जगभरात सध्या प्रत्येक 5 व्यक्तींमध्ये किमान 4 व्यक्तीना डायबिटीस अर्थात मधुमेह असतो. मधुमेह हा असा आजार आहे जो एकदा झाला की, लवकर बरा होणं कठीण आहे. हा आजार सध्या जगभरात जास्त प्रमाणात वाढत चालला आहे. मधुमेह वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या सध्याची लाईफस्टाईल. आपण आपल्या सवयी इतक्या बिघडवल्या आहेत की, त्यामुळे आपल्याला मधुमेहासारख्या आजारांना बळी पडावं लागत आहे. या सवयी सुधारल्या तर नक्कीच आपण यापासून दूर राहू शकतो. आपला मधुमेह आपण अगदी नियंत्रणातही आणू शकतो. त्यामुळे तुम्ही वेळीच जर आम्ही सांगतो तशा काही सवयी तुम्हाला असतील सुधारा. वेळीच स्वत:कडे लक्ष द्या.
मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चनुसार, दुपारच्या उन्हात अगदी थोडा वेळ गेल्यास, तुम्हाला योग्य विटामिन डी मिळतं. तुमच्या शरीराला हे आवश्यक असतं. विटामिन डी ची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना टाईप- 2 चा मधुमेह होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तुम्हाला जर ऊन जास्त मिळत नसेल तर ही सवय लवकर सोडा आणि किमान रोज काही वेळ तरी ऊन्हामध्ये जाऊन या.
तुम्हाला तुमच्या सीटवरून उठण्याइतकाही वेळ नसेल अथवा तुम्ही ऑफिसमध्ये इतके थकून जाता की, तुम्हाला जराही फिरायला वेळ मिळत नाही. अशी स्थिती असेल आणि ऑफिसमध्ये तुम्ही जर पूर्ण 8- 9 तास फक्त आपल्या सीटवर बसून काम करत असाल तर हे चुकीचं आहे. त्यानंतर तुम्ही घरी जाऊनदेखील बसून टीव्ही बघत असाल तर तुम्हाला अशा तुमच्या रोजच्या शेड्युलने नक्कीच मधुमेह होऊ शकतो. इतकंच नाही तर तुम्हाला यामुळे इतरही अनेक आजार होऊ शकतात.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, ज्या व्यक्ती सकाळी व्यवस्थित ब्रेकफास्ट करत नाहीत अथवा अजिबातच करत नाहीत, त्यांची दिवसभरात जास्त कॅलरी वाढते आणि त्यांची ही सवय इन्शुलिनचा स्तर बिघडवण्यास कारणीभूत ठरते. चुकीचं खाणंपिणं अथवा अजिबात न खाणं यामुळे मधुमेह होण्याचे अथवा वाढण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या शोधानुसार तुम्ही जर प्लास्टिक रॅप अथवा कंटेनर्समधून गरम जेवण जेवत असाल तर यामध्ये मिळणारे केमिकल्स इन्शुलिन तुमची प्रतिरोधक क्षमता खूप वाढवतं. हेच मधुमेहाचं सुरुवातीचं लक्षण असतं. त्यामुळे आजकाल तरूण मुलांमध्येही मधुमेहाचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. त्याला हीच मुख्य गोष्ट कारणीभूत आहे.
मधुमेह (Diabetes)नियंत्रणात ठेवण्यासाठी न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्या ‘5’ सोप्या टीप्स
व्हाईट ब्रेड, भात, मैदा अथवा अशा प्रकारचे दुसरे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स तुमच्या शरीरामध्ये जास्त इन्शुलिन तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. रिफाईंड कार्बोहायड्रेड्ट शरीरामध्ये लवकर शोषून घेतले जातात आणि त्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागते. त्यामुळे भूक लागल्यावर तुम्ही जास्त खाता आणि तुम्हाला अति खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढतो.
प्रोबायोटिक्स तुमची पचनक्रिया अधिक चांगली करतात आणि तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी नियमित करतात. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही जर रात्री उशीरापर्यंत जागलात आणि कमी झोपलात तर ही तुमची सर्वात चुकीची सवय आहे. तसंच रात्री उशीरा जेवणं, सिगारेट ओढणं यादेखील तुमच्या शरीरासाठी चुकीच्या सवयी आहेत. या सवयींसह तुमच्या शरीराचं वजनदेखील जास्त असेल तर तुम्हाला नेहमी लवकर तणाव आणि चिंता घेण्याची सवय लागते आणि त्याचा परिणाम मधुमेह होण्यावर होतो. तणाव आणि चिंता करत असताना शरीरातील एक हार्मोन कार्टिसोल रिलीज करतात जे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढवण्याचं काम करतं.
हॉर्वर्ड चैन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसातून किमान 4-5 कप कॉफी (दुधासह वा दुधाशिवाय, साखरेशिवाय अथवा अगदी कमी साखर असणारी कॉफी) प्यायलात तर तुम्ही टाईप- 2 मधुमेहापासून वाचू शकता. कॉफीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स मधुमेहाच्या त्रासातून मुक्त करतात आणि तुम्हाला निरोगी ठेवण्याचं काम करतात. पण कॉफीची अतिशयोक्ती करू नये. शक्यतो साखर न घालता काळी कॉफी पिणं जास्त योग्य आहे.
तुम्ही रात्री खूप उशीरापर्यंत जागत आहात अथवा झोप पूर्ण घेत नसाल आणि रात्री उशीरा जेवणं, सिगरेट पिणं अथवा दारू पिणं अशा वाईट सवयी तुम्हाला असतील तर अशा अनहेल्दी सवयी मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकतात. यासह तुमचं वजन आणि शरीरामध्ये ट्रायग्लिसरॉइड्स जास्त असतील तरीही तुम्हाला टाईप- 2 मधुमेह होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्ही नेहमी दिवसातून किमान 8 तास झोप पूर्ण करायलाच हवी.
बऱ्याचदा विकेंडला पूर्ण दिवस टीव्ही समोर बसून वेळ घालवणं आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडत असेल. पण ही चुकीची सवय आहे. एका स्टडीमध्ये सिद्ध झाल्याप्रमाणे टीव्हीच्या समोर घालवलेला प्रत्येक तास हा तुमच्यासाठी मधुमेहाचा धोका साधारण 4 टक्क्यांनी वाढवत असतो.
तणाव आणि चिंता ही तुमच्या शरीरात मधुमेह वाढवण्यास कारणीभूत ठरणारी मुख्य कारणं आहेत. तणाव आणि चिंतेमुळे तुमच्या शरीरामधील कार्टिसोल हार्मोन रिलीज होतात आणि हे तुमच्या शरीरातील इन्शुलिन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते.
मधुमेहावर करा घरगुती उपचार आणि करा मधुमेहाला दूर