ADVERTISEMENT
home / Acne
#StayHealthy: सतत मोबाईलच्या वापराने होऊ शकतं चेहराचं नुकसान

#StayHealthy: सतत मोबाईलच्या वापराने होऊ शकतं चेहराचं नुकसान

आजकाल ऑफिसपासून ते घरातील अनेक कामांसाठी सातत्याने मोबाईलचा वापर केला जातो. एवढंच काय तर कामातून फुरसत मिळाल्यावरही अनेकांच्या हातात पहिल्यांदा घेतली जाणारी वस्तू म्हणजे मोबाईल. मित्रमैत्रिणींशी चॅटींग, इंटरनेट सर्फिंग, सोशल मीडिया आणि यासारख्या अनेक गोष्टींसाठी आपण तासंतास मोबाईलचा वापर करतो. पण तुम्ही एका गोष्टीपासून अनभिज्ञ आहात की, जास्त वेळ मोबाईलच्या वापराने तुमच्या त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. 

Shutterstock

तुम्ही रात्री उशिरापर्यंत इंटरनेट सर्फिंग केल्यावर जसे डोळे थकल्यासारखे वाटू लागतात तसंच तुमचा चेहराही कोमेजल्यासारखा दिसू लागतो. जर तुमच्या मोबाईलचा तुम्ही सतत वापर करत असाल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावर आणि केसांवर दिसू लागतात. ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली नसेल तर आता जागरूक व्हा.

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील वाढलेले पिंपल्स

Shutterstock

आपला दैनंदिन व्यवहारात आपण सतत सगळीकडे मोबाईल कॅरी करतो. अनेकजण तर वॉशरुममध्येही मोबाईल सोबत नेतात. साहजिकच मोबाईल स्क्रीनवर सर्वात जास्त किटाणू आढळतात. मुख्य म्हणजे मोबाईल अनेक जण स्वच्छही करत नाही. परिणामी सतत वापराने मोबाईलच्या स्क्रीनला चिकटलेले किटाणू तुमच्या चेहऱ्यावर लागतात. हे किटाणू चेहऱ्यावरील कोमल त्वचेवर परिणाम करतात आणि परिणामी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसंच तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसू लागतात. रोज थकल्यासारखं वाटू लागतं. काही महिलांच्या चेहऱ्यावर वेळेआधीच सुरकुत्याही दिसू लागतात आणि चेहऱ्यावरील ग्लोसुद्धा गायब होतो. 

त्वचा दिसते निर्जीव

ADVERTISEMENT

Shutterstock

स्मार्टफोनवर दिवस-रात्र वेळ घालवल्यावर डाएट आणि एक्सरसाईजचं रूटीनही बिघडू लागतं. ज्यामुळे साहजिकच तुमच्या आरोग्यावर आणि त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो. यामुळे तुमची त्वचा कोमजल्यासारखी दिसू लागते. 

Giphy

ADVERTISEMENT

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावर उपाय काय? तर काळजी करू नका. मोबाईलचा वापर आपण संपूर्णतः थांबवू शकत नाही. पण त्याची वेळ मर्यादा ठरवू शकतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील काही सोपे घरगुती उपाय नक्की करू शकता.

कोरफड जेलने पडेल फरक

Shutterstock

जर तुमच्या स्मार्टफोनच्या सतत वापराने तुमचं रूटीन बिघडलं असेल आणि थकवा जाणवत असेल तर रोज वापरा कोरफड म्हणजे एलोव्हेरा जेल. एलोव्हेरा जेलने तुमची त्वचा उजळेल आणि त्वचेवरील अनेक समस्याही दूर होती. तसंच या जेलने तुमच्या त्वचेचं अंतर्गत पोषणही होईल. 

ADVERTISEMENT

दही आहे गुणकारी

Shutterstock

जर तुम्हाला तुमची त्वचा खूपच कोमेजल्यासारखी वाटत असेल तर चेहऱ्यावर नियमितपणे दह्याचा वापर करा. दह्याचा फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे टिश्यू खूप लवकर हील होतील आणि चेहऱ्यावर त्याचा चांगला परिणाम दिसू लागेल. 

मग आजच ठरवा की, आरोग्य महत्त्वाचं आहे की, मोबाईलचा वापर. 

ADVERTISEMENT

हेही वाचा –

तुमच्या मुलालाही आहे का मोबाईल बघत जेवण्याची सवय

टेक्नोलॉजीचे साईड ईफेक्ट्स टाळण्यासाठी घ्या ही काळजी

या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी

ADVERTISEMENT
02 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT