एका स्पर्शातूनही तुम्हाला कळू शकते व्यक्ती 'चांगली' की 'वाईट' | POPxo

एका स्पर्शातूनही तुम्हाला कळू शकते व्यक्ती 'चांगली' की 'वाईट'

एका स्पर्शातूनही तुम्हाला कळू शकते व्यक्ती 'चांगली' की 'वाईट'

दिवसभरात आपल्याला कितीतरी स्पर्श होतात. काही स्पर्शातून निखळ माया दिसून येते. तर काही स्पर्शातून समोरच्या मनातील तुमच्याबद्दलचे वाईट विचार. स्पर्शज्ञानाविषयी मुलांना अधिक कळावे यासाठी लहान वयातच शाळांमधून मुलांना good touch आणि bad touch शिकवला जातो. पण लहान मुलांसोबत महिलांनाही हे स्पर्शज्ञान ओळखता यायला हवे. आपण दिवसभरात कितीतरी लोकांना भेटतो. जर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर पडत असाल तर तुम्ही दिवसभरात कितीतरी लोकांना धडकता काही स्पर्श तुम्हाला चीडचीड करायला भाग पाडतात. तर काही स्पर्शामुळे तुम्ही माफी देखील मागता. आता या स्पर्शातून तुमच्या आयुष्यातील व्यक्ती चांगली की वाईट ते कसे ओळखायचे ते आज आपण पाहूया

चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या

पाठीवरुन हात फिरवणे

shutterstock
shutterstock

शाबासकी देण्यासाठी, समजावताना अनेकदा पाठीवरुन हात फिरवला जातो. पण हा असा स्पर्श केवळ तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला करु शकते. पण जर तुम्ही ऑफिस किंवा अशा ठिकाणी असाल आणि तुमचा मेल बॉस किंवा कलिग तुम्हाला असा स्पर्श करु शकत नाही. जर तो अशा प्रकारे तुम्हाला स्पर्श करत असेल तर हा स्पर्श तुमच्या प्रोफेशनल नात्यात अजिबात चांगला नाही. जर तुम्ही स्वत: महिला असाल आणि तुमची बॉस महिला असेल तर कदाचित ती तुम्हाला असा स्पर्श करु शकेल त्यावेळी त्याचा अर्थ वाईट असेलच असे नाही. पण पुरुष सहकाऱ्यांनी तुमच्या आवडीचा विचार न करता अशा प्रकारचा स्पर्श करणे चांगले नाही.

घट्ट हात मिळवणे

shutterstock
shutterstock

आपण एखाद्या नवीन सहकाऱ्याला भेटल्यानंतर त्यांना हाय हॅलो करताना शेकहँड करतो. शेकहँड करण्याचीही एक पद्धत असते. म्हणजे एखादी व्यक्ती जर तुम्हाला शेकहँड करताना आत्मविश्वासाने हात एक दोन वेळा शेक करुन सोडत असेल तर ठिक. पण काही जण हात बराच वेळ पकडून ठेवतात.हा स्पर्श अनेकांना खटकतो आणि तो योग्यच आहे. कोणाचाही हात कारण नसताना असा घट्ट पकडून ठेवणे हे चांगले नाही. जर तुमच्या कार्यालयात एखादी व्यक्ती तुमचा हात काही गोष्टी करताना असा पकडून ठेवत असेल तर तुम्ही त्यांना हात सोडण्यासाठी वेळीच सांगा. जर तुम्ही काहीही बोलला नाहीत तर त्यातून चुकीचा अर्थही जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला या स्पर्शाची काही आपत्ती नाही असे समोरच्याला वाटू शकते.

चेहऱ्यावरील फॅट कमी करतील हे सोपे व्यायामप्रकार

खांद्यावर हात ठेवणे

shutterstock
shutterstock

खांद्यावर हात ठेवण्याचा अधिकार तुमच्या जोडीदाराला, तुमच्या आई-वडिलांना आणि फक्त तुमच्या जवळच्या व्यक्तींना असतो. जर एखादी व्यक्ती फारच कमी ओळखीमध्ये तुमच्या खांद्यावर हात ठेवत असेल तर त्याचे असे स्पर्श करणे कधीच चांगले नाही. खांद्यावर हात ठेवून तुमचा खांदा दाबणे चांगले नाही. 

कंबरेत हात घालणे

shutterstock
shutterstock

तुमच्या कंबरेला हात लावणे तर त्याहूनही पुढचे आहे. तुमच्या कंबरेला हात लावणे कोणत्याही प्रोफेशनल नात्यात बसत नाही. जर तुम्हाला फॉर्मल रिलेशनशीपमधील व्यक्ती कंबरेला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला वेळीच रोखा. तुमचे शरीर हे कोणालाही स्पर्श करण्यासाठी नाही हे त्याला आवर्जून सांगा. तरच त्या व्यक्तीला तुम्ही किती कठोर आहात ते कळू शकेल. जर तुम्ही एकदा त्या व्यक्तीला रोखले नाही तर ती व्यक्ती वारंवार हे करण्याचा प्रयत्न करेल.

मांड्यावर हात ठेवणे

shutterstock
shutterstock

तुमच्या मांड्यांना मस्करीतही हात लावणे चांगले लक्षण नाही. काहींना एखादा विनोद सांगताना कोणाच्याही मांड्यांवर जोराने हात मारायची सवय असते. जर तुम्हाला अशी सवय असेल तर तुम्ही सवय आताच बदला कारण तुमची ही सवय तुम्ही वाईट व्यक्ती आहात असे दर्शवू शकते. तुमच्या मांडीवर जर एखादी अनोळखी किंवा अगदी फारच कमी ओळक असलेली व्यक्ती हात ठेवत असेल. नुसताच हात नाही. तर तो हात ठेवून तुमची मांडी कुरवाळण्याचेकाम करत असेल तर अशा व्यक्तींना नक्कीच रोखा.

तुमच्या चेहऱ्याला हात लावणे

shutterstock
shutterstock

तुमचा गालगुच्चा घेणे, तुमच्या चेहऱ्यावरुन हात फिरवणे यामध्ये एखाद्याची तुमच्यावर मायाही असू शकते. पण जर एखादी व्यक्ती तुम्हाला कारण नसताना तुमचा चेहरा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल. तुमच्या ओठांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चांगले नाही. तुमच्या जोडीदाराव्यतिरिक्त असा स्पर्श तुम्हाला कोणीही करु शकत नाही.आणि तो करुही नये.

जर तुम्हालाही अशा स्पर्शांचा अनुभव आला असेल आणि हा स्पर्श तुम्हाला नकोसा वाटत असेल तर तुम्ही त्याचा विरोध करायला शिकायला हवे.

#sugarcraving कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय