प्रत्येकाला माहीत हव्या #Navratri शी निगडीत या गोष्टी

प्रत्येकाला माहीत हव्या #Navratri शी निगडीत या गोष्टी

नवशक्तीचं मिलन म्हणजे नवरात्री असं म्हणतात. नवरात्रीमध्ये दुर्गामातेच्या नऊ रुपांची आराधना केली जाते. सर्व भक्त आपल्या श्रद्धेनुसार व्रत-उपवास आणि पूजेने देवीला प्रसन्न करतात. आपल्यापैकी बऱ्याच जणी या काळात उपवास करत असतीलच. या नऊ दिवसात केले जाणारे उपवास हे फारच कडक असतात. अनेकजण अनवाणीसुद्धा वावरतात. पण यामागील नेमकी कारण काय आहेत याबाबत अनेकांना माहीती नसते. त्यामुळे या लेखात नवरात्रींशी निगडीत काही गोष्टी आम्ही सांगणार आहोत. ज्या देवीच्या प्रत्येक भक्ताला माहीत हव्यात.

वर्षातून 4 वेळा असतं नवरात्र

हिंदू धर्मानुसार नवरात्र वर्षातून चार वेळा येते. पण सामान्यतः आपल्याला फक्त दोनच नवरात्र माहीत असतात चैत्र आणि शारदीय नवरात्र. माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र म्हटलं जातं. कारण यामध्ये गुप्तपणे शिव आणि शक्तीची उपासना केली जाते. गुप्त नवरात्रादरम्यान तंत्रसाधनेसाठी माँ काली, तारा देवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, माता छिन्नमस्ता, त्रिपुर भैरवी, माँ ध्रूमावती, माता बगलामुखी, मातंगी आणि कमला देवीची पूजा केली जाते.

उपवास केल्याने काय होतं नुकसान

नवरात्रीत म्हणून केले जातात उपवास

दोन ऋतूंच्यामधील संधीकाळ म्हणजेच जेव्हा ऋतू संपतो आणि दुसरा सुरू होतो तेव्हा नवरात्र साजरी केली जाते. या दरम्यान आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे आरोग्याच्या संतुलनासाठी उपवास केले जातात.

नारी शक्तीचं दर्शन देतात देवीची ही 9 रूपं

माता शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री देवी ही दुर्गैची नऊ वेगवेगळी रूप आहेत. ही प्रत्येक देवी नारी शक्तीचं एक रूप दर्शवते. नवरात्रीसाठी देवीची आरती आणि पूजा करून आराधना केली जाते. 

म्हणून देवीला दाखवतात गूळ-चण्याचा नैवेद्य

देवीला चणे-गूळाचा नैवेद्या दाखवला जातो. या नैवेद्याची सुरूवात त्या काळी झाली होती जेव्हा चणे हे एक असं अन्न होतं जे खूप स्वस्त आणि रोगनाशक होतं. तर गूळ हे सर्व वर्गातील लोकांकडे सहज उपलब्ध असणारा गोड प्रकार होता. अनेकदा नैवेद्य किंवा बळी म्हणून निर्दोष पशूंचा बळी जाऊ नये म्हणूनही त्याऐवजी गूळ-चण्याचा अर्पण केला जाऊ लागला. 

कन्या पूजन

नवरात्रामध्ये कन्यांचं पूजन केलं जातं कारण कन्यांना नऊ देवीचं प्रतिबिंब मानलं जातं. देवींच्या रूपात कन्यांचं पूजन करून नवरात्रीची पूज सफल मानली जाते. कन्या पूजनांमध्ये 1 ते 10 वर्षांपर्यंतच्या कन्यांचं पूजन उत्तम मानलं जातं. यापेक्षा जास्त वयाच्या कन्यांना देवीपूजनासाठी वर्जित मानलं जातं. 

या गोष्टी पाहिल्यास असतं शुभ

असं म्हणतात की, नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर कोणी तुम्हाला नाणं दिल्यास समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू झाले. जर तुम्हाला या दिवसात सापाचं दर्शन झाल्यास समजून जा तुमच्यावर लक्ष्मीकृपा होणार आहे.

कांदा-लसूण वर्ज्य

नवरात्रीच्या दिवसात जास्तकरून लोकं कांदा-लसूण खाणं बंद करतात कारण हिंदू वेदानुसार कांदा आणि लसूणसारखे पदार्थ खाल्ल्याने मनुष्यात राग आणि उत्तेजना वाढते. ज्यामुळे त्यांच्या ध्येयापासून भटकू शकतात. त्यामुळे या व्रत-उपवासादरम्यान कांदा-लसूण खात नाहीत.

गहू अंकुरणं

नवरात्रीमध्ये कलश स्थापनेचं खूप महत्त्व असतं. या दरम्यान गहू अंकुरण्याची प्रथा असते. ज्याचं मुख्य कारण आहे अन्नाचा सन्मान करणं. असं मानलं जातं की, या नऊ दिवसात गहू किंवा ज्वारी जरं सरळ आणि हिरव्यागार रंगात उगवल्यास ते घर-कुटुंबासाठी शुभ मानलं जातं. 

P.S : POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty - POPxo Shop's चं नवं कलेक्शन. त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत. शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुूटदेखील आहे. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौंदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.