ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
#FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा

#FoodFact : डाळ-भात खा आणि निरोगी राहा

गरमागरम भात-वरण, त्यावर तूपाची धार आणि तोंडीला लिंबाच्या लोणच्याची फोड. असा साधा बेतही अनेक जणांना स्वर्गसुख देतो. फक्त भारतातच नाहीतर डाळ-भात हे जगातील प्रसिद्ध पदार्थांपैकी एक आहे. भारतातील जास्तीत जास्त भागात डाळ-भात म्हणजेच दाल-चावलला सर्वात जास्त पसंती आहे. कारण हे बनवायला अगदीच सोपं आणि वेळही कमी लागतो. काही लोकांना हे खाणं खूप बोअरिंगसुद्धा वाटतं. पण याच डाळ-भाताला जगातील सर्वोत्तम आहार म्हणण्यात आल्याचं समोर आलंय. एक रिसर्च रिपोर्टनुसार हा आश्चर्यजनक आणि आनंददायी खुलासा समोर आला आहे.

Instagram

जगभरातील वैज्ञानिकांनी पहिल्यांदा मानलं आहे की, डाळ-भात हा आहार अनुवंशिक आजारांशी (जेनेटीक डिसऑर्डर) शी लढण्यात उपयोगी ठरू शकतो. याला दुजोरा मिळाला जर्मनीतील एका युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चमध्ये.  या रिसर्चमध्ये समोर आलं आहे की, डाळ-भाताने जेनेटिक डिसऑर्डरल दूर होण्यास मदत होते. त्यांच्यानुसार हे कळलं आहे की, फक्त DNA तील दोषामुळे अनुवंशिक रोग होत नाहीत तर व्यक्तीचं आहारसुद्धा यामागील एक मुख्य कारण असू शकतं. या रिसर्चनुसार, पाश्चिमात्य देशात खाल्लं जाणाऱ्या हाय कॅलरी फूडपेक्षा भारतीय उपमहाद्विपात खाल्ला जाणारा डाळ-भात हा अनुवंशिक आजारांना मात देतो. डाळ-भात किंवा भाज्या ज्यामध्ये विशेषकरून हळदीचा वापर होतो. त्या अशा रोगांशी प्रतिकार करण्यास मदत करतात.

ADVERTISEMENT

तूपचे आरोग्यविषयक फायदे देखील वाचा

Shutterstock

डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. ज्यामध्ये व्हिटॅमीन ए, बी 12, कार्बोहायड्रेट, फायबर, फॉस्फरस आणि अनेक प्रकारची पोषक तत्त्व आढळतात. भातासोबत डाळ खाल्ल्याने शरीराला संपूर्ण प्रोटीन मिळतं. डाळीमध्ये काही प्रकारची अमिनो एसिड्सही आढळतात. ज्यांचं सेवन भातासोबत केल्यास शरीराला फायदेशीर ठरतं. या दोन्हीच्या सेवनाने ना फक्त शरीर निरोगी राहतं तर जेनेटिक डिसऑर्डर्सपासूनही बचाव होतो. वैज्ञानिकांनुसार, पिझ्झा, बर्गर आणि फास्टफूड खाण्याऐवजी डाळ-भातासारखं लो कॅलरी फूड खाणं शरीराला निरोगी ठेवतं आणि आजारापासून बचाव करतं.

ADVERTISEMENT

वाचा – गुळामध्ये दडलं आहे निरोगी आयुष्याचं रहस्य

डाळ-भात खाण्याचे फायदे

Instagram

  • डाळीत असे अनेक अमिनो एसिड्स आहेत जे भातात नसतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही डाळीसोबत भात खाता तेव्हा तुम्हाला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. 
  • डाळ आणि भातात भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबरमुळे पचन क्रिया चांगली होते. जर तुम्ही पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईसचा वापर केलात तर अजूनच चांगल ठरतं. ब्राऊन राईसमध्ये सेलेनियम, मँगनीज, कॉपर, फॉस्फरस आणि मॅग्निशअमसारखे आवश्यक घटक आढळतात. 
  • मांसाहार करणाऱ्यांना प्रोटीनची कमतरता नसते पण शाकाहारी लोकांसाठी डाळ हे प्रोटीनचं प्रमुख माध्यम आहे. यामध्ये असलेलं फोलेट हे हृदयासाठी चांगलं असतं. 
  • असं म्हणतात की, भात खाल्ल्याने वजन वाढतं. पण असं नाहीयं. डाळ-भात खाल्ल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे दिवसभर काही वेगळं खाण्याची गरज पडत नाही आणि एक्स्ट्रा कॅलरीजसुद्धा वाढत नाहीत.

वाचा – तसेच मराठीमध्ये मिठाईची रेसिपी

ADVERTISEMENT

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.

हेही वाचा –

वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य

बटाट्याशिवाय तुमचेही जेवण होत नाही पूर्ण, मग वाचाच

ADVERTISEMENT

स्टॅमिना वाढवण्यासाठी आपल्या जेवणात समाविष्ट करा ‘हा’ आहार

25 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT