भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धार्मिक मान्यतांनुसार श्राद्ध म्हणजेच पितृपक्षाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. दरवर्षी येणाऱ्या या पितृ पंधरवड्याच्या काळात सर्व हिंदू धर्माचे अनुयायी आपल्या पित्रांप्रती श्रद्धा, आभार आणि स्मरण व्यक्त करून तसंच त्यांच्या मोक्षप्राप्तासाठी हवन-पूजन, तर्पण आणि दान-पुण्य इत्यादी करतात. अशी मान्यता आहे की, यामुळे पूर्वजांचा आशिर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि सर्व प्रकारच्या रोग आणि शोकांपासून रक्षण होते. या पक्षातील एक सुंदर गोष्ट म्हणजे हे कोणत्याही अंधविश्वासावर केंद्रित नाही. तर याचा खोलवर अभ्यास केल्यास आपल्या कुटुंबाच्या पूर्वजांचे आणि पितरांप्रती असलेले सन्मानाची भावना आहे. तसंच समस्त जीव-जंतूंशी जोडलेल्या मानवजातीचं हे दर्शन आहे. कारण या काळात पितरांच्या नावाने जे दान-पुण्य किंवा भोजन तर्पण इत्यादी केले जातो. त्यात पशू-पक्षी आणि वनस्पतींचा प्रमुख सहभाग असतो.
हिंदू धार्मिक मान्यतांनुसार श्राद्ध आणि पितृ पक्ष हा असा काळ आहे. ज्यामध्ये हिंदू धर्म मानणारे लोक आपल्या पूर्वजांसाठी हवन-पूजन तसंच भोजन आणि जल अर्पण करून त्यांना श्रद्धांजली देतात. आपल्या पूर्वजांच्या आत्माच्या शांती आणि मोक्षप्राप्तीसाठी ते दानही करतात. पितृ पक्ष हा पंधरा दिवसांचा असतो. यालाच पितृ पंधरवडा असेही म्हणतात. अशी म्हणतात की, या काळात आपले पूर्वज मोक्ष प्राप्तीच्या इच्छेने आपल्या नातेवाईकांना अनेक रूपात भेटायला येतात. या काळात आपल्या पितरांप्रती सन्मान आणि आभाराची भावना ठेवत त्यांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध केलं जातं आणि त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात खुशाली राहो अशा आशिर्वादासाठी प्रार्थना केली जाते. सोबतच ही प्रार्थनासुद्धा केली जाते की, आपल्या पितरांचा आशिर्वाद कुटुंबावर कायम राहो आणि सर्वांना सदबुद्धी आणि सदगुणयुक्त करो.
हिंदू धर्मात ज्योतिषीय गणनेनुसार आपल्या पितृ कुंडलीमध्ये सुख आणि स्थैर्याचा स्वामी असतो. सुख आणि स्थैर्य म्हणजे नोकरी-व्यापारातील प्रगती आणि धनप्राप्ती, तसंच लग्न आणि संतती संतुलन राहून सुख मिळावं. जे फक्त पितरांच्या कृपेने शक्य आहे. कुटुंबाच्या वंशवृद्धीसाठी आणि सुखासाठी आपल्याला त्यांचा आशिर्वाद मिळावा. खरंतर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला एक तर्पण करावं असं म्हणतात. पण लोकांच्या व्यस्त आयुष्यामुळे ते करणं शक्य नाही. त्यामुळे वर्षातून एकदा श्राद्धकाळ म्हणजेच पितृपक्षात ते केलं जातं. आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आभार व्यक्त करण्याची ही एक चांगली संधी आहे.
हिंदू कॅलेंडर अनुसार अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून पितृपक्षाला सुरूवात होते. 12 महिन्यांतील सहाव्या महिन्यात म्हणजेच भाद्रपक्षाच्या पौर्णिमेपासून (म्हणजे शेवटच्या दिवसापासून) 7 व्या महिना अश्विनच्या पहिल्या पाच दिवसांपर्यंत हे पितृपक्ष मानले जाते.
या विधीचा कोणताही नियम अगदी कट्टर नियम नाही. तुमच्या वेळेप्रमाणे आणि यथाशक्तीअनुसार हे केलं जातं. पण जर आपण विधी-विधान किंवा पुरातन मान्यतांबाबत बोलायचं झाल्यास जसं सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण लागल्यावर कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. तसंच पितृ पक्षांमध्येही कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. उदा. लग्न, घर खरेदी किंवा वाहन खरेदी इ. श्राद्ध हे दुपारच्या 12 वाजताच्या आसपास करणं योग्य मानलं जातं. एखाद्या नदी किनारी किंवा आपल्या घरीसुद्धा हे करता येतं.
परंपरेनुसार आपल्या पितरांंना आवाहन करण्यासाठी भात, काळे तीळ आणि तूपाचं मिश्रण करून पिंड दान आणि तर्पण केलं जातं. यानंतर विष्णू भगवान व यमराजाची पूजा-अर्चना करून सोबतच पितरांची पूजाही केली जाते. आपल्या तीन पिढ्यापर्यंतच्या पूर्वजांची पूजा करण्याची मान्यता आहे. ब्राह्मणाला आपल्या घरी आमंत्रित करून त्यांच्याद्वारे पूजा केल्यानंतर आपल्या पूर्वजांना या निमित्ताने केलेलं विशेष भोजन अर्पण केलं जातं. मग आमंत्रित ब्राम्हणालाही भोजन दिलं जातं. ब्राम्हणाला दक्षिणा, फळ, मिठाई आणि वस्त्र देऊन प्रसन्न केलं जातं आणि सर्व कुटुंब त्यांच्याकडून आशिर्वाद घेतं. पूजेनंतर सर्व जेवण एका ताटात सजवून गाय, कुत्रे, कावळा आणि मुंग्याना देणं आवश्यक मानलं जातं. पितृपक्षात अपशब्द बोलणं, राग करणं, छळ-कपट करणं किंवा कोणत्याही अहिताच्या गोष्टी करणं चुकीचं मानलं जातं. या दरम्यान करणाऱ्याचं मन, वाणी आणि कर्म हे शुद्धतापूर्ण होणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा दुर्व्यवहार पूर्णतः वर्ज्य असतं. तसंच या विधीदरम्यान कोणत्याही प्रकारचा नशा, तामसिक जेवण, मद्यपान, मांसाहारी भोजन करायचं नसतं. आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शुद्धता.