ADVERTISEMENT
home / Brothers
Relationship म्हटलं की, भांडणं आलीच…नाही का?

Relationship म्हटलं की, भांडणं आलीच…नाही का?

नाते कोणतेही असो..त्यामध्ये भांडण आलीच. जगात असे कोणीच नसेल ज्याचे एकदाही भांडण झाले नसेल. पण तुम्हाला माहीत आहे का? भांडण होणे आरोग्यासाठी चांगले असते. आता तुम्ही म्हणाल ते तसे… बरोबर ना ? पण ज्यावेळी तुम्ही भांडण करता त्यावेळी तुमच्या मनातील सगळी कटुता मनातून बाहेर पडत असते. कटुता बाहेर पडल्यानंतर मिळणारी मन:शांती ही इतर कशापेक्षाही अधिक महत्वाची असते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही नात्यात भांडण होत असतील तर ठीक आहे.. कारण या भांडणानंतरच तुम्हाला तुमची व्यक्ती कळते आणि भांडण कमीत कमी होण्यास तुम्हाला मदत मिळते.

सासू- सुनांची भांडण

GIPHY

आता या भांडणाबद्दल काय सांगायचे. आजच्या नव्या युगातही अनेक सासू- सुनांचे पटत नाही. एकमेकांची चहाडी सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. पण एकमेकांना सोडून दूर जण्याचा विचारही ते करत नाही.जगभरात सासू-सुना हे असं कॉम्बिनेशन आहे जे ‘तुझं माझं जमेना पण तुझ्या वाचून करमेना’ असे आहे. तुमचंही सासूशी किंवा सुनेशी सतत खटके उडत असतील तर तुम्हा मैत्री करण्यासाठी दोघांना एकमेकांना वेळ देण्याची गरज आहे. सुनांना त्यांच्या सासूला समजून घेण्याची गरज आहे आणि सासूला त्यांच्या सूनांचे लाड करण्याची गरज आहे. दोघांनी थोडासा पुढाकार घेतला तर  भांडणं संपूर्ण मिटणार नाही. पण काही अंंशी तुम्ही तुमचे relationship एन्जॉय करु शकता.

ADVERTISEMENT

रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या

नवरा- बायकोचे नाते

GIPHY

पत्रिकेत कितीही गूण जुळले असले तरी नवरा- बायकोमध्ये कधीतरी खटके उडतातच. ही भांडण कधीकधी इतकी विकोपाला जातात की, अनेक जण एकमेकांवर प्रेम करत असूनही टोकाचा निर्णय घेतात की, त्यांना त्यांचा ego सगळ्यात जास्त महत्वाचा वाटतो. पण थोडा विचार करुन पाहा तुम्ही जितके आतताईपणे भांडता.. त्यामध्ये तुमची शक्ती, बुद्धी दोन्ही वाया जाते. काहीही समजून घेण्याची तुम्हा दोघांची स्थिती नसेल अशावेळी तुम्हाला ती भांडण थांबवता आली तर फारच उत्तम…कारण असे झाले तर पुढे होणारा परिणाम तुम्हाला रोखता येतील.तुम्हाला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे आहे आणि तुम्हीच एकमेकांचा आधार आहात हे कळल्यावर मग तुम्हाला तुमचा राग शांत करता येईल.

ADVERTISEMENT

मुलींसाठी मराठी वृत्तीच्या स्थितीबद्दल देखील वाचा

गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांचे भांडण

GIPHY

अरे बापरे यांच्या नात्यात तर सततच काहीना काही होत असते. मुळातच हे नाते अगदी कोवळे असते. कारण समोरच्या व्यक्तीला पारखताना अनेकदा गैरसमजही निर्माण होतात. म्हणजे ही व्यक्ती आपल्याला फसवत तर नसेल ना ही भीती सतत एकमेकांना असते. अशाच ही व्यक्ती आपल्या मनाविरुद्ध वागली की मग उगाचच वाद उद्भवतात. काहींची ही भांडणे इतकी विकोपाला जातात की, समोरच्याला वाईटही बोलले जाते. पण असे करुनही ये रे माझ्या मागला म्हणत पुन्हा एकदा हे दोघे एकत्र येतात. त्यामुळे गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडमध्ये अगदीक् क्षुल्लक कारणावरुन भांडणं होत असतील तर तुम्ही त्यामध्ये पडायला नको. कारण अशा भांडणाच्या निमित्ताने या दोघांना एकमेकांसाठीचा वेळ मिळत असतो. 

ADVERTISEMENT

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

आई- मुलाचे नाते

GIPHY

घरातही भांडण होतातच. आई-मुलीचे किंवा आई- मुलाचे भांडण होतच असते. मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी कायमच लहान असतात. असा डायलॉग आई कित्येकदा मारते आणि तुम्हाला काही गोष्टी करण्यांपासून अडवते. मग काय आई वाईट असे वाटून आईशी कधीकधी कचाकच भांडले जाते. पण आईशी कितीही भांडण झालं, ती चिडली… तरी तुम्हाला सोडून ती कधीच जात नाही. आईसोबत होणाऱ्या भांडणानंतर उलट तिची माया अधिक वाढते. कारण तिला हट्टी मुलांना समजून घेताना… आणि समजावताना नेहमीच आनंद मिळत असतो.

ADVERTISEMENT

Also Read Relationship Status In Marathi

मित्र-मैत्रिणींचे नाते

GIPHY

अनेकदा मित्रांमध्येही भांडण झालेली ऐकली आहे. अगदी घट्ट मैत्री असून देखील काही जण एकमेकांशी इतकी भांडतात की, हे खरचं मित्र आहे असा प्रश्न निर्माण होतो. पण कधीतरी उडणारे खटके हे चांगले असतात. कारण त्यांच्यामध्ये काहीतरी निर्णयाला घेऊनच भांडण होत असते. एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला कोणत्याही अडचणीत पाहायचे नसते म्हणूनच कधीकधी काही गोष्टी त्यांचा पारा चढतो. अशावेळी तुम्ही नक्की भांडा पण एकदा तरी विचार करा ती व्यक्ती जी आपल्याशिवाय राहू शकत नाही. ती आज आपल्याशी असा वाद का घालत आहे. हे जाणून घ्या. शांत राहा आणि आपल्या मित्राला मस्त जादूची झप्पी द्या.

ADVERTISEMENT

#Relationship सुरु करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

अजूनही अशी बरीच नाती आहेत ज्यात भांडण अगदी हमखास असतात. पण या भांडणातून खूप काही चांगले घडते हे लक्षात ठेवा.. आता भांडण विकोपाला नेऊ नका. कुठे थांबायचे याचे भान ठेवा. तुम्हाला नक्कीच तुमचे नाते दृढ झालेले जाणवेल.

08 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT