सणासुदीला पुरूषांमध्ये वाढतोय ‘भिकबाळी’ घालण्याचा ट्रेंड

सणासुदीला पुरूषांमध्ये वाढतोय ‘भिकबाळी’ घालण्याचा ट्रेंड

गणेशोत्सवाची धूम सर्वत्र सुरू आहे. सण-समारंभ जवळ आले की पारंपरिक पेहराव करण्याकडे सर्वांचा कल असतो. आजकाल पारंपरिक आणि आधुनिक असा फ्युजन लुकदेखील अधिक ट्रेंडमध्ये आहे. महिलांना जसं नऊवारी आणि साडीवर पारंपरिक साजशृगांर सजून दिसतो तसंच पुरूषही पारंपरिक लुकमध्ये रुबाबदार दिसतात. पारंपरिक पेहराव केल्यावर पारंपरिक दागिने घालणं हे ओघाने आलंच. खासकरून गुढीपाडव्याच्या सणाला महत्त्व आहे ते अशा पारंपारिक पेहरावाचं. महिला पारंपरिक पेहराव केल्यावर मोत्याची नथ घालणं पसंत करतात. तसंच पुरूषांमध्ये 'भिगबाळी' घालण्याची पद्धत आहे.  भिकबाळी हा पुरूषांनी कानात घालायचा एक पारंपरिक दागिना आहे. भिकबाळी हा एक पेशवाई दागिना असून त्यामध्ये सोन्याच्या तारेत मोती आणि लाल, हिरव्या रंगाची रत्ने जडवलेली असतात. पूर्वी यामध्ये खरे माणिक आणि पाचू जडवलेले जायचे. मात्र आता प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार भिकबाळी तयार करून घेतात. हा दागिना पुरूषमंडळी त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या पाळीत घालतात. भिगबाळी हा एक ऐतिहासिक दागिना असल्याने याविषयी प्रत्येकाला माहीत असणं फार गरजेचं आहे. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्यांनी हा दागिना घातलेला आहे. ज्यामुळे या दागिन्याची फॅशन सध्या फारच इन आहे.

बाजीराव मस्तानी चित्रपटात रणवीर सिंहने कानात घातलेली भिकबाळी...

तरूणाईत आहे या दागिन्याची विशेष क्रेझ

गणपती बाप्पाला पारंपरिक दागदागिन्यांनी सजवताना भिगबाळी घालण्यात येते. गणपती तयार करताना त्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर 'त्या 'साठी मुर्तीकार खास व्यवस्था करतात.आजकाल तरूण पिढीत भिगबाळी या दागिन्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. तुम्हालाही या भिकबाळीची आवड असेल तर यंदाच्या गणेशोत्सवाला भिगबाळी घालायला विसरू नका. शिवाय तुम्ही भिकबाळी कोणत्याही पेहरावावर सहज कॅरी करू शकता. पुणेरी पगडीवर भिकबाळी फारच उठून दिसते. मात्र आजकालचा जमाना हा मिक्समॅच फॅशनचा आहे. ज्याप्रमाणे  पारंपरिक नथ एखाद्या वनपीसवर उठून दिसू शकते. अगदी त्याच प्रमाणे तुम्ही भिकबाळी तुमच्या कोणत्याही लुकवर कॅरी करू शकता. 

गुढीपाडव्यासाठी खास शुभेच्छा संदेश

Accessories

Mahi Red and Gold Brass Bhik Bali

INR 229 AT Mahi

भिगबाळी खरेदी करताना काय काळजी घ्यावी

भिकबाळी हा सोन्याच्या तारेत गुंफलेला एक पारंपरिक दागिना असल्याने तो विश्वासू सोनाराकडेच विकत घ्यावा. ज्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. आजकाल सोनारांकडे तयार भिकबाळी मिळतात. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती खरेदी करू शकता. जर तुम्हाला सोन्याची भिकबाळी नको असेल तर चांदी अथवा आर्टिफिशिअल भिकबाळीदेखील बाजारात सहज उपलब्ध होऊ शकते. चांदी अथवा इतर धातूंमधील भिकबाळीत रिअल मोती आणि मणी नसल्यामुळे तिची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही सोन्याची भिकबाळी घालणार असाल तर तुम्ही ती अगदी रोजही वापरू शकता. मात्र आर्टिफिशिअल भिकबाळी फक्त कार्यक्रमापुरतीच वापरावी लागते. भिकबाळी विविध आकारात मिळत असल्यामुळे तुमच्या आवडीनुसार आणि हव्या आकारात तुम्ही ती विकत घेऊ शकता. या दागिन्यामध्ये नाविण्य आणत मोत्याप्रमाणेच रूद्राक्ष जडवलेल्या भिकबाळीदेखील सध्या लोकप्रिय होत आहेत. शिवाय सणासुदीला इंन्स्टट ट्रेडिशनल लुक करण्यासाठी तुम्ही ती अगदी ऑनलाईनही खरेदी करू शकता. तेव्हा यंदा गणपतीच्या सणाला पारंपरिक लुक करण्यासाठी एखादा कॉटन, लीनन, सिल्कचा कुर्ता, धोती, कानात मोत्याची भिगबाळी आणि डोक्यावर चंद्रकोर ही फॅशन कॅरी करायला काहीच हरकत नाही. पटकन होणारा आणि पारंपरिक असूनही सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या या लुकमध्ये तुम्ही अगदी रुबाबदार दिसाल.

अधिक वाचा

प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने

अशी घ्या मोत्यांच्या दागिन्यांची काळजी How to take care of Pearl Jewellery

पावसाळ्यात सिल्कच्या साड्यांची काळजी घेण्यासाठी खास टिप्स