ADVERTISEMENT
home / Fitness
नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी

नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी

नवरात्रौत्सव लवकरच सुरु होत आहे. नवरात्रीची माहिती आपल्यापैकी अनेकांना असते. आपल्यापैकी बरेच जण नवरात्रीमध्ये 9 दिवस सलग उपवास करतात. हे उपवास नक्की का केले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या दैनंदिन जीवनशैलीतून बाहेर पडून मनाला आणि तुमच्या शरीराला जास्तीत जास्त सुदृढ, निरोगी आणि आरोग्यसंपन्न करण्यासाठी हे उपवास केले जातात. पण बऱ्याचदा हे उपवास चुकीच्या पद्धतीनेही केले जातात. काही जण उपवासाचे अतिरिक्त पदार्थ खाऊन हे उपवास करतात तर काही जण काहीही न खाता पिता करतात. अशा दोन्ही तऱ्हेने हे उपवास करणं चुकीचं आहे. नक्की या उपवासाने काय घडतं आणि त्याचे काय फायदे आहेत हे आपण पाहूया. या उपवासामध्ये पचण्यास अत्यंत हलके, फक्त पाणी अथवा विविध पेय पदार्थांचं ग्रहण अथवा अन्न भाजून त्याचे पदार्थ बनवून खाणं हे अपेक्षित आहे. पण बरेच लोक हे या दिवसात शेंगदाणे, साबुदाणे, तळलेले बटाट्याचे पदार्थ असं सेवन करतात ज्याचा योग्य परिणाम शरीरावर होत नाही. पाहूया याचे  नक्की काय फायदे होतात. ज्याच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने नवरात्री शुभेच्छा मराठी मिळतील.

1. पोटाच्या तक्रारीपासून होते सुटका

तुम्ही नवरात्रीमध्ये योग्य तऱ्हेने उपवास केल्यास, तुम्हाला असलेल्या पोटाच्या तक्रारीपासून सुटका मिळते. यादरम्यान तुम्ही हलका आहार घेऊन स्वतःच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण आणू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अॅसिडिटी, जुलाब, जळजळणे यासारख्या तक्रारींवर तुम्हाला योग्य नियंत्रण ठेवता येतं. त्यासाठी हा उपवास तुम्हाला फायद्याचा ठरतो.  

2. अतिरिक्त कॅलरी बर्न होतात

Shutterstock

या नऊ दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या खाण्यावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेऊन अतिरिक्त कॅलरी बर्न करू शकता. जाडी कमी करण्यासाठी हे उपवास करणं हा चांगला पर्याय आहे. योग्य डाएट प्लॅन करून तुम्ही तुमच्या वजनावर अंकुश लावू शकता. या दिवसांमध्ये पदार्थांमधून इतर दिवसांपेक्षा कमी प्रमाणामध्ये कॅलरीज घेतल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त कॅलरी बर्न होऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेऊ शकता. 

ADVERTISEMENT

3. फळांचा रस ठरतो फायदेशीर

Shutterstock

तुमच्या नेहमीच्या धावपळीच्या आयुष्यात रोजच्या आहारावर खूपच प्रभाव पडत असतो. त्यामुळे या नऊ दिवसात व्यवस्थित आहार योजना करून तुम्ही शरीर सुदृढ करण्याचा प्रयत्न करू शकता. या दिवसात ताजी आणि वेगवेगळी फळं बाजारात येतात. .त्यामुळे तुम्ही नऊ दिवस या विविध फळांचा रस पिऊन आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करू शकता. उपवास असल्याने इतर दिवसांसारखी फळांचा रस न पिण्यासाठी कारणं देता येत नाही. शक्यतो स्मूदी प्याव्यात. साखरेचा त्यामध्ये समावेश करू नये. 

आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे ‘आरोग्यदायी पदार्थ’

4. सौंदर्यात होते वाढ

Shutterstock

ADVERTISEMENT

नऊ दिवस आपण जे रोज अरबट चरबट खातो अर्थात जंक फूडचा सपाटा लावतो त्यावर नियंत्रण राहातं. त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर लगेचच दिसून येतो. हे नऊ दिवस आपण सतत फळं, नारळ पाणी आणि इतर पौष्टिक आहार घेत असल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचेवर तकाकी दिसून येते. तसंच तुमच्या केसांचंही सौंदर्य यामुळे वाढतं. पोषक आहार घेतल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहातं. 

वाचा – Shengdane Khanyache Fayde In Marathi

5. त्वचा हायड्रेट राहण्यास होते मदत

फराळ आणि फळांव्यतिरक्त काहीही आहार न घेतल्यास म्हणजेच योग्य पदार्थांचं सेवन केल्यास, तुमच्या शरीरातील पाण्याची कमी पूर्ण होते आणि त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसंच तुमच्या शरीराला आवश्यक नसलेले पदार्थ शरीरात न गेल्याने आणि पाण्याचे योग्य सेवन झाल्याने तुम्हाला अधिक एनर्जी मिळते.  

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

ADVERTISEMENT

6. पचनक्रिया सुधारायला होते मदत

नऊ दिवसात तुम्ही कोणतेही जंक फूड अथवा तिखट पदार्थ सेवन न केल्याने तुमच्या शरीराची पचनक्रिया योग्य होते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्याकडे सतत दुर्लक्ष होऊन पचनक्रिया बिघडते. पण उपवासाच्या काळात तुमच्या पोटाला विश्रांंती मिळून पचनक्रिया सुधारायला मदत होते. 

7. भाजलेल्या अन्नामुळे हलकं वाटतं

या उपवासाच्या दिवसात जास्तीत जास्त भाजलेलं अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करावा. हे अन्न पचण्यास अत्यंत हलकं असतं आणि त्यामुळे दिवसभर तुमच्या शरीराला हलकं वाटतं. जडपणा वाटत नाही. त्यामुळे आळसही येत नाही. हे उपवास करताना योग्य खाण्यासाठी योग्य पदार्थांची निवड करत आहात ना याची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे.  

वटपौर्णिमा नक्की का आणि कशासाठी, जाणून घ्या कशी साजरी करावी वटपौर्णिमा

8. शरीराची मरगळ निघून जाते

Shutterstock

ADVERTISEMENT

उपवास केल्याने आपण शरीराला आवश्यक तितकेच पदार्थ खाण्याकडे कटाक्ष ठेवतो. त्यामुळे अतिरिक्त अन्नपदार्थ पोटात जात नाहीत आणि त्यामुळे आळसही येत नाही. शरीरातील मरगळ निघून जाण्यास मदत होते. तसंच दिवसभर पाणी असणारी फळं खाल्ल्याने व्यवस्थित ऊर्जाही मिळत राहाते. 

9. मानसिक शांती मिळते

उपवासाने केवळ शारीरिक नाही तर मानसिक स्वास्थ्यही मिळतं. मानसिक ताण दूर होऊन अधिकाधिक आपल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी मन केंद्रित करता येतं. तसंच इतर समस्यांवर योग्य विचार करण्याची शक्ती येते. राग कमी होतो. चंचलता कमी होऊन मन एकाग्र करण्यासाठी त्याची मदत होते. 

You Might Like These:

भोंडला’ महाराष्ट्राची संस्कृती जपणारा एक पारंपरिक खेळ

ADVERTISEMENT
18 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT