डोळे हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतात. कारण डोळ्यातून माणसाच्या मनातील भावना प्रकट होत असतात म्हणूनच डोळे न बोलताच सारं काही बोलतात असं म्हटलं जातं. तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालतो तो तुमचा आय मेकअप (Eye Makeup). डोळ्यांचा मेकअप परफेक्ट असेल तर तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या प्रिय व्यक्तीची नजर मुळीच हलू शकत नाही. वास्तविक नजर आणि डोळे दिलखेचक असतील तर ते कोणालाही आकर्षित करू शकतात. मात्र यासाठी तुम्हाला आय मेकअपविषयी माहीत असायलाच हवं. डोळ्यावर मेकअप करण्यापूर्वी तुमच्या डोळयांचा आकार, तुमचा स्कीन टोन, तुम्ही केलेला पेहराव या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. यासाठीच या आय मेकअप टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.
एखाद्या अभिनेत्रीचे स्मोकी आईज पाहिले की तुम्हालादेखील अगदी तसाच आय मेकअप करावासा वाटत असतो. कधी कधी आयमेक अप करण्याची टेकनिक तुम्हाला माहीत नसते. तर कधी कधी तो मेकअप आपल्याला सुट होईल का? ही शंका मनात येत असते. यासाठीच आम्ही तुम्हाला निरनिराळ्या डोळ्यांच्या आकारानुसार आयमेकअप सुचवत आहोत. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचा आकार आणि त्यानुसार नेमका कोणता मेकअप करावा हे नक्कीच समजू शकेल.
बऱ्याचदा काही जणींच्या डोळ्यातील आतला कोपरा म्हणजेच इनर कॉर्नर नाकाच्या उंचवट्यापासून फार लांब असतो. अशा प्रकारच्या डोळ्यांना वाईड सेट आईज असं म्हटलं जातं. अनेर मॉडेल्सच्या डोळ्यांचा शेप या पद्धतीचा असतो. आलिया भटचा आयशेपदेखील अशाच प्रकारचा आहे.
वाईड सेट आईजसाठी आय मेकअप टिप्स
जर तुमचा चेहऱ्याची ठेवण आणि आयशेप या प्रकारचा असेल तर तुम्हाला तुम्हाला डोळे आणि नाकातील अंतर कमी दाखवणारा मेकअप करावा लागेल. यासाठी डोळ्याच्या इनर कॉर्नरला डार्क रंगाची आणि आऊटर कॉर्नरला हलक्या रंगाची आयशॅडो लावा. इनर कॉर्नरपासून डार्क रंगाच्या आयशॅडोला सुरूवात करून तुम्ही ती आऊटर कॉर्नरपर्यंत हलक्या रंगाने ब्लेंड करू शकता.
आयलायनर लावताना ते काळ्या गडद रंगाचं निवडा आणि ते जास्तीत जास्त टिअर टक्ट (Tear Duct) पर्यंत लावा. हेच टेकनीक मस्कारा लावण्यासाठीदेखील वापरा. अशा चेहऱ्याच्या मुलींनी आयलायनरचे विंग फार लांब ठेवू नयेत. कारण यामुळे तुमचा नाकापासून डोळे आणि लांब दिसतील ज्यामुळे लुक जास्तच बिघडण्याची शक्यता आहे.
जेव्हा तुमच्या डोळ्याचा इनर कॉर्नर नाकाच्या उंचवट्यापासून जवळ असतो तेव्हा अशा आयशेपला क्लोज सेट आईज असं म्हणतात. करिना कपूरच्या डोळ्यांचा आकार अशा प्रकारचा आहे.
क्लोज सेट आईजसाठी आय मेकअप टिप्स
अशा प्रकारच्या डोळ्यांचा मेकअप करताना आऊटर कॉर्नरवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. यासाठी मेकअप करताना इनर कॉर्नरला हलक्या रंगाच्या अथवा हायलाईट करणाऱ्या आणि आऊटर कॉर्नरला डार्क रंगाच्या आय शॅडो लावा. शिवाय तुमच्या टिअर डक्टवर पांढऱ्या रंगाचं आयशॅडो अथवा हाईटलायनर लावायला मुळीच विसरू नका. कारण या टिप्स मुळे तुमचे डोळे नाकापासून लांब दिसतील. मस्कारा लावताना तुमच्या पापण्यांच्या आऊटर कॉर्नरवर एक्स्ट्रा कोट लावा ज्यामळे तुमच्या डोळ्यांचा आऊटर भाग फोकस होईल.
ज्यांचे डोळेबारीक आणि खोलवर आत रुतलेले असतात त्यांच्या आय ब्रो लाईन फारच उठून दिसतात. अशा डोळ्यांच्या आकाराला डीप सेट आईज असं म्हणतात. अभिनेत्री श्रेया सरनचे डोळे या आयशेपचे आहेत.
डीप सेट आईजसाठी मेकअप टिप्स
अशा आयशेपच्या मुलींनी त्यांचे डोळे मोठे दिसतील असा मेकअप करणं गरजेचं आहे. अशा डोळ्यांवर हलके आणि शिमर आय शॅडो खुलून दिसतात. अशा डोळ्यांच्या संपूर्ण आललीडवर शिमर आयशॅडोचा वापर करणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुमचे डोळे आत रुततेले दिसणार नाहीत. शिवाय असा आयशेप असेल तर स्मोकी आईज मुळीच ट्राय करू नका. कारण ज्यामुळे तुमचे डोळे आणखी खोलवर रूतलेले दिसतील. शिवाय या शेपच्या मुलींनी मस्कारा वापरताना तो वॉटरप्रूफच वापरावा.
जर डोळे उघडल्यावर तुमच्या पापण्या दिसत नसतील तर अशा डोळ्यांच्या आकाराला हुडेड आईज असं म्हणतात. त्यात जर तुमच्या अर्धा पापण्या दिसत असतील आणि अर्धा पापण्या झाकलेल्या असतील तर त्या आयशेपला सेमी हुडेड आईज असं म्हणतात. या शेपच्या डोळ्यांचा पापण्या झाकल्या जातात कारण त्यावर तुमच्या पापण्यांवरील त्वचेचा लेअर येत असतो. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे डोळे या आकाराचे आहेत.
हुडेड आईजसाठी आय मेकअप टिप्स
अशा डोळ्यांच्या आकाराच्या मुलींनी असा मेकअप करावा ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांवरील भाग जास्तीत जास्त दिसू शकेल. डोळ्यांच्या पापण्यांवरील भाग उठून दिसण्यासाठी त्यावर डार्क शेडच्या आयशॅडोचा वापर करावा. आयशॅडोचा वापर अगदी आयब्रोलाईनपर्यंत करावा. टिअर डक्टला हायलाईट करण्यासाठी हाटलाईटर वापरावे. लॅश लाईन दिसेल अशा पद्धतीने तिला फोकस करावे. मस्काराचा एक मस्त कोट देऊन तुम्ही लॅश लाईनला हायलाईट करू शकता.
जेव्हा तुमच्या डोळ्यांचा बाहेरील कोन खालच्या दिशेने झुकलेला असतो तेव्हा त्या डोळ्यांच्या आकाराला डाऊन टर्न आईज अथवा ड्रूपी आईज असं म्हणतात. कधी कधी असा शेप नैसर्गिक असतो तर कधी कधी वयोमानानुसार डोळ्यांना असा आकार प्राप्त होतो. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या डोळ्यांचा आकार अशा प्रकारचा आहे.
डाऊन टर्न अथवा ड्रूपी आईजसाठी मेकअप टिप्स
अशा प्रकारच्या आय मेकअप शेपमुळे तुमचे डोळे खालच्या दिशेने झुकलेले दिसू लागतात. मात्र तुम्ही सेक्सी कॅट आय लायनर अथवा सेक्सी कॅट आयलायनर विंग शेपने तुमच्या डोळ्यांना आकर्षक करू शकता. यासाठी डोश्यांच्या बाहेरील एंगलवरून 45 अंशाचा कट वरच्या दिशेने देऊन तुम्ही सेक्सी अपवर्ड फ्लिक देऊ शकता. ज्यामुळे तुमचे डोळे वरच्या दिशेने लिफ्ट होतील.
बदामाच्या आकाराचे डोळे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात. ज्यामुळे अशा आयशेपला आऊटर कॉर्नरला नैसर्गिक लिफ्ट टर्न असतो. ज्यामुळे खालची पापणी वरच्या पापणीपेक्षा किंचित मोठी दिसते. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचे डोळे या आकाराचे आहेत.
बदाम शेअ आईजसाठी मेकअप टिप्स
अशा प्रकारच्या डोळ्यांचा आकार मुळातच सुंदर असतो. ज्यामुळे या आयशेपवर कोणताही मेकअप चांगलाच दिसतो. फक्त खालच्या पापणीला वरच्या पापणीच्या तुलनेचं करण्यासाठी एखाद्या डार्क आयपेन्सिलने बोल्ड करा. तुम्ही या आयशेपवर स्मोकी आईज, बोल्ड रंग, बोल्ड लाईन्स, ग्राफिक्स लाईन्स असा कोणताही मेकअप करू शकता.
या आकाराचे डोळे फारच बोल्ड आणि दिलखेचक असतात. कारण अशा डोळ्यांचा आकार असलेल्या मुलींच्या डोळ्याच्या पापण्या फारच दाट आणि मोठ्या असतात. बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोनचा आयशेप अशा प्रकारचा आहे.
प्रॉमिनंट आईजसाठी आय मेकअप टिप्स
अशा डोळ्यांचा मेकअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मेकअपमुळे तुमचे डोळे ओव्हर पॉवर होणार नाहीत. यासाठी पुर्ण डोळयांवर डार्क रंगाची आयशॅडो लावा ज्यामुळे तुमच्या पापण्यांमधील अंतर कमी दिसेल. स्मोकी आईजसाठी या डोळ्यांचा आकार अगदी चांगला आहे. दीपिका पदूकोनने लग्नातील विविध कार्यक्रमात असे स्मोकी आईजचा मेकअप केला होता. तुमच्या स्कीन टोनला मॅच होणारे रंग तु्म्ही वापरू शकता. लॅश लाईनवर थिक लायनरदेखील लावू शकता ज्यामुळे तुमची लीड स्पेस कमी दिसेल.
मेकअप करणं ही एक कला आहे. मेकअप करण्यासाठी तुमच्याकडे मेकअप किट असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने मेकअप करता येतो. डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी या खाली दिलेल्या गोष्टी तुमच्या मेकअप किटमध्ये असायला हव्या.
आय मेकअपमुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक दिसू लागतात. जर तुम्हाला विविध प्रकारचे लुक ट्राय करायचे असतील तर आयलायनर स्टाईलने लावा. लिक्वीड अथवा ड्राय फॉर्ममध्ये आयलायनर उपलब्ध असतं. तसंच विविध रंगांमध्ये तुम्ही आयलायनर लावू शकता. काळा, निळा, हिरवा, लाल अशा विविध रंगातील आयलायनरमुळे तुमच्या चेहऱ्याचा लुकच बदलु शकतो.
सुंदर आणि दाट पापण्यांमुळे डोळ्यांच्या सौंदर्यांत अधिक भर पडते. जर तुम्हाला तुमचे डोळे अधिक सुंदर दिसावे असं वाटत असेल तर मस्कारा लावण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. कारण जर मस्कारा योग्य पद्धतीने लावला तर तुमच्या पापण्या अधिक आकर्षक आणि कर्ली वाटू शकतात.
चेहऱ्यामधील सर्वात लक्षवेधक गोष्ट म्हणजे तुमचे डोळे. डोळ्यांच्या मेकअप मुळे तुमचे डोळे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात. जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांना अधिक सुंदर करायचं असेल तर त्यासाठी आयशॅडो लावणं फार गरजेचं आहे. विविध लुकसाठी विविध प्रकारच्या आणि शेडच्या आय शॅडो बाजारात उपलब्ध असतात. मात्र त्या उत्तमरित्या लावण्यसाठी तुमच्याकडे योग्य पद्धतीचा आय शॅडो ब्रश असणं गरजेचं आहे. आयमेकअपसाठी लागणाऱ्या ब्रशचा सेट विकत घ्या.
डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो. त्वचेच्या रंगसंगतीप्रमाणे आयशॅडोची शेड निवडायला हवी. जर तुम्ही सावळ्या असाल तर गोल्ड, कॉपर, मॅक्स ब्राऊन, ब्रॉंझ, मॅक्स बर्गंडी यासारख्या शेड्स वापरा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर रेड, ब्लू, ग्रीन, पिंक, पर्पल, गोल्ड असे कलर डोळ्यांवर फार सुंदर दिसतात. यासाठी विविध रंगाच्या आयशॅडो पॅलेट तुमच्या मेकअप किटमध्ये जरूर ठेवा.
फॅशनचा ट्रेंड हा सतत बदलत असतो. सध्या बोल्ड आणि ग्लिटरी आयशॅडोचा ट्रेंड आहे. यासाठी डार्क आणि शिमर लुकच्या आयशॅडोची निवड करा. ब्राईट आणि काळपट रंगाच्या शेड्स जास्त ट्रेंडमध्ये नाहीत. बॉलीवूड अभिनेत्रीदेखील जास्तीत जास्त बोल्ड आयमेक अप करण्यावर भर देतात. यासाठी पिवळ्या, एक्वाग्रीन, मरीन, ऑरेंज, स्काय ब्लू असे रंग वापरण्याची फॅशन आहे. मात्र तुम्हाला जे रंग खुलून दिसतील ते वापरून तुम्ही स्वतःचा फॅशन ट्रेंड तयार करू शकता.
आय मेकअप करणं हे एक कौशल्य आहे. कारण मेकअप करताना जर चुक झाली तर तुमचा लुक बिघडण्याची दाट शक्यता असते. यासाठी या आय मेकअप टिप्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील
मेकअपवर वातावरणाचा लवकर परिणाम होत असतो. त्यामुळे मेकअप लगेच आक्सिडाईज होतो. जेव्हा तुमचा मेकअप हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो लगेच सुकण्यास सुरुवात होते. तुम्ही निवडलेली शेड कदाचित नंतर गडद होऊ शकते. यासाठी कोणतेही मेकअप उत्पादन खरेदी करण्यापूर्वी आधी ते लावून तर बघाच शिवाय ते लावल्यावर पाच ते दहा मिनीटे वाट बघा. कन्सिलर लावून तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स लपवू शकता. मात्र ते फार पॅची दिसू नये यासाठी तुमच्या रंगसंरगतीला मॅच होणारे निवडा.
बाजारात विविध रंगांचे आयलायनर उपलब्ध असतात. त्यातून आपल्या त्वचेला आणि डोळ्यांना कोणता रंग सुंदर दिसेल याचा विचार करूनच आयलायनर वापरावं. शिवाय ते निवडताना आपल्या डोळ्यांच्या आकार आणि रंग याचाही नीट विचार करावा. तुम्ही आयलानर कॅट स्टाईल, विंग स्टाईल, डबल विंग स्टाईल, ग्लिटरी स्टाईल, व्हाईट अॅन्ड हायलाईटर स्टाईल, शिमर स्टाईल अशा विविध पद्धतीने लावू शकता.
मस्कारा निवडताना विशेष काळजी घ्या. कारण मस्कारा आपण डोळ्यांच्या पापण्यांना लावतो. जर तो निकृष्ठ दर्जाचा असेल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या डोळ्यांवर होऊ शकतो. आजकाल मार्केटमध्ये काळ्या, ट्रान्सफरंट आणि व्हाईट, कलरफुल रंगाचे मस्कारा उपलब्ध असतात. मस्कारा लावण्याआधी पापण्या कर्ल करा आणि मगच मस्कारा लावा. ज्यामुळे तुमच्या पापण्या अधिक आकर्षक दिसतील. जर तुम्हाला आर्टिफिशियल आयलॅशेस लावायचे असतील तर ते लावल्यावर तुमच्या पापण्या आणि आर्टिफिशियल आयलॅशेस दोन्ही कर्ल करा आणि मग त्यावर मस्कारा लावा. मस्कारा लावताना तो पापण्यांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा. ज्यामुळे पापण्या जास्त लांब दिसतील. वरच्या पापण्यांसाठी अपवर्ड स्ट्रोक आणि खालील पापण्यांसाठी डाऊनवर्ड स्ट्रोक्स लावा. आय लॅश ब्रशवर थोडा थोडा मस्कारा घ्या. जास्त मस्कारा ब्रशवर लागला असेल टिश्यू पेपरने तो काढून टाका. तसेच जर पापण्यांवर जास्त मस्कारा लागला तर तो आय लॅश ब्रशच्या मदतीने साफ करा.जर मस्कारा लावताना तो डोळ्यांच्या आजूबाजूला पसरला तर तो सुकल्यावर स्वच्छ करा. तुम्ही हा मस्कारा काढून टाकण्याकरता टिश्यू पेपर अथवा कापसावर पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेंसेस वापरत असाल तर डोळयांचा मेकअप करण्याआधी त्या लावा. जर तुम्हाला मस्काराचे दोन कोट लावायचे असतील तर एक कोट सुकल्यावरच दुसरा कोट पापण्यांवर लावा.
आयशॅडोचा रंग जर गडद असेल तर तो खूप जास्त लावू नका कारण त्यामुळे तुमच्या सगळ्या मेकअपचा लूक बदलू शकतो. त्यामुळे खूप जास्त आयशॅडो लावू नका. डोळ्यांसाठी चांगले आयशॅडो पॅलेट निवडा. डोळ्यांना आयशॅडो लावताना तुमच्या स्किनटोनवर जास्त उठून दिसणार नाही असा रंग निवडा. शिवाय आयशॅडो आणि लिपस्टीक जर सारख्या कलरचं असेल तर तेही तुमचा लूक बिगडवू शकतं. जर तुम्ही तुमच्या डोळ्यांना डार्क शेड्स लावत असाल तर ओठांना नेहमी लाइट शेड्सच्या लिपस्टीक वापरा. स्मोकी आईज मेकअप करताना लिपस्टीकची शेड न्यूड किंवा पीच ठेवा.
आयशॅडो लावण्यापूर्वी डोळ्यांच्या पापण्यांना आयशॅडो प्रायमर लावणं गरजेचं असतं. कारण त्यामुळे तुमच्या आयशॅडोचा रंग ब्राईट आणि उठावदार दिसतो. प्रायमर लावल्यामुळे डोळ्यांवरील क्रीज लाईन्स कमी प्रमाणात दिसतात. मात्र यासाठी तुमच्या त्वचेच्या रंगसंगतीचं प्रायमर निवडा. ज्यामुळे चेहरा आणि डोळे यामध्ये वेगळेपण दिसणार नाही.
काहीजणींना रात्री मेकअप न काढताच झोपण्याची सवय असते. असं केल्यामुळे तुमचा बेड तर खराब होतोच शिवाय तुमच्या त्वचा आणि डोळ्यांवरही त्याचा दुष्परिणाम दिसू लागतो. इनफेक्शन टाळण्यासाठी नेहमी तुमचा मेकअप काढून मगच झोपी जा. मेकअप काढून टाकण्यासाठी चांगल्या क्लिनझरचा वापर करा. नारळाच्या तेलानेही तुम्ही मेकअप काढू शकता. जीवनशैलीमध्ये चांगले बदल केल्याने तुमच्या आरोग्य आणि सौदर्यावर याचा चांगला परिणाम दिसून येईल. तुमच्या पापण्यांचे केस यामुळे नक्कीच चांगले दिसू लागतील.
जर तुम्हाला आय मेकअप येत नसेल तर तज्ञ्ज व्यक्तीकडून तो आधी शिकून घ्या आणि त्याचा सराव करा. कारण आयमेक जर चुकला तर तुमच्या संपूर्ण लुकवर त्याचा परिणाम होऊ शकतो. लुक चांगला दिसण्ययासाठी आय मेकअप येणं गरजेचं आहे.
आय मेकअपच्या साहित्याचा वापर थेट डोळ्यांवर केला जात असल्यामुळे आयमेकअप करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मुळातच सर्वच सौंदर्योत्पादने ही चांगल्या दर्जाचीच वापरावीत. मात्र डोळ्यांचा मेकअप करताना ती नेहमी तपासून घ्यावीत कारण चुकून त्यातील एखादा भाग डोळ्याच्या आत गेल्यास तुमचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
आय मेकअपवर आधारीत विविध युट्यूब व्हिडिओज असतात. ते पाहून अथवा तज्ञ्ज व्यक्तीकडून शिकून मगच आयमेकअप करावा. अथवा सिंपल बेसिक आयमेक करण्याचा घरीच सराव करावा.
हे ही वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या लिंकवर क्लिक करा.