आई वडिलांकडून मुली आणि सुनांना देता येणारे खास गिफ्ट्स

आई वडिलांकडून मुली आणि सुनांना देता येणारे खास गिफ्ट्स
Products Mentioned
Fuji
Samsung
Vega
Swarovski
POPxo
POPxo
nursery live
POPxo
Philips
JM Massagers
Kurtzy
Mollismoons
Savni
POPxo
POPxo
Dressberry
POPxo
POPxo
JBL
POPxo
YVES ROCHER
POPxo

कोणत्याही व्यक्तीला गिफ्ट्स म्हटलं की नक्कीच डोळे चमकतात. तुम्ही कितीही श्रीमंत असाल पण तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून तुम्हाला गिफ्ट्सची अपेक्षा असतेच. त्यातही ते जर तुमच्या आईवडिलांकडून मिळणार असेल तर ते तुमच्यासाठी अधिक खास असतं. मुलांपेक्षाही मुलींचे बऱ्याच ठिकाणी जास्त लाड होताना दिसतात. मुली या घराची शान असतात असं म्हटलं जातं. घर सांभाळण्याापासून ते अगदी देश सांभाळण्यापर्यंत सर्व गोष्टी मुली करतात. आईवडील आपल्या मुलींसाठी नेहमी काही ना काहीतरी खास गिफ्ट्स आणत असतात. पण आपल्या या खास मुलींसाठी एक दिवस महत्त्वाचा असतो तो म्हणजे डॉटर्स डे. जगात वेगवेगळ्या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. पण भारतात हा दिवस सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील रविवारी साजरा करण्यात येतो. World Daughter Day च्या निमित्ताने आईवडिलांना मुलींना काय खास गिफ्ट देता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेव्हा आईवडील आपल्या मुली आणि सुनांसाठी खास प्रेम व्यक्त करतात तेव्हा मुली आणि घरातील सुनांनाही खूप बरं वाटतं. आम्ही तुमच्याबरोबर इथे काही खास गिफ्ट आयडियाज शेअर करणार आहोत. 

Table of Contents

  डॉटर्स डे साठी गिफ्ट आयडियाज (Daughters Day Gift Ideas)

  आपल्या मुलींना नक्की काय खास गिफ्ट्स द्यायचं याचा आपल्याला नेहमीच विचार असतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळे गिफ्ट्स आणि युनिक आयडियाज तुम्हाला सुचवत आहोत. तुम्ही याचा वापर करून आपल्या मुलींना यावर्षी डॉटर्स डे ला खास गिफ्ट द्या. 

  1. इन्स्टा कॅमेरा

  Fuji
  Fujifilm Instant Film Camera
  INR 2,399 AT Amazon
  Buy

  तुमच्या मुलीला अथवा सुनेला जर सतत सेल्फी काढायला अथवा फोटो काढायला आवडत असेल तर तुम्ही त्यांना इन्स्टा कॅमेरा गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यांना हे गिफ्ट नक्कीच आवडेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गिफ्ट मिळाल्यानंतर तुमच्याबरोबरच त्या पहिला फोटो काढतील हेदेखील नक्की.

  2. फिटनेस बँड

  Samsung
  Samsung Unisex Yellow Galaxy Fit e Fitness Band
  INR 2,486 AT Myntra.com
  Buy

  सध्या फिटनेस ट्रॅकर गॅझेट्स खूपच चलनात आहे.  मुलांनाच नाही तर मुलींनाही याची आवड आहे. तुमच्या मुलींकडे विविध वॉचेसदेखील असतील. पण यावेळी तिला फिटनेस बँड गिफ्ट करा. हे फिटनेस बँड तुमच्या मुलींच्या फिटनेसकडे विशेष लक्ष पुरवेल. ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनला कनेक्ट करून तुमच्या मुलीच्या फिटनेसबाबत माहिती हा बँड देत राहील. त्यामुळे तुमच्या मुलीच्या आरोग्याकडेही व्यवस्थित लक्ष राहील आणि अतिशय फायदेशीर ठरेल. तुम्ही अशा तऱ्हेने एक प्रकारे काळजीही घेऊ शकता. सतत तिच्याकडे वेगळं लक्ष देण्याची गरज भासणार नाही. तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही एक ट्रॅकर घेतलात की, वेळोवेळी तब्बेतीकडेही व्यवस्थित लक्ष देता येईल. 

  मित्रमैत्रिणींना काय द्यायचे स्पेशल गिफ्ट्स

  3. हेअर स्ट्रेटनर

  Vega
  SILKY FLAT HAIR STRAIGHTENER
  INR 1,599 AT vega
  Buy

  तुमच्या मुलीला अथवा सुनेला जर हेअर स्टाईल्स करायला खूप आवडत असेल तर हेअर स्ट्रेटनर हा एक चांगला पर्याय गिफ्ट म्हणून उपलब्ध आहे. आजकाल बदलत्या काळात वेगवेगळ्या फॅशन आणि स्टाईल्स करत राहाणं गरजेचं असतं. आपल्या ड्रेसप्रमाणे आजकाल हेअरस्टाईल्सही केल्या जातात. त्यामुळे तुम्ही हेअर स्ट्रेटनर गिफ्ट दिल्यास, पार्लरला सतत होणारा खर्चही वाचेल. हेअर स्ट्रेटनर 2 हजार रुपयांच्या किमतीचा साधारण असतो. त्यामुळे तुम्ही सहज आपल्या मुली आणि सुनेला गिफ्ट म्हणून हे देऊ शकता. 

  4. इअररिंग्स

  Swarovski
  Swarovski Crystal Metal Drops & Danglers
  INR 2,999 AT flipkart
  Buy

  मुलींजवळ कितीही इअररिंग्ज असोत पण त्यांना ते कमीच वाटतात. प्रत्येक ड्रेसवर वेगळे इअररिंग्ज त्यांना हवचे असतात. असं असेल तर तुम्ही तुमच्या मुलींना स्वरोस्कीचे चांदीचे इअररिंग्ज नक्कीच गिफ्ट देऊ शकता. याचं कलेक्शन अतिशय सुंदर आहे. तसंच ही ज्वेलरी अतिशय ट्रेंडी असून चांगल्या दर्जाचीही आहे. तुमच्या मुली आणि सुनेला हे नक्कीच आवडेल. तसंच तुमची चॉईस बघून त्यांना अधिक आनंद होईल. 

  5. स्वेट शर्ट्स आणि हुडीज

  POPxo Exclusive
  Send Noods Hoodie
  INR 1,499 AT POPxo
  Buy

  आजकालचा हा ट्रेंड आहे. मुलींना स्वेट शर्ट्स आणि हुडीज खूपच आवडतात.  त्यांना अशा तऱ्हेचे कपडे स्टायलिश आणि अगदी आरामदायी वाटतात. आपल्या मुलीच्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये काही नवीन तुम्हाला घेऊन द्यायचं असेल तर हा पर्याय नक्कीच चांगला आहे. गरमीमध्ये नक्कीच हे घालता येणार नाही. पण गारवा असताना नक्कीच याचा चांगला उपयोग त्यांना करून घेता येईल. 

  वडिलांकडून मुलीला लक्षात राहणारे गिफ्ट्स (Gifts for daughters from Dad)

  Shutterstock

  आठवणींचा अल्बम

  वडील ही प्रत्येक मुलीसाठी एक खास व्यक्ती असते. तसंच त्यांच्याकडून मिळणारं कोणतंही गिफ्ट हे कधीच पैशात तोलता येत नाही. कोणत्याही मुलीसाठी सर्वात महत्त्वाच्या असतात त्या वडिलांच्या आठवणी. त्या तिने आपल्या मनात अगदी जपून ठेवलेल्या असतात. तुमच्याजवळ जर तुमच्या मुलीचा एखादा लहानपणीचा सुंदर आठवणींचा फोटो असेल तर तो फोटो अथवा अशा अनेक फोटोंचा एक अल्बम बनवून तिला गिफ्ट म्हणून द्या. तो दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कितीही पैशांनी नक्कीच विकत घेता येणार नाही. हे गिफ्ट तिच्यासाठी अमूल्य ठेवा असेल. 

  महिला दिनानिमित्त काय गिफ्ट्स देता येतील तुमच्या आयुष्यातील स्पेशल 'महिलांना'

  डायलॉग पोस्टर्स

  POPxo Exclusive
  Main Apni Favourite Hoon Poster
  INR 150 AT POPxo
  Buy

  तुमची मुलगी जर फिल्मी असेल आणि तिला फिल्मी संवाद म्हणण्याचा नाद असेल तर तिला तुम्ही POPxo शॉपमधून डायलॉग पोस्टर्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. मुख्यत्वे ‘मैं अपनी फेव्हरेट हूँ’ चं पोस्टर तर तिला नक्कीच आवडेल. कारण करिना कपूरचा हा डायलॉग प्रत्येक मुलीला आवडतो. करिना आवडो न आवडो हा डायलॉग तर सर्वांचाच फेव्हरेट आहे.  

  एफडी

  प्रत्येकाला आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता नक्कीच असते. मग अशावेळी तुम्ही तिला गिफ्ट म्हणून एफडी करून देऊ शकता. एफडी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. आपल्या मुलीला फायनान्शियली स्ट्राँग ठेवण्यासाठी तुम्ही हे गिफ्ट नक्कीच देऊ शकता. जे तिच्या भविष्यासाठी तिला उपयोगी पडेल. पुढे तिला काही वेगळं करायचं असेल तर तिला हे पैसे वापरता येऊ शकतील. 

  प्लांट्स आणि गार्डनिंग किट

  nursery live
  Grow Your Own Flower Garden
  INR 628 AT nurserylive
  Buy

  बऱ्याच मुलींना झाडं लावणं आणि त्यांचं संगोपन करणं आवडतं. तसंच आजकाल झाडांची इतकी वानवा आहे की, तुम्ही तुमच्या मुलींना गार्डनिंग करण्याची आवड निर्माण करून त्यांना वेगवेगळे प्लांट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर त्यांना गार्डनिंग किट देऊन त्यांची आवड जोपासायला त्यांना मदत करा. आजकाल ऑनलाईन सर्व काही मिळतं. त्यामुळे तुम्हाला वेळ नसल्यास, तुम्ही ऑर्डर करून मागवून घेऊ शकता. तुमचं हे प्रेमाचं गिफ्ट पर्यावरण राखायलादेखील मदत करेल. 

  पासपोर्ट कव्हर

  POPxo Exclusive
  Lifestyle
  Let's Get Away Passport Cover
  INR 749 AT POPxo
  Buy

  फिरायला कोणाला आवडत नाही? तुमच्या मुलीलाही फिरण्याची हौस आणि आवड असेल अथवा आपल्या ऑफिसच्या कामानिमित्त जर ती सतत प्रवास करत असेल तर तुम्ही तिला POPxo शॉपमधून एक अप्रतिम पासपोर्ट कव्हर गिफ्ट म्हणून देऊ शकता. असे कव्हर्स तिचं प्रोफेशन, व्यक्तिमत्व यालाही साजेसं आहे आणि तिला हे कव्हर नक्कीच आवडेल. 

  सुनेसाठी गिफ्ट आयडियाज (Gift for Daughter in law)

  सून हीदेखील मुलगीच असते. तिलादेखील घरामध्ये मुलीसारखी वागणूक देणं गरजेचं असतं. त्यामुळे डॉटर्स डे ला सुनेसाठीही तुम्ही काही खास गिफ्ट घेऊ शकता. 

  पार्लरमध्ये बुकिंग

  दिवसभर तुमची सून घरामध्ये आणि अगदी ऑफिसमध्येही काम करत असते. तिला अजिबातच आराम मिळत नाही. मग तुम्ही तिच्यासाठी नक्की काय करू शकता? तर कोणत्या तरी चांगल्या पार्लरमध्ये तिच्यासाठी स्पेशल ग्रुमिंग पॅकेजची अपॉईंटमेंट फिक्स करून तिला सरप्राईज द्या. अशा सरप्राईजने ती नक्की आनंदी होईल आणि तिलाही अशा ट्रिटमेंटने थोडं फ्रेश आणि रिलॅक्स वाटेल. 

  कॉफी/ टी मेकर

  Philips
  Philips HD7431/20 Coffee Maker (Black)
  INR 2,045 AT flipkart
  Buy

  प्रत्येक घरात दिवसभर खूप वेळा चहा आणि कॉफी बनणं चालूच असतं. बऱ्याचदा हे काम घरातील सुनांनाच करावं लागतं. तुम्हाला जर या कामात तुमच्या सुनेला मदत करायची असेल तर तिला एक चांगलंसं कॉफी अथवा टी मेकर आणून द्या. यामुळे तिचे सतत किचनमध्ये राहून चहा कॉफी करण्याचे कष्टही वाचतील आणि शिवाय तिला आनंदही होईल. 

  जागतिक कन्या दिन शुभेच्छा, लाडक्या लेकीसोबत साजरा करा हा दिवस - Daughters Quotes In Marathi

  योगा क्लास मेंबरशिप

  Shutterstock

  घर सांभाळण्याच्या नादात तुमच्या सुनेला स्वत:ची काळजी घ्यायला आणि फिटनेसकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. या डॉटर्स डे ला तुम्ही तुमच्या सुनेला वेगळं गिफ्ट द्या, जे तिच्या खरंच कामाचं असेल. आपल्या जवळच्या योगा क्लासमध्ये अथवा जिममध्ये तिला मेंबरशिप घेऊन द्या. जेणेकरून ती तिच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकेल. तुम्हीही अशा तऱ्हेने तिला तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत करू शकाल. 

  फेस आणि फूट मसाजर

  JM Massagers
  Beauty Care Massager Massager
  INR 499 AT Flipkart
  Buy

  तुमच्या सुनेसाठी मसाजर हादेखील एक गिफ्टचा चांगला पर्याय आहे. कारण घरातील जबाबदारी सांभाळताना तुमची सून खूपच थकून जाते. अशावेळी तिला आरामाची गरज असते. तिची काळजी घेऊन फेस आणि फूट मसाजर तुम्ही गिफ्ट केल्यास, तिला नक्कीच आनंद होईल. तुम्ही तिचा विचार करत आहात हे तिला कळेल आणि ती नक्कीच आनंदीदेखील होईल.  

  मुलींंसाठी बेस्ट सरप्राईज गिफ्ट (Surprise Gift For Girls)

  Shutterstock

  कस्टमाईज गिफ्ट आयटम्स

  आजकाल कस्टमाईज गिफ्ट्स देण्याचा एक ट्रेंडच आला आहे. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो असणारा टी शर्ट, की रिंग, मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, कुशन कव्हर, बेडशीट, दागिना, बॅग, कॉफी मग, क्रॉकरी, पेंटिंग, फोटोकोलाज, डायरी असे अनेक गिफ्ट्स डिझाईन करून तिला गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

  तुमच्यावर अधिक प्रेम करावं असं वाटत असल्यास, मुलांसाठी ख्रिसमसची खास 80 गिफ्ट्स

  ब्युटी स्टेशन

  Kurtzy
  Kurtzy 360 Degree Rotating Makeup Organizer
  INR 799 AT Amazon India
  Buy

  बऱ्याचदा मुलींंना मेकअप करायला आवडतो. पण मेकअपचे प्रॉडक्टस् अस्ताव्यस्त पडले तर घरातील इतर लोकांना त्याचा त्रास होतो. पण तुम्हाला त्यांच्या या गोष्टी नीट करून द्यायच्या असतील तर तुम्ही तिला एक ब्युटी स्टेशन गिफ्ट म्हणून द्या. डेली मेकअप ऑर्गनाईजर म्हणून याचा वापर करता येतो. यामध्ये तुमच्या मुलीचं प्रत्येक ब्युटी प्रॉडक्ट व्यवस्थित फिट होईल. 

  पेट्स (पाळीव प्राणी)

  तुमच्या मुलीला जर पाळीव प्राणी खूप आवडत असतील तर तिला कुत्रा, मांजर, मासे अशा कोणत्याही प्रकारचे पाळीव प्राणी तुम्ही भेट म्हणून देऊ शकता.  फक्त यांची काळजी नीट घेतली जाईल ना याची खात्री करून घ्या. तुम्हाला तुमच्या मुलींना दुसऱ्यांची काळजी कशी करता येऊ शकते याचं शिक्षणही यातून देता येतं. 

  बीन बॅग अथवा काऊच

  Mollismoons
  Mollismoons Lounger Sofa Stretchable Leather Bean Bag
  INR 1,800 AT Amazon India
  Buy

  नुसता काऊच नाही तर आम्ही बोलत आहोत थीम काऊचबद्दल. तुमच्या मुलीला आरामदायी आणि डिझाईनर काऊच आवडत असेल तर तो गिफ्ट म्हणून द्या अथवा तिला बीन बॅगदेखील तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. ज्यावर बसून दिवसभराचा थकवा पळून जाईल आणि तिचा तो एक खास कोपरा असेल तिथे तिला निवांत बसता येईल. 

  नेल आर्ट किट

  Savni
  Savni Nail Art kit
  INR 699 AT Flipkart
  Buy

  नेलपेंट लावणं आणि तुमची नखं नीट ठेवणं हे प्रत्येक मुलीला आवडतंच.  प्रत्येक मुलीकडे नेलपेंट्सच्या असंख्य बॉटल्स असतात. तुम्ही तिची ही आवड लक्षात घेऊन नेल आर्ट किट गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट बघून तिला खूपच आनंद होईल. नेल आर्ट हे सध्या खूपच ट्रेंडिंग आहे. त्यामुळे असं गिफ्ट मिळाल्यास, तिला अजून काय हवं असणार. तुम्ही दिलेलं हे गिफ्ट ती नक्कीच जपून ठेवेल. 

  डॉटर्स डे साठी आईकडून बेस्ट गिफ्ट्स (Daughters Day Gift Ideas from mother)

  Shutterstock

  ऑडियो/ व्हिडियो स्टोरी

  तुम्ही तुमच्या मुलीसाठी काही सरप्राईज गिफ्ट प्लॅन करत असाल तर तिच्या लहानपणीच्या आठवणी आपल्या शब्दात मांडा आणि तिच्यासाठी एखादा ऑडिओ अथवा व्हिडिओ स्टोरी तयार करा. हे करणं तुमच्यासाठी कदाचित थोडं कठीण असू शकतं. पण तुमच्या मुलीसाठी तुम्ही हे नक्कीच करू शकता. डॉटर्स डे हा एक यासाठी नक्कीच चांगला मुहूर्त आहे असं आ्पण म्हणूया.  कोणत्याही खरेदी केलेल्या गिफ्टपेक्षा हे गिफ्ट तुमच्या मुलीसाठी नक्कीच खास असेल. कारण यामध्ये अनेक भावना आणि आठवणी दडलेल्या असतील. 

  नोटबुक

  POPxo Exclusive
  Scorpio Wiro Notebook
  INR 349 AT POPxo
  Buy

  POPxo शॉप तुमच्यासाठी तुमच्या राशीचे खास नोटबुक घेऊन आलं आहे. तुमच्या मुलीची जी रास असेल त्या राशीचं नोटबुक तुम्ही तिला गिफ्ट म्हणून देऊ शकता. हे चांगल्या दर्जाचं असून दिसायलाही मस्त आहे. त्यामुळे तुम्ही हे ऑनलाईन ऑर्डर करून मागवून घ्या आणि तुमच्या मुलीला गिफ्ट द्या. 

  ट्रेंडी मोबाईल कव्हर

  POPxo Exclusive
  Tiara Phone Cover
  INR 399 AT POPxo
  Buy

  तेच तेच मोबाईल कव्हर वापरून कंटाळा येतो. मोबाईल स्मार्ट असतो मग कव्हर का नको? POPxo शॉपमधून तुम्ही असे ट्रेंडी मोबाईल कव्हर आपल्या मुलीसाठी गिफ्ट म्हणून ऑर्डर करू शकता. या कव्हरमुळे मुलीचा मोबाईलदेखील अधिक ट्रेंडी दिसेल. तुमच्या मुलीचा मोबाईल जुना जरी असेल तर या मोबाईल कव्हरमुळे त्याला नक्कीच एक वेगळा लुक मिळेल आणि तुमची मुलगीही खूश होईल. 

  क्लासी फुटवेअर

  Dressberry
  Kitten Heels
  INR 2,599
  Buy

  घरात कितीही फुटवेअर असले तरीही ते कमीच वाटतात. त्यामुळे फुटवेअर हादेखील गिफ्ट म्हणून एक चांगला पर्याय आहे. यामध्ये कॅज्युअल, पार्टी वेअर, हायहिल्स, विदाऊट हिल्स असे अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात. तुमच्या मुलीच्या आवडीनुसार आणि तिच्या कम्फर्टनुसार तुम्ही फुटवेअर खरेदी करू शकता. 

  बॅग पॅक

  POPxo Exclusive
  Bubbles Backpack
  INR 1,799 AT POPxo
  Buy

  मुली नेहमीच क्यूट असतात. तुमच्या मुलींना पॉवरपफ गर्ल्स तर नक्कीच आवडत असणार. त्यामुळे अशी बॅगपॅक तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. आपल्या मुलीमधील एक मस्तीखोर मुलगी तर तुम्हाला माहीत असतेच. त्यामुळे अशी बॅगपॅक तिला द्या आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. ही बॅगपॅक जितकी स्टायलिश आहे तितकीच ती स्पेशियसदेखील आहे.  

  कोट्स मेसेज टी-शर्ट

  POPxo Exclusive
  Be Kind T-shirt (Boxy Fit)
  INR 799 AT POPxo
  Buy

  आजकाल बऱ्याच मुलींना कोट्सवाले टी शर्ट घालायला खूपच आवडतं. तुमची मुलगीही कॉलेजमध्ये जात असेल तर तिला असे कोट्स वाले टी शर्ट नक्की घेऊन द्या. तिच्या आवडीनिवडीनुसार कोट्स बघून तुम्ही तिला टी शर्ट घेऊन देऊ शकता. तसंच तिला ऑनलाईन ऑर्डर करूनही तुम्ही सरप्राईज गिफ्ट घेऊ शकता. 

  ब्‍लूटूथ इअरफोन

  JBL
  JBL Wireless Metal Earbud Headphones with Mic
  INR 1,999 AT Amazon India
  Buy

  आजच्या काळात ब्लूटूथ इअरफोनची चलती आहे. तुम्ही तुमच्या मुलीला हे गिफ्ट देऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल याची किंमत खूप जास्त असेल तर तसं काहीच नाही. तुम्हाला साधारण 2 हजारच्या आत चांगल्या कंपनीचे ब्लूटूथ इअरफोन मिळतात. 

  वॉल क्लॉक

  POPxo Exclusive
  Your Time Is Now Wall Clock
  INR 999 AT POPxo
  Buy

  POPxo शॉपमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. त्यामुळे युनिक गिफ्ट म्हणजे वॉल क्लॉक. तुम्हाला हवं असल्यास,  तुम्ही ट्रेंडी कोट्सवाले वॉल क्लॉक तुमच्या मुलीला देऊ शकता. ‘युअर टाईम इन नाऊ’ कोट्सवालं घड्यास तिला नक्कीच आवडेल. ती जेव्हा हे घड्याळ बघेल तेव्हा तेव्हा तिला नक्कीच सकारात्मक वाटेल.

  परफ्यूम

  YVES ROCHER
  Moment De Bonheur Edp Perfumes
  INR 3,127 AT shoppers stop
  Buy

  चांगल्या दर्जाचं परफ्यूम कोणाला आवडत नाही? तुमच्या मुलीला परफ्यूम आवडत असेल तर तिला तिच्या आवडत्या ब्रँडचं परफ्यूम गिफ्ट म्हणून द्या.  तिला नक्कीच तुम्ही दिलेलं सरप्राईज आवडेल. अचानक तिच्या आवडतं परफ्यूम बघून तिला नक्कीच आनंद होईल. 

  कुशन्स कव्हर

  POPxo Exclusive
  Flamingo Coasters
  INR 549 AT POPxo
  Buy

  कुशन्स कव्हर हे सगळ्यांनाच आवडतात. एकांतात आपला सर्वात जवळचा मित्र म्हणजे उशी. आनंदी असलो अथवा त्रास होत असला तरीही सर्वात जवळ कोण असते तर उशी. तुम्ही तुमच्या मुलीला डॉटर्स डे च्या निमित्ताने फ्लेमिंगोचे हे कुशन्स कव्हर नक्कीच गिफ्ट करू शकता. घर असो वा ऑफिस फ्लेमिंगो प्रिंट पाहून सर्वांनाच बरं वाटतं. याचं डिझाईन सुंदर असून हवहवंसं वाटणारं आहे.