दिवाळीचा सण प्रत्येकासाठी खास असतो. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिपावली पाडवा आणि भाऊबीज देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाऊबीज हा बहीण-भावासाठी सणाचा आनंद द्विगुणित करणारा सण असतो. ज्या दिवशी बहिण भावाला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीसाठी काहीतरी खास भेटवस्तू आणतो. भाऊबीज नेहमी कार्तिक शुद्ध द्वितीयेला असते. या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. महाराष्ट्रीय पद्धतीत दिवाळीचा हा सहावा दिवस असतो. असं म्हणतात की या दिवशी यमराजाने त्याची बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली होती. यासाठीच या दिवशी यमुना नदीत स्नान करण्याची आणि बहीणीच्या घरी जाऊन तिला भेटवस्तू देण्याची पद्धत निर्माण झाली.
आजकाल बहीणीदेखील भावाला एखादी भेटवस्तू देतात. मात्र या सर्वामागे एकमेकांसाठी सदिच्छा व्यक्त करणं हाच मुख्य उद्देश असतो. आजकाल अनेक भाऊ-बहीण कामानिमित्त वेगवेगळ्या राज्यात अथवा देशात असतात. त्यामुळे प्रत्येक दिवाळीच्या सणाला त्यांना एकत्र येणं शक्य होतच असं नाही. यावर्षी '16 नोव्हेंबर 2020' रोजी भाऊबीज आहे. यासाठीच यंदा या शुभेच्छा पाठवून तुमची भाऊबीज साजरी करू शकता.
भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहीणीच्या घरी तिला भेटण्यासाठी जातो. मात्र या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या लाडक्या बहीणीपासून दूर असाल तर तिला हे शुभेच्छा संदेश जरूर पाठवा.
1.सोनीयाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे वेड्या बहीणीची वेडीही माया.... भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
2. माझ्या लाडक्या भावाला भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
3. फुलो का तारो का सबका कहना है एक हजारो में मेरी बहना है....भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा
4. दिव्यांचा लखलखाट घरी आला आज माझा भाऊराया आला... भाऊबीजेच्या शुभेच्छा
5. सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
6. तुझ्या माझ्या नात्याला कोणाचीच उपमा नाही. ताई तुला उदंड आयु्ष्य लाभो. भाऊबीजेच्या शुभेच्छा
7. माझ्या दादाला उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदंबेकडे प्रार्थना. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा
8. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया... तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
9. आईप्रमाणे काळजी घेतेस, बाबांप्रमाणे धाक दाखवतेस, सतत माझी पाठराखण करतेस, ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा
10. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. भाऊबीजेच्या शुभेच्छा
11. आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारं कुणी असेल तर ती म्हणजे बहीण. ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा
12. लक्ष दिव्यांना उजळू दे बहीण-भावाचे पवित्र नाते. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
13. जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा
14. जपावे नाते निरामय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने. भाऊबीजेच्या शुभेच्छा
15. क्षणात भांडणार आणि क्षणात हसणार भावा-बहीणीचे नाते असेच राहणार. भाऊबीजेच्या शुभेच्छा
शुभेच्छा ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास दूर असूनही जवळचा वाटू लागतो. यासाठी या दिवाळीला भाऊबीजेसाठी भावंडांना हे मेसेज जरूर पाठवा.
1. माझ्याशी रोज भांडतोस पण दर भाऊबीजेला साठवलेल्या पैशांनी मला हवं ते गिफ्ट नेहमी आणतोस, Thanks Bhaiya
2. काही नाती खूप अनमोल असतात. त्यापैकी एक नातं म्हणजे तु आणि मी. भाऊबीजेच्या शुभेच्छा
3. या नात्यात ओढ आहे, या नात्यात गोडवा आहे. हे नातं आयुष्यभर असंच राहू दे
4. दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा
5. तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा
6. मला धाकात ठेवायला तुला नेहमीच आवडतं पण भाऊबीजेला मात्र प्रेमाचा झरा होतोस, भाऊबीजेच्या शुभेच्छा
7. तुझं प्रेम आकाशापलीकडचं आहे म्हणूनच तर मला कधीच कोणाची भिती वाटत नाही. तू असाच माझ्यासोबत राहा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
8. तू माझी छकुली आणि मी तुझा दादुल्या. तुझ्यापेक्षा मला इतर काहीच नको बाळा. भाऊबीजेच्या शुभेच्छा
9. तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा
10. भाऊ नसल्याचं दुःख कोणालाच मिळू नये. या नात्याचा आनंद काही औरच आहे.
11. जिला मोठा दादा असतो तिची सगळीकडेच हुकूमत चालते.
12. आईने जन्म दिला, बाबांनी आधार दिला पण प्रेम तर फक्त तुझ देतेस ताई. भाऊबीजेच्या शुभेच्छा
13. दर भाऊबीजेला मला वाट पाहायला लावतोस मग माझ्या नाकावरचा राग घालवण्यासाठी आवडणारं गिफ्ट देतोस.
14. मनातलं सिक्रेट सांगण्यासाठी प्रत्येकाला तुझ्यासारखी मोठी ताई हवी.
15. तायडे, ओवाळणी हवी असेल तर मलादेखील खास गिफ्ट आणायला विसरू नकोस.
आजकाल व्हाटसअॅप स्टेटस ठेवण्याची फॅशन आहे. त्यामुळे या भाऊबीजेला जर तुम्हाला व्हॉटसअॅप स्टेटस ठेवायचा असेल तर हे संदेश तुमच्या उपयोगाचे आहेत.
1. तुझं माझं नातं शब्दांच्या पलीकडचं तुझं माझं नातं सर्वांच्या पलीकडचं
2. तुझं माझं नातं असंच राहू दे तुझं माझं नातं आयुष्यभर अतूट राहू हे
3. ताई तुझ्या मायेला आभाळाची उपमा आहे, ताई तुझ्या हाताला अन्नपुर्णेची चव आहे
4. भाऊबीजेला तुझी साथ ही मिठाईपेक्षा गोड वाटते.
5. या दिवाळीला लक्ष्मीमातेची कृपा तुझ्यावर बरसत राहू दे. म्हणजे मला हे ते गिफ्ट तू नक्की देशील
6. सगळा आनंद एकीकडे आणि भावाने आणलेलं गिफ्ट एकीकडे
7. उटण्याच्या आनंदाने तुझं घर दरवळू दे, तुझा माझ्या प्रेमाचा सुगंध जगभर पसरू दे
8. सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली.
9. दारी रांगोळी सजली, ज्योतीने पणती सजली, आली आली भाऊबीज आणि दिवाळी आली.
10. रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास, भाऊबहीणीसाठी आजचा दिवस आहे खास
11. आकाशकंदीलचा प्रकाश अंगणात पडू दे देवाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे
12. दिवाळीच्या सणाला घरोघरी असतो लक्ष्मीचा निवास, तुझ्या माझ्यासाठी आजचा दिवस आहे खास
13. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज. दिपावलीच्या शुभेच्छा...
14. स्नेहाचा सुगंध दरवळला, आला आला भाऊबीजेचा सण आला
15. दिवाळीला येऊ दे सुख, शांती , समृद्धी घरी, यंदाच्या दिवाळीला माझी बहीणआली आहे माहेरी.