‘हादगा’ या रानभाजीविषयी तुम्हाला माहीत आहे का, नसेल तर ही माहिती जरूर जाणून घ्या. कारण हादग्याची भाजी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. हादग्याच्या झाडाला काही ठिकाणी ‘अगस्ता’ असं म्हटलं जातं. गावाकडे शेताच्या बांधावर अथवा अंगणात हादग्याचे झाड लावले जाते. हादग्याच्या झाडाला पानं, फुलं आणि शेंगा येतात. या झाडाच्या फुलांची आणि कोवळ्या शेंगाची भाजी, वडी आणि भजी केली जाते. या झाडाला पिवळसर, पांढरट आणि तांबड्या रंगाची फुलं येतात. फुलं कोयरीच्या अथवा एखाद्या पक्षाच्या चोचीच्या आकाराप्रमाणे असतात. फुलांच्या रंगावरून ते झाड कोणत्या जातीचे आहे हे समजते. हादगा हे पित्त, वात आणि कफ या तिन्ही प्रकृतीसाठी उत्तम असे औषध आहे. यासाठीच या झाडाला आयुर्वेदिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हादग्याच्या झाडाला वर्षातून अनेकवेळा बहर येतो मात्र ऑगस्ट ते डिसेंबरच्या काळात येणारा बहराची भाजी, वडी अथवा भजी अधिक चविष्ठ लागते. सफेद अथवा जांभळट रंगाची ही फुलं चवीला थोडी तुरट, कटवट असतात. मात्र या फुलांची आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. भुक कमी झाल्यास ती लागण्यासाठी अथवा पोट साफ होण्यासाठी ही भाजी अतिशय गुणकारी आहे. ही फुले दृष्टीदोषावर देखील अत्यंत उपयुक्त ठरतात. महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या या भाजीतील गुणधर्मामुळे नक्कीच कमी होऊ शकतात. हादग्याच्या फुलांची भाजी विविध प्रकारे करण्यात येते. विशेष म्हणजे नवरात्रीत या फुलांची भाजी, भजी आवर्जून केली जाते.
साहित्य - हादग्याची 20 ते 25 ताजी फुले, अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ, आवडीनुसार दाण्याचे कुट, लाल तिखट, चार-पाच लसूण पाकळ्या, हळद चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तेल.
कृती- हादग्याच्या फुलांमधील केसर काढून ती स्वच्छ धुऊन घ्यावीत. (या फुलांधील केसर कडवट लागतो) कढईमध्ये लसूण व हळदीची खमंग फोडणी तयार करावी. त्यात फुले गरजेनूसार चिरुन टाकावीत. (फुले न चिरता देखील ही भाजी करता येते) वरून भिजवलेली चणाडाळ भाजीत टाकावी. ही भाजी लगेच शिजते. भाजी शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ व लाल तिखट टाकावे व पुन्हा एकदा चांगले परतून घ्यावे.
सूचना- फोडणी देताना फुलांमधील पाणी पूर्ण निथळून घ्यावे. तसेच चणाडाळ ऐवजी मूगडाळ देखील वापरता येते. कोणतीही डाळ न वापरता भाजीला वरुन डाळीचे पीठ लावून देखील ही भाजी चविष्ट लागते.
हादग्याची भजी- या भाजीप्रमाणेच हळद,तिखट व मीठ टाकलेल्या सरसरीत बेसणामध्ये बुडवून हादग्याच्या फुलांची कुरकुरीत भजी देखील करता येते.
हादग्याची वडी- अळूवड्या अथवा कोथिंबीर वड्यांप्रमाणे तुम्ही या भाजीची वडीदेखील तयार करू शकता.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी
या नवरात्रीत सौंदर्य खुलवण्यासाठी ‘झेंडू’च्या फुलांचा असा करा वापर