ADVERTISEMENT
home / Diet
डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि बनवण्याची पद्धत (Benefits of Making Detox Water In Marathi)

डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि बनवण्याची पद्धत (Benefits of Making Detox Water In Marathi)

तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय खाता अथवा काय पिता यावर तुमच्या शरीराचा फिटनेस अवलंबून असतो. आपली आजची जीवनशैली पूर्ण वेगळी आहे. रोजची धावपळ, त्यात नेहमी जंक फूड खाणं. या जंक फूडमुळे जे काही दुष्परिणाम होतात त्याची यादी मात्र लांबलचक आहे. रोजच्या या कामकाजातून वेळ मिळत नाही. पण अतिरिक्त ऊर्जेची मात्र गरज असते. आपल्याला कधी थकायला होतं याचं भानही राहात नाही. त्यामुळे शरीरामध्ये अधिक टॉक्झिन जमा होण्याचीही शक्यता असते. याच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित स्वरुपात शरीराच्या डिटॉक्सची साफसफाई होणंही तितकंच गरजेचं आहे. यासाठी डिटॉक्स वॉटर आपल्या शरीराची स्वच्छता ठेवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. डिटॉक्स वॉटर हे नैसर्गिक स्वरूपात असून साधारणपणे जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, पाचनशक्ती अधिक चांगली बनवण्यासाठी, लिव्हर साफ ठेवण्यासाठी आणि आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर आहे. 

डिटॉक्स वॉटर म्हणजे नक्की काय? (What is detox water in Marathi)

Shutterstock

ADVERTISEMENT

डिटॉक्स वॉटरचं काम हे आपल्या शरीरातील डिटॉक्सची सफाई करण्याचं आहे. टॉक्झिक पदार्थ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. आपल्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या अथवा जागण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरामध्ये बरेच टॉक्झिक पदार्थ तयार होत असतात. हे पदार्थ शरीराच्या बाहेर काढणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरातील ही घाण साफ करण्यासाठी डिटॉक्स वॉटरचा फायदा होतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला या डिटॉक्स वॉटरबद्दल सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आपल्या डाएटमध्ये डिटॉक्स वॉटर समाविष्ट करून घ्या. एक्स्पर्ट्सच्या म्हणण्यानुसार, केवळ डिटॉक्स वॉटरच्या मदतीने तुम्ही तुमचं वजनही कमी करू शकता. व्यायाम न करता तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही नियमित याचा वापर करून घेऊ शकता. तसंच त्वचेवर चमक आणायची असल्यास अथवा तुम्हाला अधिक ऊर्जा हवी असल्यास, डिटॉक्स वॉटरबद्दल तुम्ही नक्कीच माहिती करून घ्यायला हवी. 

डिटॉक्स वॉटरचे आरोग्यासंबंधीचे फायदे (Health Benefits of Detox water in Marathi)

Shutterstock

ADVERTISEMENT

आपण रात्री साधारण 8 तास झोपतो त्यामुळे या तासांमध्ये आपल्या पोटात पाणी जात नाही. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर आणि आपल्या घरातील मोठी माणसंही देतात. तुम्ही नुसतं पाणी पिण्याऐवजी जर डिटॉक्स वॉटर प्यायलात तर त्याचा अधिक चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होतो. दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. डिटॉक्स वॉटरच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ निघून जाण्यास मदत होते. यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते आणि तुमचं वजन लवकर कमी होण्यासही मदत मिळते. याचे आरोग्यासंबंधित फायदे नक्की काय आहेत पाहुया.

वजन कमी करतं (Weight loss)

Shutterstock

तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते आणि हीच गोष्ट डिटॉक्स वॉटरच्या बाबतीतही लागू होते. हे पाणी पूर्णपणे तुमची पचनक्रिया वाढवण्यासाठी मदत करतं. यामुळे कॅलरीज कमी होतात. डिटॉक्स वॉटर प्यायल्याने ऊर्जेचा स्तर वाढतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहता आणि अगदी शरीरातही तुम्हाला हलकं हलकं वाटत राहातं. द्राक्षांसारख्या फळांमध्ये काही विशिष्ट अर्क असतात जे शरीरामध्ये साखर निर्माण करण्याची प्रक्रिया करतात. यामुळे पचनक्रिया वाढते आणि वजन कमी होतं. 

ADVERTISEMENT

पचनक्रिया योग्य राखतं (Digestion)

पचनक्रिया योग्य राखण्यासाठी आणि पोट नियमित स्वरूपात साफ ठेवण्यासाठी शरीरामध्ये योग्य प्रमाणात पाणी जाणं आवश्यक आहे. जास्त वेळ पाणी न प्यायल्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होऊ शकतो. ज्यामुळे पोट सतत गच्च राहातं आणि तुम्हाला सुस्तीही येत राहाते. अशी अवस्था असेल तर डिटॉक्स वॉटरमध्ये असलेल्या पोषक तत्वाने तुमची पचनक्रिया ही व्यवस्थित राखण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने जेवण व्यवस्थित जिरायला मदत होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. 

इम्यून सिस्टम मजबूत होते (Immune system)

शरीराची इम्यून सिस्टिम योग्य असेल तर कोणताही आजार तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे डिटॉक्स वॉटरने तुमच्या शरीराची इम्यून सिस्टिम योग्य बनवा. वास्तविक फळ आणि भाज्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती ही जास्त प्रमाणात असते. मुख्यत्वे तुम्ही नियमित स्वरूपात विटामिन सी चं सेवन करत असाल तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती ही मजबूत असते. डिटॉक्स वॉटर हे विषारी पदार्थ, कचरा आणि मुक्त कणांपासून शरीराची सुटका होण्यासाठी मदत करतं आणि तसंच तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अर्थात इम्यून सिस्टिम मजबूत करण्यासाठी मदत करतं. 

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी प्या ‘लिंबूपाणी’

लिव्हरचं रक्षण (For liver)

ADVERTISEMENT

Shutterstock

लिव्हरचं मुख्य कार्य आहे शरीर साफ ठेवण्याचं. आजच्या धावपळीच्या काळात आपल्या लिव्हरवर अनेक वाईट सवयींमुळे दबाव येत आहे. त्यामुळे लिव्हरची सुरक्षा करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून लिव्हर योग्य प्रकारे काम करू शकेल. डिटॉक्स वॉटर हे आपल्या शरीरातील टॉक्झिन पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या पिण्याच्या पाण्यात ताजे आणि रसयुक्त असेल काकडीचे तुकडे मिसळून ठेवा. दिवसभर हे पाणी पित राहा. रोज तुम्ही हे डिटॉक्स वॉटर प्यायल्यास, तुमचं लिव्हर हे इतरांच्या तुलनेत नक्कीच निरोगी असेल. 

ऊर्जा कमी होणार नाही (For energy)

शरीरामध्ये एक टक्का जरी पाणी कमी झालं तरी तुमच्या मूडवर त्याचा वाईट परिणाम होत असतो. तसंच एकाग्रता कमी होऊन तुमचं डोकंही यामुळे दुखू शकतं. कोणतंही डिटॉक्स वॉटर हे नैसर्गिकरित्या जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी, लिव्हर साफ ठेवण्यासाठी आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतं. यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस काम करण्याची एनर्जी अर्थात ऊर्जा राहाते. 

ADVERTISEMENT

सौंदर्यासाठीही होतो डिटॉक्स वॉटरचा फायदा (Beauty Benefits of Detox Water in Marathi)

डिटॉक्स वॉटर हे तुमच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे. तुमचं वाढतं वय न दाखवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. पर्यावरणातील अनेक प्रदूषणात्मक गोष्टी आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर जमा झाल्याने आपल्या त्वचेवर वयाच्या आधीच सुरकुत्या येतात आणि त्वचा कोरडी होते. पण तुम्ही नियमित विटामिन सी युक्त डिटॉक्स पेयं घेतलीत तर तुम्हाला हा त्रास नक्कीच होणार नाही आणि तुमची त्वचा अधिक चमकदार दिसेल. आंबट फळांमध्ये विटामिन सी चा जास्त भरणा असतो. त्यामुळे तुम्ही त्वचेसाठी कोणत्याही आंबट फळाचा डिटॉक्स वॉटरमध्ये वापर केल्यास, तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळतील.

डिटॉक्स वॉटरने सौंदर्यासंबंधी तुम्ही असा फायदा करून घेऊ शकता : 

रूप उजळवण्यासाठी (Skin brightning)

Shutterstock

ADVERTISEMENT

कोणालाही आपली त्वचा काळवंडलेली आवडत नाही. मग त्यासाठी अनेक वेळा पार्लरमध्ये जावं लागतं. पण तुम्ही डिटॉक्स वॉटरच्या सहाय्याने रूप उजळवू शकता. नियमित याचं सेवन केल्यास तुमच्या त्वचेमध्ये नक्कीच फरक पडतो. तुमचा मूळ रंग तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. 

पिंपल्सपासून होते सुटका (Reducing pimples)

Shutterstock

डिटॉक्स वॉटरमध्ये शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी लागणारी पोषक तत्व असतात. त्यामुळे नियमित याचं सेवन केल्याने तुमच्या शरीराती टॉक्झिन्स साफ होऊन चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शरीरातील टॉक्झिन्स निघून गेल्याने घामाने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत. 

ADVERTISEMENT

सुरकुत्या होतात कमी (Anti Aging)

डिटॉक्स वॉटरमध्ये विटामिन सी चा वापर केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. विटामिन सी हे तुमच्या त्वचेच्या सौंदर्यासाठी जास्त फायदेशीर असतं. त्यामुळे तुम्ही डिटॉक्स वॉटरसह याचं सेवन केल्यास, सुरकुत्या कमी व्हायला याची मदत होते. 

Flat Belly हवी आहे, तर मग आजपासूनच ट्राय करा हे 5 Detox Drinks

त्वचा चमकदार राहाते (Skin Tightning)

Shutterstock

ADVERTISEMENT

एक विशिष्ट वय झालं की, त्वचेवर फरक जाणवायला लागतो आणि त्वचा खाली येऊ लागते. पण नियमित डिटॉक्स वॉटरच्या सेवनाने तुमचं वय दिसून येत नाही. नियमित ऊर्जा मिळत राहिल्याने तुमची त्वचा अधिक चमकदार राहते आणि त्याशिवाय तुमची त्वचा व्यवस्थित टाईट राहून तुमचं वय दिसून येत नाही. 

त्वचा अधिक तरूण दिसते (Youthful Skin)

Shutterstock

डिटॉक्स वॉटरच्या नियमित सेवनाने तुमच्या त्वचेवर तजेलदारपणा येऊन तुमची त्वचा अधिक तरूण दिसते. तसंच यामुळे सुरकुत्या येत नाहीत आणि तुमची त्वचा अधिक तरूण दिसण्यासाठी मदत होते. मात्र याचं नियमित सेवन व्हायला हवं. 

ADVERTISEMENT

डिटॉक्स वॉटर बनवण्याची पद्धत (Method Of Making Detox Water In Marathi)

Shutterstock

घरच्या घरी डिटॉक्स वॉटर बनवणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ पाणी, फळं, भाज्या आणि काही वनस्पतींची गरज असते. आम्ही तुम्हाला घरच्या घरी हे डिटॉक्स वॉटर कसं तयार करायचं याची सोपी पद्धत सांगत आहोत. 

ADVERTISEMENT

स्टेप 1— सर्वात पहिले तुम्हाला कोणत्या फळाचं डिटॉक्स वॉटर करून घ्यायचं आहे ते ठरवा आणि त्यानंतर ते फळ आणि इतर भाज्या वा वनस्पती साफ करून ठेवा

स्टेप 2— हे व्यवस्थित कापून गरम अथवा थंड पाण्यात मिसळा

स्टेप 3— आता हे पाणी एका जारमध्ये घालून ठेवा. तुम्ही जितक्या अधिक गोष्टी यामध्ये घालणार तितकं तुमचं डिटॉक्स वॉटर अधिक चांगलं होणार. तुम्हाला थंड हवं असल्यास, हे डिटॉक्स वॉटर फ्रिजमध्ये साधारण 1-2 तास ठेऊन द्या. यामध्ये घातलेल्या गोष्टी व्यवस्थित मिसळण्यासाठी तुम्ही जास्त तासही हे ठेवू शकता. पण अगदीच जास्त तास ठेवू नका कारण त्यामुळे ते पाणी खराब होण्याची शक्यता असते. हे पाणी नंतर तुम्ही दिवसभर पिऊ शकता. 

ADVERTISEMENT

स्वच्छ, चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी कसे बनवावे डिटॉक्स वॉटर

डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यावा लागत नाही. तुम्ही घरच्या घरी अगदी स्वयंपाकघरात असलेल्या फळांपासून डिटॉक्स वॉटर बनवू शकता. आम्ही तुम्हाला इथे काही डिटॉक्स वॉटरच्या रेसिपी देत आहोत. 

1. लिंबाचं डिटॉक्स वॉटर (With lemon)

Shutterstock

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असतं. ज्यातील अँटिऑक्सिडंट गुण तुमच्या त्वचेवरील चमक वाढवून तुम्हाला अधिक सुंदर बनवतं. हे प्रदूषणांमधील कणांशी लढतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे डिटॉक्स वॉटर बनवू शकता. 

ADVERTISEMENT

स्टेप 1— सर्वात पहिले एका लिंबाचे दोन तुकडे करा

स्टेप 2— एका पाण्याच्या ग्लासात हे पूर्ण पिळून त्याचा रस काढून घ्या

स्टेप 3— तुम्हाला हवं असल्यास, पाण्याच्या ग्लाासत पुदीन्याची पानं घालू शकता. यामुळे तुम्हाला पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. रोज हे पाणी प्यायल्यास, शरीरातील टॉक्झिन्स दूर होतील. तसंच शरीर दिवसभर उत्साही राहील. पण लक्षात ठेवा की, यामध्ये कधीही मीठ अथवा साखर याचा वापर करू नका. 

2. गुलाबांच्या कळ्यांचं डिटॉक्स वॉटर (Rose petals and Fennel of Detox Water)

ADVERTISEMENT

Shutterstock

तणावापासून सुटका मिळण्यासाठी आणि  आपली मनोदशा चांगली करण्यासाठी तसंच पचनक्रियेवर योग्य इलाज म्हणून तुम्ही गुलाबांच्या पाकळ्यांचा उपयोग करू शकता. बडिशेप तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. तसंच डीएनए अत्परिवर्तन रोखण्यासाठीही याची मदत होते. यामध्ये असणारे अँटिइन्फ्लेमेटरी, कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आणि अँटिकॅन्सर गुण तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात. 

स्टेप 1— गुलाबाच्या 20 पाकळ्या आणि 2 चमचे बडिशेप 1 लीटर पाण्यात मिसळा

स्टेप 2— हे मिश्रण साधारण चार तास तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊन द्या. व्यवस्थित गार झालं आणि मिक्स झालं की, दिवसभर तुम्ही थोडं थोडं पित राहा

ADVERTISEMENT

3. संत्र आणि आल्याचं डिटॉक्स वॉटर (Orange And Ginger)

Shutterstock

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि विटामिन सी असतात जे आपल्या heart ची योग्य रक्षा करतात. त्यासाठी याचं डिटॉक्स वॉटर खूपच फायदेशीर ठरतं. हे डिटॉक्स वॉटर तुम्हाला विविध आजारांपासून आणि रोगांपासून लढण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. घरच्या घरी हे बनवणं अतिशय सोपं आहे. 

स्टेप 1— 1 आल्याचा मोठा तुकडा व्यवस्थित किसून घ्या आणि संत्र्याचे सालासकट साधारण 15 तुकडे करून हे एकत्र 1 लीटर पाण्यात घाला

ADVERTISEMENT

स्टेप 2— हे मिश्रण साधारण दोन तास तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊन द्या. व्यवस्थित गार झालं आणि मिक्स झालं की, दिवसभर तुम्ही थोडं थोडं पित राहा

4. द्राक्ष आणि लिंबाचं डिटॉक्स वॉटर (Grapes And Lemon)

Shutterstock

पाण्यामध्ये आपण लिंबाचा उपयोग थंड पेय म्हणून करतो पण यामध्ये तुम्ही काळ्या द्राक्षाचा उपयोग करून घेतलात तर अधिक फायदेशीर ठरेल. काळ्या द्राक्षांमध्ये कॅन्सरला रोखण्याची क्षमता आहे. तसंच अधिक कोलेस्ट्रॉल आणि प्लेटलेटच्या एकत्रीकरणालाही रोखतं. लिंबू हे विटामिन सी चा मोठा स्रोत आहे. पचनक्रिया उत्तेजित करण्यासाठी, केसगळती थांबवण्यासाठी, सर्दी आणि खोकल्याशी दोन हात करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

स्टेप 1— 10-15 काळी द्राक्ष बारीक कापून घ्या. लिंबूदेखील सालासकट कापून घ्या. एक लीटर पाण्यात हे दोन्ही मिक्स करा. 

स्टेप 2— हे दोन्ही पदार्थ तुम्ही पाण्यात 20 मिनिट्स ठेवा. त्यानंतर तुम्ही या डिटॉक्स वॉटरचा वापर करू शकता. 

5. आंबा आणि तुळशीचं डिटॉक्स वॉटर (Mango And Basil Leaves)

Shutterstock

ADVERTISEMENT

आंबा हा पचनक्रिया चांगली राखण्यासाठी, रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी, खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि इन्शुलिनमध्ये सुधारणा आणण्यासाठी फायदेशीर असतो. तुळशीच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरातील टॉक्झिक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. तसंच कॅन्सरच्या पेशींना रोखण्याचं कामही करतात. 

स्टेप 1— पिकलेल्या आंब्याचे 10 पातळ तुकटे करा आणि 10 तुळशीची पानं घ्या.

स्टेप 2 — हे दोन्ही पदार्थ एक लीटर पाण्यात घालून साधारण 1 तास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि  नंतर पित राहा

ADVERTISEMENT

डिटॉक्स वॉटरशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्नोत्तरं जाणून घ्या (FAQS)

प्रश्न – वजन कमी करण्यासाठी कोणतं डिटॉक्स वॉटर प्यायला हवं?

लिंबू विटामिन सी ने युक्त आहे, जे विषारी पदार्थ दूर करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. त्याशिवाय किवी आणि स्ट्रॉबेरीमध्येदेखील भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. यापासून बनलेले डिटॉक्स वॉटर हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आपल्या शरीरातील डिटॉक्स कमी करण्यासह हे मेटाबॉलिजम वाढवण्यासही मदत करतात. ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. 

प्रश्न – शरीराची सूज कमी करण्यासाठी कोणतं डिटॉक्स वॉटर वापरावं?

ज्या व्यक्तींना वॉटर रेंटेशनची समस्या असते अर्थात ज्यांचे पाय सूजतात, अशा व्यक्तींना काकडी आणि स्ट्रॉबेरीपासून तयार केलेलं डिटॉक्स वॉटर प्यायला हवं. यामुळे त्यांना खूप फायदा मिळतो. या व्यक्तींच्या शरीरातील टॉक्झिन्स निघून जातात आणि त्यांचं शरीरही डिटॉक्स होतं. त्यामुळे त्यांनाही आराम मिळतो. 

प्रश्न – डिटॉक्स वॉटरमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते का?

संत्र आणि स्ट्रॉबेरीच्या डिटॉक्स वॉटरने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे तुमच्या शरीराची आजारांशी लढण्याची ताकदही वाढते. तुम्ही दिवसातून एक वेळा डिटॉक्स वॉटर प्यायलात तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. रोज हे प्यायल्यास तुम्हाला नक्की बदल जाणवेल. 

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स 

04 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT