नात्यात 'या' चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा!

नात्यात 'या' चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा!

नातं जुळणं तर सोपं आहे पण टिकवणं अत्यंत कठीण. कोणताही माणून नक्कीच एकटा राहू शकत नाही. तो कोणत्या ना कोणत्या नात्यामध्ये बांधला गेलेला असतोच. पण प्रेमाचं नातं हे असं नातं आहे त्यामध्ये तुम्ही जर काही चुका करत असाल आणि तुम्हाला तुमचं नातं टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवं. तुमचं नातं कितीही परफेक्ट असलं तरी एक वेळ अशी येतेच जेव्हा हे नातं तुटायच्या वळणावर येतं. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य गोष्टी माहीत असायला हव्यातच पण त्याचबरोबर कोणत्या चुका टाळायला हव्यात हेदेखील माहीत असायला हवं. जेणेकरून तुमचं नातं कायम टिकून राहील. आम्ही तुम्हाला याबाबत नक्की कोणत्या चुका टाळायला हव्यात हे सांगत आहोत. 

1. एकदम नातं तोडून टाकणं

GIPHY

तुम्हाला जर वाटत आहे की, तुमच्या नात्यामध्ये सध्या काही प्रॉब्लेम सुरू आहेत तर त्याचवेळी लगेच समोरच्याशी नातं तोडून टाकण्याचा विचार करू नका. तुमचं भांडण झालं असेल अथवा चालू असेल तर त्याचा अर्थ लगेच ब्रेकअप करणं असा होत नाही. तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्ही कोणत्याच नात्यात राहू शकत नाही. तुम्हाला जेव्हा असं जाणवतं की, तुम्ही आयुष्यभर एकत्र राहू शकाल अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली आहे त्यावेळी तुमच्या मनात ब्रेकअप करण्याबद्दल विचार येऊ देऊ नका. अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर तुम्ही त्यातून कोणता योग्य मार्ग निघतो ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच वाचा नात्याची प्रत्येक भावना मांडणारे कोट्स

2. चूक असल्यावरही शांत बसणं

GIPHY

तुमचा जोडीदार तुम्हाला जर अपसेट करत असेल अथवा तुमचं मन दुखावत असेल तर तुम्ही वेळोवेळी त्याला अथवा तिला ही गोष्ट सांगायला हवी. तुम्हाला काहीच फरक पडत नाही असं दाखवणं ही चूक आहे किंवा अशावेळी तुम्ही शांत बसणंदेखील चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला अशा भावना व्यक्त करण्याची गरज आहे. तुम्ही त्यांना वेळीच रोखलंत तर तुमचं नातं आहे तसंच राहील. अन्यथा एखाद्या दिवशी मनात साचून साचून अधिक कडवटपणा येईल. 

तुमच्या नात्यात तुम्हाला नक्की काय हवं सांगते तुमची रास (Zodiac)!

3. विचार न करता दूषण देणं

GIPHY

असं बऱ्याचदा नात्यांमध्ये घडताना दिसून येतं. उदाहरणार्थ तुमच्या एखाद्या मित्र अथवा मैत्रीणीने तुमच्या जोडीदाराविषयी तुमच्याकडे काही तक्रार केली. तर तुम्ही काय कराल? तुम्ही आपल्या जोडीदाराला त्याबद्दल न विचारता त्याला त्या गोष्टीवरून दूषण द्याल अथवा त्याच्या किंवा तिच्यावर संशय घेऊन अंगावर ओरडाल तर हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेऊन समोरासमोर बसून त्यांच्याशी अतिशय शांतपणे या गोष्टीबद्दल विचारणा करता यायला हवी. कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही तुमचं नातं खराब करून घेऊ शकता. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. 

4. प्रत्येक गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींना सांगणं

तुमचा बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड कोणताही चुकीची गोष्ट करत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगता. पण असं करू नका. कारण असं केल्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराची इमेज खराब करत असता. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या जोडीदाराचा यामुळे राग येतो. असं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्यापेक्षा जोडीदाराशी याबाबत स्पष्ट बोलणं योग्य आहे. 

5. खोटं बोलणं

GIPHY

तुमच्या नात्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सर्व काही ठीक आहे अशा भ्रमात ठेवून खोटं बोलू नका. तुम्ही जर त्यांच्याशी बिनधास्त बोलू शकणार नसाल तर तुम्ही आयुष्यात कधीच एकत्र आनंदी राहू शकणार नाही. खरं बोलणं हा विश्वासाचा पाया आहे आणि विश्वास हा नात्याचा पाया आहे. त्यामुळे खोटं बोलून त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. सहसा नात्यामध्ये खोटं बोलणं टाळा. 

6. दुसऱ्याकडे आकर्षित होणं...

तुमच्या नात्यात भांडणं आणि त्रास असेल त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी आकर्षित झालात आणि त्या व्यक्तीजवळ गेलात तर हे चुकीचं आहे. तुम्हाला जर तुमच्या पहिल्या नात्यात अजिबात रस नसेल आणि पटत नसेल तर पहिल्या नात्यातून ब्रेकअप करून पूर्ण बाहेर या आणि नंतरच तुम्ही दुसऱ्या नात्याला योग्य न्याय देऊ शकता. एकावेळी दोन व्यक्तींबरोबर राहणं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तींची फसवणूक तर करताच पण त्याशिवाय स्वतःचीही फसवणूक करत आहात हे लक्षात घ्या. 

नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

7. आपल्या प्रॉब्लेम्सकडे दुर्लक्ष करणं

बऱ्याचदा आपल्या नात्यात येणाऱ्या समस्यांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला वाटतं की, हे हळूहळू ठीक होईल.  पण असं होत नाही. असं केल्याने तुमच्या समस्या अधिक वाढत जातात आणि एक दिवस हे असह्य होऊन नातं तुटण्यापलीकडे काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी जी समस्या तुम्हाला जाणवेल तुम्ही तुमच्या जोडीदारासह याची चर्चा करा. त्याकडे दुर्लक्ष करणं टाळा. 

8. सतत समोरच्याला जबाबदार धरणं

GIPHY

एखादी गोष्ट जेव्हा नात्यात चुकीची होते तेव्हा सतत तुमच्या जोडीदाराला याबाबत जबाबदार ठरवता.  असं करू नका. नक्की समस्या काय आहे आणि असं का झालं याचा योग्य विचार करा. आपली चूक असेल तर मान्य करा. तुम्ही चूक करूच शकत नाही अशा आविर्भावात राहू नका. तसंच समोरच्याची चूक असेल तर किमान चूक काय आहे याचा विचार करून माफ करायला शिका. 

दीर्घ अंतर रिलेशनशिप टिप्स

9. प्रत्येक गोष्टीत वाद घालणं

कधीतरी वाद होणं हे साहजिक आहे. पण प्रत्येक लहानसहान गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारावर नाराज होत असाल आणि वाद घालत असाल तर त्यामुळे नातं नक्कीच खराब होऊ शकतं.  कोणत्याही समस्येचं समाधान वाद घालण्याने मिळत नाही. असं वागत राहिल्यास, तुमचं ब्रेकअप होण्याची शक्यता जास्त आहे. कोणतीही समस्या असल्यास शांततेने जोडीदाराबरोबर चर्चा करा. 

10. बोलायला भीती वाटत आहे?

GIPHY

तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये योग्यरितीने संवाद होत नाहीये का? तुम्ही एकमेकांबद्दल जर बोलायच कचरत असाल किंवा भीती वाटत असेल तर तुमचं नातं नक्कीच टिकू शकत नाही. कोणत्याही परफेक्ट नात्यासाठी ही गोष्ट योग्य नाही. त्यामुळे तुमचं तुमच्या जोडीदाराबरोबर बाँडिंग चांगलं असणं आवश्यक आहे. तसंच कोणतीही शंका असेल तर वेळीच त्या शंकेचं निरसन जोडीदाराकडून करून घ्या. 

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे, तर आताच करा ब्रेकअप

POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन... त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.

तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.