आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी (Flax Seeds) | POPxo

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी (Flax Seeds)

आरोग्यासाठी फायदेशीर ठरते बहुगुणी आळशी (Flax Seeds)

कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीतच नसतं. फ्लॅक्स सीड्स अर्थात आळशी हा पदार्थ त्यापैकीच एक आहे. आळशीची बी तुमचं वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आणि केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. आळशी नियमित खाल्ल्याने अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. आळशी खाण्याची एक योग्य पद्धत असते. ही पद्धत ज्याला कळली त्या व्यक्तीला आळशीच्या औषधीय गुणांचा भरपूर फायदा मिळू शकतो. आळशीच्या बियांसह (flax seeds) याला लिनसीड्स (linseeds) असंही म्हटलं जातं. आळशी आकारामध्ये लहान असते आणि याचा रंग चॉकलेटी असतो. आळशीची बी तुम्ही नुसती पण खाऊ शकता आणि याची पावडर करून खाल्ल्यानेही फायदे होतात. मुळात तुमच्या शरीराला लागणारी उर्जा यामधून मिळते. नक्की आळशीचे काय फायदे आहेत आणि याचा वापर आपण कुठे आणि कसा करू शकतो, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही याचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करून आरोग्य सुधारण्यासाठी फायदा करून घ्या. 

Table of Contents

  आळशीचे आयुर्वेदिक फायदे (Ayurvedic Benefits Of Flax/Jawas)

  Shutterstock
  Shutterstock

  आयुर्वेदामध्ये आळशीच्या बियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आळशीच्या बियांबाबत यामध्ये सांगण्यात आलं आहे. आळशीचं सेवन केल्याने कफसारख्या समस्येतून लवकर सुटका मिळते. तसंच आळशी अत्यंत पौष्टिक समजण्यात येते. शरीराच्या कोणत्याही भागावर सूज असल्यास, तुम्ही आळशीच्या बियांच्या तेलाने मालिश केल्यास, तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. सूज लवकरात लवकर कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे तुमच्या घराता आळशीचं बी नेहमी असणं आवश्यक आहे. 

  आळशीच्या बियांचे वैद्यकीय गुण (Medicinal Properties Of Flax Seeds)

  Shutterstock
  Shutterstock

  आळशीला तसं तर गुणांची खाण असंच म्हटलं जातं. आळशीच्या बी आणि तेलामध्ये अल्फा लिनोलिक अॅसिड (alpha linolic acid) सापडतं, जे एक प्रकारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड (Omega 3 fatty acid) असतं. त्याचबरोबर यामध्ये फायबर (fiber), विटामिन बी कॉम्प्लेक्स (vitamin B complex), प्रोटीन (protein), पोटॅशियम (potassium), मॅग्निशियम (magnesium), फॉस्फोरस (phosphorus), मँगनीज (manganese), थायामिन (thayamin) आणि फायटोअॅस्ट्रोजन (fightoestrogen) ज्याप्रमाणे मिनरल्स (minerals) या गोष्टींचादेखील समावेश आहे. या सगळ्यामध्ये वैद्यकीय गुण असतात. 100 ग्रॅम आळशीमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असतं. 

  आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं

  त्वचेसाठी आळशीच्या बियांचे फायदे (Flax Seeds For Skin)

  Shutterstock
  Shutterstock

  आळशीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स गुणांमुळे आळशी ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स गुणांनी त्वचेमध्ये कोलेजन प्रॉडक्शन आणि नव्या पेशींचं निर्माण होत असतं. यामुळे त्वचाही निरोगी राहाते आणि यामुळे वाढत्या वयावरही त्याचा परिणाम होत नाही. तुमची त्वचा तशीच चमकदार राहाते. तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार हवी असेल तर तुमच्या रोजच्या आहारात किमान 1 ते 2 चमचे आळशीचा नक्की समावेश करून घ्या. बघूया कसा होतो उपयोग त्वचेसाठी

  1. दालचिनी, दही आणि आळशी

  Shutterstock
  Shutterstock

  • एका भांड्यात आळशीची पावडर अर्धा चमचा घ्या. त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि दही घाला. याची पेस्ट बनवून घ्या
  • ही पेस्ट साधारण पाच मिनिट्स चेहऱ्याला लावा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा
  • यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते

  2. आळशी पावडर आणि मध

  Shutterstock
  Shutterstock

  • एका भांड्यात आळशी पावडर आणि मध घालून मिक्स करा
  • हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून साधारण 20 मिनिट्स ठेवा. सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.
  • यामुळे तुमच्या त्वचेला योग्य मॉईस्चराईजेशन मिळतं

  3. आळशी पावडर, दूध आणि हळद

  Shutterstock
  Shutterstock

  • या तिन्ही गोष्टी मिक्स करून पेस्ट बनवा
  • हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून साधारण 20 मिनिट्स ठेवा. सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.
  • यामुळे तुमची त्वचा सूर्याच्या किरणांपासून सुरक्षित राहाते

  4. आळशी पावडर आणि लिंबाचा रस

  Shutterstock
  Shutterstock

  • एक चमचा आळशी पावडरमध्ये लिंबाचा रस घाला 
  • हे मिश्रण  चेहऱ्यावर आणि मानेवर लावून साधारण 20 मिनिट्स ठेवा. सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा.
  • यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते

  5. आळशी पावडर आणि ऑलिव्ह ऑईल

  Shutterstock
  Shutterstock

  • एक चमचा आळशी पावडरमध्ये ऑलिव्ह ऑईल घाला 
  • हे मिश्रण चेहऱ्यावर लावून काही वेळ अगदी हळूवार मसाज करा
  • तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. 

  आळशीच्या बियांचे आरोग्यासाठी फायदे (Health Benefits of Flax seeds)

  आळशीच्या बियांचे आरोग्यदायी बरचे फायदे आहेत. कदाचित इतके फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील. त्यामुळे जाणून घ्या नक्की काय फायदे आपल्या शरीराला आळशीच्या बियांमुळे होतात. 

  1. हार्मोन्स ठेवते संतुलित - Flax Seeds To Balance Hormones

  बऱ्याचदा महिलांना हार्मोनल असंतुलनाची समस्या सतावत असते. आळशीमध्ये असणाऱ्या फायटोअॅस्ट्रोजनच्या कारणामुळे महिलांसाठी हे खूपच फायदेशीर ठरतं. मेनोपॉज (Menopause) च्या वेळी महिलांना बेचैनी, अत्यधिक गरम होणं, अनियमित रक्तस्राव, कंबरदुखी आणि सांधेदुखी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. हार्मोनचं संतुलन राखण्यासाठी आळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. तसंच तुमची मासिक पाळी (Periods) नियमित करण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

  कढीपत्त्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू

  2. रक्तदाब नियंत्रणात राहातो - Maintains Blood Pressure

  आळशीच्या बियांचा उपयोग रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आपण करू शकतो. यामुळे हायपरटेन्शनसारख्या समस्यांशी लढा देण्यासही मदत मिळते. त्यामुळे नियमित याचं सेवन केल्यास, यापासून तुम्ही दूर राहू शकता.  

  3. कॅन्सरपासून बचाव - Cancer Prevention

  Shutterstock
  Shutterstock

  अभ्यासातून सिद्ध झालं आहे की कॅन्सर (Cancer) ची जोखीम कमी करण्यासाठी आळशीचं बी अत्यंत उपयुक्त आहे. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर याबरोबर लढण्यासाठी आळशीचं बी महत्त्वाचं समजलं जातं. आळशीच्या बियांमध्ये लिगननचा स्तर अधिक प्रमाणात असतो. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer) पासून संरक्षण होतं. 

  4. रॅशेस आणि सूज आल्यावर परिणामकारक - Cure Redness And Swelling

  Shutterstock
  Shutterstock

  आळशीमध्ये अँटिइन्फ्लेमेटरी (anti inflammatory) गुण असतात.  या गुणांमुळे त्वचेवर होणारी जळजळ, सूज आणि लाल रॅशेस कमी करण्यासाठी मदत मिळते. आळशीमध्ये असणाऱ्या ओमेगा 3 फॅटी अॅसिडमुळे त्वचेला हायड्रेटेड राखण्यासाठीही मदत मिळते. त्वचेवर जर कोणताही घाव झालआ असेल तर त्यावरील उपचार म्हणूनही आळशीच्या बियांचा वापर करण्यात येतो. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत मिळते. 

  5. गर्भवती महिलांसाठी फायदेशीर - Beneficial For Pregnant Women

  Shutterstock
  Shutterstock

  गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आळशी अतिशय फायदेशीर आहे. बऱ्याच घरांमध्ये गर्भवती महिलांसाठी अथवा नवजात बालकांच्या मातांसाठी आळशीचे लाडू बनवण्यात येतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आळशीचं सेवन योग्य नाही. पण तरीही बाळाला मिळणाऱ्या दुधासाठी आळशी चांगली समजली जाते आणि वर्षानुवर्ष याचा फायदाच महिलांना होतो हे समजण्यात आल्याने आळशीचा वापर केला जातो. 

  6. वजन नियंत्रणात राखण्यासाठी होते मदत - Flax Seeds To Maintain Body Weight

  Shutterstock
  Shutterstock

  आळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, फायबर आणि लिगनेनचं प्रमाण अधिक असतं.  जे वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं. आळशी हे प्रोटीनचादेखील एक चांगला स्रोत आहे आणि प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. जेवणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यास, भूक लवकर लागत नाही. पोट भरल्यासारखं वाटतं. आळशीच्या सेवनाने शरीर निरोगी राहातं आणि वजन कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. 

  7. पचनसमस्येपासून होते सुटका - Flax Seeds For Digestion

  काही लोकांना बऱ्याचदा बद्धकोष्ठतेची समस्या असते आणि त्यांना पचनाचीही समस्या असते. तुम्हाला पण असंच काहीसं होत असेल तर तुम्ही नियमित आळशीचं सेवन केलंत तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. वास्तविक फक्त  एका गोष्टीची काळजी घ्या, आळशीचं सेवन केल्यानंतर तुम्ही अधिक प्रमाणात पाणी पित राहा. 

  जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत

  8. त्रासातून मिळतो आराम - Quick Relief From Pain

  आळशीच्या बी मध्ये समाविष्ट असणारे अल्फा- लिनोलेनिक अॅसिड आर्थ्राइटिस (संधीवात) अथवा दुसऱ्या कोणत्याही तऱ्हेच्या जॉइंट पेनमधून तुम्हाला सुटका मिळवून देतं. तसंच आळशीच्या बियांचं सेवन केल्याने यापासून त्वरित आराम मिळतो. 

  9. प्रतिकारशक्ती वाढवण्यास होते मदत - Flax Seeds Boost Immune System

  आळशीच्या बियांमध्ये अँटिव्हायरल, अँटिबॅक्टेरियल आणि अँटिफंगल गुण असतात. याचं सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रतिकारशक्ती अर्थात इम्युन सिस्टिममध्ये कमतरता असल्यास, आळशीच्या बियांचं सेवन करण्याचा त्या व्यक्तीला नक्कीच सल्ला घ्या. 

  10. मधुमेहासाठी फायदेशीर ठरते आळशी - Flax Seeds For Diabetes Patient

  Shutterstock
  Shutterstock

  आळशीचं सेवन रोज केल्याने टाईप 2 मधुमेहांच्या रोग्यांच्या शुगर लेवलचा स्तर सुधारतो. आळशीच्या बी मध्ये असणारं अल्फा- लिनोलेनिक अॅसिड, फायबर आणि प्रोटीनमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे मधुमेहाच्या रोगींसाठी नेहमीच आळशी खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात.

  11. केस राहतील निरोगी आणि सुंदर - Healthy And Beautiful Hair

  Shutterstock
  Shutterstock

  ओमेगा 3 फॅटी अॅसिडचे खूपच फायदे आहेत. फ्लॅक्स सीड्स अर्था आळशी खराब आणि कोरड्या केसांसाठी गुणकारी औषध आहे. आळशीचा नियमित उपयोग करून आणि सेवन करून तुम्ही कोंडा, खाज आणि केसगळतीसारख्या समस्यांपासून दूर राहू शकता. याच्या नियमित वापराने तुम्हाला या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळते. 

  12. कोलेस्ट्रॉलची पातळी होते कमी - Flax Seeds To Maintain Cholestrol

  प्रतिदिवशी तुम्ही जर 100 मिलीग्रॅम आळशीच्या बियांचं सेवन केल्यास, तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येऊ शकते. आळशीच्या बियांमध्ये फायबर जासत् प्रमाणात असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं. 

  13. दमा (Asthma) रोगापासून मिळवा सुटका - Flax Seeds For Asthma

  आपल्याकडे भरपूर प्रदूषण असल्याने आजकल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बऱ्याच जणांना अस्थमा (Asthma) अर्थात दमा आजार असतो. तुम्हालादेखील या आजाराने त्रस्त केलं असेल तर आळशीचं सेवन तुम्हाला यावर उपयुक्त ठरू शकतं. आळशीच्या बिया वाटून पाण्यात घाला आणि 10 तास अर्थात रात्रभर हे पाणी असंच ठेवा. दिवसातून हे पाणी दोन ते तीन वेळा प्या. यामुळे दमा कमी होतो आणि कफही होत नाही. 

  14. संधीवातापासूनही मिळतो आराम - Flax Seeds For Arthritis

  आर्थरायटिस (arthiritis) असलेल्या लोकांना गुडघ्यात आणि कंबरेत प्रचंड त्रास होत असतो. आळशीच्या तेलाने मालिश केल्यास, त्रासातून सुटका होते आणि सूजही कमी होते. ओमेगा 3 फॅटी अॅसिड (Omega 3 fatty acid) चा समावेश असल्याने ऑस्टियोआर्थरायटिस (ostioarthiritis) ठीक होण्यासाठीही मदत मिळते. रोज एक चमचा आळशीच्या बिया (flax seeds) खाल्ल्याने ऑस्टियोआर्थरायटिसच्या लक्षणातूनही सुटका मिळते. 

  15. डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी - Flax Seeds For Healthy Eyes

  Shutterstock
  Shutterstock

  काही व्यक्तींना ड्राय आय सिंड्रोम (dry eye syndrome) ची समस्या असते. या त्रासामध्ये बाहेर गरजेचं असणारं ल्युब्रिकेशन (lubrication) मिळत नाही. त्यामुळे डोळ्यात सतत जळजळ होते आहे. या रोगाचं लक्षण कमी करण्यासाठी आळशीच्या तेलाचा (flax seeds oil) वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो. 

  कशी खावी आळशी/जवस (How To Eat Flax Seeds?)

  Shutterstock
  Shutterstock

  प्रत्येक समस्येमध्ये आळशीच्या बिया खाण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला जर आळशीची बी खायची असेल तर त्याची पद्धती जाणून घ्या. 

  1. आपलं हृदय (heart) निरोगी ठेवण्यासाठी रोज वाटलेल्या आळशीच्या बियांंचं सेवन करा

  2. मेनोपॉज (menopause) चा प्रभाव कमी करण्यासाठी रोज दोन वा तीन वेळा एक चमचा आळशीच्या बियांच्या पावडरचं सेवन करा

  3. कोलेस्ट्रॉल (cholestrol) दोन प्रकराचं असतं. बॅड कोलेस्ट्रॉल (bad cholestrol) ची पातळी कमी करण्यासाठी रोज 2 ते 4 चमचे वाटलेल्या आळशीच्या बिया खा

  4. वजन कमी करायचं असल्यास, आळशीच्या बियांची भाजी, सूप, सलाड अथवा दह्यात मिसळून खाणंही योग्य ठरतं

  5. कॅन्सर (cancer) पासून वाचायचं असल्यास, आळशी बी ची पावडर (powder) दह्यात घालून खा. तुम्हाला हवं तर जेवण बनवतानाही ही पावडर तुम्ही पदार्थांमध्ये घालू शकता

  6. डिटॉक्सीफिकेशन (Detoxification) साठी तुम्ही आळशीच्या बिया खा. एक कप पाण्यात आळशी भिजवा. दुसऱ्या दिवशी पाणी आणि आळशी दोन्ही खा

  7. आळशीचं बी पाण्यात उकळून त्याची जेल (gel) बनवा. कुरळ्या केसांवर याचा उपयोग केल्यास, केस अधिक सुंदर दिसतात

  8. सुगंधित तेल (Essential oil) मध्ये काही थेंब आळशीचं तेल घालून नैसर्गिक मॉईस्चर तुम्ही बनवू शकता

  9. आळशीपासून फेसपॅक (face pack) आणि स्क्रबही (scrub) बनवता येतात

  10. कोंडा (dandruff) अथवा केसगळतीची समस्या असल्यास, आळशीच्या तेलाचा उपयोग केसांना लावायला करा. लवकरच त्याचा चांगला परिणाम दिसून येईल

  11. आळशी भाजूनही खाऊ शकता. असं केल्याने पोटदुखी बंद होते

  आळशीच्या बी ने होणारं नुकसान (Side Effects Of Flax Seeds)

  Shutterstock
  Shutterstock

  प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसंच आळशीच्या बी चे जसे फायदे आहेत तसंच त्याचं नुकसानही आहे. जाणून घेऊया काय आहे याचं नुकसान 

  1. आळशी कमी प्रमाणात खाल्ल्यास, बद्धकोष्ठतेची(constipation) समस्या दूर होते. पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास जुलाब अर्थात लूज मोशन्सची (loose motion) समस्या होऊ शकते

  2. हृदयाची समस्या असणाऱ्या व्यक्तींना डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच आळशीच्या बी चं अथवा पावडरचं सेवन करायला हवं

  3. आळशीचं बी सेवन करत असल्यास, पाणी जास्त प्रमाणात प्यायला हवं अन्यथा आतड्यांमध्ये आणि पायांमध्ये समस्या होऊ शकते

  4. आळशीचं सेवन जास्त केल्यास, श्वास घेण्यातही अडचण होते आणि लो ब्लड प्रेशर सारखे अॅलर्जिक (allergic) रिअॅक्शनदेखील होण्याची शक्यता असते

  5. आळशीमध्ये जास्त अॅस्ट्रोजन (estrogen) असतं. त्यामुळे मासिक पाळीसाठी हे चांगलं आहे. मात्र तुम्हाला गरोदर व्हायचं असेल तर याचं सेवन बंद करा. त्याचा वाईट परिणाम होतो. 

  6. अख्खी आळशी पचवणं कठीण आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही याची पावडर खाण्यालाच प्राधान्य द्या

  7. कोणतीही सर्जरी (surgery) होणार असेल तर दोन आठवडे आधीच आळशीचं तेल खाणं बंद करा. आळशीच्या तेलाने सर्जरी दरम्यान अथवा नंतरही रक्तस्रावाची भीती राहाते. 

  आळशीसंबंधित प्रश्नोत्तरे (FAQs)

  प्रश्न - आळशी अख्खी खाणं चांगलं की भिजवून?

  आळशी अख्खी खाणं ही पचायला जड असते. त्यामुळे ती भिजवून खाणं अथवा आळशीच्या बियांची पावडर करून खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. 

  प्रश्न - आळशी जेवणाच्या कोणत्या पदार्थात घालता येते?

  आळशीची पावडर तुम्ही कोणत्याही भाज्यांमध्ये योग्य प्रमाणात वापरू शकता. आळशीला एक चव असते. त्यामुळे जास्त प्रमाणात ही घालू नये. 

  प्रश्न - गरोदरपणात आळशी खाणं योग्य आहे का?

  आळशी ही उष्ण असते. त्यामुळे गरोदरपणाच्या काळात आळशी खाणं योग्य नाही. तुम्ही नियमित आळशी खात असाल तर गरोदर राहण्याच्या काळात याचं सेवन बंद करणं योग्य आहे. 

  मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे