आता आदेश बांदेकरच्या घरी रंगणार ‘पैठणीचा खेळ’

आता आदेश बांदेकरच्या घरी रंगणार ‘पैठणीचा खेळ’

‘होम मिनीस्टर’ हा मराठी टेलिव्हिजन शो गेली पंधरा वर्ष महिलांमध्ये लोकप्रिय आहे. सर्वात जास्त वर्ष चालणारा आणि महिलांची विशेष पसंती असलेला हा एकमेव कौटुंबिक शो आहे. या शो इतका लोकप्रिय आहे या कार्यक्रमाची वेळ महिलाच काय पण घरातील पुरूषही सहसा चुकवत नाहीत. या पैठणीच्या खेळाच्या माध्यमातून बांदेकर भावोजी हे नाव घराघरात प्रसिद्ध झालं. विशेष म्हणजे  शोमुळे आदेश बांदेकर महाराष्ट्रातील सर्व महिलांचे भावोजी झाले. त्यामुळे कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होममिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. आता या कार्यक्रमात आणखी रंगत आणणारा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.  या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास या भावोजींच्या घरीच होम मिनीस्टरची टीम पोहचली आहे. त्यामुळे पुढील विशेष भागात बांदेकरांच्या घरी पैठणीचा खेळ रंगणार आहे. 

होममिनीस्टला पंधरा वर्षे पूर्ण

वर्षानूवर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा, अनेक कुटुंबाना एकत्र आणणारा आणि घराघरातील वहिनींना पैठणीचा बहुमान देणारा हा कार्यक्रम लवकरच 15 वर्षे पूर्ण करत आहे. या कार्यक्रमाची आजवर अनेक पर्व झाली. वेगवेगळ्या स्वरूपात हा पैठणीचा खेळ प्रेक्षकांच्या भेटीस आला असून नेहमीच या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या महाराष्ट्रातील सर्व वहिनींसाठी होम मिनिस्टरच 'अग्गबाई सासूबाई' हे पर्व सादर होतंय. सासू - सुनेच्या नात्यातील गोडवा या पर्वातून आदेश बांदेकर उलगडत आहेत. पण आता याच पर्वाचा एक विशेष भाग खुद्द आदेश बांदेकर यांच्याच घरीच चित्रित होणार आहे. आदेश बांदेकर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि आदेश भावोजींचं संपूर्ण कुटुंब या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या भागात पैठणीचा खेळ भावोजींच्या घरीच रंगणार असल्यामुळे प्रेक्षकांना तो पाहण्यास नक्कीच मौज येणार आहे. शिवाय या भागात इतरांना प्रश्न विचारून भंडावून सोडणारे भावोजी स्वतःच्या आयुष्यात कसे आहेत हे देखील समजणार आहे. शिवाय या विशेष भागातील पैठणी नेमकी कोण जिंकणार हे पाहणं उत्सुकता वाढवणारं असणार आहे. आदेश बांदेकर आणि सुचिता बांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय कपल आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील गमती जमती आणि त्यांचा एवढ्या वर्षांचा सुखाचा संसार जाणून घ्यायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

होम मिनीस्टरची वाढत जाणारी लोकप्रियता

होम मिनीस्टर हा कार्यक्रम प्रत्येकीला अगदी स्वतःच्याच घरात सुरू आहे असं वाटत असतं. या शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घरोघरी खऱ्या अर्थाने पैठणीचा हा खेळ सुरू झाला. ‘बांदेकर माझ्याघरी पैठणी घेऊन आले हो’ असं प्रत्येकीलाच म्हणावसं वाटत असतं. कारण महिलांना पैठणी साडी अतिशय जिव्हाळाची असते. प्रत्येकीला आपल्याकडे एकतरी पैठणी असावी असं वाटत असतं. शिवाय कौटुंबिक खेळ खेळून पैठणी जिंकण्याची मजा काही औरच असते. आता या विशेष भागामुळे हा खेळ खेळण्याची आणि पैठणी जिंकण्याची ओढ महाराष्ट्रातील महिलांना नक्कीच लागणार आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

अधिक वाचा -

डिजीटल डेब्यूसाठी दिव्यांका त्रिपाठीचा

संजय दत्तच्या आयुष्यात आली 'पूजा', संजय दत्तचा व्हिडिओ होतोय व्हायरल

सुरवीन चावलाची 5 महिन्यांच्या मुलीने केला डेब्यू