Body relaxation ची सगळ्यांनाच गरज असते. विशेषत: महिलांना कारण त्यांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. अशावेळी कामाचा ताण दूर करण्यासाठी त्यांना एक दिवस तरी Relaxation मिळायलाच हवे. त्यासाठीच तुम्ही body spa करायला हवा. जर तुम्हाला body spa म्हणजे काय? नेमकं या मध्ये काय केलं जातं. आणि त्याचे फायदे काय हे जाणून घ्या आणि मग लगेचच body spa ची अपॉईंटमेंट बुक करा.
आता तुम्हाला body spa म्हणजे काय हे माहीत नसेल तर आधी त्याबद्दल आपण जाणून घेऊया. हल्ली सगळ्या unisex पार्लरमध्ये body spa नावाचा प्रकार असतोच. Body spa मध्ये तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत मसाज केला जातो. म्हणजे एकप्रकारचे शुद्धीकरणच ना! हा मसाज म्हणजे नुसती मालिश नसते ही मालिश शास्त्रशुद्ध असते. यामध्ये तुमच्या सगळ्या नसा रिलॅक्स केल्या जातात. यामध्ये प्रकारही असतात. तुम्हाला तेल मालिश आणि किंवा स्क्रब आणि स्पा क्रिमचा वापर केला जातो. त्यानंतर स्टीम आणि बाथ असा पर्याय असतो आणि महत्वाचे म्हणजे यामध्ये तुम्हाला हेडमसाजही दिला जातो.
Body spaचे काम तुम्हाला रिलॅक्स करणे असते. तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी तसा मसाजही केला जातो. तुम्हाला सहन होईल इतका प्रेशर देऊन हा मसाज केला जातो. आता या मसाज मागे तुमचे muscle रिलॅक्स करणे हा हेतू असतो.बरेचदा आपल्यावर असलेला कामाचा ताण आपल्याला जाणवत नाही. त्याकडे दुर्लक्ष केले की मग कालांतराने अंगदुखी जाणवू लागते. तुम्हाला अंगदुखी पर्यंत वाट पाहायची नसेल तर मग तुम्ही body spa करायलाच हवा.
जर तुम्ही नुसती तेलमालिश नाही तर त्यासोबत बॉडी स्क्रबिंग करुन घेत असाल तर फारच उत्तम कारण तुमचा हात पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्वचा स्वच्छ करता येत नाही. पण जर तुम्ही body spaसोबत स्क्रब केले तर तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते. शिवाय शरीरावर असेला मळही निघून जातो.
आता तुम्ही तुमचा थकवा दूर करायला body spa करणार आहात म्हटल्याव body spa चे महत्वाचे काम तुमचा थकवा दूर करणे हे आहे. तुम्हाला अगदी रिलॅक्स राहता यावे यासाठी spa करतात त्या खोलीत मंद लाईट आणि शांत करणारे संगीत लावले जाते. हा मसाज करताना तुम्हाला झोप लागली की, फार बरे वाटते कारण सगळ्या कामांसाठी किंवा उगाचच मोबाईलमध्ये पाहणारे आपण तासभरासाठी फोन लांब ठेवून देतो त्यातच आपला अर्धा थकवा निघून जातो.
आता या काही गोष्टी आणि फायदे लक्षात घेऊन relaxation साठी body spaची अपॉईन्टमेंट आजच घ्या.