ADVERTISEMENT
home / Acne
पिंपल्सना करा bye bye या सोप्या उपायांनी (Tips To Avoid Pimples In Marathi)

पिंपल्सना करा bye bye या सोप्या उपायांनी (Tips To Avoid Pimples In Marathi)

पिंपल्सचा त्रास म्हणजे एकदम डोक्याला ताप होऊन जातो. एकदा का पिंपल आला की, मग तो चेहऱ्यावर जायचं नाव घेत नाही. त्या एका पिंपलला चेहऱ्यावरुन घालवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण जर तुम्ही खूप काही न करता काही ठराविक गोष्टी केल्या तर तुम्ही तुमच्या पिंपल्सना bye bye करु शकता. जाणून घेऊया पिंपल्स घालवण्यासाठीचे असेच काही सोपे उपाय

Pimple-free चेहरा मिळवण्यासाठी करा घरगुती उपचार

बर्फाचा द्या शेक (Shake The Ice)

shutterstock

ADVERTISEMENT

 जर तुम्हाला तुमच्या पिंपल्सचे डाग राहावे असे वाटत नसेल आणि पिंपल्स लवकर सुकावा असे वाटत असेल तर तुम्ही बर्फाचा खडा घेऊन तो टर्किश टॉवेलमध्ये गुंडाळून तुमच्या पिंपल्सवर फिरवा. जर तुम्हाला एकच पिंपल आला असेल तर तुम्ही त्या पिंपल्सवर बर्फ काही सेंकद ठेऊन द्या. असे करताना तुमची त्वचा थोडीशी लाल होते. पण काळजी करण्याचे फार कारण नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बर्फ लावताना त्यामध्ये पुदीना किंवा ग्रीन टी टाकू शकता. त्यामुळे तुमचे पिंपल्स सुकायला मदत होईल.

(हे करुनही पिंपल्स बरा होत नसेल तर घाई करु नका. थोडा वेळ द्या)

पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका

साफी किंवा तत्सम औषधांचे करा सेवन (Drink Safi Or Similar Medicine)

साफी, कुमारी आसव, वैद्य पाटणकर काढा, एरंडेल तेल असे काही दिले जायचे. पिंपल्स आल्यानंतर जर तुम्ही या औषधांचे सेवन केले तर तुम्हाला पिंपल्स नॅचरली पिंपल्स घालवता येईल. त्यामुळे तुम्ही रोज या औषधांचे सेवन करा. यांचा कोणताही विपरीत परिणाम तुमच्या त्वचेवर होत नाही. 

ADVERTISEMENT

व्हाईटहेड्सपासून मुक्त कसे व्हावे हे देखील वाचा

 

केस ठेवा स्वच्छ (Keep The Hair Clean)

shutterstock

ADVERTISEMENT

जर तुमचे केस अस्वच्छ असतील तरीही पिंपल्स लवकर जात नाही. जर तुम्हाला पिंपल्स लवकर जावे असे वाटत असेल तर तुम्ही तुमचे केस स्वच्छ ठेवा. जर तुम्हाला कोंड्याचा त्रास होत असेल तर तुम्ही त्यावरचा इलाज तुम्ही करुन घ्या. कारण जर तुमचे केस अस्वच्छ राहिले तर तुमचे पिंपल्स लवकर जाणार नाहीत. उलट तुम्हाला जास्त पिंपल्स येतील. त्यामुळे तुम्ही चांगल्या शॅम्पूने केस स्वच्छ करा. चांगल्या शैम्पूद्वारे मुरुम कसे काढायचे ते शिका.

चेहऱ्याला लावा अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar For Face)

shutterstock

पिंपल्सवर अॅपल सायडर व्हिनेगरही चांगले काम करते. तुम्हाला जर अॅपल सायडर व्हिनेगरची भीती वाटत असेल तर तुम्ही आधी ते तुमच्या मानेला लावून पाहा. जर तुम्हाला त्रास झाला असे वाटत असेल तर तुम्ही त्याचा वापर करु नका. जर तुम्हाला त्रास झाला नाही. तर तुम्ही याचा वापर करु शकता. अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करताना तुम्ही त्यात पाणी घालायला विसरु नका. थेट अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करु नका. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमचे पिंपल्स लवकर वाळू शकतात.

ADVERTISEMENT

कानातील मळ असा काढत असाल तर आताच असे करणे थांबवा

 

व्हिटॅमिन C चे करा सेवन (Consume Vitamin C)

पिंपल्स आल्यानंतर ते पुन्हा येऊ द्यायचे नसतील तर तुम्ही तुमच्या शरीराला काही गोष्टी पुरवणे आवश्यक असते. तुमच्या उत्तम त्वचेसाठी व्हिटॅमिन C महत्वाचे असते. त्यामुळे जर तुम्ही फळांचे सेवन करत नसाल तर व्हिटॅमिन C चे सप्लिमेंट घ्यायला विसरु नका. हल्ली बाजारात व्हिटॅमिन C सप्लिमेंट मिळतात. त्यांच्या नित्यसेवनामुळे तुमच्या त्वचेमध्ये नक्कीच बदल झालेले दिसतील.

वाचा – व्हिटॅमिन ई युक्त आहार

ADVERTISEMENT

अशा प्रकारे तुम्ही तुमचे हट्टी पिंपल्स घालवू शकता. फक्त तुम्हाला आम्ही नेहमी सांगतो त्याप्रमाणे सगळे उपाय एकदम करुन पाहू नका.तुम्हाला तुमचे पिंपल्स घालवता येतील.

व्हिनेगर चे उपयोग (Apple Cider Vinegar Benefits In Marathi)

26 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT