#WeddingShopping साठी पुण्यातील ठिकाणं (Wedding Shopping In Pune) | POPxo

#WeddingShopping साठी पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

#WeddingShopping साठी पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

पुणे या शहराची ओळख महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी आहे. पुणे शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. त्यामुळे पुण्यात तुम्हाला टिपीकल मराठमोळ्या वस्तू सहज उपलब्ध होतात. कारण आजही पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीचं जतन केलं आहे. असंच काहीसं आहे येथील लग्न आणि लग्नाबाबतच्या गोष्टींबाबतही. त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी आणि लग्नाच्या शॉपिंगसाठी पुण्याला जायचं प्लॅन करत असाल तर हा लेख नक्की वाचा.

Table of Contents

    वेडिंग शॉपिंगसाठी पुण्याची खासियत Pune’s Wedding Speciality

    मराठमोळं आणि टिपीकल मराठी लग्न म्हटल्यावर डोळ्यासमोर येते पुणेरी पगडी आणि पारंपारिक वस्त्रांनी सजलेले वर-वधू. पुणे शहराचा आता बऱ्यापैकी मॉर्डन चेहरा झाला असला तरी येथील सांस्कृतिक टच कायम आहे. त्यामुळे पुण्यात तुम्हाला पारंपारिक दागिने, लग्नासाठी लागणाऱ्या अनेक पारंपारिक गोष्टी जसं पुणेरी पगडी, सोवळं, रूखवताच्या गोष्टी आणि नऊवारी साड्या यांची भरपूर व्हरायटी आणि तीही मुंबईपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होते. तसंच तुम्ही लग्नसुद्धा पुण्यात करायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमचं बजेटही चांगलंच कमी होईल. दुसरी फायद्याची बाब म्हणजे तुम्हाला मराठमोळा मेन्यू जेवणासाठी ठेवता येईल.  

    पुण्यात वेंडिग शॉपिंगसाठी या दुकानांना नक्की भेट द्या Must visit shops in Pune for Wedding Shopping

    जर तुम्ही पुण्यात लग्नाची शॉपिंग करायची ठरवली असेल तर मग या दुकानांना नक्कीच भेट दिली पाहिजे.

    पेशवाई क्रिएशन

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address 717,सदाशिव पेठ, चित्रशाळा चौक, कुमठेकर रोड, पुणे - 411030

    कसं जाल How to reach इथे पोचण्यासाठी तुम्हाला खाजगी वाहन, बस आणि रिक्शाचा पर्याय आहे. 

    खासियत Speciality पेशवाई क्रिएशन्स हे खरंतर वर-वधू दोघांच्याही शॉपिंगसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. इथे तुम्हाला पारंपारिक पैठणीपासून, बनारसीपर्यंत आणि डिझाईनर साड्यांपासून पार्टी वेअरपर्यंत सर्व साड्यांचे प्रकार मिळतील. तर वरांसाठी सूटींग शर्टिंग आणि पारंपारिक कपड्यांची सर्व व्हरायटी मिळेल. तसंच इथे तुम्हाला कस्टमाईज्ड कपडेसुद्धा बनवून घेता येतील. त्यामुळे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला कॉम्बिनेशन कपडे लग्नात घालायचे असल्यास इथे नक्की भेट द्या. या ग्रँड दुकानाची सुरूवात 1994 साली दत्ताराम येऊल यांनी केली. 

    अंदाजे खर्च Approx Cost दहा हजारांपासून पुढे.

    हस्तकला

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address शगुन चौक, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे - 411030

    कसं जाल How to reach इथून जवळचं स्टेशन म्हणजे शिवाजी नगर, याशिवाय तुम्ही बस, रिक्शाने किंवा खाजगी वाहनाने इथे पोचू शकता. 

    खासियत Speciality या दुकानाची सुरूवात 2004 साली सुरूवात करण्यात आली. इथे तुम्हाला सिल्क सारीज, वेडिंग कलेक्शन, सलवार-कमीज आणि ड्रेस मटेरिअलची भरपूर व्हरायटी मिळेल. इथे तुम्हाला अगदी कमीतकमी 800 रूपयांपासून साड्या पाहायला मिळतील. 

    अंदाजे खर्च Approx Cost एक हजारांपासून पुढे

    गलानी फॅशन्स

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address गलानी टॉवर्स, के के होलसेल मार्केट, सातारा रोड, पुणे - 411043

    कसं जाल How to reach बस किंवा रिक्शाचा पर्याय सोबतच खाजगी वाहनानेही तुम्ही इथे पोचू शकता. 

    खासियत Speciality हे ठिकाण म्हणजे दुकान एक आणि ऑप्शन भरपूर असा प्रकार आहे. इथे तुम्हाला वधूवरांसाठी शॉपिंग करता येईल. दोघांसाठीही ब्रायडल वेअर, डिझाईनर वेअर जसं घागरा, शरारा, वेडिंग गाऊन्स, फॉर्मल वेअर आणि ग्रूम कलेक्शनमधील व्हरायटी पाहता येईल. कारण हे दुकान चक्क सात मजली आहे.

    अंदाजे खर्च Approx Cost पाच हजारांपासून पुढे.

    कासट

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address 16/15 कॅसाब्लांका, करिश्मा सोसायटी ऑफ कोथरूड, कोथरूड, पुणे - 411029.

    कसं जाल How to reach हे पुण्याजवळ असून इथे पोचण्यासाठी तुम्ही बस आणि रिक्शाचा पर्याय वापरू शकता. 

    खासियत Speciality कासट हे पुण्यातील प्रसिद्ध आणि खात्रीशीर दुकानांपैकी एक आहे. इथे पारंपारिक साड्यांबरोबरच आता लेहंगा आणि डिझाईनर साड्याही मिळतात. पण या दुकानात अजूनही पुणेकर पारंपारिक साड्यांचे प्रकार घेण्यासाठी आवर्जून भेट देतात.

    अंदाजे खर्च Approx Cost हजार रूपयांपासून पुढे.

    चार्वी

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address 684, सदाशिव पेठ, चित्रशाळा चौक, कुमठेकर रोड, पुणे - 411030

    कसं जाल How to reach हे ठिकाण पुणाच्या अगदी मध्यवर्ती भागात असल्याने बस आणि रिक्शा तसंच खाजगी वाहनाचा पर्याय आहे. 

    खासियत Speciality युवांच्या पसंतीस नक्की पडेल असं वेडिंग शॉपिंगसाठीचं दुकान म्हणजे चार्वी. चार्वीमध्ये तुम्हाला पारंपारिक सोबतच कोकटेल सारीज आणि ड्रेसमटेरिअल्ससुद्धा मिळतील. इथे खास हँडमेड वर्क केलेल्या साड्याही मिळतात. या दुकानाची सुरूवात 2009 साली झाली होती.  हे ठिकाण पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी सदाशिव पेठेत आहे.

    अंदाजे खर्च Approx Cost दोन हजारांपासून पुढे.

    कजरी सारीज

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address सर्व्हे नं 43/44, सरस्वती विलास बिल्डींग, लक्ष्मी रोड, नारायण पेठ, कुंटे चौक पुणे - 411030

    कसं जाल How to reach बस, रिक्शा किंवा खाजगी वाहन. 

    खासियत Speciality हे पुण्यातील लक्ष्मी रोडवरील जुन्या दुकानांपैकी एक आहे. इथे पारंपारिक साड्यांच्या प्रकारासोबतच लेटेस्ट फॅशनच्या साड्याही उपलब्ध आहेत. इथे तुम्हाला जरी, ऑरगँजा, झर्दोसी, सिक्वीन्स, कट वर्क, मिरर वर्क, पर्ल वर्क आणि कुंदन वर्कच्या साड्या पाहायला मिळतील. 

    अंदाजे खर्च Approx Cost एक हजारांपासून पुढे.

    वामा

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address कुंटे चौक, कॉमनवेल्थ बिल्डींग समोर आणि सिटी ज्वेलर्ससमोर, लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ, पुणे - 411030

    कसं जाल How to reach रिक्शा, बस आणि खाजगी वाहनाचा पर्याय. 

    खासियत Speciality वामाला पुण्यातील ऑफिशियल होम फोर वेडिंग शॉपिंग असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला रिसेप्शनसाठी काही वेगळं काही करायचं असल्यास चॉईस उपलब्ध आहे. ज्यामध्ये जरी वर्कचे रिच लेहंगा आणि कॉकटेल सारीज ते अगदी नऊवारी, पैठणी आणि इतरही व्हरायटी मिळेल. या तीन मजली शॉपिंग प्लाझामध्ये तुम्हाला रॉयल ट्रीटमेंटही मिळू शकते. तसंच इथे खास व्हीआयपींसाठी क्युबिकल्स आणि पर्सनल एस्कॉर्टही असतात. 

    अंदाजे खर्च Approx Cost पाच हजारांपासून पुढे.

    स्वामिनी सारी सेंटर

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address शॉप नं. 776 बिझीलँड बिल्डींग, विश्रामबाग वाडासमोर, कुमठेकर रोड, सदाशिव पेठ, पुणे - 411030

    कसं जाल How to reach बस, रिक्शा किंवा खाजगी वाहन. 

    खासियत Speciality स्वामिनी सारी सेंटर हे पुण्यात वेडिंग शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेलं अजून एक ठिकाण आहे. त्यामुळे पुण्यात शॉपिंगला आल्यास तुमच्या लग्नाच्या बस्त्यात एक तरी स्वामिनीमधली साडी असलीच पाहिजे.  

    अंदाजे खर्च Approx Cost एक हजारापासून पुढे.

    पु. ना. गाडगीळ

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address 658/59, साचापीर स्ट्रीट, एमजी रोडजवळ, हनुमान मंदिरासमोर, कँप, पुणे - 411001

    कसं जाल How to reach बस, रिक्शा किंवा खाजगी वाहनाचा पर्याय. 

    खासियत Speciality लग्नाची खरेदी म्हटल्यावर दागिनेसुद्धा आलेच आणि पुण्यात दागिने खरेदी म्हटल्यावर पु.ना.गाडगीळला पर्याय नाही. गेली अनेक दशकं गाडगीळ यांचं दागिन्यांमध्ये नाव आहे. महाराष्ट्रभरात त्यांच्या शाखा असल्यातरी मुख्य आणि सुंदर कलेक्शनसाठी पुण्यातील दुकानाला भेट द्यायलाच हवी. साखरपुड्याच्या अंगठीपासून ते अगदी लग्नाच्या मंगळसूत्रांपर्यंत इथे तुम्हाला सर्व कलेक्शन्स पाहायला मिळतील. 

    अंदाजे खर्च Approx Cost पाच हजारांपासून पुढे. 

    नानासाहेब विट्टुल शामसेट ज्वेलर्स (NWS)

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address 2433,ईस्ट स्ट्रीट कँप, पुणे - 411001

    कसं जाल How to reach बस किंवा रिक्शा याशिवाय खाजगी वाहन. 

    खासियत Speciality अगदी ब्रिटीश काळापासून पुण्यातील दागिन्यांच्या व्यापारात असलेलं नाव म्हणेज हे दागिन्यांचे दुकान. ग्राहकांना खासकरून येथील इंडो-वेस्टर्न ज्वेलरी आवडते. या दुकानाच्या नावाची ही एक कथा आहे. विठ्ठल शामसेठ यांनी या दुकानाची सुरूवात केली. पण त्याकाळी ब्रिटीशांना विठ्ठल बोलता येत नसे त्यामुळे त्यांना विट्टूल बोलत असत. मग त्यावरूनच दुकानाचंही नाव पडलं. इथे तुम्हाला ज्वेलरीतील अनेक कलेक्शन्स पाहायला मिळतील.  

    अंदाजे खर्च Approx Cost पाच हजारांपासून पुढे.

    ज्वेल पॅरडाईज

    Just Dial
    Just Dial

    पत्ता Address शोरूम नं. 11,सोहराब हॉल, जहांगीर हॉस्पिटल समोर, पुणे रेल्वे स्टेशनच्या मागे, पुणे - 411001

    कसं जाल How to reach रेल्वे स्टेशनजवळ असल्याने तुम्ही इथे रेल्वेनेही पोचू शकता. त्याशिवाय बस किंवा रिक्शाचा पर्याय. 

    खासियत Speciality इथे तुम्हाला लग्नासाठी लागणारी ज्वेलरी भाड्याने घेता येईल. कारण लग्नासाठी बरेचदा लागणारी ज्वेलरी आपल्याला विकत घेणं शक्य नसतं. त्यामुळे ज्वेलरी भाड्याने घेण्याचा पर्यायही चांगला आहे. 

    अंदाजे खर्च Approx Cost पाचशे रूपयांपासून पुढे.

    तुळशी बाग

    Instagram
    Instagram

    पत्ता Address तुळशी बाग, पुणे. 

    कसं जाल How to reach बस, रिक्शा किंवा खाजगी वाहन. 

    खासियत Speciality तुळशीबागेत तुम्हाला लग्नासाठी लागणारी प्रत्येक वस्तू अगदी हमखास मिळेल. तेही इतर दुकानांपेक्षा किंवा मार्केट्सपेक्षा स्वस्त दरात. त्यामुळे पुण्यात साडी, ज्वेलरीची खरेदी करून झाल्यानंतर लग्नाच्या रूखवतासाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांना गिफ्ट देण्यासाठी असो वा छोट्या-मोठ्या खरेदीसाठी तुळशी बागेत एकदा चक्कर नक्की मारा.  

    अंदाजे खर्च Approx Cost शंभर रूपयांपासून पुढे. 

    शॉपिंगनंतर खादाडीसाठी पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणं Food stalls at Pune

    Instagram
    Instagram

    पुण्यातील खाद्यसंस्कृती हा तर हमखास चर्चैचा विषय आहे.  मग ती पुण्यातील पुणेरी मिसळ असो वडापाव असो किंवा मस्तानी. पुण्यात शॉपिंगला गेल्यावर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्याची ही आयती संधी मिळेल.

    • गार्डनचा वडापाव - महाराष्ट्रभरात वडापाव प्रसिद्ध आहे. तसंच पुण्यातही वडापावसाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्यापैकीच एक म्हणजे कँप एरियातील गार्डन वडापाव सेंटर. शॉपिंग केल्यानंतर तुमची झणझणीत वडापाव खायची इच्छा झाल्यास इथे नक्की भेट द्या.
    • कल्याण भेळपुरी - भेळपुरी आणि इतर चाट खायची काही ठराविक वेळ नसते. त्यामुळे शॉपिंगनंतर चाट खायला काहीच हरकत नाही. पुण्यातील बाणेर रोडवरील प्रसिद्ध कल्या भेळला तुम्ही भेट देऊ शकता.   
    • बेडेकरांची पुणेरी मिसळ - मिसळ प्रकारात पुणेरी मिसळ हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे पुण्यात आल्यावर पुणेरी मिसळ खाणं मस्ट आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील बेडेकर टी स्टॉलला भेट द्यायलाच हवी.
    • अमृतेश्वरचे कांदेपोहे - पुण्यातील एरंडवणे येथील अभिनव चौकातील अमृतेश्वर हे ठिकाणं खमंग पोह्यांसाठी प्रसिद्ध आहे.
    • सुजाताची मस्तानी - पुण्यात आल्यावर मस्तानी खायला किंवा प्यायलाच हवी. यासाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे सुजाता मस्तानी. सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकातील सुजाता मस्तानी प्रसिद्ध आहे ते मस्तानीसाठी. 

    शॉपिंगसाठी जाताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा Things to remember

    वरील दुकानांची लिस्ट पाहून तुम्हाला कळलं असेलच की, जर तुम्हाला पुण्यात वेडिंग शॉपिंग करायची असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे सदाशिव पेठेला भेट देणे. जिथे तुम्हाला वधूच्या साड्यांपासून ते वराच्या कुर्त्यांपर्यंत तर दागिन्यांपासून ते अगदी खाण्यापिण्याचीही चंगळ या भागात आहे. तसंच पुण्यात शॉपिंगला जाताना पुणेकरांच्या वेळा लक्षात ठेवायलाही विसरू नका.

    पुण्यातील वेडिंग शॉपिंगबाबत विचारण्यात येणारे काही प्रश्न - FAQs

    लग्नाची शॉपिंगसाठी पुण्यातील प्रसिद्ध मॉल्स कोणते?

    पुण्यात जसं तुम्हाला तुळशीबागेत किंवा सदाशिव पेठेत शॉपिंग करण्याचा ऑप्शन आहे. तसंच पुण्यातील अनेक मॉल्समध्येही तुम्हाला चांगली शॉपिंग करता येईल. पुण्यातील मॉल्सपैकी फिनीक्स मार्केट सिटी, अमनोरा आणि एसजीएस मॉल हे काही चांगले ऑप्शन्स आहेत. त्यामुळे या मॉल्सना नक्की भेट द्या.

    लग्नाची शॉपिंग करताना काय काळजी घ्यावी ?

    लग्नाची शॉपिंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिस्ट बनवा. ज्या वस्तूंची तुम्हाला शॉपिंग करायची आहे. त्या सर्व गोष्टींची यादी केलेली असल्यास तुम्हाला शॉपिंगच नीट प्लॅनिंग करता येईल आणि वेळही वाचेल. तसंच शॉपिंग करताना तुमचं बजेटही लक्षात ठेवा. 

    शॉपिंगसाठी जाण्यासाठी पुण्याला कसे जावे?

    पुण्यात जर तुम्ही आधीही फिरला असाल तर तुम्हाला माहीत असेलच की, स्वतःच वाहन मस्ट आहे. कारण पुण्यातील पब्लिक ट्रान्सपोर्ट मुंबईसारखं सहज आणि सोपं नाही. त्यामुळे पुण्यात शॉपिंगसाठी बाहेर पडताना ट्रान्सपोर्टेशन आणि ट्रॅफिकच्या वेळा पाहूनच बाहेर पडा.

    पुण्यात लग्नाची बजेट शॉपिंग करता येईल का?

    पुण्यात लग्नासाठीच बजेट शॉपिंग सहज शक्य आहे. कारण मुंबईपेक्षा नक्कीच पुण्यातील भाव काहीसे कमी आहेत. तसंच इथे शॉपिंगसाठी तुमच्या बजेटप्रमाणे अनेक पर्यायही उपलब्ध आहेत.