केसांसाठी कोरफड बद्दल देखील वाचाHealthy Fitness साठी नक्की ट्राय करा महत्त्वाचे नियम

केसांसाठी कोरफड बद्दल देखील वाचाHealthy Fitness साठी नक्की ट्राय करा महत्त्वाचे नियम

आपल्या शरीराने योग्य काम करायला हवं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या शरीरासाठी आपण एक चांगल्या पोषक तत्वाचं डाएट करणं. वास्तविक आपलं जेवण हे 6 तऱ्हेच्या पोषक तत्वाने बनलेलं आहे. यामध्ये  मॅक्रोन्यूट्रिअंट्स (प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, फॅट्स) मायक्रोन्यूट्रोअंट्स (विटामिन आणि मिनरल्स) आणि पाणी या गोष्टींचा समावेश आहे. तुम्ही या 6 तत्वोंचं योग्य सेवन न केल्यास अथवा याकडे दुर्लक्ष केल्यास, तुमच्या लाईफस्टाईलवर याचा दुष्परिणाम नक्की होतो. तसंच तुम्ही तुमचा Fitness Goal यामुळे पूर्ण करू शकणार नाही. आम्ही तुम्हाला इथे 11 अतिशय सोप्या आणि अप्रतिम टिप्स आणि डाएटचे नियम सांगत आहोत. हे फॉलो करून तुम्ही आरामात तुमची लाईफस्टाईल हेल्दी करू शकता. 

1. कणकेत मिसळा फायबर

आजकाल कार्बोहायड्रेट्स ना नकारात्मक समजलं जातं. कारण याचा जास्त भाग हा मॅक्रोन्यूट्रिअंट्समध्ये समाविष्ट होतो. पण यावर एक सोपा उपाय आहे तो म्हणजे, रिफाईंडला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये बदला. याबरोबरच तुम्ही तुमच्या कणीक अर्थात गव्हाच्या पिठाऐवजी ब्रान फ्लोर वापरा अथवा कणीक एखाद्या दुसऱ्या फायबरमध्ये मिसळा. असं केल्यास, तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. 

2. मोड आलेली डाळच खा

प्रत्येकाच्या जेवणामध्ये डाळींचा वापर करण्यात येतो. पण डाळींमधून शरीराला अधिक पोषण मिळण्यासाठी तुम्ही डाळीला मोड आणूनच खा. अशाप्रकारे तुमच्या आहारात डाळीचा समावेश केल्यास, तुमच्या आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो. 

झियाफलच्या फायद्यांविषयी देखील वाचा

3. सॅलेडने तुमच्या जेवणाची सुरूवात करा

Shutterstock

तुमचं जेवण हे किमान 1 बाऊल सॅलेडने सुरु करा. यामध्ये मायक्रोग्रीन्ससह जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या असायला हव्यात. त्यामुळे तुमच्या शरीराला चांगलं पोषण मिळतं.

महिलांसाठी फिटनेस टिप्स बद्दल देखील वाचा

4. स्नॅक्सच्या जागी वापर करा सुपरफूडचा

संध्याकाळच्या वेळातही आपल्याला कडकडून भूक लागते. मग अशा वेळी आपण बऱ्याचदा तेलकट आणि थोडे जड पदार्थ खातो. पण त्याऐवजी तुम्ही सुपरफूडचा वापर करू शकता. उदाहरणार्थ आळशीच्या बिया, सनफ्लावर सीड्स, ड्रायफ्रूट्स इत्यादी. 

महिलांसाठी फिटनेस टिप्स बद्दल देखील वाचा

5. डीप फ्राय पदार्थांना द्या स्पष्ट नकार

डीप फ्राय पदार्थांसाठी नक्कीच आपल्या जिभेला पाणी सुटतं. पण आपल्या आहारातून डीप फ्राय पदार्थांना बाहेरचा रस्ता दाखवा. डीप फ्राय पदार्थांऐवजी तुम्ही रोस्ट केलेले, ग्रिलिंग अथवा बेकिंगचे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. यामुळे वजन नियंत्रणात राहतं. 

संध्याकाळी काय खाऊ हा पडतो प्रश्न, मग खा हे हेल्दी पदार्थ

6. फ्रूट्स आणि नट्स उत्तम उपाय

Shutterstock

सकाळी नाश्ता करून झाल्यानंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही मधल्या वेळात किमान एक फळ अथवा नट्स अर्थात सुकामेवा नक्की खावा. यामुळे पोटात गॅस जमा होत नाही आणि भुकेने पोटही दुखत नाही. या सुक्या मेव्याने पोट भरल्यासारखं राहातं.

7. जंक फूडची सवय द्या सोडून की आदत छोड़ें

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याकडून बऱ्याच प्रमाणात जंक फूड खाल्लं जातं. प्रोसेस्ड फूड, स्ट्रीट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाण्याची सवय सोडून द्या. हेल्दी फिटनेस ठेवण्यासाठी हा एक सर्वात महत्त्वाचा नियम आहे. 

लहान मुलांना हेल्दी खाण्याची सवय कशी लावाल

8. कोल्ड ड्रिंक्सपासून लांबच राहा

प्रत्येक स्वरुपाच्या कोल्ड ड्रिंक्स पासून दूरच राहा. कोल्ड ड्रिंक हे आपल्या शरीरात स्लो पॉईझनप्रमाणे पसरतं. इतकंच नाही यामध्ये डाएट सोडादेखील समाविष्ट आहे. रिसर्चनुसार, कोल्ड ड्रिंक्स आपल्या लिव्हर आणि किडनीच्य आसपास जमा होणाऱ्या चरबीसाठी कारणीभूत ठरतात. 

कुटुंबाची काळजी कशी घ्यावी हे देखील वाचा

9. रोज लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स खा

डेअरी फूडमध्ये अधिक प्रोटीन आहार असतात. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात लो फॅट डेअर प्रॉडक्ट्सचा नक्की समावेश करून घ्या. त्याचप्रमाणे यामधील समाविष्ट विटामिन 12 राखून ठेवण्यासाठी आणि प्रोटीन डीनॅच्युरेशनपासून वाचण्यासाठी कमीत कमी गॅसचा वापर करण्याचं लक्षात ठेवा. 

वाचा - तंबाखू सोडण्याचे उपाय

10. गुड फॅट्स आहेत आवश्यक

Shutterstock

आपल्या डाएटमध्ये फॅट्स नक्कीच समाविष्ट करून घ्या. तसं तर फॅट हे वजन वाढण्यासाठी आपण दूर ठेवतो. पण बॅड फॅटच्या जागी तुम्ही गुड फॅट तुमच्या आहारात वापरा. राईस ब्रान ऑईल, एडिबल अलमंड ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला ऑईल, फ्लॅक्स सीड्स ऑईल, कोकोनट ऑईल, सोयाबीन ऑईल, घरी तयार केलेलं तूप आणि भोपळ्याच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स, कलिंगड बी, फेटा चीज, अंडी, मासे याचा समावेश करून घ्या. फक्त याचा अतिरिक्त डोस घेऊ नका इतकं लक्षात ठेवा. 

11. मीठ आणि साखर खा प्रमाणात

Shutterstock

आपल्या आहारामध्ये नेहमीच मीठ आणि साखर यांचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे. याच्या नियंत्रणात असल्याने तुमच्या फिटनेसवर खूपच चांगला फरक पडतो हे लक्षात ठेवा.

निरोगी राहण्यासाठी नियमित प्या 'नारळपाणी'