दररोज खा आंबट-गोड चिंच आणि मिळवा भरपूर फायदे

दररोज खा आंबट-गोड चिंच आणि मिळवा भरपूर फायदे

आंबट- गोड चिंच असं म्हटलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. चिंच नुसतीच चवीला चांगली नसते तर तिच्या सेवनाचे ही अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात चिंचेचा समावेश करायला हवा. पण तुम्ही आहारात चिंचेचा कसा समावेश करायला हवा ते देखील पाहूया या सोबतच चिंचेचे काय काय फायदे आहेत ते देखील पाहूया

डायबिटीसच्या रुग्णांसाठी चांगले

जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर तुम्ही तुमच्या आहारात चिंचेचा उपयोग करायला हवा. चिंचेमध्ये तुमच्या कार्बोहायड्रेटला शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोझ नियंत्रणात राहते. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही चिंचेचा रस करुन पिऊ शकता. तुम्हाला अगदी लहान ग्लास चिंचेचा हा रस प्यायचा आहे. तुम्ही एक दिवस आड जरी हा रस प्यायलात तरी तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो.

गणपतीच्या निमित्ताने करा खास मघई मोदक

वजन ठेवते नियंत्रणात

shutterstock

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्हाला तर हमखास चिंचेचा आहारात नक्कीच समावेश करायला हवा. चिंचेमधील गुणधर्म तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे असेल तर तुम्ही चिंचेचा रस आहारात समाविष्ट करा. दिवसातून एकदा तरी तुम्ही चिंचेचा रस प्यायला हवा.

Also Read Recipe Of Sweets In Marathi

प्रतिकारशक्ती वाढवते

आजारांशी दोन हात करण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. जर तुम्ही चिंच चावून खाल्ली किंवा त्याचा आहारात तुम्ही समावेश केला तर तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात चिंंचेचा समावेश करायला हवा.

लांब घनदाट केस हवे असतील तर टाळा ‘या’ चुका

त्वचा करते सुंदर

shutterstock

आता तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्हाला चिंच अगदी नक्कीच खायला हवी. चिंचेमध्ये व्हिटॅमिन C असते. ते तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असते. चिंच तुम्ही चेहऱ्याला लावली तरी तुम्हाला त्याचे भरपूर फायदे मिळू शकतात.या शिवाय जर तुम्ही चिंचेचा रस करुन प्यायलात तरी चालू शकेल. व्हिटॅमिन A,B, अल्फा हायड्रो अॅसिड असते त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला तजेला मिळतो. शिवाय तुम्हाला असलेला पिंपल्सचा त्रासही त्यामुळे कमी होईल.

म्हणजे तुमचे पिरेड्स आलेत जवळ, जाणून घ्या पिरेड्सची लक्षणं

असा करा करा चिंचेचा समावेश

shutterstock

  • आता तुम्हाला चिंचेचा समावेश तुमच्या आहारात करायचा असेल तर तुम्ही चिंचेची चटणी किंवा असे काही प्रकार करुन खाऊ शकता. 
  • जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चिंचेचा रस करुनही पिऊ शकता. चिंचेचा रस करण्यासाठी तुम्हाला चिंच पाण्यात भिजवून ठेवायची आहे. तुम्हाला आंबट चिंच सहज खाता येणार नाही. तुम्हाला जितकं आंबट हवे तितकं ठेऊन त्यात दुप्पट पाणी घाला. म्हणजे तुम्हाला हा रस पिता येईल. 
  • तुम्ही चिंचेचा वापर बॉडी स्क्रब म्हणूनही करु शकता. तुम्हाला चिंचेचा पल्प किंवा चिंचेचा पल्प काढून झाल्यानंतर उरलेला चोथा घ्यायचा आहे. त्यात लिंबाचा रस, बेकिंग सोडा आणि साखर घालून स्क्रब तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण शरीराला लावायचा आहे. तुम्ही तो चेहऱ्याला लावल्यास उत्तम

रताळ्यापासून तयार केलेल्या 'या' रेसिपीज जरूर ट्राय करा