या 10 गोष्टी आईपेक्षा चांगल्या कोणीच समजू शकत नाही

या 10 गोष्टी आईपेक्षा चांगल्या कोणीच समजू शकत नाही

आईने नुसता डोक्यावरून हात जरी फिरवला तरी सगळी टेन्शन्स एका झटक्यात दूर होतात. त्यामुळेच की काय, आपल्याला साधा खोकला जरी झाला तरी आपण डॉक्टरकडे जाण्याआधीच आपली आई (mother) डॉक्टरच्या भूमिकेत शिरते. कारण तिच्याकडे आहे प्रत्येक problem वरील साधे आणि सोपे घरगुती उपाय (home remedies).

1. जेव्हा पोटात दुखतं

जेव्हा पोटात दुखू लागतं आणि नेमक कशाने दुखतंय हे कळत नाही. तेव्हा आई कोणताही प्रश्न न विचारता उपायासोबत हजर होते. ना कोणतंही कडू औषध ना काढा. हिंग पाण्यात मिक्स करून ती फक्त बेंबीवर लावते काही वेळातच पोटात दुखणं थांबतं. 

2. खोकल्यामुळे झाला असाल हैराण

जेव्हा तुम्हाला विनाकारण खोकल्याचा त्रास होतो आणि कफ सिरप घेऊनही फरक पडत नाही. तेव्हा आईकडे असतो एक रामबाण उपाय. ज्येष्ठमध तोंडात धरा. मग पाहा खोकला कसा दोन-तीन दिवसात गायब होईल.

3. constipation झाल्यावर

जेव्हा constipation म्हणजेच बद्धकोष्ठाचा problem होतो तेव्हा आईच ही समस्या समजू शकते. मग आई जेवण झाल्यावर खडीसाखर आणि बडीशोप देते. मग पोट होतं एकदम साफ.

खडी साखरेतील पोषक तत्व (Nutritional Value Of Rock Sugar In Marathi)

4. पिंपलच्या समस्येवर

जेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि कोणत्याही क्रीम किंवा फेसवॉशने ते जात नाही. तेव्हा आई बनवून देते मध आणि दुधाचा लेप. हा लेप लावल्याने जुन्यात जुनं पिंपल किंवा डाग अगदी नाहीसे होतात. 

5. जेव्हा भूकच लागत नाही

कधी कधी असं होतं की, भूकच लागत नाही. मग सर्वात जास्त चिंता वाटते ती आईलाच. का आपल्या लेकराला भूक लागत नाही. मग आई लगेच लिंबू पाणी प्यायला देते आणि लगेच भूक लागते. कारण लिंबू पाण्याने भूक लागण्यास मदत होते.

6. सर्दी-पडसं होईल गायब

सर्दी-पडश्यांमुळे हैराण असाल तर डॉक्टरांच्या कडू औषधांऐवजी आईने बनवलेला गरमागरम बेसन आणि बदामाचा शिरा नक्कीच खायला हवा. हा शिरा खाऊन बरं तर वाटेलच पण सर्दीही नाहीशी होईल.

7. ताप जाईल पळून

तापाची कणकण वाटू लागताच आपली आई आलं-तुळशीचा काढा बनवून ठेवते. तो काढा कडू असतो पण तापापासून लगेच सुटका होते. चार-पाच दिवस डॉक्टरांचं औषधं आणि वाऱ्या करण्यापेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आहे.   

8. चेहऱ्यावरील हसू येईल परत

थंडी असो वा कोणताही महिना कधी कधी ओठ फाटतात आणि मग चैन पडत नाही. लिपबाम लावूनही फरक पडत नाही. अशावेळी आईचा साधा सोपा उपाय कामी येतो. तो म्हणजे घरगुती तूप लावण्याचा. मस्तपैकी घरी कढवलेलं तूप ओठांना लावा आणि झोपून जा. हा उपाय दोन-तीन दिवस केल्यास ओठ बरे तर होतीलच पण गुलाबीही दिसतील.

9. चक्कर येत आहे का

जेव्हा मळमळतं किंवा चक्कर आल्यासारखं वाटते तेव्हा घाबरण्याची गरज नाही. आई आहे ना. आईकडे आहे यावर सोपा उपाय. असं वाटत असल्यास चाटा थोडंसं काळं मीठ. मग बघा लगेच फरक जाणवेल.

10. डोकेदुखी

जेव्हा डोकेदुखी आपण हैराण होतो तेव्हा प्रभावी ठरतो आईच्या हातचा जादूई चहा. या जादूई चहात आई घालते आलं, वेलची, लवंग आणि काळी मिरी सोबतच आईचं अनलिमिटेड प्रेम.

मग पुढच्या वेळी वरील त्रास जाणवल्यास आईचे हे सोपे घरगुती उपाय नक्की करून पाहा.