कॉलेजनंतर त्याच्या घरी येण्यासाठी सांगू लागला. कारण त्याला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. त्याच्या या बोलण्याने मला काहीच कळलं नाही. पण संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी मी तयार झाले. 

कॉलेजनंतर मी त्याच्या घरी गेले. त्याचा मूड काहीसा बिघडलेला होता. आम्ही बोलायला सुरूवात केली. पण त्याने अचानक त्याच्या फोनमधील माझे फोटो दाखवायला सुरूवात केली. ज्यापैकी काही फोटोज मी त्याला पाठवले होते आणि काही त्याने काढलेले होते. ते सर्व फोटो रिव्हीलिंग होते. जे फोटोज मुली आपल्या बॉयफ्रेंडला पाठवतात. त्यानंतर त्याने मला मी त्याला पाठवलेले काही मेसेज दाखवले. काही असे मेसेजेस जे मी त्याला पाठवायलाच नको होते. त्यानंतर त्याने मला सेक्स करण्यासाठी ब्लॅकमेल करत सांगितलं की, तुला माझ्यासोबत सेक्स करावाच लागेल नाहीतर मी सगळ्यांना याबाबत सांगेन आणि हे सर्व फोटोज इंटरनेटवर टाकेन. 

मी तर भीतीने अक्षरशः थरथरू लागले, मला तर रडूच आलं आणि मी त्याच्या घरातून पळ काढला. 

त्या रात्री मला झोपच आली नाही. मी खूप घाबरले होते. ही गोष्ट घाबरण्यासारखीच होती. 

त्याने मला जवळजवळ एक आठवडा सेक्ससाठी असं ब्लॅकमेल केलं. या दरम्यान त्याने मला एकदाही फोन किंवा मेसेज केला नाही. तो मला पाहताच असं काहीतरी बोलून निघून जायचा की, मला भीतीच वाटायची. जाहीर होतं की, हे सगळं तो त्याने केलेल्या प्लॅनप्रमाणे करत होता. 

कॉलेजमधल्या माझ्या एका टीचरने हे सर्व नोटीस केलं की, मी आजकाल खूपच टेन्शनमध्ये दिसते. तिने मला विचारलं की, मी इतकी घाबरलेली आणि टेन्स का असते. मी इतकी घाबरलेले होते की, रडून रडून मी तिला सगळं सांगून टाकलं. 

ती सरळ त्या मुलाच्या घरी गेली आणि त्याच्या आईशी बोलली. खरंच माझं नशीब इतकं चांगलं होतं की, त्याच्या आईनेही टीचरची मदत केली आणि दोघींनी मिळून त्याला खूप ओरडाओरडा केला आणि घाबरवलं. घाबरून त्याने माझे सगळे फोटो डिलीट केले आणि प्रिंट्ससुद्धा जाळल्या. त्यानंतर त्याने मला कधीच सेक्ससाठी जबरदस्ती केली नाही. 

अशाप्रकारे माझी पहिली रिलेशनशिप संपली. त्यानंतर तो मला जेव्हा कॉलेजमध्ये दिसायचा तेव्हा मला विचित्र पद्धतीने बघायचा. पण त्याची काही बोलायची हिम्मत होत नसे. कारण टीचरने त्याला अशा काही पद्धतीने फेल करण्याबाबत आणि प्रिन्सीपलबाबत घाबरवलं होतं की, तो माझ्याजवळ येतचं नसे. 

खरंच मी एका मोठ्या संकटातून वाचले होते. ज्या दिवशी त्याने माझे फोटो डिलीट केले. त्या दिवशी मी स्वतःशी आणि माझ्या टीचरला वचन दिलं की, आता अशाप्रकारे पुन्हा कधीच स्वतःला संकटात टाकणार नाही.