आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात सर्व काम आपल्याला रिमोटने करायची सवय लागली आहे. जसं टीव्हीसाठी रिमोट किंवा खिडकीचे पडदे लावण्यासाठी रिमोट वापरणे असाो. या सर्व प्रकारात आपल्या शरीराकडे लक्ष द्यायलाही आपण कंटाळा करतो. पूर्वीच्या काळी लोक म्हातारपणी आजारी पडत असत. पण आजकाल तर युवा पिढीमध्ये अनेक प्रकारचे आजार जसं आर्थरायटिस, हार्ट अटॅक, कॅन्सर, डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय. पण जर तुम्ही नियमितपणे पावर योगा केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता.
शक्ती योग किंवा पावर योगा हा एक प्रकारचा तीव्र योगा आहे. पावर योगा हा अष्टांग योगावर आधारित असून मुख्यतः वजन कमी करण्यासाठी केला जातो. याशिवाय या योगाला ‘जिम योगा’ (gym yoga) च्या नावानेही ओळखले जाते. ‘पावर योगा’ ही संकल्पना खरंतर आजच्या #millenialgeneration प्राचीन योगाचं केलेलं नामकरण आहे. पावर योगामुळे तुम्हाला दरदरून घाम येतो. हे उत्तेजक (stimulating), पंपिंग (pumping) आणि एकाच वेळी आराम देणारं आसन आहे. या योगामध्ये सर्वात चांगलं आणि आधुनिक अशा दिवसभराच्या कवायतीचा समावेश आहे. चला जाणून घेऊया पावर योगाबाबत विस्तारितपणे आजच्या #POPxoMarathi च्या या लेखात.
पावर योगा हा शब्द 1990 च्या दशकात प्रचलित झाला. ही एक पाश्चात्य संकल्पना आहे जी अष्टांग योगावर आधारित आहे. हा एक वेगाने करण्यात येणारा योगाभ्यास आहे जो तुमच्या हृदय गतीला जलद करतो. हा योगा केल्याने तुमची सहनशक्ती, सहनशीलता, शक्ती आणि स्थिरता वाढण्यास मदत होते. पावर योगामध्ये प्रत्येक पोज करताना लागोपाठ केली जाते त्यामुळे कोणताही दोन्हींच्या मध्ये नसतो. त्यामुळे तुमच्या शारीरिक क्षमतेसाठी हे एखाद्या आव्हानासारखं आहे. पावर योगा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक रूपाने फिट ठेवतो. तसंच तुम्हाला आध्यात्मिक बाजूही अवगत होते.
चला जाणून घेऊन ही योगासनं करण्याची कृती विस्तृतपणे -
नौकासन तुमच्या पोटाला मजबूत करते आणि पचन सुधारते. हे तुमच्या थायरॉईड आणि आतड्यांना उत्तेजित करते. या आसनामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तणावसुद्धा कमी होईल.
नौकासन कसे कराल - सर्वात आधी लादीवर योगा मॅट घाला दोन्ही पाय समोर घेऊन खाली बसा. दोन्ही पाय सरळ ठेवा आणि वर उचलायचा प्रयत्न करा. आता थोडंसं पाठीमागे वाकून संतुलन बनवा आणि हात तुमच्या पुढे सरळ ठेवा. या मुद्रेमध्ये तुमच्या पायाचा आणि शरीराचा वरील भाग यांचा कंबरेवर 45 डिग्रीचा कोन झाला पाहिजे. हे आसन तुमच्या क्षमतेनुसार काही सेकंड (10 ते 60 सेकंड) करण्याचा प्रयत्न करा.
अधोमुख श्वान आसनामुळे तुम्हाला उर्जा मिळते आणि ताजंतवान वाटतं. हे तुमच्या फुफ्फुस्साची क्षमता वाढवतं आणि छोट्या आजारापासून मुक्तता देतं. ही मुद्रा ऑस्टियोपोरोसिस रोकण्यासाठी आपल्या हाडांना बळकटी देते.
हे आसन कसं कराल - जमिनीवर योगा मॅट घालून सरळ उभे राहा. तुमच्या दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता समोरच्या बाजून वाकत तुमचे दोन्ही हात जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय लांब करा ज्यामुळे तुमच्या हाताची आणि मणक्याची हाडं सरळ रेषेत येतील. यामध्ये तुमचे पाय आणि छातीच्यामधे 90 डिग्री अंशाचा कोन होईल. अधोमुख श्वान आसन दोन-तीन मिनिटांसाठी करा.
उष्ट्रासन तुमची पाठ आणि खांदे मजबूत करतं. हे आसन केल्यामुळे तुमची श्वसन प्रणाली सुधारते. हे पाठीच्या खालच्या भागाला आराम देतं आणि जांघा मजबूत करतं. हे आसन तुमच्या शरीरासाठी खूपच चांगल आहे.
हे आसन कसं कराल - योगा मॅट जमिनीवर घालून गुडघ्यावर उभे राहा. आता कंबरेतून पाठीमागे वाका. तुमचं डोकंही वाकवा आणि दोन्ही हाथ पायांच्या टाचेला जोडा. उष्ट्रासनामध्ये 30 ते 60 सेकंडपर्यंत राहण्याचा प्रयत्न करा.
उत्कटासनामुळे तुुमचा दृढनिश्चय वाढण्यास मदत होते आणि यामुळे गुडघ्याच्या मांसपेशी टोन होतात. हे तुमच्या टाचा, पोटऱ्या आणि कुल्ह्यांच्या फ्लेक्सर्स (flexors) ना मजबूत करतं. ही मुद्रा तुमच्या छातीला खेचते आणि हृदयाला उत्तेजित करते.
हे आसन कसं कराल - सर्वात आधी लादीवर योगा मॅट घालून सरळ उभे राहा. तुमचे दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन जोडा. आता हळूहळू तुमचे गुडघे फोल्ड करून कुल्ह्यांच्या खाली आणा. आशा स्थितीत तुम्ही एखाद्या खुर्चीसमान दिसाला. हे आसन तुम्हाला 30 ते 60 सेकंड करायचे आहे.
शलभासन तुमच्या वरच्या आणि खालच्या पाठीच्या मांसपेशींना मजबूत करतं. या मुद्रेमुळे तुमची चिंतापासून सुटका होते आणि मेंदूला शांतता मिळते. या आसनामुळे तुमचे हात मजबूत होतात आणि तुमच्या शरीराला पेशन्सची सवय होते.
हे आसन कसं कराल - सर्वात आधी योगा मॅट घालून पोटाच्या बाजूवर आडवं व्हा. दोन्ही हाथ आणि पाय जमिनीलगत सरळ ठेवा. आता तुमचे धड आणि दोन्ही पाय वरच्या दिशेला उचलायचा प्रयत्न करा. तसंच दोन्ही हातही वर उचला. या मुद्रेत कमीतकमी 20 सेकंड राहण्याचा प्रयत्न करा.
चतुरंगा दंडासन तुमच्या कोर (core) स्थिरता चालना देतं. हे तुमच्या मेंदूला आणि शरीराला प्रभावित करतं. या मुद्रेमध्ये तुमचे हात, पाय आणि मनगट मजबूत होता आणि सहनशक्तीही वाढते.
हे आसन कसं कराल - चतुरंग दंडासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅट लादीवर घालून पोटावर झोपा. आपले दोन्ही हात जमिनीवर खांद्याच्या पुढच्या बाजूला ठेवत बोटं समोरच्या दिशेकडेच ठेवा. पायाच्या बोटांवर जोर टाकत हळू हळू दोन्ही गुडघे वर करा. श्वास आत घ्या आणि दोन्ही हातांवर शरीराचा भार टाकून उचाला. हाताच्या कोपराने 90 डिग्रीचा कोन बनवा. हे आसन तुम्हाला 10 ते 30 सेकंड करायचे आहे.
हे आसन करण्याचे फायदे - अर्ध चंद्रसन तुमच्या पायांना, स्तनांना आणि मणक्याच्या हाडाला मजबूत करतं. हे तुमच्या हॅमस्ट्रींगला पसरवतं आणि तुमचा पार्श्वभाग खुला करतं. अर्ध चंद्रासन हे समन्वय आणि संतुलन राखतं.
कसं कराल हे आसन - हे आसन करण्यासाठी एक योगा मॅट लादीवर घालून सरळ उभे राहा. डावा पाय पुढे घेऊन आणि शरीरावर भार उजवा पाय वर उचला. आता उजवा पाय जमिनीीवर ठेवा आणि डावा पाय सरळ करा. या स्थितीमध्ये शरीर लादीशी समांतर राहील. या आसनात तुम्हाला 15 ते 30 सेकंड थांबायचं आहे.
पावर योगातील आसन जाणून घेतल्यावर खाली पावर योगातील काही आसनांचे व्हिडिओ दाखवत आहोत. ते पाहून तुम्हाला पावर योगा कसा केला जातो हे कळेल.
पावर योगा सुरू करण्याआधी हे लक्षात घ्या की, पावर योगामध्ये बरीच मेहनत असून हा सगळ्यांना जमेलच असं नाही. सामान्यपणे हा योगा करताना पुढील काळजी घ्या.
1. तुमचं शरीर जर सुडौल नसेल तर - पावर योगा करण्याआधी एकदा नक्की विचार करा. कारण पावर योगा करण्यासाठी तुम्ही कमीत कमी मध्यम आकाराचे असून फिट असणं आवश्यक आहे. नाहीतर शारीरिक रूपाने यातील आसनाने तुम्हाला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
2. जर तुम्ही गर्भवती असाल तर - पावर योगातील काही आसन गर्भावस्थे दरम्यान केल्यास कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात. त्यापेक्षा तुम्ही गर्भसंस्कार किंवा गर्भवती महिलांसाठी असणाऱ्या योगा क्लासेसना जावं.
3. मधुमेही किंवा जुन्या शारीरिक आजाराने पीडित व्यक्तींसाठी - जर तुम्हाला एखादी चिंता असेल तर शक्ती योग किंवा कोणताही शारीरिक हालचाली असणारा प्रकार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
वाचा - नजर टाकूया पुण्यातील टॉप टेन जिम्सवर जिथे तुम्ही करू शकता मस्तपैकी कसरत
योगातील काही आसनातील हालचाली किंवा पोश्चर्स या खूप वेगाने बदलतात. तर पावर योगामधील आसन ही बराच वेळ एकाच पोजिशनमध्ये राहण्याची आहेत. पावर योगामध्ये शरीरावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं तर सामान्य योगामध्ये श्वसनावर जास्त लक्ष दिलं जातं.
पावर योगामुळे वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते. कारण तुमच्या स्नायू आणि बॉडीलाईनवर जास्त भर दिला जातो. स्नायूंवर काम केल्याने वजन घटण्यास आपोआपच मदत होते. तसंच यामुळे पचन सुलभ होते आणि फॅट्सही बर्न होतात.
पावर योगा हा खूपच अक्टिव्हीटी असणारा वर्कआऊट प्रकार आहे. ज्यामध्ये संपूर्ण शरीराचा समावेश होतो. योगा नव्याने शिकणाऱ्यांसाठी पावर योगा करून पाहायला हरकत नाही. पण हा सगळ्यांनाच सोपा पडेल असं नाही. काहीजणांना हळूवार पोझ असणारा नेहमीचा योगाही आवडू शकतो.
आपल्यालाच आपल्या शरीराची योग्य क्षमता माहीती असते. पण नियम पाहायला गेल्यास आरोग्यदायी शरीरासाठी योगा आठवड्यातून 3-5 वेळा केलाच पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य आराम मिळण्यासाठी वेळ मिळतो आणि आरोग्यही चांगले राहते.