अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा करणार लग्न, केला व्हिडिओ शेअर

एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरामध्ये प्रसिद्ध झालेली मूळ प्रेरणा अर्थात श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्वेताने दुसरं लग्न करून बाळाला जन्म दिल्यानंतर ती कोणत्याही मालिकेत काम करत नव्हती. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने श्वेता तिवारी कायमच चर्चेत राहिली आहे. तिच्या खासगी आयुष्यामुळेही श्वेता नेहमीच चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वीच श्वेता आणि तिचा दुसरा नवरा अभिनव कोहली यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या अनेक चर्चा होत्या. तसंच आपली मुलगी पलक तिवारीला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोपही तिने अभिनववर लावला होता. या अशा चर्चा असतानाच आता नवी चर्चा सुरू झाली आहे की, पुन्हा एकदा श्वेता तिवारी पुन्हा एकदा लग्न करणार आहे. तिने स्वतःच हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

‘हिरकणी’ येत आहे प्रेक्षकांचं मन जिंकायला...

श्वेता तिवारीचा व्हिडिओ व्हायरल

श्वेता तिवारी हे नक्कीच टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने काहीही केलं तरी तिच्या नावाची चर्चा होते. आता पुन्हा एकदा श्वेता तिवारी लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. कोणताही विचार करण्याआधी जरा थांबा. तिच्या खऱ्या आयुष्यात ती तिसरं लग्न करणार नसून रिल लाईफमध्ये पुन्हा एकदा लग्न करणार आहे.  बऱ्याच कालावधीनंतर श्वेता तिवारी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. नुकतंच तिने ‘मेरे डॅड की दुल्हन’ या नव्या मालिकेच टीझर तिने शेअर केला आहे. यामध्ये अभिनेता वरूण वडोलाबरोबर श्वेता तिवारीची जोडी बनली आहे. हे ट्रेलर थोडं वेगळं असून त्यांची पहिलीची भेट कारला टक्कर दिल्याने होणाऱ्या भांडणाने झालेली दिसून येत आहे. हे भांडण अतिशय क्यूट स्वरूपात दाखवण्यात आलं आहे. आईविना वाढलेली मुलगी आणि तिचं वडील असं एक कुटुंब असून यामध्ये श्वेता तिवारीची एंट्री होणार आहे हे या व्हिडिओमधून प्रेक्षकांना कळत आहे. पण ही मालिका नक्कीच इतर मालिकांमधील सासू- सून स्वरूपाची नसून वेगळी असेल हेदेखील कळत आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी झालेल्या  पित्याचा त्याची मुलगी हा एकच आधार आहे. तर त्याची मुलगी त्याच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद मिळावा यासाठी दुल्हन अर्थात नव्या बायकोच्या शोधात आहे. मालिकेची कथा तर नक्कीच इंटरेस्टिंग आहे. पण ही मालिका ऑनएअर आल्यावरही तितकीच मजेशीर असेल आणि प्रेक्षकांना आवडेल अशी सध्या श्वेताचे चाहते अपेक्षा करत आहेत. 

वयाचं अंतर असूनही प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत टीव्हीवरील ‘या’ जोड्या

3 वर्षांनी श्वेता दिसणार छोट्या पडद्यावर

‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेतून श्वेता तिवारी साधारण 3 वर्षांनी पुन्हा दिसणार आहे. त्यापूर्वी ‘बेगूसराय’ या मालिकेतून श्वेता दिसली होती. तर वरूण वडोलादेखील बऱ्याच वर्षांनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही कलाकारांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. वरूण वडोला थिएटरदेखील करत असल्यामुळे त्याचा अभिनय आवडणारे बरेच प्रेक्षक आहेत. आता या मालिकेतून या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसंच श्वेताच्या चाहत्यांसाठी ती पुन्हा एकदा मालिकेतून दिसणार असल्याने आनंदाची बाब आहे. पुन्हा एकदा श्वेताला छोट्या पडद्यावर एका नव्या विषयासह रोजच्या रोज पाहता येणार आहे. या निमित्ताने श्वेताने पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली आहे असं म्हणावं लागेल. खासगी आयुष्यात नक्की तिचं काय चालू आहे याबाबत कोणतंही वक्तव्य श्वेताने यादरम्या केलं नाही. 

बॉलीवूड अभिनेत्री रायमा सेन करतेय मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.