काकडीचे फायदे Health and Beauty Benefits of Cucumber In Marathi | POPxo

स्वयंपाक घरातील काकडीचे फायदे Benefits of Cucumber

स्वयंपाक घरातील काकडीचे फायदे Benefits of Cucumber

काकडी हा आपल्या रोजच्या आहारातील घटक आहे. कारण आपल्याकडे बरेचदा कोशिंबीर, सलाड किंवा चटणी अगदी कढीमध्येही काकडीचा वापर आवर्जून केला जातो. काकडी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तुम्हाला माहीत आहे का की, काकडी ही भाजी नसून एक फळ आहे. या फळांमध्ये पोषक तत्त्वांची मात्रा अधिक असते. तसंच काकडीमध्ये अँटीऑक्सीडंट्सही आढळतात. जे अनेक आजारांपासून तुमचं संरक्षण करतात. काकडीमधील कमी कॅलरीजमुळे याचा डाएटमध्येही भरपूर प्रमाणात वापर केला जातो. कारण यातील पाण्याची मात्रा आणि सॉल्युबल फायबर अधिक असल्याने वजन कमी करण्यातही काकडी उपयोगी ठरते. या लेखात जाणून घेऊया काकडीचे फायदे आणि तोटे.

Table of Contents

  काकडीतील पोषक तत्त्व Nutritional Value of Cucumber

  Shutterstock
  Shutterstock

  काकडीमध्ये कमी पण अनेक महत्त्वपूर्ण व्हिटॅमीन्स आणि खनिजांचं प्रमाण जास्त आहे. एका सोललेल्या कच्च्या काकडीतील पोषक तत्त्वं खालीलप्रमाणे - 

  कॅलरीज : 45

  फॅट्स : 0 ग्रॅम

  कार्ब्स : 11 ग्रॅम

  प्रोटीन : 2 ग्रॅम

  फायबर: 2 ग्रॅम

  व्हिटॅमीन सी : RDI 14%

  व्हिटॅमीन K : RDI 62%

  मॅग्नेशिअम : RDI 10%

  पोटॅशिअम : RDI 13%

  मँगनीज : RDI 12%

  साधारणतः रोजच्या जेवणात आपण एक तृतीयांश काकडी खातो, त्यामुळे त्यानुसार आपल्याला वरील सांगितलेली पोषक तत्त्वही त्याच प्रमाणात मिळतात. या व्यतिरिक्त काकडीमध्ये पाण्याची मात्रा अधिक असते. वास्तविकतः काकडी ही 96% पाण्याने बनलेली असते. काकडीतील जास्तीत जास्त पोषक तत्त्व मिळण्याकरता पिकलेली काकडी खाणं आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा काकडी सोलून खाल्ल्यास त्यातील फायबरचं प्रमाण कमी होतं. तसंच काही व्हिटॅमीन्स आणि खनिजंही कमी होतात.

  काकडीचे आश्चर्यकारक फायदे Benefits of Cucumber

  Cucumber मध्ये कॅलरीज कमी असतात हे आपण पाहिलं. पण यामध्ये महत्त्वपूर्ण व्हिटॅमीन्स आणि खनिज यांचं प्रमाण अधिक असतं. चला जाणून घेऊया काकडी सेवनाचे काही आश्चर्यकारक फायदे.

  Shutterstock
  Shutterstock

  रोग प्रतिकारक शक्तीवर्धक Immune Sysytem

  आपल्या शरीरातील हानीकारक मुक्त कणांच्या संचयामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आजार होण्याची शक्यता असते. ज्यामध्ये तणाव, कॅन्सर, हृदय रोग, फुफ्फुस्सांचा रोग आणि ऑटोइम्यून आजार होण्याचा धोका असतो. या सर्वांपासून वाचण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सीडंट्सची आवश्यकता असते. जी आपल्याला फळ आणि भाज्यांमधून मिळतात. काकडीही विशेष अँटीऑक्सीडंट्सयुक्त आहे. जी असे आजार होण्याची शक्यता कमी करते. काकडीमधील अँटी ऑक्सीडंट्समध्ये फ्लेवनॉईड आणि टॅनिन असतं. जे दुर्धर रोगांपासून आपलं संरक्षण करतं. त्यामुळे वरील आजार आपल्याला न होण्यासाठी काकडीचं सेवन अवश्य करा.

  डीहायड्रेशन टाळण्यासाठी Prevent Dyhydration

  पाणी आपल्या शरीरातील सर्व कार्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि शरीराच्या सुरळीत कार्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. जसं शरीराचं तापमान नियंत्रित करणे आणि पोषक तत्त्वांचं उत्पादन आणि शोषणं. वास्तविकपणे शरीरातील योग्य हायड्रेशनमुळे शरीर निरोगी राहतं आणि चयापचय क्रिया सुरळीत राहते. त्यामुळे जेव्हा आपण पाणी पितो किंवा अन्य तरल पदार्थांद्वारा आपल्या पाण्याची गरज पूर्ण करतो. तर काही जणांना त्यांच्या जेवणाच्या माध्यमातून पाण्याच्या सेवनाचे 40% मिळतात. फळ आणि भाज्या हे विशेष रूपाने आपल्या शरीरातील आहारामार्गे मिळणाऱ्या पाण्याचा चांगला स्त्रोत असतात. त्यामुळे काकडी ही मुख्यतः हायड्रेशनला पूरक असून विशेष रूपाने प्रभावी आहे. कारण काकडीमध्ये 96% पाणी आढळतं. जर तुम्ही काकडीचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर तुमची दैनंदिन पाण्याची गरज सहज पूर्ण होण्यास मदत होईल.

  वजन कमी करते काकडी Weight loss

  काकडीही तुम्हाला विविध प्रकारे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. कारण सर्वात आधी काकडीतील कॅलरीज कमी आहेत. एक कप (104 ग्रॅम) काकडीमध्ये फक्त 16 कॅलरीज असतात. तर 300 ग्रॅम काकडीमध्ये फक्त 45 कॅलरीज असतात. याचाच अर्थ असा की, अतिरिक्त कॅलरीजशिवाय तुम्ही काकडी खाऊ शकता. कारण काकडीमुळे कॅलरीज वाढण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत तर काकडीचे अनेक प्रकार आढळतातच. जसं कोशिंबीर, सॅलड आणि चटणी किंवा कढीमध्ये काकडी घालणं. अगदी रोजच्या नाश्त्यातील सँडविचमध्ये आपण आवर्जून काकडी वापरतो. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास काकडी खाऊन तुम्ही ते साध्य करू शकता. काकडीच्या सेवनाने तुमचं वजन कमी वेळात आणि जास्त प्रमाणात घटेल.

  ब्लडशुगरवरही गुणकारी Lower Blood Sugar

  अनेक रिसर्चमध्ये हे आढळलं आहे की, काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करणं आणि मधुमेहातील काही कॉम्प्लिकेशन्स रोखण्यात मदत होते. रिसर्चनुसार, काकडीमुळे रक्तातील शर्कराचा स्तर प्रभावीपणे कमी करणं आणि नियंत्रित राहिल्याचं आढळलं होतं. मधुमेहाच्या रूग्णांनी काकडीचं साल नक्की खावं कारण काकडीच्या सालामध्ये जास्तकरून मधुमेहाशीनिगडीत रोग बरे करण्याचे गुण आढळतात आणि रक्तातील साखरही कमी होते. याशिवाय काकडीतील ऑक्सीडंट्स तणावही कमी करतात.

  सुलभ पचनासाठी Digestion

  जर तुम्हाला पोटाच्या समस्या किंवा बद्धकोष्ठासारखी समस्या असेल तर तुम्ही रोजच्या आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे. ज्यामुळे तुमच्या पचनाबाबतच्या समस्या कमी होतील. शरीरातील पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठाचं प्रमुख कारण असतं. काकडीच्या सेवनाने हे टाळता येऊ शकतं. कारण काकडी तुम्हाला हायड्रेट ठेवते. ज्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास कमी होऊन पचनास मदत मिळते. तसंच काकडीतील फायबरमुळे आतड्यातील समस्याही नियंत्रणात राहतात. काकडीतील पेक्टीन नावाच्या विरघळणाऱ्या फायबर प्रकारामुळे आतड्यांची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे काकडी ही फायबर आणि पाण्याचा चांगला स्त्रोत असून बद्धकोष्ठ आणि पचन जलद करण्यासाठी मदत करते.

  हृदयमित्र काकडी Good for heart

  काकडीमध्ये पोटॅशिअम असतं. जे लो ब्लडप्रेशरशी निगडीत असतं. आपल्या शरीरातील आणि बाहेरील पोटॅशिअम एक योग्य संतुलन तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. त्यामुळे तुम्ही काकडीचं सेवन केल्यास तुमचं हृदय निरोगी राहील.

  तोडांची दुर्गंधी होईल दूर Bad breath

  जर तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर तोंडात एक काकडीचा तुकडा धरून ठेवा. काकडीच्या वासाने तोंडात दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियापासून तुमची सुटका होईल. आयुर्वेदानुसार, काकडी खाल्ल्याने पोटातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत मिळते. या उष्णतेमुळे मुख्यतः तोंडाची दुर्गंधी होते.

  कॅन्सरचा धोका टाळा Reduce risk of cancer

  काकडीत पॉलीफेनोल आढळतं जे स्तन, गर्भाशय आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करतं. याशिवाय काकडीत फिओनोट्रीयंट्स असतात ज्यामध्ये कॅन्सर दूर करण्याचे गुण असतात.

  मेंदूसाठीही लाभदायक Brain

  काकडीमध्ये अँटी इन्फ्लेमेट्ररी फ्लेवनॉईल असतं ज्याला फिसेटिन (fisetin) असं म्हटलं जातं. जे मेंदूच्या स्वास्थामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. तुमच्या स्मरणशक्तीतील सुधार आणि आयुष्याशी निगडीत कोशिकांचं संरक्षण हे घटक करतात. शिवाय फिसेटिन (fisetin) तुमची बुद्धी तल्लख करतं आणि अल्झायमर रोग बरा करण्यासाठी जे सक्षम असल्याचं आढळलं आहे.

  तणावावर प्रभावी Stress

  वर म्हटल्याप्रमाणे काकडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन बी असतं ज्यामध्ये व्हिटॅमीन बी 1, व्हिटॅमीन बी 5 आणि व्हिटॅमीन बी 7 (बायोटिन) यांचा समावेश आहे. बी व्हिटॅमीन मनात चिंता निर्माण करणाऱ्या भावना कमी करतं आणि तणावाचे हानीकारक परिणामही दूर करतं. त्यामुळे काकडीचं सेवन करून तुम्ही तणावापासून दूर राहू शकता.

  त्वचेसाठी गुणकारी ठरणारी काकडी 7 ways to Use Cucumber for skin care

  उष्णतारोधक काकडी तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे, हे तर तुम्हाला माहीत असेलच. काकडी तुमच्या शरीराला hydrated ठेवते ज्यामुळे तुम्हाला ताजंतवान वाटतं. तसंच काकडी त्वचेसाठीही प्रभावी आहे कसं ते जाणून घ्या. 

  Shutterstock
  Shutterstock

  डोळ्याखालील काळी वर्तुळांसाठी काकडी Black circles

  Ingredients यासाठी तुम्हाला लागतील काकडीच्या 2 स्लाइसेस. 

  What You Need To Do या स्लाईसेस डोळ्यांवर ठेवा किमान 20 मिनिटं किंवा काकडीच्या ज्यूसमध्ये कापूर भिजवून तो डोळ्यांवर ठेवा. 

  Why Does It Work काकडीच्या वापराने तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळं लवकर आणि अगदी आरामात कमी करता येतील. यामध्ये असणाऱ्या अँटी ऑक्सीडंट्स आणि सिलीका या घटकांमुळे डोळ्यांखालील वर्तुळं कमी होतात. तसंच तुमच्या डोळ्यांतील उष्णता शोषली जाऊन डोळ्यांना थंडावाही मिळतो.

  Puffy eyes साठी काकडी

  Ingredients ताज्या काकडीच्या 2 स्लाइसेस किंवा रस 

  What You Need To Do झोपून उठल्यावर डोळे सुजलेले असल्यास त्यावर काकडीच्या स्लाईसेस ठेवा किंवा काकडीचा रसात बुडवलेला कापूस काही वेळा ठेवा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. 

  Why Does It Work सकाळी झोपून उठल्यावर बराच वेळ आपले डोळे सुजलेले म्हणजेच puffy दिसतात. यावरील सोपा आणि सहज उपाय काकडी आहे. काकडीत भरपूर प्रमाणात आढळणारे ascorbic acid डोळ्यांचं water retention कमी करतं आणि तुमच्या डोळ्यांचा puffiness कमी होतो.

  फ्रेकल्स Freckles

  Ingredients काकडीचा गर किंवा सालं
  What You Need To Do ताजा काकडीचा गर किंवा काकडीचं ताजं सालं तुम्ही पॅकसारखं वापरू शकता किंवा ज्या ठिकाणी चट्टे आले असतील तिथे काकडीचं साल लावा.
  Why Does It Work फ्रेकल्स म्हणजेच ब्राऊन patches त्वचेवर उठतात जे साधारणतः कडक उन्हात जाऊन आल्यामुळे उठतात. काकडीने हे चट्टे कमी करण्यास मदत होते.

  तजेलदार त्वचेसाठी Glowing Skin

  Ingredients ताजा काकडीचा रस 2-3 चमचे, 1 चमचा लिंबाचा रस 

  What You Need To Do काकडी आणि लिंबाचा रस मिक्स करून तो चेहऱ्याला लावा. 

  Why Does It Work काकडी ही त्वचेसाठी वरदान आहे. काकडीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होऊन तुमची त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसेल.

  सनबर्नवर प्रभावी Sunburn

  Ingredients ताज्या काकडीच्या स्लाईसेस 

  What You Need To Do जर तुम्हाला बराच वेळ उन्हात राहिल्यामुळे सनबर्न झाल्यास काकडीच्या स्लाईसेस सनबर्न झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. तुम्हाला थंड पण वाटेल आणि सनबर्नही कमी होईल. 

  Why Does It Work काकडीतील उष्णतारोधक गुणांमुळे ही सनबर्नवर गुणकारी ठरते. काकडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो.

  ओपन पोर्स होतील कमी Open Pores

  Ingredients अॅपल साईडर व्हिनेगर, लिंबाचा रस, मध, एलोव्हेरा जेल किंवा टोमॅटोचा गर 

  What You Need To Do हे सर्व घटक मिक्स करून ते चेहऱ्यावरील ओपन पोर्सवर लावा. 

  Why Does It Work काकडीही एक उत्तम टोनर आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील ओपन पोर्स लवकर कमी होतील. 

  सेल्युलाईट Cellulite

  Ingredients अर्धा कप कॉफी, 1 चमचा मध आणि काकडीचा रस 

  What You Need To Do हे घटक मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्या. नंतर सेल्युलाईट असलेल्या स्कीनवर लावून मऊ कापडाने ती त्वचा कव्हर करा. किमान अर्धा तास exfoliate करा.  

  Why Does It Work काकडीच्या वापराने तुमच्या जांघावरील सेल्युलाईट गायब होईल. रोज जर तुम्ही काकडी खाल्ली तर तुम्हाला हा त्रास अजिबात जाणवणार नाही.

  काकडीचे साईड ईफेक्ट्स Side Effects of Cucumber

  Shutterstock
  Shutterstock

  वरील लेखात लिहील्याप्रमाणे तुम्हाला कळलं असेलच की, काकडी खाणं किती लाभदायक आहे. पण काही वेळा काकडी खाल्ल्याने काही दुष्परिणामही दिसून येतात. जाणून घ्या काकडीचे काही साईड ईफेक्ट्स 

  • जर तुम्हाला कच्च्या फळांची किंवा भाज्यांची अलर्जी असेल तर तुम्हाला काकडी खाल्ल्याने अलर्जी होऊ शकते. कारण बहुतेक वेळा काकडी कच्चीच खाल्ली जाते. 
  • जर तुम्हाला श्वसनाच्या त्रास होत असेल तर काकडी खाताना काळजी घ्या. कारण काकडी थंड असल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. 
  • काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने काकडीही मूत्र वर्धक म्हणूनही ओळखली जाते. जर तुम्हाला यामुळे मूत्राचा त्रास झाला तर काकडीचं सेवन करू नका. 
  • गर्भावस्थेतही जास्त प्रमाणात काकडीचं सेवन करणं टाळा. कारण काकडी खाणं जरी चांगलं असलं आणि पाण्याची कमतरता काकडीमुळे दूर होत असली तरी वारंवार लघवी लागल्यामुळे त्रास होऊ शकतो. 

  काकडीबाबत विचारले जाणारे काही प्रश्न FAQs about Cucumber

  Shutterstock
  Shutterstock

  काकडी हे फळ आहे की भाजी?

  खरंतर काकडी ही भाजी नसून फळ आहे. कारण काकडीची निर्मिती ही फळातून होते आणि त्यात बियाही आढळतात.

  रात्री काकडी खाल्ल्यास काही त्रास होतो का?

  आपण बरेचदा रात्रीच्या जेवणात सलाड किंवा कोशिंबीर म्हणून काकडीचं सेवन करतो. पण काकडी ही थंड असल्याने शक्यतो रात्री याचं सेवन करू नये असं न्युट्रीशन एक्सपर्ट सांगतात. तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काकडीचं सेवन करू शकता.

  काकडी खाल्ल्याने belly fat कमी होतं का?

  काकडीमध्ये फक्त 45 कॅलरीज आहेत. तसंच यात पाण्याचं प्रमाण तब्बल 96 टक्के आहे. त्यामुळे पोटाचं bloating कमी होतं तसंच तुमच्या शरीरालाही थंडावा मिळतो. परिणामी तुमचं वजन जलदगतीने कमी होतं आणि बेली फॅटही.

  काकडी ज्यूस पिण्याची योग्य वेळ कोणती?

  काकडीचा रस तुम्ही रिकाम्यापोटी सकाळी घेऊ शकता. जर तुम्हाला कोणती अॅलर्जी किंवा काही औषधं सुरू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काकडीच्या ज्यूसचं सेवन करा.

  काकडी खाण्याचे खरंतर फायदे अनेक आणि नुकसान मात्र नाममात्र आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी काकडीचं सेवन अवश्य करा.

  हेही वाचा -

  संत्र्याची साल ठेवा जपून.. कारण संत्र्याच्या सालीचे आहेत भरपूर फायदे

  'केळ्याची साल' आहे एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन

  आजच्या काळातंही तुम्हाला सौंदर्य मिळवून देतात या ‘पुरातन’ गोष्टी