#Mystory:त्याला निवडणं माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती

#Mystory:त्याला निवडणं माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती

आयुष्यात प्रत्येकाकडून काहीना काही चुका होतच असतात.काही चुका या निस्तरता येतात. तर काही चुका निस्तरता निस्तरता नाकी नऊ येतात. पण जगात अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की, ज्याने अजिबात चूक केली नाही.( असल्यास तिला भेटून काही टीप्स नक्कीच घ्यायला हव्यात नाही का?)नात्यांमध्येही आपण बरेचदा अशी चूक करत असतो. म्हणजे चांगलं वाईट ओळखायला आपण चुकतो. राधाच्या बाबतीतचही अगदी तसेच काहीसे झाले. तिने सगळ्यांच्या संमतीने एक निर्णय घेतला खरा.. पण तिचा तोच निर्णय तिचे संपूर्ण आयुष्य बदलवून गेला. ही एक चूक आता तिला निस्तरणे कठीण आहे.तिच्या याच कहाणीतून आज आपण जाणून घेणार आहोत… असा कोणता निर्णय तिला आयुष्यभर चटका लावून गेला ते….

#MyStory... आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

shutterstock

चांदीचा चमचा तोंडात घेऊनच राधा जन्माला आली. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या राधाला मुलगी म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी रोखण्यात आले नाही. घरात वेगवेगळ्या विचारांची माणसे एकत्र छताखाली राहून देखील तिला कायमच तिच्या मनाप्रमाणे वागू दिले. शिक्षण, मौज-मस्ती, मित्र मैत्रिणी या कशावरच तिला कधीच बंधने नव्हती. हा पण लग्नाचा निर्णय तिने घरातील सगळ्यांच्या संमतीने घ्यायचा हा हट्ट मात्र घरातल्या सगळ्यांचाच होता. आता या मध्येही जबरदस्ती नव्हती. राधा ज्या श्रीमंतीत येथे वाढली तिच श्रीमंती तिला तिच्या सासरी मिळावी हीच सगळ्यांची अपेक्षा होती.

राधाचे कॉलेज संपल्यानंतर तिला लग्नासाठी स्थळ येऊ लागली. दिसायला सुंदर शिवाय घरातल्या सगळ्यांचं ऐकणारी, संस्कारी अशी राधा पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. तिच्यासाठी मुलांच्या रांगाच लागल्या. घरातले मुलीला चांगली स्थळ येत आहेत म्हणून खुश होते. शिवाय स्थळ ही त्यांच्याहून अधिक श्रीमंताची येत असल्यामुळे  कुटुंबियांचा आनंद अधिक होता. पण राधाला काय हवं हे राधाला कधीच विचारण्यात आलं नाही आणि तिने कधी सांगितलेही नाही. घरातल्यांनी सांगितले म्हणून तिने आर्किटेक्टचं शिक्षणं घेतलं. पण तिला त्या शिक्षणानंतर काय करायचे असे न विचारता तिच्या मागे लग्नाचा घोष लावला. मग काय तिनेही शिक्षण मागे ठेवून कुटुंबाचे ऐकायचे ठरवले. दोन चार मुलांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्यात अनिकेत आला. अनिकेत म्हणजे तिच्या कॉलेजमधलाच मुलगा. तिच्यावर त्याचं प्रेम होतं. पण त्याने तिला ते कधीच सांगितलं नाही. तिच्या लग्नाचे घरी पाहतात हे कळाल्यावर त्याने तिला रितसर मागणी घालायचे ठरवले. 

तो तिच्या घरी पोहोचला. कोणाच्याच परीचयाचा नसल्यामुळे त्याला दारातच अडवण्यात आले. पण दिसायला देखणा सुशिक्षित असा वाटल्यामुळे राधाच्या धाकट्या काकीने ‘तुम्ही कोण?’ असा प्रश्न विचारला. त्याबरोबर त्याने ‘ मी अनिकेत…. राधा आणि मी एकत्र शिकायला होतो.’ आता राधच्या ओळखीचा म्हटल्यावर त्याचे स्वागत तर होणारच. तो आत आला कोचावर बसला .. काकीने , ‘थांबा राधाला बोलावते’ असे म्हणत. राधाला हाका मारायला सुरुवात केली. तो वर राधाचे वडील आले. त्यांनी बोलायला सुरुवात करताच अनिकेत म्हणाला, ‘काका मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे.’ राधाचे वडील . ‘हो बोला ना’.. राधाच्या लग्नाचं कळलं म्हणून आलो.  राधाचे वडील धीरगंभीर झाले. अनिकेत बोलतच होता. मोठ्या आत्मविश्वाने त्याने मला राधा आवडते मला तिच्याशी लग्न करायचे आहे. तिला मागणी घालण्यासाठी मी इथे आलो आहे असे सांगितले. राधाच्या वडिलांना त्याचे ते बोलणे पटले नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्या आईवडिलांनी हे काम करायला हवे होते. राधाच्या वडिलांनी ‘तुझे आईवडील कुठे?’ असे विचारल्यावर अनिकेतने ते गावी असल्याचे सांगितले. अनिकेतने त्यांना मी माझ्या आईवडिलांना राधाची कल्पना दिली आहे असे सांगितले. 

#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….

 राधाच्या वडिलांनी राधाला बोलावून सगळे काही सांगितले. राधाने अनिकेत वर्गातील हुशार मुलगा असल्याचे सांगितले. शिवाय त्याला लढ्ढ पगाराची नोकरी मिळाली हे ही सांगितले. परिस्थितीशी मात करुन त्याने हे सगळे मिळवले आहे. असे ती भरभरुन त्याच्याबद्दल बोलत होती. वडिलांना तिची बाजू कळली त्यांनी लगेचच घरात बैठक बोलावली. घरातल्यांना अनिकेत आवडला असला तरी राधासाठी तो त्यांना योग्य वाटत नव्हता. राधाला तो आवडला होता कारण तो फार मेहनती आणि आपल्या शिक्षणाचा सन्मान राखत पुढे शिकण्याची, काम करण्याची संधी देईल असे वाटत होता. शिवाय गरिबीतून वर आल्यामुळे त्याचे पायही जमिनीवर होते. राधा श्रीमंत आहे म्हणून त्याने तिला मागणी घातली असावी, अशी शंका राधाच्या काकीने काढली मग काय सगळचं फिस्कटलं. राधाला अनिकेत असा नाही हे माहीत असूनही सगळ्यांसमोर सिद्ध करता आले नाही. तिने अनिकेतला नकार दिला. पण तरीदेखील अनिकेतने ‘पुन्हा विचार कर, मी वाट पाहीन’ असे सांगितले होते. 

पण राधाच्या घरातल्या लोकांसाठी हा विषय संपला होता. या गोष्टीला दोन महिने झाले. राधाला अजूनही घरातल्यांनी अनिकेतला पसंद करावे असे वाटत होते. पण तसे झाले नाही. नियतीच्या मनात काही वेगळे होते. एका मोठ्या बिल्डरच्या मुलाचे स्थळ राधासाठी चालून आले. मंदार आणि राधा यांचा भेटण्याचा कार्यक्रम झाला. राधाला मंदार आवडला नव्हता. कारण तिच्या मनात अनिकेतने घर केलं होतं. पण घरातल्यांना कोणत्याही प्रकारे तिला दुखवायचे नव्हते. मंदारच्या घरात श्रीमंतीत लोळशील. तुला कशाचीच कमी राहणार नाही.. तो तुला सोन्याने मढवेल. कायम सुखात ठेवील. असे सांगून घरातल्यांनी तिचे लग्न मंदारशी लावून दिले. लग्नातला एकूणच थाट पाहिला तर त्यात श्रीमंती झळकत होती. राधाच्या वडिलांना मंदारमुळे समाधान मिळाले होते. 

shutterstock

पण जे स्वप्न राधाच्या वडिलांनी पाहिलं होतं. त्याहून काहीतरी भीषणच परिस्थिती निघाली लग्नाच्या अगदी काहीच दिवसात मंदारच्या घरात सगळं काही उलट आहे हे तिला जाणवू लागलं. इतक्या मोठ्या घरात राहूनही घरातल्यांचे विचार अत्यंत मागासलेले राधाला पैशांची कमी नव्हती पण तिला हवा असलेला मान तिला या घरात मिळत नव्हता. मंदार आठवडा आठवडा घरी नसायचा. घरात शिस्तीच इतकं वातावरण ही बाहेर जायची सोय नव्हती. बाहेर जायचे असेल तर ड्रायव्हरशिवाय जायची सोय नाही. माहेरी जायला तर परवानगीच नव्हती. इतक्या मोठ्या घरात इतकी माणसं असून देखील त्यांना खोलीतून बाहेर पडायला वेळ नसायचा. काही दिवसांनी मंदारला राधामध्ये काहीही रस नसल्याचे कळले घरातल्यांच्या आदेशामुळे त्याने राधाशी लग्न केले. मंदार घरी फारच कमी असल्यामुळे ही बाब लक्षातही येत नव्हती. पण एके दिवशी राधाला त्याचे घरी येणे म्हणजे केवळ आई-वडिलांची काळजी घेणे हे कळले.  तिच्यासाठी तो केवळ अकाऊंटमध्ये पैशाचा भरणा करत होता. पण तो तिच्याशी कधीही बोलला नव्हता. राधाला काय हवं ? हे त्याने तिला कधीच विचारलं नव्हतं. असाच एकदा मंदार रात्री घरी आल्यानंतर तिने त्याच्याशी बोलायचे ठरवले. तो गपचूप राधाशेजारी येऊन झोपला. राधा त्याला प्रेमाने मिठी मारायला गेली तोच त्याने हात बाजूला काढून ‘झोप’ असे तिला सांगितले. नवीन लग्न झाले आहे असे त्याच्या वागण्यातून अजिबात वाटत नव्हते. 

#MyStory: तेवढ्यात आईबाबा तिकडे आले…

shutterstock

त्याच्या या अजब वागण्याचा तिने शोध घ्यायचा ठरवले. मंदार पहाटे 4 ला उठून अलगद घराबाहेर  पडला. त्याच्या मागोमाग राधाही गाडी घेऊन निघाली. त्याचा पाठलाग ती करु लागली. तो एका गगनचुंबी इमारतीच्या आत शिरला. त्याच्या मागोमाग तीही. वॉचमनकडे  मंदारची चौकशी केल्यावर त्याने साहेब वरच्या माळ्यावर राहतात सांगितले. ती तशीच घरी परतली. दुसऱ्या दिवशी ती त्या बिल्डींगकडे गेली. आता तिला पत्ता माहीत होता. तिने खाली पाटी पाहिली पाटीवर  mr & mrs. मंदार असे नाव लिहिले होते. तिच्या मनात कितीतरी विचारांचे काहूर माजले होते. ती लिफ्टने वर गेली तिने फ्लॅट शोधून डोअरबेल वाजवली. दरवाजा एका सुंदर मुलीने उघडला तिने कोण? असे विचारले. मंदार आहेत का? तिने मंदार झोपल्याचे सांगितले.. काही काम आहे का?  तुम्ही मला सांगू शकता मी त्यांची बायको आहे.. हा शब्द ऐकताच तिने तेथून जाण्याचा निर्णय घेतला. आपली घोर फसवणूक झाल्याचे तिला कळले.

तिने घरी आल्यावर कसलाही विचार न करता घरी परतण्याचे ठरवले. घरी मंदारविषयी खरे सांगितल्यानंतर घरातल्यांनीही खातरजमा केली. मंदारचे लग्न झाले होते. त्याने दुसरे लग्न केले होते. हे घरी कळले. आता काय राधाच्या आयुष्याला खीळ बसली होती कायमची.. घरातल्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि राधालाही.. जो अनिकेत अगदी ठामपणाने माझ्याशी लग्न करायला तयार होता त्याला न निवडता तिने चुकीच्या माणसाची केलेली निवड तिला आयुष्यभरासाठी दु:खी करुन गेली होती.  मंदार त्याच्या आणि अनिकेत त्याच्या आयुष्यात सुखी होते. एकटी राहिले होते फक्त मी