भारतीय स्वयंपाकाघरात हिंगाची डबी असतेच. हिंग निरनिराळ्या भाज्या, डाळी, खिचडीच्या फोडणीसाठी वापरलं जातं. हिंगाच्या फोडणीचा खमंग सुवास तुमची भुक आणखी चाळवतो. कारण हिंगामुळे पदार्थाला विशिष्ठ चव येते. हिंग केवळ स्वादासाठीच फोडणीत वापरलं जातं असं नाही तर त्यामागे खूप मोठं आहारशास्त्रदेखीलआहे. हिंग वापरल्यामुळे त्या पदार्थांची चव आणि पोषणमुल्यं दोन्ही वाढतात. शिवाय हिंग वापरल्यामुळे अनेक विकार तुमच्यापासून दूर राहतात. अन्नपदार्थांचे व्यवस्थित पचन होण्यासाठी पारंपरिक स्वयंपाकात हिंग आवर्जून वापरलं जातं. यासाठी जाणून घ्या हिंगाचे आरोग्यदायी फायदे.
स्वयंपाकात हिंग वापरण्याची अनेक कारणे आहेत. हिंगामुळे स्वयंपाकाला सुंदर सुवास आणि स्वाद तर मिळतोच शिवाय याचे अनेक आरोग्यदायी फायदे शरीराला मिळतात. यासाठीच हिंगाचे आरोग्यदायी फायदे जरूर वाचा.
खाद्यपदार्थाला हिंगाची फोडणी दिली की तो सुवास तुम्हाला शांत बसू देत नाही. या खमंग वासाने भुक लागते आणि तुम्ही पोटभर जेवता. मात्र जेवण स्वादिष्ट असेल तर कधी कधी दोन घास अधिकच खाल्ले जातात. यासाठीच जेवणात अनेक पदार्थांना हिंगाची फोडणी दिली जाते. कारण त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन होण्यास मदत होते. हिंगातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे पचनक्रिया सुरळीत चालते. पोटातील विकार कमी होण्यास मदत होते. अॅसिडिटी, अपचनाचा त्रास कमी होतो. बऱ्याचदा जड जेवणाचा त्रास झाल्यास हिंगाचे पाणी पिण्यास दिले जाते. कारण हिंग पोटासाठी अतिशय उत्तम असते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले तर मधुमेहींचा धोका अधिक वाढतो. यासाठी मधुमेही नेहमी आहारातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवून असतात. मधुमेहींनी इन्सुलीनची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नेमका कोणता आहार घ्यावा हा प्रश्न नेहमीच त्यांना पडत असतो. जर तुम्हाला मधुमेह असेल तर स्वयंपाकात हिंगाचा वापर जरूर करा. कारण हिंग हे अॅंटिडाएबेटिक पदार्थ आहे. हिंगाच्या वापरामुळे तुमच्या रक्तातील साखर नक्कीच नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
हिंग हे एक अॅंटि इन्फ्लैमटरी असल्यामुळे त्यामुळे तुमच्या वेदना अथवा एखादा दाह कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा मासिक पाळीच्या काळात महिलांना त्रासदायक पोटदुखी अथवा कंबरदुखीमुशे वेदना आणि क्रॅम्प येतात. यावर उपाय करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यातून हिंग घेऊ शकता. तुम्हाला यामुळे त्वरीत आराम मिळू शकतो.
हिंगात दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची एखादी जखम अथवा त्यावर आलेली सूज कमी होऊ शकते. मुका मार लागल्यास हिंगाचा खडा अथवा पावडर कापडात गुंडाळून त्याचा शेक त्या दुखऱ्या भागावर लावल्यास लगेच आराम मिळू शकतो. शिवाय हिंगातील या घटकामुळे इनफेक्शन होण्याचा धोका नसतो.
हिंगामधील औषधी गुणधर्मांमुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच त्याचा चांगला फायदा होत असतो. मात्र विषेशतः जर आपल्याकडे रक्तदाब असेल तर आपल्या उच्च रक्तदाब आहारमध्ये हिंगाचा समावेश करा. कारण हिंगामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तात गुठळ्या होत नाहीत ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहिल्यामुळे रक्तप्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.
वातावरणातील बदल आणि वाढणारे प्रदूषण याचा परिणाम शरीरावर होत असतो. ज्यामुळे अनेकांना वारंवार सर्दी-खोकला यासारखे संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत असतो. मात्र जर तुम्हाला सतत सर्दी, खोकला होत असेल तर तुम्ही हिंगाचा वापर करून त्यापासून सुटका मिळवू शकता. हिंग, मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याचे चाटण घेतल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.