फिटनेसबाबत जागरूक असल्यामुळे अनेकजण आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात. ब्रोकोली आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. ब्रोकोलीचा वापर बऱ्याचदा सॅलेड मध्ये केला जातो. खरंतर ब्रोकोली ही एक पाश्चात्य भाजी असून खाण्यास अतिशय चविष्ट लागते. आजकाल भारतीय भाजी मार्केटमध्येदेखील ब्रोकोली मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे ती एक कुठेही सहज उपलब्ध होणारी भाजी आहे. ब्रोकोली दिसायला अगदी फ्लॉवरच्या बाजीप्रमाणे दिसते मात्र तिचा रंग फक्त मात्र हिरवट आणि पिवळट असतो. ब्रोकोलीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वं आणि पोषणमुल्यं असतात. ज्यामुळे पौष्टिक आहारात या भाजीचा समावेश केला जातो. एका ब्रोकोलीच्या भाजीत जवळजवळ 53 कॅलेरिज आणि 4 ग्रॅम प्रोटिन्सची मात्रा असते. ब्रोकोली विविध पद्धतीने खाल्ली जाते. तुम्ही सॅलेडप्रमाणेच पराठा, सूप, स्मुदी आणि सॅन्डविजमध्ये ब्रोकोलीचा वापर करू शकता. तुमच्या नियमित आहारात ब्रोकोलीचा समावेश करण्यापूर्वी तिचे फायदे आणि शिजवण्याची मात्र पद्धत जरूर जाणून घ्या.
ब्रोकोली आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे रोजच्या आहारात तिचा समावेश करणं फार गरजेचं आहे. यासाठीच ब्रोकोली खाण्याचे तुमच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात हे अवश्य जाणून घ्या.
ब्रोकोली मधील पोषक घटक तुमच्या ह्रदयासाठी उपयुक्त असतात. नियमित ब्रोकोली खाण्यामुळे ह्रदयातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुम्हाला ह्रदयविकार होण्याचा धोकाही कमी होतो. ब्रोकोलीमधील पोटॅशियममुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होऊ शकते. यासाठी निरोगी ह्रदयासाठी तुमच्या आहारात ब्रोकोलीचा वापर जरूर करा.
ब्रोकोलीच्या भाजीत पाणी आणि फायबर्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे तिच्या सेवनाने तुमचे वजन कमी होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी उकडलेली ब्रोकोली सॅलेडमध्ये टाकून दोन्ही वेळच्या जेवणासोबत खा. अथवा मधल्या वेळेस ब्रोकोलीची स्मूदी खाण्यास काहीच हरकत नाही. यामुळे तुमच्या पोटात फायबर्स पुरेशा प्रमाणात जातील आणि तुम्हाला वारंवार भुक लागणार नाही. सहाजिकच ब्रोकोली खाण्याने तुमचे पोषण होईल शिवाय वजनदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी ब्रोकोलीचं सॅलेड नियमित खाणं तुमच्या फायद्याचं ठरेल.
वाचा - आरोग्यासाठी दालचिनी चे फायदे (Health Benefits Of Cinnamon In Marathi)
गरोदरपणात नेमका कोणता आहार घ्यावा याबाबत अनेक समज आहेत. मात्र या काळात गरोदर स्त्रीचे आणि तिच्या गर्भाचे उत्तम पोषण होणे गरजेचे असते. ब्रोकोलीमधील पोषणतत्त्वं गर्भाच्या वाढीसाठी पोषक असतात. यामुळे त्यांच्या मेंदू आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते. यासाठीच गरोदर महिलांनी त्यांच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश जरूर करावा.
बदलती जीवनशैली आणि व्यसनांचे वाढलेले प्रमाण यामुळे आजकाल कर्करोग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जीवनशैलीत बदल आणि योग्य आहार यामुळे कर्करोगापासून बचाव होणे शक्य आहे. एका संशोधनानूसार आहारात नियमित ब्रोकोलीचा वापर केल्यामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर आहे. यासाठीच ब्रोकोली खा आणि कर्करोगापासून स्वतःचे रक्षण करा.
ब्रोकोली या फळभाजीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. नेहमीच्या जेवणात ब्रोकोलीचा वापर केल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर आहारात ब्रोकोलीचा वापर जरूर करा. ब्रोकोली नियमित खाण्यामुळे तुमच्या पोटाचे विकार हळूहळू कमी होतील.
ब्रोकोलीमध्ये बीटी केरोटिन मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते. वयोमानानुसार होणारे मोतिबिंदू, काचबिंदू यापासून बचाव होण्यासाठी नियमित ब्रोकोली अवश्य खा.
मधुमेहींसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणं हे मोठं आव्हानंच असतं. टाईप 2 मधुमेह असणाऱ्या लोकांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित ब्रोकोली खाल्ल्यास चांगला फायदा होऊ शकतो. म्हणूनच जर तुम्हाला मधुमेह असल्यास कोणता आहार करावा अशी चिंता सतावत असेल तर नियमित ब्रोकोलीचं सॅलेड आणि स्मुदी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे.
आजकाल वाढता कामाचा ताण आणि चिंता-काळजी याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थावर दिसून येतो. मानसिक ताणतणावामुळे अनेक माणसं नैराश्याच्या आहारी जातात. शरीरात फॉलिक आॅसिडचे प्रमाणात कमी झाल्यामुळेदेखील तुम्हासा नैराश्य येण्याची शक्यता असते.मात्र ब्रोकोली खाण्यामुळे तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. याचे कारण असे की ब्रोकोलीमध्ये फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे तुम्हाला सतत फ्रेश आणि उत्साही वाटते.
ब्रोकोलीमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकते. कारण ब्रोकोलीत फायटोकेमिकल्स आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे या भाजीमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच सशक्त आणि रोगमुक्त राहण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश जरूर करा.
ब्रोकोली नियमित खाण्याने तुमच्या शरीरातील हाडे मजबूत होतात ज्यामुळे तुम्हाला कमजोर हाडांमुळे होणाऱ्या व्याधी कमी प्रमाणात होतात. वास्तविक ब्रोकोली हे व्हिटॅमिन के आणि कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास नक्कीच मदत होते. शिवाय ब्रोकोलीमध्ये फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन ए, सी देखील मुबलक असतं. ज्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी येते. लहान मुले आणि वृद्ध माणसांची हाडे मुळातच ठिसुळ असतात. म्हणूनच त्यांच्या आहारात ब्रोकोलीचा वापर करण्यास सुरूवात करा.
ब्रोकोलीचे जसे आरोग्यावर चांगले फायदे होतात अगदी तसेच ते तुमच्या त्वचा आणि केसांवरदेखील होत असतात. जर तुम्हाला निरोगी आणि सुंदर दिसायचं असेल तर ब्रोकोली जरूर खा.
वास्तविक म्हातारपण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र आजकाल बदललेली जीवनशैली, वाढता ताणतणाव, चिंता-काळजी, प्रदूषण याचा नकळत तुमच्या सौंदर्यावर परिणाम होत असतो. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही वयाच्या आधीच फार म्हाताऱ्या दिसू लागता. मात्र एका संशोधनानुसार बोक्रोलीचा आहारात समावेश केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अकाली म्हातारपणाच्या खुणा दिसत नाहीत.
ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या दातांचे आणि तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियममुळे तोंडातील जीवजंतू नष्ठ होण्यास मदत होते आणि दात मजबूत होतात. ब्रोकोली खाण्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. शिवाय यामुळे तुम्हाला तोंडाचा कॅंन्सर होण्याचा धोकादेखील कमी होतो. काही संशोधनानुसार कच्ची ब्रोकोली खाण्यामुळे तुमच्या तोंडातील दुर्गंधी कमी होते आणि तुमचे दात स्वच्छ होण्यास मदत होते.
वातावरणातील ओझोनचा थर कमी झाल्यामुळे अतीप्रखर सुर्याच्या किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचं प्रमाण सध्या वाढत चाललं आहे. मात्र एका संशोधनानुसार ब्रोकोलीमुळे त्वचला सुर्याच्या अतिनील किरणांपासून होणारा धोका कमी झाल्याचं आढळून आलेलं आहे. त्वचेचं संरक्षण करण्यासाठी नियमित ब्रोकोली खाण्यास काहीच हरकत नाही.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे तुमचे केस मजबूत आणि घनदाट होतात. व्हिटॅमिन सीमुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन ए आणि सी तुमच्या केसांचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. ज्यामुळे तुमच्या केसांची मुळं निरोगी आणि सशक्त होतात.
ब्रोकोलीमधील तेलाच्या घटकांमुळे तुमच्या केसांच्या मुळांचं योग्य पोषण होण्यास मदत होते. यातील ओमेगा 9 फॅटी अॅसिडचा परिणाम तुमच्या केसांच्या टेक्चरवर होतो. ज्यामुळे तुमचे केस फ्रेश आणि चमकदार दिसू लागतात.
ब्रोकोली बऱ्याचदा सॅलेडमध्ये वापरण्यात येते. यासाठीच तुम्हाला ब्रोकोली कशी शिजवावी हे माहीत असायलाच हवं. ब्रोकोली शिजवण्यापूर्वी ती थंड पाण्याने स्वच्छ धुवावी आणि तिचे तुरे वेगवेगळे करावे.
ब्रोकोली तुम्ही शिजवून खाऊ शकता पण ती शिजवताना पूर्णपणे कधीच शिजवू नये. कारण त्यामुळे त्यातील जीवनसत्व कमी होण्याची शक्यता असते. कमी शिजल्यामुळे तिचा कुरकुरपणादेखील तसाच राहतो. मायक्रोव्हेव मध्ये ब्रोकोली शिजवता येते मात्र ती शिजवताना तीन ते चार मिनीटांवर शिजवू नये.
ब्रोकोली उकडून खाणं नेहमीच चांगलं कारण त्यामुळे त्यातील पोषणघटक कमी होत नाहीत. फक्त ती फार उकडू नये. ज्यामुळे ब्रोकोलीची चव आणि रंग कमी होत नाही. थोड्याप्रमाणात उकडून घेतल्यामुळे तिचा उग्रपणा नक्कीच कमी होऊ शकतो. शिवाय ब्रोकोली निर्जंतूक करण्यासाठी फक्त कुकर अथवा स्टीमरमध्ये फक्त वाफवून घ्यावी.
तुम्ही ब्रोकोली पॅनवर स्टर फ्रायदेखील करू शकता. वाफवलेल्या अथवा स्टर केलेल्या ब्रोकोलीवर सॅलेड ऑईल, मीठ, मसाले टाकून त्याचं तुम्ही छान सॅलेड करू शकता. मात्र त्याआधी ब्रोकोली स्वच्छ धुवून कोरडी करावी. कारण ओलसर ब्रोकोली स्टर केल्यामुळे ती लवकर नरम पडते.ज्यामुळे तिचा मुळ कुरकूरीतपणा कमी होऊ शकतो.तुम्ही तुमच्या एखाद्या पास्ता अथवा सॅंडविजमध्ये या ब्रोकोलीचा वापर करू शकता.
ब्रोकोलीचे सूप अथवा ज्युसदेखील अगदी मस्त लागतं. सूप, स्मुदी अथवा ज्युस करण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून वाफवून अथवा निर्जंतूक करून घ्यावी. गरमागरम सूप अथवा थंडगार ज्युस,स्मुदी तुमच्या नेहमीच्या डाएटसाठी अगदी परफेक्ट ठरू शकतं.
होय, कारण कोणतीही भाजी शिजवल्यास त्यातील पोषकघटक कमी होतात. यासाठीच ब्रोकोली शिजवण्याऐवजी ती वाफवून घेतल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
नक्कीच, ब्रोकोलीची लागवड करण्यासाठी सुपिक जमीन, थंड वातावरण, पुरेसा सुर्यप्रकाश आणि योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. जर तुम्ही घरातच ब्रोकोलीची लागवड करणार असाल तर लक्षात ठेवा या रोपाला कमीत कमी सहा तास सुर्यप्रकाशात ठेवण्याची गरज आहे. हे सर्व शक्य असेल तर तुम्ही घरच्या बाल्कनीमध्ये ब्रोकोली नक्कीच लावू शकता.
ब्रोकोलीतील पोषकमुल्ये मिळण्यासाठी ब्रोकोली कच्ची खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र ब्रोकोलीचे देठ योग्य पद्धतीने चावून खायला हवेत. नाहीतर तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा
'या' पावसाळी रानभाज्यांची चव तुम्ही चाखली आहे का
जाणून घ्या कंदमूळं खाणं आरोग्यासाठी कसं आहे फायदेशीर
किवी (Kiwi) तुमच्या फिटनेस आणि त्वचेसाठी आहे वरदान, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या