लेह-लडाखसाठी प्लॅन करताना या गोष्टी ठेवा लक्षात

लेह-लडाखसाठी प्लॅन करताना या गोष्टी ठेवा लक्षात

लेह-लडाखचे सुंदर फोटो पाहिल्यानंतर एकदा तरी या ठिकाणी जायला हवे असे अनेकांना वाटते. जर तुम्ही देखील ही अॅडव्हेंचर टूर करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी तुम्ही ही टूर प्लॅन करण्याआधी लक्षात ठेवायला हव्यात. कारण तुम्ही देशातील इतर ठिकाणी फिरणं आणि लेह-लडाख फिरणं यात खूप फरक आहे. त्यामुळे ही टूर प्लॅन करण्याआधी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

खूप प्रवास

लेह- लडाख जितकं सुंदर आहे .तितकाच ते पाहण्यासाठी तुम्हाला प्रवास करावा लागतो. आता हा प्रवास अगदी काही तासांचा आहे तर असे नाही. तुम्ही दिल्ली- मनाली-लेह असा प्रवास करत असाल तर तुम्हाला तब्बल 18 ते 19 तासांचा प्रवास करावा लागतो. लेहवरुन ही प्रवास करत असाल तरी तुमचा प्रवास कमी होत नाही. येथील काही ठिकाणं ही फार लांब आहे. त्यामुळे तुम्हाला रोड वेजने खूप प्रवास करावा लागणार हे मनाशी ठरवायचे आहे. त्याचच हा रस्ता वळणावळणाचा असल्यामुळे तुमचा हा प्रवास वाढतो.

Flight चे तिकिट्स स्वस्तात book करायचे असतील तर हे आहेत सिक्रेट्स

ऑक्सिजनचा अभाव

लेह- लडाखमधील अनेक ठिकाण उंचावर आहेत. सगळ्या मॉनेस्ट्री, पासेस फिरताना तुम्हाला या ठिकाणी सतत धाप लागत राहते. याचे कारण म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. लेहला मुळातच थंड वाळवंट म्हणतात. या ठिकाणी म्हणावी तितकी झाडं नाहीत. त्यामुळे बाहेरुन त्या राज्यात गेलेल्या प्रत्येकाला ऑक्सिजनची कमतरता जाणवते. ज्यावेळी ऑक्सिजन कमी असतो त्यावेळी तुम्हाला डोकेदुखी होते. थोडं अस्वस्थ वाटू लागतं. पण जर तुम्हाला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा हवा असेल तर तुम्ही या प्रवासात सतत पाणी प्यायला हवे. अगदी घोटभर का असेना तुम्ही हे पाणी पिणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनचा अभाव फार जाणवणार नाही.

Also Read : महाराष्ट्रातील किनारे

उंचावर चढण्याची सवय

लेह- लडाखचा प्रवास डोंगरांमुळे खूप वाटतो. आता तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल की, येथील सगळी ठिकाणं अगदी उंचावर आहे. उदा. लेह पॅलेस, शे पॅलेस, सगळ्या मॉनेस्ट्री या उंचावर आहे. ही ठिकाणं पाहण्यासाठी तुम्ही तयारी ठेवायला हवी. अगदी शांतपणे ही सगळी ठिकाणं तुम्ही पाहायला हवी. जर तुम्हाला चार पावले चालल्यानंतर थकल्यासारखे वाटत असेल. तर तुम्ही थांबून थांबून सगळी ठिकाणं पाहा. आता तुम्ही म्हणाल नुब्रा व्हॅली, जिस्पा सारखी ठिकाणं खाली आहेत. तरी देखील तुम्हाला तेथेही चालावे लागतेच त्यामुळे चालण्याची तयारी ठेवा. 

महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे (beaches in maharashtra)

खाण्याचे प्रकार

प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्याच पद्धतीचे जेवण मिळेल असे नाही. लडाखमध्ये प्रामुख्याने बटाटा, फ्लॉवर, कोबी होत असल्या कारणाने तुम्हाला अनेक ठिकाणी केवळ याच भाज्यांचे प्रकार मिळतील. तुम्हाला पोळी, भाजी, डाळ( दाल मखनी), भात असा साधारण आहार मिळेल. अनेक ठिकाणी शाकाहारीच जेवण मिळत असल्यामुळे तुम्हाला मासांहार मिळेल याची शक्यता फारच कमी. हा तुम्हाला अंडी या ठिकाणी मिळू शकतील. शाकाहार वगळता तुम्हाला या ठिकाणी सगळीकडे मोमोज, चाऊमीन (चायनीज), थुपका (सुपी नुडल्सचा प्रकार), मॅगी असे पदार्थ सगळीकडे अगदी हमखास मिळतील. काही ठिकाणी तुम्हाला पिझ्झा, बर्गर, फ्रेंचफ्राईजचा पर्यायदेखील मिळेल. पण सगळीकडे मिळेलच असा नाही.

योग्य प्लॅनिंग

लेह-लडाखशी टूर म्हणजे खाऊची गोष्ट नाही. तुम्हाला ही टूर खासगी प्लॅन करायची असेल तर तुम्हाला तेथील लोकल कॉन्टॅक्ट असणे गरजेचे आहे. शिवाय वातावरणाचा अंदाज नसेल तर त्याची माहिती असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिल्ली- चंदिगड- मनाली-लेह-लडाख असा प्रवास करणार असाल तर हा क्रम योग्य आहे. जर तुम्ही थेट लेहला जाणार असाल तर वातावरणाशी जुळवून घेताना तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. शिवाय लांबची ठिकाणं आधी, मग जवळची ठिकाणं आणि नंतर थोडा आराम असे तुमच्या शेड्युलमध्ये असू द्या.

पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)

अचानक वातावरणातील बदल

लेहमध्ये वातावरणात अचानक बदल होत असतात. म्हणजे पाऊस, थंडी, स्नो फॉल, ऊन असे बदल कधी होतील सांगता येत नाही. त्यामुळे थंडीच्या कपड्यांसोबत तुमच्याकडे एखादा विनचिटरदेखील असायला हवा. उनापासून वाचण्यासाठी तुमच्याकडे सनस्क्रिनसुद्धा असायला हवे. 


या अगदी काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही लेह-लडाखचे प्लॅनिंग करताना लक्षात हव्यात. तर तुम्हाला प्रवासात कोणताही त्रास होणार नाही.