फिरण्याची आहे हौस.. मग असे करा Money planning

फिरण्याची आहे हौस.. मग असे करा Money planning

आयुष्यात एकदा तरी कंगनासारखे बनून मस्त फिरावे असे अनेकींना वाटते. मुलांच्या बाबत पालकांना इतकी काळजी नसते. पण मुलींच्या बाबतीत मात्र पालक त्यांना एकटे पाठवायला तयार नसतात. मुलींनी असे अॅव्हेंचर करावे असे फारच कमी पालकांना वाटते. पण तुम्ही independant आहात ( विचाराने आणि अर्थाजनाने) आणि तुम्हालाही असे फिरण्याची इच्छा असेल तर तुम्ही आतापासूनच तुमच्या टूरचे प्लॅनिंग आखायला सुरुवात करा. हो तुम्ही प्लॅनिंग करा म्हणजे सर्वार्थाने. अगदी बजेटपासून ते जागा निवडण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही करु शकता. जर तुम्ही इच्छित स्थळी जाण्यासाठी योग्य असे Money planning केले..

प्रेगनंन्सीदरम्यान विमान प्रवास करताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा

Table of Contents

  Money planning!! माशी तिथेच तर शिंकते

  आता टूर करायची म्हणजे खिशात पैसे हवेच ना. काहींना पैसै साठवायचे म्हटले की, अगदी टेन्शन येते. म्हणजे मुळात काय की, टूरचा किंवा बाहेर जाण्याच्या प्लॅनवर जर माशी शिंकत असेल तर ती इथेच बरं का! म्हणूनच तुम्हाला money planning ही महत्वाची आहे. Money planning म्हणजे काही टेन्शन घेण्याचे नकाम नाही. थोडा समजूतदारपणा आणि थोडा दूरचा विचार केला तर तुम्ही अगदी सहज money planning करु शकता. आता त्याचा श्रीगणेशा करायचा ते पाहुया.

  असे करा पैशाचे नियोजन आणि मग करा टूर प्लॅन

  सोचो थोडे दूर की!!!

  shutterstock

  आता आज तुम्हाला बाहेर जावेसे वाटत आहे. म्हणून तुम्हाला तसा प्लॅन करुन चालत नाही. तर तुम्हाला थोडा लांबचा विचार करावा लागतो. तरच तुमच्या खिशाला आर्थिक मंदी जाणवणार नाही. साधारण 6 महिने ते 1 वर्ष इतका कालावधी तुम्ही तुमच्या टूर अरेंजमेंटसाठी घालवायला हवा. आता सर्वात कमी काळ म्हणजे 6 महिन्यांचा. जर तुमची टूर तुम्ही 6 महिन्यांनी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आतापासूनच काहीतरी करायला हवे. म्हणजे समजा टूरचा खर्च हा 50 हजार रुपयांचा असेल आणि तुम्हाला तुमच्या अन्य सेव्हिंग वगळून केवळ महिना 3 ते 5 हजार वेगळे काढणे शक्य असतील तर ही टूर तुमच्या बजेटमध्ये नाही. पण लगेच निराश होऊ नका. कारण या इतक्या पैशांमध्ये तुम्हाला इतर ठिकाणी फिरणे शक्य होईल. तुम्हाला एका वेळी किमान पैशांच्या तुलनेतील दोन ते तीन जागा तरी निवडता यायला हव्यात.

  उदा. देशाचा विचार करता मनाली, शिमला, राजस्थान, केरळ, गोवा यांसारख्या टूर तुम्ही आठवडाभरासाठी प्लॅन करताना तुम्हाला साधारण 30 ते 40 हजारांचा खर्च येऊ शकतो.हे पैसे तुम्ही सहा महिन्यांमध्ये आरामात जमवू शकता. पण जर एखाद्या टूरचा खर्च हा 50 किंवा त्याहून अधिक असेल तर मात्र तुम्ही या टूरसाठी पैसे साठवण्यासाठी थोडा जास्त कालावधी घ्या.

  Flight चे तिकिट्स स्वस्तात book करायचे असतील तर हे आहेत सिक्रेट्स

   

  थेंबे थेंबे तळे साचे

  shutterstock

   ही म्हण वापरली जाते ती उगाच नाही. तुम्ही आताच्या घडीला कोणतीही देशातील टूर करण्याचा जरी विचार केलात तरी तुम्हाला साधारण 50 हजार इतका तरी खर्च येतोच. आता तुम्हाला ही इतकी मोठी रक्कम कितीही पगार असला तरी एकदम खर्च करावीशी अजिबात वाटणार नाही. कारण त्यामुळे तुमचे त्या महिन्याचे बजेट नक्कीच कोलमडू शकते. म्हणूनच तुम्हाला बचतीची सुरुवात करायची आहे. तुमच्या महिन्यांचा इतर खर्च पाहता जर तुम्ही पगारातून काही हजार काढून वेगळे काढू शकत असाल तर तुम्ही तुमच्या बँकेतील खात्यात आजच RD सुरु करा. दर महिन्याला तुमच्या पगारातून ही रक्कम आपोआप तुमच्या RD खात्यात जाईल अशी सोय करायची आहे. आतापासून तुम्हाला किती फायदा होतो हे पाहण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या पुढील प्लॅनसाठी हे पैसे मिळणार आहेत. हे लक्षात ठेवा.

  शॉपिंगवर हवे नियंत्रण

  shutterstock

  आता एखाद्या नव्या ठिकाणी आपण जाणार म्हटल्यावर आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी नवीन कपडे किंवा बॅग वा तत्सम गोष्टी हव्या असतात. आता तुम्हाला गरजेच्या सगळ्याच वस्तू घेण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही त्या घेताना तुमच्या गरजाही ओळखायला हव्यात. समजा तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जात असाल तर तुमच्याकडे थंडीचे कपडे हवेत. जर तुम्ही उष्ण प्रदेशात जात असाल तर तुमच्याकडे कॉटनचे कपडे हवे. आता तुमची महत्वाच्या वस्तूंची यादी करताना तुमच्याकडे बॅग, कपडे,रोजच्या वापरातील सामान आणि महत्वाची औषध आहेत का पाहा. या गोष्टींच्या खरेदीशिवाय उगाचच भरमसाट खरेदी करु नका. त्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते.

  प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

  प्रवासासाठी पैसे

  आता तुम्ही एखाद्या टूरला जाणार आहात म्हणजे विमानखर्च किंवा ट्रेनचा खर्च हा आलाच. आता तुम्हाला काही गोष्टींचे बुकींग हे आधीच करावे लागते. त्यासाठीही तुम्हाला काही पैसै आधीच जमवावे लागतील. साधारण तीन महिन्यांआधी तुम्ही जर बुकींग केले तर तुमचा प्रवास हा स्वस्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बजेटमधून आधीच काही रक्कम यासाठी वेगळी ठेवावी लागेल. जर तुम्ही एखाद्या ग्रुपमधून टूर बुकींग करण्याचा विचार करत असाल तर त्यापद्धतीने तुम्हाला तुमचे पैसे मॅनेज करावे लागतील. आता जर तुम्ही फार आधी पासूनच पैसे साठवणे सुरु केले असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला फ्लाईट किंवा तत्सम बुकींग करण्यास अडचण येणार नाही.

  वरखर्चाला पैसे

  shutterstock

  तुम्ही अगदी कुठेही जा तुम्हाला वरखर्चाला पैसे हे हवेच. म्हणजे टूरचे पैसे वगळता तुमच्याकडे किमान 10 हजार रुपये वरखर्चाला हवे. तुम्ही ज्या महिन्यात टूरला जाणारा आहात. त्या महिन्यातील सगळे खर्च भागवून तुम्हाला काही पैसे हे वरखर्चाला ठेवता आले पाहिजे. वरखर्चाचे पैसे एकाच महिन्यात जमवणे शक्य नसतील तर तुम्ही ते थोडे थोडे करुन वेगळे काढा. म्हणजे तुम्हाला त्या पैशांचा ताण येणार नाही. पण तुम्ही अगदी काटोकाट पैसे जमवून टूरला जाणार असाल तर ते अजिबात चांगले नाही. अशी टूर करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते.

  बँकामध्ये करा चौकशी

  तुम्हाला तुमच्या सेव्हिंग संदर्भातील काहीही गोंधळ असेल तर तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन विचारु शकता किंवा ऑनलाईनदेखील सेव्हिंगचे असे प्रकार पाहू शकता. हे सगळे करत असताना कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. पैसे दुप्पट करणे, जास्त व्याजाचा दर किंवा अन्य कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. 

   

  इंटरनॅशनल टूरचा विचार करताना

  shutterstock

  जग पातळीरील टूर प्लॅन करणे तुलनेने कठीण असते.कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा असतो. व्हिसा, करंसी, टूर प्लॅन, Hidden charges या सगळ्याचाच गोष्टीचा विचार करावा लागतो. अशा टूर प्लॅन करताना तुम्ही चांगल्या टूर कंपनीची निवड करा. या टूरसाठी खूप पैसा लागतो त्यामुळे तुम्हाला याचे प्लॅनिंग करताना पैशांची जुळवाजुळवही करावी लागते. त्यामुळे यासाठी किमान वर्षभराचा कालावधी तरी तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला जग फिरणेही सोपे जाईल. 

   

  घर चालवणे असो किंवा फिरणे या दोघांसाठी खूप दूरचा विचार करावा लागतो. जर तुम्ही योग्य प्लॅनिंग केले तर तुम्हाला भ्रमंतीपासून कोणीच अडवू शकणार नाही.