घरातील सोफा कसा स्वच्छ करायचा असा पडलाय प्रश्न, जाणून घ्या सोप्या पद्धती

घरातील सोफा कसा स्वच्छ करायचा असा पडलाय प्रश्न, जाणून घ्या सोप्या पद्धती

हल्ली सगळ्यांचाच घरात घराची शोभा वाढवणारा सोफा असतो. घरात केलेल्या इंटेरिअरला सूट होईल असे सोफे, कोच, काऊच प्रत्येकाच्या घरी असतात. पण कालांतराने हेच सोफे कळकट्ट झाले की, मात्र त्याचे सौंदर्य कमी होते. तुमच्याही सोफ्याची अशीच काहीशी गत झाली असेल आणि तुम्हाला तुमचा सोफा स्वच्छ, सुंदर आणि पूर्ववत करायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी सोफा स्वच्छ करु शकता.

सोफ्याचे प्रकार

सर्वसाधारणपणे हल्ली सगळ्यांकडे कापडाचे आणि लेदरचे सोफे असतात. लेदरचा विचार करता सॉफ्ट लेदर, हार्ड लेदर असे प्रकार असतात. आणि कपड्याच्या सोफ्याचा विचार केला तर त्यामध्ये वेलवेट, कॉटन किंवा रेक्झीन असे प्रकार मिळतात. तुमच्याकडेही यापैकीच काही मटेरिअलचे सोफे असतील. तर ते सोफे स्वच्छ करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत हवी.

रोजच्या वापरातील टॉवेल बिघडवू शकतो तुमचं सौंदर्य

आता जाणून घेऊया सोफा साफ करण्याची योग्य पद्धत

लेदरचे सोफे

shutterstock

आता जर तुमच्याकडे लेदरचे सोफे असतील तर तुम्हाला सोफा साफ करणे फारच सोफे आहेत कारण तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सोफे साफ करु शकता. 

डिटर्जंट सोल्युशन: तुमच्याकडील लेदर सोफे मळलेले असतील तर तुम्ही डिटर्जंट पावडर पाण्यात भिजवून त्याचे सोल्यूशन तयार करुन तुम्हाला तुमचा सोफा साफ करण्यासाठी वापरायचे आहे. आता सोफा साफ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, एखादा स्वच्छ आणि पातळ कपडा घेऊन तुम्हाला तुमचा सोफा साफ करायचा आहे. ज्या ठिकाणी डाग असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे सोल्युशन घासायचे आहे. तुम्हाला तुमचा स्वच्छ झालेला दिसेल. सोफा स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला साधे पाणी घेऊन सोफ्यावरील साबण काढून टाकायचा आहे. 

आला किंवा तत्सम क्लिनर:  जर तुमचा सोफा पांढराशुभ्र असेल तर तुम्ही आला किंवा त्यासारख्या तत्सम सोल्युशनचा वापर करु शकता. पण हे करताना तुम्हाला त्याला पाण्यामध्ये डायल्युट करुन ते वापरायचे आहे. त्यामुळे सोफ्याचा कपडा खराब होणार नाही. तुमच्या पांढऱ्या रंगाचे सोफे यामुळे लगेचच स्वच्छ होऊ शकतात.

Apple cider vinegar चा वापर करून खुलवा तुमचे सौंदर्य

कापडाचे सोफे

shutterstock

आता सगळ्यात जास्त कठीण असतात ते कापडाचे सोफे स्वच्छ करणे. पण जर तुम्हाला ते बाहेर धुवायला देणेही शक्य नसेल तर मग तुम्ही अशाप्रकारे त्याची स्वच्छता करु शकता 

लिंबू- बेकिंग सोडाचे पाणी: तुम्हाला एका भांड्यात एक ते दोन लिंबाचा रस (सोफ्याचा आकार पाहून लिंबाची संख्या ठरवा) आणि बेकिंग सोडा तुम्हाला घ्यायचा आहे. तयार मिश्रणात पाणी न घालता ते थेट तुम्हाला तुमच्या सोफ्यावर ज्या ठिकाणी मळ साचली असेल किंवा सोफा काळा पडला असेल तिथे लावायचे आहे.  तुम्हाला त्या ठिकाणी थोडे घासावे सुद्धा लागेल तेव्हाच तो मळ निघून येईल. बहुतेकदा सोफ्यावर हात ठेवतो त्या ठिकाणी हा मळ साचलेला असतो. 

(पाणी न वापरण्याचे कारण इतकेच की, सोफ्याच्या आतील कापूस किंवा गादी जास्त भिजली की, ते वाळवणं फारच कठीण जातं. त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करा. 

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा: व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचा वापर देखील तुम्ही सोफा साफ करण्यासाठी करु शकता. तुम्हाला व्हिनेगर, डिटर्जंट,बेकिंग सोडा तुम्हाला कोमट पाण्यात घालायचे आहे. हे तयार सोल्युशन तुम्हाला सोफा साफ करण्यासाठी वापरायचे आहे. तुम्हाला सोफ्यावरील चिकट मळ आणि हट्टी डाग निघालेले दिसतील. 

Healthy Fitness साठी नक्की ट्राय करा महत्त्वाचे नियम

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील सोफे साफ करु शकता. पण हा सोफा एका फटक्यात साफ होणार नाही तर तुम्हाला ते वारंवार साफ करावे लागेल. तरच तुम्हाला इच्छित निकाल मिळेल.