ही Remix गाणी एकेकाळी होती फारच प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का

 ही Remix गाणी एकेकाळी होती फारच प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का

2000 नंतरचा काळ हा Remix गाण्यांचा होता. या नंतरच्या वर्षात जुन्या हिंदी गाण्यांचे इतके Remix व्हर्जन आले की, ही गाणी आजही लागली तरी त्यावर नक्कीच ठेका घ्यावासा वाटतो. आज आम्ही अशी 5 रिमिक्स गाणी काढली आहे. जी कदाचित तुम्हाला आम्ही सांगितल्यावर नक्की आठवतील.

एका रात्री प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्या या व्यक्ती

चंदू के चाचा ने चंदु की चाचीसे ( Chandu ke chacha ne )

  1996 साली आलेल्या ‘मुका’ या चित्रपटातील हे गाणं. या गाण्याचे Remix एकदम जबरदस्त होते. चंदु के चाचा या अगदीच स्लो गाण्याला या नव्या Remix गाण्याने एकदम जोश आणला. हात हवामे ऐसे उठाओ… टांग से टँगो करके दिखाओ . असं हे गाणं Remix चार जणांवर चित्रित करण्यात आले होते. हे गाणं लोकांना फारच आवडले होते.  त्यानंतर या गाण्यावर कितीतरी जणांनी डान्स केला असेल.

छोड दो आँचल जमाना क्या कहेगा (chod do aanchal )

 Paying  guest या चित्रपटातील ही मूळ गाणं किशोर कुमार यांचं. हे गाणं  देवानंद आणि नुतन यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याची त्याच काळातील प्रसिद्धी इतकी होती की हे गाणं अनेकांच्या ओठांवर होते. पण या गाण्याचे Remix आल्यानंतर ते लोकांना किती आवडेल हा प्रश्नच होता. पण bombay vinkings ने हे Remix गाणं तयार केलं. या गाण्यामध्ये रॅप टाकण्यात आले होते आणि जुन्या काळापासून आतापर्यंतचा काळ याच गाण्यातून दाखवण्यात आला होता. आजही गाणं अनेकांच्या लक्षात असेल. या गाण्यावर दोन Remix  गाणी आली. पण या गाण्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. 

#MemoriesOfYourBappa: मराठी सेलिब्रेटींच्या आठवणीतला बाप्पा

चढती जवानी मेरी चाल मस्तानी ( Chadti jawani meri chaal mastani)

1971 मध्ये आलेल्या ‘कारवा’ या चित्रपटातील हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायले होते. हे गाणं जितेंद्र आणि अरुणा इराणी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यावर अशा प्रकारचे Remix तयार होईल असे तर कधीच वाटले नव्हते. तीन मेनिक्वीन अचानक जीवंत होतात आणि त्यांच्या घरी एक चोर येतो. या नव्या दुनियेची जाण नसणाऱ्या या तीन मेनिक्वीन दाखवण्यात आल्या आहेत. या गाण्याने फारच गोंधळ घातला होता. या व्हिडिओमध्ये हॉट निगार खान देखील होती. आता तरी तुम्हाला हे गाणं लक्षात आलंच असेल. 

नही नही अभी नही

 1972 साली आलेल्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटातील हे गाणं फारचं प्रसिद्ध झालं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. या गाण्यात हे दोघं एका खोलीत दाखवण्यात आले आहेत.तर नव्या Remix गाण्यामध्ये लिफ्टमध्ये एक कपल दाखवण्यात आले होते. Dj aqueel ने हे गाणं Remix केलं होतं. हे गाणं ही फारच प्रसिद्ध झालं.

काटा लगा (Kaanta laga)

समाधी या चित्रपटातील आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं काटा लगा हे गाणं खूप प्रसिद्ध होतं. बंगले के पिछे तेरी बेरी के निछे… आहा रे पिया काटा लगा असे या गाण्याचे बोल होते. आशा पारेख यांच्या नृत्याविष्काराबद्दल काहीच सांगायला नको. त्यांचा नृत्याविष्कार हा नेहमीच चांगला होता. 2002 साली बेबी डॉल या अल्बममध्ये या गाण्याचे Remix तयार करण्यात आले. जितका भोळेपणा समाधीमधील गाण्यात होता. तितकाच वाईल्डनेस या Remix गाण्याच्या व्हिडिओमध्ये होता. पण तरीही हे गाणं अनेकांनी नाकं मुरडत पसंत केले.

ब्रेकअप झाल्यानंतरही बेस्ट फ्रेंड्स आहेत हे सेलिब्रिटी कपल्स

या गाण्याव्यतिरिक्त 'कलियों का चमन', 'भीगी भीगी रातो में', 'मेरे नसीब मे', 'क्या सुरत है', 'परदेसिया ये सच है पिया', 'संया दिल मे आना रे', 'तु तु है वही' ही गाणी देखील फारच प्रसिद्ध होती.