केळ्याच्या सालीचा असा उपयोग करा.. मिळतील फायदेच फायदे

केळ्याच्या सालीचा असा उपयोग करा.. मिळतील फायदेच फायदे

फळ आरोग्यासाठी चांगली असतात म्हणूनच ती खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: केळं. हे फळ सगळ्याच सीझनमध्ये मिळतं. शिवाय हे फळ खिशाला परवडणारही असतं. जर तुम्ही केळं खात असाल तर केळ्याची साल या पुढे कधीही फेकून देऊ नका कारण या केळ्याच्या सालीचे खूप फायदे आहेत. केळ्याची साल कचऱ्यात फेकून देण्याआधी तुम्ही याचे अगणित फायदे नक्कीच वाचायला हवेत. तुम्हाला या केळ्याच्या सालीचा वापर नक्कीच घरी करता येईल. मग करायची का सुरुवात?

'केळ्याची साल' आहे एक नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन

पिंपल्स करते कमी

जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास असेल तर मग केळ्याची साल तुमच्यासाठी वरदान आहे. केळ्यामध्ये व्हिटॅमिन C,E,पोटॅशिअम, झिंक,लोह, मॅग्नेशिअम असे अनेक घटक असतात.त्यामुळे तुमचे पिंपल्स कमी करण्याची क्षमता त्यामध्ये असते. तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुवून त्यावर केळ्याची साल घासायची आहे. पिंपल्स असलेल्या ठिकाणी तुम्हाला अगदी नाजूक हाताने ही साल फिरवायची आहे. केळ्याच्या सालीतला गर चेहऱ्याला पुरेपूर तुमच्या चेहऱ्याला लागायला हवा. तुम्हाला काहीच दिवसात तुमच्या त्वचेत बदल झालेला दिसेल. तुम्ही इतरवेळीही केळं खाल्यानंतर हा प्रयोग करु शकता. तुम्हाला अपेक्षित असलेली सुंदर त्वचा मिळेल.

दातांचा पिवळेपणा

shutterstock

तुमचे दात पिवळे पडले असतील ( तुमच्या दातांचा शेड वगळता) तर तुमच्या दातांचा पिवळटपण काढून टाकण्याचे काम केळ्याची साल करु शकते. केळ्यामध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळेच तुमच्या दातांवरील पिवळाथर निघून जाण्यास मदत मिळते. दररोज ब्रश केल्यानंतर तुम्हाला तुमच्या दातांवर केळ्याची साल फिरवायची आहे. साधारण दोन मिनिटं तरी तुम्ही ती तुमच्या दातांवर घासायला हवी. त्यानंतर तोंड धुवून घ्यायचे आहे. तुम्हाला तुमच्या दातांच्या रंगामध्ये झालेला बदल साधारण आठवड्याभरानंतर जाणवेल. त्यामुळे जर तुमचे दात पिवळे असतील तर तुम्ही हे नक्की करुन पाहू शकता.

डोकेदुखी

shutterstock

मायग्रेन किंवा अन्य डोकेदुखीवरही केळ्याची साल अगदी उत्तम आहे. तुम्हाला केळ्याची साल तुम्हाला साधारण तासभर तरी फ्रिजरमध्ये ठेवायची आहे. बर्फाप्रमाणे कडक झालेली ही केळ्याची साल तुम्हाला आराम देऊ शकते. तुम्हाला केळ्याची एक साल डोक्यावर आणि एक मानेखाली ठेवायची आहे. साल गरम होईपर्यंतच तुम्हाला ती ठेवायची आहे. जर तुम्हाला  तरी डोकं दुखत आहे असे वाटत असेल तर तुम्ही पुन्हा हा प्रयोग करु शकता. 

 मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)

चांदी करते स्वच्छ

shutterstock

केळ्याच्या सालीमध्ये असलेले पोटॅशिअम तुमच्या चांदीच्या भांड्यानाही लख्ख करु शकते. हे तुम्हाला नक्कीच माहीत नसेल. केळ्याचे साल घेऊन तुम्हाला ती कोरडी सालच चांदीच्या भांड्यावर घासायची आहे. चांदीवरील काळेपणा तुम्हाला याच्या वापरानंतर कमी झालेला दिसेल. तुम्ही रोज अशाप्रकारे चांदीची भांडी धुतली तर ती नक्कीच स्वच्छ राहतील.

उत्तम खत

shutterstock

जर तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर मग तुम्ही खत म्हणून केळ्याच्या सालीचा उपयोग केलात पाहिजे. तुम्ही झाड लावण्याचा विचार करत असाल तर कुंडीमध्ये सगळ्यात खाली केळीचे साल ठेवा. त्यावर माती टाका. केळ्याच्या साली लगेचच कंपोस्ट होतात. आणि त्याचे खतही उत्तम बनते त्यामुळे केळ्याची साल कधीच फेकू नका. तुम्ही एखाद्या भांड्यात केळ्याच्या सालीचे कंपोस्ट खतही बनवू शकता आणि त्याचा वापर करु शकता. 

रिंकल फ्री त्वचा

जर तुम्हाला रिंकल फ्री त्वचा हवी असेल तर मग तुम्ही हमखास केळ्याची साल वापरा. अनेकदा डोळ्यांखाली रिंकल्स येण्याची शक्यता अधिक असते. केळ्याची साल तुमच्या डोळ्याच्या आकारामध्ये कापून डोळ्याखाली रात्रभर ठेवा तुम्हाला तुमच्या रिंकल्स कमी झालेल्या दिसतील.

मग आता केळ्याची साल अजिबात फेकू नका. उलट त्याचा आजपासून वापर सुरु करा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.