मनुकांचा वापर आपण नेहमी गोडाधोडाच्या अन्नपदार्थात करतो. शिरा आणि लाडू यांमध्ये मनुका आवर्जून वापरल्या जातात. मात्र काळ्या मनुका अगदी नुसत्याच आवडीने खातो. याचं कारण या काळ्या मनुकांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. काळ्या द्राक्षांना सुकवून काळ्या मनुका तयार केल्या जातात. त्यामुळे या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात लोह,व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे पोषक घटक असतात. आर्युवेदानुसार रात्री मूठभर मनुका पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून खा असं सांगितलं जातं. कारण काळ्या मनुका फक्त आरोग्यच नाही तर तुम्हाला चिरतरूण दिसण्यासाठी मदत करू शकतात. यासाठीच काळ्या मनुकांचे फायदे जरूर वाचा.
मनुक्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असतात. ज्यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या कमी प्रमाणात होतात. फायबर्स असल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि गॅस, पोटफुगीचा त्रास कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार अपचन बद्धकोष्ठतेचाच त्रास होत असेल तर नियमित काळ्या मनुका खाणे तुमच्या फायद्याचे असू शकते.
प्रत्येक मुलीला सुंदर आणि नितळ त्वचा हवी असते. मात्र त्यासाठी तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध असणं गरजेचं आहे. रक्तामधील अशुद्धता बाहेर टाकण्यासाठी काळ्या मनुका वरदान ठरू शकतात. काळ्या मनुका दररोज खाण्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होतं आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स येत नाहीत. रक्त शुद्ध झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा नैसर्गिक तजेलदारपणा येतो आणि तुम्ही नेहमी फ्रेश दिसता.
आजकाल बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेकांना ह्रदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र जर तुम्ही नियमित काळ्या मनुका खात असाल तर तुम्हाला काळजी करण्याची मुळीच गरज नाही. कारण काळ्या मनुकांमधील पोटॅशियम, फायबर, अॅंटिऑक्सिडंट तुमचे कार्डिएक आरोग्य राखण्यास मदत करते.
आजकाल अन्नधान्यातील वाढती भेसळ आणि जंकफूड यामुळे योग्य पोषण होणे कठीण झाले आहे. शरीराचे योग्य पोषण न झाल्यामुळे अशक्तपणा अथवा अॅनिमियाचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र काळ्या मनुकांमध्ये असलेलल्या लोह आणि इतर व्हिटॅमिन्समुळे तुमच्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीला चालना मिळते. ज्यामुळे तुमच्या शरीराला प्रमाणात रक्त निर्माण होतं ज्यामुळे तुमचा अशक्तपणा कमी होतो.
जर तुम्हाला दररोज काळ्या मनुका खाण्याची सवय असेल तर तुमचे केस काळेभोर राहू शकतात. आजकाल वयाच्या आधीच केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना सतावत असते. कारण काळ्या मनुका तुमच्या केसांना अकाली पांढरे होण्यापासून वाचवतात. कारण काळ्या मनुकांमध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण होते. यासाठी सतत चिरतरूण दिसण्यासाठी काळ्या मनुका जरूर खा.
काळ्या मनुकांमधील पोषक घटक तुमच्या डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. आपण पाहतो की आजकाल अगदी लहान लहान मुलांनादेखील चष्मा असतो. मात्र जर तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच काळ्या मनुका खाण्याची सवय लावली तर तर त्यांना दृष्टी दोष नक्कीच होणार नाहीत.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
अधिक वाचा
पिस्त्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहित हवेत