छोट्या पडद्यावरच्या या सुंदऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही आहेत वरचढ

छोट्या पडद्यावरच्या या सुंदऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही आहेत वरचढ

आजच्या ग्लॅमर, स्टाईल, फॅशन किंवा लोकप्रियतेच्या बाबतीत फक्त बॉलीवूड अभिनेत्रीचं एकछत्री राज्य राहिलेलं नाही. आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीही स्टारडमच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत. उलट छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री चांगल्या आणि संस्कारी सूनेचा रोल करून लोकांच्या मनात खास जागाही बनवतात. एवढंच नाहीतर या छोट्या पडद्यावरच्या सूनांना प्रेक्षक रिअल लाईफमध्ये तेवढाच मान, सन्मान आणि प्रेम देतात. पाहा टीव्हीवरील या अभिनेत्री ज्या सौंदर्यात बॉलीवूड अभिनेत्रींनाही देतात टक्कर.

जेनिफर विंगेट

छोट्या पडद्यावरील सर्वात सुंदर अभिनेत्री जेनिफर विंगेट आहे असं म्हणण्यास हरकत नाही. जेनिफर लहानपणापासून टीव्हीवर शाका लाका बूम बूम सारख्या मालिका आणि जाहिरातींमधून काम करत आहे. टीव्हीवर काम करण्याऱ्या या अभिनेत्री पहिलं यश मिळालं ते कसौटी जिंदगी की या मालिकेमुळे. या मालिकेनंतर जेनिफरने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सरवस्तीचंद्र,बेहदसारख्या अनेक यशस्वी मालिका तिने केल्या आणि आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. मुख्य म्हणजे ती कोणत्याही इमेजमध्ये अडकून न राहता तिने भूमिकांबाबत अनेक प्रयोग केले.

मौनी रॉय

छोट्या पडद्यावरील ही नागिन मौनी रॉय बॉलीवूडमध्येही चमकली आहे. मौनी ही छोट्या पडद्यावरील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या इन्स्टा अकाउंटवर ती सतत बोल्ड फोटो शेअर करत असते. तिची पॉप्युलॅरिटी एवढी आहे की, तिने पोस्ट टाकताच काही सेकंड्समध्ये तिचे फोटोज व्हायरल होतात. खरंतर मौनीला छोट्या पडद्यावर खूप प्रसिद्धी आणि यश मिळालं. पण ती तेवढ्यावरच न थांबता बॉलीवूडच्या मार्गावर आहे. अक्षय कुमारसोबत गोल्ड या चित्रपटात झळकल्यानंतर ती ब्रम्हास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

एरिका फर्नांडिस

एरिकाने टीव्ही शो “कुछ रंग प्यार के” मध्ये डॉक्टर सोनाक्षीची भूमिका केली होती. ज्या भूमिकेने तिला रातोरात टीव्हीवरील टॉपची अभिनेत्री बनवलं. एरिकाने टीव्ही शोसोबतच कन्नड़, तामीळ आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या ती कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये प्रेरणाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

क्रिस्टल डिसूजा

क्रिस्टल डिसूजाचे हिरवे डोळे, चमकणारे केस आणि लवचिक फिगरमुळे तिला टीव्ही इंडस्ट्रीतील रपन्जल म्हटलं जातं. क्रिस्टलला छोट्या पडद्यावर सर्वात जास्त यश मिळालं ते फेमस शो एक हजारों में मेरी बहना मुळे. त्यानंतर ती दिसली ती “बेलनवाली बहू” सीरियलमध्ये कॉमिक भूमिकेत ज्यामुळे तिने प्रेक्षकांना खूप हसवलं.

पूजा बोस

तुझ संग प्रीत लागई सजना शोने धमाकेदार सुरूवात करणाऱ्या पूजाने आता टीव्ही इंडस्ट्रीत चांगलंच स्थान निर्माण केलं आहे. तिने कॉमेडी शोजमध्ये काम करून कॉमिक टाईमिंगही प्रेक्षकांना दाखवलं आहे. तर तुझ संग प्रीत लगाई सजना मालिकेतील को-एक्टर असलेल्या अभिनेता कुणाल वर्माशी लग्न करून ती सेटलही झाली आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

हिना खान

View this post on Instagram

Reddd not just a colour, it’s an attitude ❤️

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

तब्बल आठ वर्ष सुपरहिट ठरलेल्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये एका चांगल्या सूनेची भूमिका करणाऱ्या हिना खानने घराघरात एक खास जागा बनवली होती. पण बिग बॉसच्या घरातील शिल्पा शिंदेसोबतच वागण्याने तिच्या चांगल्या सूनेच्या इमेजला तडा गेला. त्यानंतर तिने कसौटी जिंदगी की मालिकेत पॉप्युलर कोमोलिकाच्या भूमिकेत एंट्री केली आणि आता ती लवकरच बॉलीवूड चित्रपटातही झळकणार आहे. एवढंच नाहीतर तिने कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरही फॅशनचा जलवा दाखवला.

त्यामुळे बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षाही जास्त सुंदर असणाऱ्या अभिनेत्रींना प्रेक्षकांचं जास्त प्रेम मिळतं, असं म्हणायला हरकत नाही.

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.