Best Makeup Artist In Mumbai- मुंबई मधील सर्वोत्तम मेकअप कलाकार | POPxo

लग्नाच्या दिवशी तुमच्या सौंदर्याला बहारदार बनवतील मुंबईतील (Best Makeup Artist In Mumbai)

लग्नाच्या दिवशी तुमच्या सौंदर्याला बहारदार बनवतील मुंबईतील (Best Makeup Artist In Mumbai)

प्रत्येक मुलीला आपल्या लग्नाच्या दिवशी बेस्ट दिसायचं असतं. त्यामुळे लग्नाच्या मेकअपसाठी बेस्ट ब्रायडल मेकअप आर्टिस्ट बुक करणंही आलंच. एक वेळ तुम्ही लग्नाच्या साडी किंवा लेहंग्यावर कमी खर्च करा पण मेकअप आर्टिस्टसाठी मात्र चांगल बजेट ठेवा. कारण तुमचा लग्नातला लुक हा आयुष्यभरासाठी फोटोच्या रूपाने तुमच्यासोबत राहणार आहे. पण कोणत्याही मेकअप आर्टिस्टला फिक्स करण्याआधी ट्रायल मेकअप नक्की करून घ्या. यातही मेकअप आर्टिस्टप्रमाणे तुमच्या लग्नाच्या मेकअपचंही बजेट ठरतं. तसंच त्यांच्याही ट्रायलचे चार्जेसही घेतले जाऊ शकतात. पण तरीही आपल्या लग्नाच्या दिवसाचा मेकअप बेस्ट हवा असेल तर ट्रायल तर हवीच. त्यामुळे तुम्हाला मेकअप आर्टिस्टचीही कल्पना येईल. जर तुमचं बजेट उत्तम असेल तर तुम्हाला मुंबईतल्या या टॉप ब्रायडल मेकअप आर्टिस्टची लिस्ट नक्कीच उपयोगी पडेल. लग्नाच्या किमान 6 महिनेआधी मेकअप आर्टिस्टकडून ट्रायल नक्की घ्या.

Table of Contents

  मुंबईतील बेस्ट 15 Makeup Artist in Mumbai

  या लेखातील लिस्टमध्ये देत आहोत मुंबईतील सेलेब्स, प्रसिद्ध, या इंडस्ट्रीत मुरलेले आणि अनुभवी मेकअप आर्टिस्ट.

  वाचा: दक्षिण फुलांच्या केशरचनांबद्दल देखील वाचा

  1. वरदान नायक (Vardan Nayak)

  Instagram
  Instagram

  तुम्ही ईशा अंबानीचा लग्नाचा मेकअप पाहिला होतात का? तिच्या बऱ्याच प्री-वेडिंग फंक्शन्स आणि लग्नातील फंक्शन्सचा मेकअप हा वरदानने केला होता. वरदान जर तुमच्या मेकअप आर्टिस्टच्या लिस्टमध्ये असेल तर ट्रायल घेण्याचीही गरज नाही. कारण आत्तापर्यंत त्याने सेलिब्रिटी ईशा अंबानी आणि बॉलीवूड हिरोईन्सपैकी आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, सारा अली खान, जान्हवी कपूर आणि इतर अनेक जणींचा मेकअप केला आहे. पण त्याला संपर्क करण्याआधी तुम्ही त्याचं इन्स्टा पेज नक्की पाहा. त्याने आत्तापर्यंत केलेल्या अनेक कामांचे व्हिडिओज त्यावर आहेत.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : 45,000 रूपयांपासून पुढे. एकेका फंक्शनसाठी.. 

  संपर्क Contact: vardan.nayak23@gmail.com

  वाचा: नाटक शाळा मुंबई

  2. मिताली वकील (Mitali Vakil)

  Instagram
  Instagram

  मितालीचं नावही वरदानप्रमाणे बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहे. पण तिला जर तुम्ही निवडलंत तर त्याचा दुहेरी फायदा आहे. तो म्हणजे ती फक्त मेकअपच नाहीतर ती हेअरस्टाईल्ससुद्धा करते. मिताली वकीलने लंडनच्या डेल्मार अकॅडमीमधून मेकअपचं प्रशिक्षण घेतलं आहे. तिला 5 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव असून ती ब्रायडल मेकअपमधील प्रोफेशनल्सपैकी एक आहे.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 30,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन

  संपर्क Contact: Mitali.v@hotmail.com

  तसेच मराठीतील मेकअप टिप्स वाचा

  3. सुनीता दिवीहा (Sunita Diveeha)

  Instagram
  Instagram

  तुमच्या माहितीसाठी सुनीता दिवीहा यांना ब्रायडल मेकअपमध्ये तब्बल 25 वर्षांचा अनुभव आहे. त्या मेकअप आणि हेअरस्टाईल दोन्ही करतात. मेकअपमधल्या परफेक्टशनिस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी डोळे बंद करून त्यांच्यावर तुमच्या लग्नाच्या दिवशीच्या लुकची जबाबदारी टाकू शकता.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 35,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन

  संपर्क Contact: Sunitadivecha@gmail.com

  Also Read About Good Quality Primer In Marathi

  4. निधी बेहल (Nidhi Behl)

  Instagram
  Instagram

  निधीचं जेवढं प्रेम मेकअपवर त्यापेक्षा जास्त तिच्या ब्रशेसवर आहे. तुम्ही तिचा इन्स्टा पेज पाहिल्यास तुम्हाला कल्पना येईल. मुख्य म्हणजे त्या हेवी मेकअप आवडणाऱ्या ब्राईड्सचाही मेकअप करतात आणि ज्यांना अगदी सिंपल मेकअप हवा असतो. त्यांचाही मेकअप करतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रायडल मेकअप करून घ्यायला आवडेल.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 30,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन

  संपर्क Contact: 76-66-77-88-99

  5. आयेशा सेठ (Ayesha Seth)

  Instagram
  Instagram

  तुम्ही अगदी एखाद्या मॅगजिनवरच्या मॉडेलप्रमाणे दिसाल जर तुम्ही तुमच्या ब्रायडल मेकअपसाठी आयेशा सेठला निवडलंत. आयेशाने आत्तापर्यंत अनेक मॉडेल्स, बी-टाऊन सेलेब्स आणि अनेक ब्राईड्सचा मेकअप केला आहे. ती सतत बिझी असते, त्यामुळे तुमच्या लग्नासाठी तिला हायर करताना अॅडव्हान्समध्येच बुकिंग करावं लागेल.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 35,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन.

  संपर्क Contact: 09820613781

  वाचा - सेलिब्रिटी ब्राइडल मराठीत दिसते (Celebrity Bridal Looks In Marathi)

  6. प्रिया तोडरवाल (Priya Todarwal)

  Instagram
  Instagram

  तुम्हाला प्रिया तोडरवालबाबत पहिली गोष्ट आवडेल ती म्हणजे तिचा कामाबाबतचा एटिट्यूड. ब्रायडल मेकअप करताना प्रियाला तो नॅचरल आणि कमीतकमी ठेवायला आवडतो. तुम्ही इन्स्टाग्रामवर तिची प्रोफाईल पाहिल्यास ती अक्षरशः व्हिज्युअल ट्रीट ठरेल. 

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : 45,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन 

  संपर्क Contact: +919821072588

  7. नम्रता सोनी (Namrata Soni)

  Instagram
  Instagram

  नम्रतासोबत काम करणं एक सुंदर अनुभव घेणं आहे. ती तिच्या कामाच्याबाबतीत खूपच पॅशनेट असून डिटेल्ड वर्कवर तिचा भर असतो. तुम्ही जर तुमच्या दी डे साठी तिला निवडणार असाल तर उत्तमच आहे. कारण तिला अनेक वर्षांचा अनुभव असून तिचा मेकअपही उत्तम आहे. तिने दिलेल्या लुकने तुमचा वेडिंग लुक नक्कीच अविस्मरणीय होईल.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 1,40,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन.

  संपर्क Contact: 09930310269 / soninamrata@gmail.com

  8. भारत आणि डोरीस (Bharat And Dorris)

  Instagram
  Instagram

  तुम्ही त्यांच्या ब्युटी प्रोडक्ट्सबद्दल ऐकलं असेल पण तुम्हाला माहीत आहे का, ते मेकअपही करतात. त्यांचा मेकअप हा सॉफ्ट आणि सबटल असतो. पण त्यांचे मेकअप चार्जेस पर फंक्शन फारच जास्त आहेत. जर तुमचं मेकअप आर्टिस्टचं बजेट तेवढं नसेल तर तुम्ही त्यांच्या टीममध्ये काम करणाऱ्या सीनिअर मेकअप आर्टिस्टची निवड करू शकता. जे अर्ध्या किमतीत मेकअप करतील.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 35,000 (सीनिअर मेकअप आर्टिस्ट चार्जेस) प्रत्येकी फंक्शन.

  संपर्क Contact: 02228891527

  वाचा - मुंबईतील 5 बेस्ट बँक्वेट हॉल (Top Banquet Halls in Mumbai)

  9. ओजस रजनी (Ojas Rajani)

  Instagram
  Instagram

  तुम्ही कदाचित मेकअप वर्ल्डमधील हे नाव ऐकलंही असेल. त्याने आत्तापर्यंत 100 हून जास्त ब्राईड्सचा मेकअप आणि अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. तो गेली अनेक वर्ष या क्षेत्रात असून तुम्ही अगदी निर्धास्तपणे तुमच्या मेकअपची जबाबदारी त्याच्यावर टाकू शकता.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 40,000 च्या पुढे प्रत्येक फंक्शन

  संपर्क Contact: 9821117259

   

  10. कोरी वालिया (Cory Walia)

  Instagram
  Instagram

  कोरी वालिया हा लॅक्मेच्या सीनियर मेकअप आर्टिस्ट्सपैकी एक आहे. जर तुम्ही त्याला तुमच्या दि डे साठी निवडलंत तर तुम्हाला अजिबात पश्चाताप होणार नाही. ब्राईड्ससोबतच तो ब्राईडची आई आणि बहिणींनाही मेकअप करतो. ब्रायडल मेकअपच्या अर्धा बजेटमध्ये तो इतरांना मेकअप करतो. 

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च: साधारणतः 40,000 ते 2,00,000 च्या रेंजमध्ये प्रती फंक्शन चार्जेस आहेत. 

  संपर्क Contact: 9820009489  11. मिकी कॉन्ट्रॅक्टर (Mickey Contractor)

  Instagram
  Instagram

  मिकीचं नाव मेकअप आर्टिस्टमधील लेजंड म्हणून घेण्यास हरकत नाही. गेली अनेक वर्ष त्याने बॉलीवूडमधील अभिनेत्रींसोबत काम तर केलं आहेच. याशिवाय जगत सुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लग्नाचा मेकअपही मिकीनेच केला होता. एवढंच नाहीतर तो M.A.C प्रसाधनांच्या भारतीय डिरेक्टर ऑफ मेकअप आर्टिस्ट्रीमध्ये आहे.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : जवळपास 1,00,000 प्रत्येकी फंक्शन

  संपर्क Contact: 09820031352

  12. मल्लिका जॉली (Mallika Jolly)

  Instagram
  Instagram

  आत्तापर्यंत मल्लिकाने ज्या ब्राईड्सचा मेकअप केला आहे त्या मेकअपबाबत समाधानी असल्याचं चित्र आहे. मुख्य म्हणजे जर तुम्ही लग्नाच्या प्रत्येक फंक्शनची जबाबदारी तिच्याकडे दिलीत तर तुम्हाला प्रत्येक फंक्शनला वेगवेगळा लुक आवर्जून मिळेल. कारण ती प्रत्येक मेकअप तितकाच फ्रेश, रिअल आणि नॅचरल करते.  

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 45,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन 

  संपर्क Contact : 08047097625 Extn: 1683

  13. आरती दमानिया (Arti Damania)

  Instagram
  Instagram

  जर तुम्ही बजेटमध्ये आणि चांगल्या ब्रायडल मेकअप आर्टिस्टच्या शोधात असाल तर आरती दमानिया हे परफेक्ट नाव आहे. 20 हजारापेक्षा कमी रेंजमध्ये तुमचा आणि कुटुंबातील सदस्यांचा मेकअप होऊ शकतो. 

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 18,000-20,000 प्रत्येकी फंक्शन.

  संपर्क Contact: 9820632176

  14. निवृत्ती चंद्रा (Nivritti Chandra)

  Instagram
  Instagram

  जर तुम्हाला वर सांगितलेल्या कोरी वालियाप्रमाणेच मेकअप हवा असेल आणि तेवढं बजेट नसेल तर तुम्ही निवृत्ती संपर्क करू शकता. कारण निवृत्तीने कोरी वालियाकडेच प्रशिक्षण घेतलं आहे. नंतर स्वतःचं मेकअपचं काम सुरू केलं आहे. मुंबई आणि दिल्लीतल्या ही ब्राईड्सच्या मेकअप ऑर्डर्स निवृत्ती घेते. तसंच फॅशन शोज आणि अॅड्सचंही काम ती करते. 

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च : Rs 20,000-25,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन 

  संपर्क Contact: दिल्ली: 9810509927 आणि मुंबई : 9004356627

  15. फातिमा सूमर (Fatima Soomar)

  Instagram
  Instagram

  जर तुम्हाला मुंबईतील मेकअप आर्टिस्टला तुमच्या वेडिंग डेस्टिनेशनच्या ठिकाणी घेऊन जायचं असेल तर तुमच्यासाठी परफेक्ट नाव म्हणजे फातिमा सूमर. ती अतिशय चांगली व्यक्ती असून मुंबईबाहेरील वेडिंग डेस्टिनेशनला येऊन तुमचा मेकअप नक्कीच करेल.

  Bridal Makeup चा अंदाजे खर्च: Rs 15,000-20,000 च्या पुढे प्रत्येकी फंक्शन.

  संपर्क Contact: 09930611766

  मेकअप आर्टिस्टबाबत विचारले जाणारे प्रश्न (FAQs Regarding Makeup Artist)

  तुम्हालाही पडतात का मेकअप आर्टिस्टबाबत असे काही प्रश्न. मग वाचा आम्ही काढलेले मेकअप आर्टिस्टबाबतचे काही ठराविक प्रश्न. 

  साधारणतः मेकअप आर्टिस्ट्स ब्रायडल मेकअपसाठी किती चार्जेस घेतात?

  प्रत्येक मेकअप आर्टिस्ट्चे चार्जेस हे अनुभवावर आधारित आहेत. जर नवीनच शिकलेले या क्षेत्रातील मेकअप आर्टिस्ट असतील तर ते 10,000-18,000 रूपयांच्या दरम्यान चार्जेस घेतील पण जर टॉप प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असतील तर 40, 000-1, 00,000 रूपयांच्या दरम्यान चार्जेस घेऊ शकतात.

  मेकअपसाठी मला स्वतःचे प्रोडक्ट्स न्यावे लागतील का?

  नाही. मुंबईतील ब्रायडल मेकअप आर्टिस्ट हे विविध प्रकारचे मेकअप प्रोडक्ट्स वापरतात. त्यामुळे तुम्हाला मेकअप प्रोडक्ट्स नेण्याची गरज पडणार नाही. पण जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट प्रोडक्टस वापरून मेकअप करायचा असल्यास तुम्हाला ते स्वतः न्यावे लागतील आणि आर्टिस्टला ते वापरण्यास सांगावे लागेल.

  मेकअप आर्टिस्ट लग्नाच्या दिवशी मेकअपसोबत हेअर स्टाईल्ससुद्धा करतात का?

  हो, मेकअप आर्टिस्ट तुमचा पूर्ण लुक केसांसकट डिझाईन करू शकतात. जर तुम्हाला स्टायलिंग आणि ड्रेपिंग करून हवं असल्यास तेही करू शकतात.

  मुंबईतील मेकअप आर्टिस्ट ट्रायल मेकअप देतात का?

  हो, ट्रायल मेकअप सेशन हे आजकाल खूप गरजेचं झालं आहे. कारण त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा लुक वेडिंगला हवा आहे आणि तुमच्यावर कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स सूट होतात, याची कल्पना येते.

  Read More from Wedding

  Load More Wedding Stories