नवरात्रीत नऊ दिवस देवीची आराधना केली जाते. घटस्थापनेपासून अगदी दसऱ्यापर्यंत देवीची सजावट करण्यासाठी, तोरणं आणि रांगोळ्या काढण्यासाठी गोंड्याच्या फुलांचा म्हणजेच झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. भारतीय संस्कृतीत सणासुदीला आणि धार्मिक कार्यात झेंडूंच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दररोज देवाला झेडूंच्या फुलांचा हार घातला जातो. पण एवढंच नाही तुम्ही या झेंडूच्या फुलांचा वापर तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील करू शकता. घरात पुजेसाठी आणलेली झेंडूची फुलं वापर झाल्यावर कचरा म्हणून टाकण्यापेक्षा त्याचा वापर तुम्ही घरच्या घरी फेसस्क्रब तयार करण्यासाठी वापरू शकता. शिवाय झेंडूच्या फुलांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्ही या फुलांचा वापर विविध आरोग्य समस्यादेखील दूर करू शकता.
झेंडूच्या फुलांमध्ये असलेल्या अॅंटिऑक्सिडंट घटकांमुळे ती तुमच्या त्वचेसाठी गुणाकारी ठरतात. बऱ्याचदा सणासुदीला बाहेर जाण्यापूर्वी आपल्याला त्वचेवर इंन्स्टंट ग्लो यावा असं वाटत असतं. त्वचेवर उजळपणा आणि असा ग्लो येण्यासाठी तुम्ही झेंडूच्या फुलांचा वापर नक्कीच करू शकता. कारण झेंडूंची फुल अशावेळी तुमच्या घरातच असतात. पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर घरच्या घरी झेंडूच्या फुलांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा चमकदार करू शकता.
आजकाल वातावरणात होणारे सततचे बदल तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपणाच्या खुणा वाढवतात. जर तुमची त्चचा कोरडी असेल तर तर तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरूकुत्या दिसू लागतात. मात्र झेंडूच्या फुलांमध्ये तुमच्या त्वचेला फ्रेश आणि तरूण ठेवण्याचे गुणधर्म असतात. झेंडूच्या फुलांचा वापर केल्यामुळे त्वचा ओलसर आणि मऊ राहते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा नक्कीच कमी होऊ शकतात.
झेंडूमध्ये अॅंटि इनफ्लैमटरी म्हणजेच दाह कमी करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील जखमा आणि व्रण लवकर बऱ्या होतात. सनबर्न, कीटकदंश, व्रण कमी करण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच झेंडूच्या फुलांचा वापर करू शकता. झेंडूंचे फुल हे एक नैसर्गिक आणि आयुर्वेदिक फुल आहे. ज्यामुळे तुमच्या जखमा अथवा व्रण लवकर बरे होतात.
पिंपल्स आणि पुरळ ही एक कटकटीची आणि कधीही येणारी समस्या आहे. एखाद्या महत्त्वाच्या दिवशी अचानक पिंपल्स चेहऱ्यावर दिसू लागतात. झेंडूच्या फुलांमधील अॅंटि बॅक्टेरिअल घटकांमुळे तुम्ही पिंपल्स दूर करण्यासाठी याचा वापर करू शकता.
वातावरणात होणारे सततचे बदल तुमच्या त्वचेवर कोरडेपणा निर्माण होतो. मात्र झेंडूच्या फुलांमुळे तुमच्या त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते. त्वचा ओलरस आणि मऊ राहिल्यामुळे ती फार कोरडी राहत नाही. तुम्हाला फ्रेश आणि तजेलदार दिसायचं असेल तर झेंडूच्या फुलांचा वापर नक्की करा.
पावसाळा अथवा दमट वातावरण फंगल इनफेक्शनला आमंत्रण देतात. नुकताच पावसाळा सरू लागला आहे. अशा वेळी फंगल इनफेक्शनची समस्या दूर करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा रस नक्कीच परिणामकारक ठरू शकतो.
सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही झेंडूची फुलं वापरून विविध प्रकारचे घरगुती फेसपॅक अथवा फेतयार करू शकता.
फेस स्कब - झेंडूची फुलं आणि मसूर डाळ
साहित्य - झेंडूची फुले, बेसन अथवा मसूर डाळीचे पीठ, दूध
काय कराल - झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून त्याची पेस्ट तयार करा. त्यात बेसण अथवामसूर डाळीचे पीठ आणि दूध मिसळून एक जाडसर पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा आणि सुकू द्या. सुकल्यावर कोमट पाणी चेहऱ्यावर शिंपडून चेहरा सर्कुलेशन मोशनमध्ये हाताने चोळून स्वच्छ करा. हा एक प्रकारचा स्क्रब असल्यामुळे यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सर्व धुळ, धाण आणि प्रदूषण निघून जाईल. त्वचेवर एक प्रकारचा तजेलदारपणा येईल. नवरात्रीत सुंदर दिसण्यासाठी हा स्क्रब तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल.
त्वचेप्रमाणेच तुम्ही तुमच्या केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठीदेखील झेंडूची फुले वापरू शकता. कारण झेंडूच्या फुलांमध्ये तुमच्या केसांना चमकदार करण्याचे अनेक गुणधर्म दडलेले आहेत.
केसांमध्ये होणारा कोंडा ही एक दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे. कोंड्यांमुळे केसांच्या आतील त्वचा कोरडी होते आणि त्याला सतत खाज येऊ लागते. मात्र झेंडूच्या फुलांचा रस अथवा तेल केसांना लावल्यामुळे तुमच्या केसांमधील कोंडा कमी होऊ शकतो. झेंडूची फुलांचा रस अथवा तेल केसांच्या मुळांना लावा आणि मसाज करा. वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा. नियमित असं केल्याने तुमच्या केसांमधील कोंडा कमी होतो.
केसांच्या समस्यांमुळे आणि प्रदूषणामुळे केस गळण्याची समस्या वारंवार जाणवते. मात्र जर तुम्हाला लांब आणि घनदाट केस हवे असतील तर तुम्ही झेंडूच्या फुलांचा वापर त्यासाठी करू शकता. केसांवर झेंडूच्या फुलांचे तेल नियमित लावल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते आणि ते लांब होतात.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
हे ही वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा
नितळ त्वचा हवी असेल तर वापरा हे 'बेस्ट पील ऑफ मास्क'
गुलाबपाणी... त्वचा आणि केसांचं सौदर्य खुलवणारा नैसर्गिक उपाय!