आपण नेहमीच अगदी नखशिखांत सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. मग नखांना विसरून कसं चालेल. डिझाईनर ड्रेसेस, हाय हिल्स, पार्लरला जाणं आणि नेहमी स्टाईलिश आणि सुंदर दिसणं हे करत असताना नखांची सौंदर्य विसरू नका. कारण आजकाल तुमच्या अक्सेसरीज इतकंच महत्त्व तुमच्या नखांनाही प्राप्त झालं आहे. तुमच्या नखाचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं ते नेल आर्ट. आजकाल नेलआर्ट खूपच ट्रेंडमध्ये आहे. #NailArt मध्ये अगदी साध्यापासून ते महागड्या किंमतीपर्यंत अनेक प्रकारचे नेलआर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. पण तुम्हाला जर खास नेलआर्ट करण्यासाठी पार्लरला जाणं शक्य नसेल तर नो प्रोब्लेम. आधी नेल आर्टचे पॅटर्न्स पाहून घ्या आणि मग घरच्या घरी सोपं नेलआर्ट कसं करता येईल ते पाहा.
नेलआर्टमधील आकर्षक डिझाईन्स जी सध्या ट्रेंडमध्ये आहेत. टाकूया अशाच काही डिझाईन्सवर नजर.
पोल्का डॉट नेल आर्ट हे नेहमीच ट्रेंडमध्ये असलेलं नेल आर्ट आहे. यासाठी तुम्हाला आधी एक न्यूड नेल कलरची गरज लागेल. ज्यावर तुम्ही व्हाईट नेल कलरने पोल्का डॉट्स बनवू शकता. हे डिझाईन तुम्ही टूथ पिकचा वापर करूनही बनवू शकता. यासाठी तुम्ही कोणत्याही दोन कलरच्या कॉम्बिनेशनचा वापर डिझाईनसाठी करू शकता. यामधील एव्हरग्रीन कॉम्बो म्हणजे ब्लॅक अँंड व्हाईट.
जर तुमच्याकडे नेलआर्ट टूल्स किंवा फंकी शेड्स नसतील तर तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुमच्या नखांना सुंदर बनवू शकता. यामध्ये महत्त्व असते ते रंगांच्या कॉम्बिनेशनला. आपल्या स्टाईल स्टेटमेंटनुसार तुम्ही नखांवर वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकता.
या नेलआर्टचं वैशिष्ट्य म्हणजे हे लावणं खूपच सोपं आहे. हे लावल्यावर तुमच्या नखांना बोल्ड लुकही मिळतो. तुमची आवडती न्यूड शेड नखांवर लावा आणि स्पंज ग्लिटरमध्ये बुडवून नखांना लावा. हे सुकल्यावर त्यावर अजून एक न्यूड कोट लावा आणि नखं फ्लाँट करा.
आजकाल एनिमल प्रिंटही खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे लेपर्ड प्रिंट. या नेलआर्टसाठी खास ब्रशसुद्धा मिळतो. याशिवाय एनिमल प्रिंट डिझाईन्स स्टीकर्सही बाजारात मिळतात.
जर तुम्हाला फिश किंवा एक्वेरियमची आवड असेल तर हे नेल आर्ट डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. एक्वेरियम नेल आर्ट डिझाईन नखांवर फारच सुंदर दिसतं. या डिझाईनमध्ये ब्लू क्रिस्टल्स खूपच सुंदर दिसतात. पाण्याचा आभास होण्याकरता न्यूड कलरचा वापर तुम्ही करू शकता. यानंतर कापूस किंवा स्पंजच्या साहाय्याने ग्लिटर लावू शकता.
हा पॅटर्न खूपच सुंदर दिसतो. मॅनिक्युअर केल्यानंतर हे नेलआर्ट केल्यास खूपच छान दिसतं. या डिझाईनसाठी तुम्ही न्यूड नेलपेंट नखांवर लावून घ्या. एका पातळ ब्रशवर व्हाईट नेलपेंट घेऊन सुंदरसं फूल काढा. फूल काढून झाल्यावर फुलाच्या मध्यभागी पिवळ्या रंगाचा एक डॉट काढा. डिझाईन सुकल्यावर एक फायनल कोट लावा.
ज्या महिलांची नखं लांब असतात त्यांच्या नखांवर हे डिझाईन खूप छान दिसतं. हे डिझाईनला लावण्यासाठी तुम्ही मॅट नेलपेंट आणि ग्लिटरचा वापर करू शकता.
हे डिझाईनही कूल दिसतं. हे लावणंही खूपच सोपं आहे. यासाठी तुम्ही कोणत्याही रंगाचं कॉम्बिनेशन करू शकता आणि कोणतंही फंकी डिझाईन काढू शकता.
तसं तर नेल आर्टसाठी अनेक प्रकारचे ब्रश वापरले जातात. पण सर्वात जास्त सिंथेटिक ब्रिसलचा ब्रश चांगला मानला जातो. या ब्रशच्या साहाय्याने डिझाईनने एंगल्ड, लाईन, फ्लॅट, डॉटींग, डिटेल अशा डिझाईन्स बनवू शकता. या नेलआर्टने तुमची नखं खूप छान दिसतात.
जर तुम्हाला नखांवर ग्रेडीएंट आणि अक्रोमॅटीक डिझाईन हवं असेल तर तुम्ही स्पंज बॉब टेक्नीकचा वापर करू शकता. या टेक्नीकचा वापर करण्यासाठी बेस कोट लावून सुकल्यानंतर तसंच ठेवा. मग नेल पॉलीश लावून स्पंजचा वापर करून डिझाईन करा. नंतर नखाच्या आसपास लागलेलं नेलपेंट साफ करा.
जर तुम्हाला सोप्या पद्धतीने नखांवर नेल आर्ट करायचं असेल तर वापर करा स्टँप्सचा. बाजारात अनेक डिझाईन्सचे नेल स्टँप्स मिळतात. त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळे नेल आर्ट डिझाईन्स नखांवर करू शकता. यासाठी सर्वात आधी चांगली नेल पॉलिश लावा आणि त्यावर स्टँप लेयर लावून कव्हर करा.
हे नेल आर्ट नखांवर करून घेण्यासाठी तुम्हाला ब्युटी सॅलोन किंवा नेल आर्ट स्टुडिओमध्ये जावं लागेल. यासाठी एक खास मशीन वापरलं जातं ज्याच्या मदतीने डिजीटल प्रिंट तुमच्यावर नखांवर केलं जातं. फक्त हे नेल आर्ट थोडं महागडं आहे.
स्टेन्सील्सचा वापर नेल आर्टसाठी करणं ही खूपच सोपी पद्धत आहे. स्टेन्सील्सवर तुम्ही हार्ट किंवा इतर आकार बनवून मग ते नखांवर बनवू शकता.
एअरब्रश मशीन्सचा वापर आजकाल नखांना पेंट करण्यासाठीही केला जातो. सर्वात आधी नखांना बेस कोट लावून घ्या. मग तुमच्या आवडीच्या डिझाईननुसार स्टेन्सिल आणि स्टीकर नखांवर ठेवून एअरब्रशच्या साहाय्याने रंग भरा. मग स्टेन्सिल काढून नखाच्या आसपास लागलेला कलर एसीटोनने स्वच्छ करा.
जर तुम्हाला घरच्या घरी कोणताही पसारा न करता नेल आर्ट करायचं असल्यास सोपा मार्ग म्हणजे बाजारात मिळणारे नेल आर्ट स्टिकर्स वापरून नखं सजवणं. यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही आणि हवं ते डिझाईन तुम्ही थेट नखांवर लावू शकता.
स्प्लटर नेल आर्ट तुम्हाला घरच्या घरी करायचं असल्यास फॅन ब्रशचा वापर करावा लागेल. तुम्ही घरातील साध्या टूथब्रशनेही नखांना हा लुक देऊ शकता. ही एक सुंदर कला आहे.
नेट आर्टसाठी सर्वात जास्त वापरात असलेली टेक्नीक म्हणजे मार्बल नेल आर्ट टेक्नीक. ज्यामध्ये पाणाच्या बाऊलमध्ये वेगवेगळी नेलपॉलीश टाकून आकार निर्माण केले जातात. त्यानंतर त्या पाण्यात नखं बुडवून ठेवा. यामुळे तुमच्या नखांवर मार्बल इफेक्ट येतो.
हे नेल आर्ट वॉटर कलर पेंटिंग्जशी मिळतं जुळतं आहे. जे खूप हटके दिसतं. या नेल आर्टसाठी सर्वात आधी नखांवर बेस कोट लावून घ्या. त्यानंतर आवडतं नेलपेंट लावा. एका डिशमध्ये नेलपॉलीश घेऊन त्यात पाण्याचे थेंब टाका. मग ब्रशच्या साहाय्याने हे नखांवर लावा. असे नखांवर विविध रंग तुम्ही लावू शकता.
या नेल आर्टने तुमच्या नखांना एक हटके लुक मिळतो. हे नेल आर्ट करणं सोपं आहे पण जपणं थोडं कठीण आहे. कारण रोजची काम करताना हे नेल आर्ट निघण्याचीही भीती असते. हे नेल आर्ट तुम्ही नेल आर्ट स्टुडिओमध्ये किंवा स्टीकर डायमंड्सचा वापर करून घरीही करू शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारचा डायमंड लावून हवा आहे. यावर हे अवलंबून आहे.
हे नेल आर्टसुद्धा खूपच सोपं आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक नखांवर वेगवेगळ्या कलरचे नेलपेंट लावून हे नेलआर्ट करू शकता. घरच्या घरी करण्यासाठी आणि कोणत्याही अक्सेसरीजशिवाय तुम्ही हे नेल आर्ट करू शकता.
नखांना न्यूड नेलपेंट लावून त्यावर तुमच्या आवडीच्या रंगाने सिंपल डॉट्स यामध्ये तुम्ही काढू शकता. तुमच्या आवडीनुसार एखादा डॉट किंवा दोन-तीन डॉट्स तुम्ही काढू शकता.
हे नेल आर्ट करणं खूपच सोपं आहे. जर तुम्हाला नेल आर्टमधील परफेक्ट शेप देता येत नसतील तर फक्त नखांवर एक नेलपेंट लावा. ते सुकल्यावर ट्रान्सपरंट सेलो टेप लावा आणि दुसरं नेलपेंट लावा. अशा पद्धतीने ट्रान्सपरंट सेलो टेपच्या मदतीने झिकझॅक डिझाईन परफेक्टली क्रिएट करू शकता.
सध्या या शाईनी मॅटालिक नेलपेंट्सचा ट्रेंड आहे. यामुळे तुमच्या नखांना हटके लुक मिळतो आणि ती उठून दिसतात. तसंच या नेलपेंटमुळे नख लांबसडक असल्याचा भास होतो.
हा शब्द तुम्हाला बाहेर ऐकायला मिळणार नाही. ना कोणत्या सलोनमध्ये विचारल्यावर कारण हे नेल आर्ट आहे खास तुमच्यातील फॅन्ससाठी. जर तुम्हाला एखादं कार्टून कॅरेक्टर किंवा फिल्म सीरिज आवडत असेल तर तुम्ही हे नेल आर्ट करून घेऊ शकता.
सध्या सगळीकडेच क्रेझ आहे ती युनिकॉर्न आणि मर्मेड्सची आहे. मग ते विविध अक्सेसरीज असो वा नेल आर्ट. हे गर्ली नेलआर्ट नखांवर फारच सुंदर आणि कलरफुल दिसतं. तसंच ड्रीम कॅचरलाही खूप मागणी आहे.
नेलआर्ट करून घेण्यासाठी सलोन किंवा पार्लरमध्ये जायलाच हवं असं काही नाही. जर तुम्हाला आवड असेल आणि नेलआर्टचं बेसिक सामान असेल तर तुम्ही घरच्याघरी हे DIY व्हिडिओज पाहूनही नेलआर्ट करू शकता.
शेडेड ग्लिटर नेल आर्टसाठी तुम्हाला लागेल न्यूड नेलपेंट, ग्लिटर पावडर.
असं करा - सर्वात आधी नखांवर बेस कोट लावून घ्या. मग नखाच्या टोकाला थोडं ग्लिटर लावा आणि ते सेट झाल्यावर पुन्हा एकदा त्यावर बेसकोट लावा.
मार्बल नेल आर्टसाठी तुम्हाला लागेल बाऊल,पाणी आणि दोन शेड्सच्या नेलपेंट्स
असं करा - तुम्हाला ज्या शेडवर हे आर्ट हवं असेल ती शेड आधी नखांवर लावून घ्या. मग एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात दुसरी नेलपेंटचे काही थेंब टाका. आता त्यात बोट बुडवा. मार्बलसारखं डिझाईन नखांवर येईल.
ही नेलआर्ट खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला लागेल एक हेअरपिन, दोन नेलपेंट शेड्स.
असं करा - सर्वात आधी बेस कोट म्हणून जी शेड हवी असेल ती लावून घ्या मग त्यावर हेअरपिनने दुसरी नेलपेंट स्प्लिटर करा म्हणजे शिंपडल्यासारखं करा. हे डिझाईनसुद्धा छान दिसतं.
या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे नेल आर्ट करण्यासाठी तुम्हाला लागेल मॅटलिक शेड किंवा पावडर, एक आयशॅडो ब्रश आणि बेससाठी एक नेलपेंट
असं करा - व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे आधी बेस नेलपेंट लावून घ्या. मग आयशॅडो ब्रशने त्यावर मॅटलिक शेड किंवा मॅटलिक पावडर लावून घ्या. तुम्ही चारही नखांना मॅटलिक लुक देऊन एका नखाला बेसिक शेडमध्ये ठेवू शकता.
हे नेल आर्ट तुम्ही दोन प्रकारे करू शकता एकतर या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्टँप स्टिकर वापरून किंवा दोन नेलपेंट्सचा वापर करून.
असं करा - बेस नेलपेंट लावून तुम्ही त्यावर दुसऱ्या नेलपेंटच्या स्टँप स्टिकरने पोलका डॉट्स काढू शकता किंवा दुसऱ्या नेलपेंटचे पोलका डॉट्स टूथपिक किंवा इअरबडने तुम्ही करू शकता.
या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेन्सिल किंवा स्टँपचा वापर करून हे नेल आर्ट काढू शकता.
असं करा - बेसिक नेलपेंट नखांवर लावून त्यावर स्टेन्सिल किंवा स्टँपच्या माध्यमाने तुम्ही दुसऱ्या शेडचं डिझाईन करू शकता. हे खूपच सोपं असून दिसायला छान दिसतं.
एकाच रंगाच्या दोन शेडेड नेलपेंटच्या आणि टेप किंवा स्ट्राईप्स वापरून तुम्ही हे नेलआर्ट करू शकता.
असं करा - एक शेड लावून त्यावर स्ट्राईप्सच्या साहाय्याने कलर ब्लॉक डिझाईन करून घ्या. तयार आहे तुमचं कलर ब्लॉक नेल आर्ट.
साधा सोप्या किचनमधल्या स्पंजच्या तुकड्याचा वापर करून तुम्ही हे नेल आर्ट करू शकता.
असं करा - व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्पंजवर तीन वेगवेगळ्या शेडच्या नेलपेंट लावून घ्या आणि मग ते नखांवर लावा. शेवटी टॉप कोट लावायला विसरू नका.
जर तुमचं ड्रॉईंग चांगल असेल तर हे नेलआर्ट करणं काहीच कठीण नाही.
असं करा - व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे बेस कोट लावून त्यावर आधी काही डायमंड आणि इतर स्टीक ऑन लावून घ्या. मग त्यावर टूथपिकच्या साहाय्याने विविध रंगाच्या नेलपेंटने ड्रीमकॅचर काढून त्यावर टॉप कोट लावा.
हे नेल आर्ट अगदी कोणीही करू शकतं. यासाठी तुम्हाला लागेल फक्च बेस कोट आणि ग्लिटर स्टिकर.
असं करा - व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे फक्त ग्लिटर स्टिकर बेस कोट लावलेल्या नखांवर चिकटवा. तयार आहेत तुमच्या पार्टीसाठी खास नखांचा ग्लिटर लुक.
नेलआर्टबाबत महिलावर्गात आणि खासकरून कॉलेजला जाणाऱ्या मुलींमध्ये खास क्रेझ आहे. याबाबत विचारले जाणारे काही प्रश्न.
नेल आर्टने तुमच्या नखांना सुंदरता मिळते. पण तुमची नखं ही निरोगी आणि चमकदार असणं आवश्यक आहे. यासाठी तुमच्या नखांना नियमितपणे मॉईश्चराईज करा. लोशन किंवा ऑईल लावताना ते क्युटीकल्स आणि नखांना लावायला विसरू नका. कोणतंही नेलपेंट नखांवर वापरू नका. नेलपेंट काढण्यासाठीही चांगलं रिमूव्हर वापरा. संतुलित आहाराचं सेवन करा.
जर तुमची त्वचा उजळ किंवा मध्यम वर्णीय असेल तर न्यूड शेड्स वापरायला काहीच हरकत नाही. न्यूड्स कलर हे या स्कीनटोनवर खूपच चांगले दिसतात. तसंच कोणत्याही स्कीन टोनवर सूट होणारी शेड म्हणजे पिंक, ब्लू किंवा रेड टोन. तुम्ही पर्पल शेडसुद्धा ट्राय करू शकता.
घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी काही ठराविक गोष्टी आवश्यक आहेत. ज्यामध्ये नेल आर्ट स्टीकर्स, डोटींग टूल्स, स्ट्राईपिंग टेप्स, ग्लिटर, नेलपॉलिश आणि स्टँपिंग किट् या ठराविक गोष्टी तरी लागतातच.
नखांसाठी सर्वात जास्त चांगला आकार म्हणजे ओव्हल नेल्स. या आकारामुळे तुमच्या नखांना बॅलन्स्ड आणि चांगला लुक येतो. तसंच हा आकार दिल्याने नख पटकन तुटतही नाहीत.