अॅसिडीटीवर घरगुती उपाय करा आणि संपूर्ण आराम मिळवा (Home Remedies For Acidity In Marathi)

Home Remedies For Acidity In Marathi

अॅसिडीटीचा त्रास हा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. उलट सुलट खाण्याच्या सवयीमुळे हा त्रास अनेकांना होतो. पण एकदा अॅसिडीटी झाली की मात्र त्यातून सुटका मिळेपर्यंत बरे वाटत नाही. आज आपण अॅसिडीटी संदर्भातील सगळी माहिती घेणार आहोत. अॅसिडीटीच्या लक्षणांपासून ते घरगुती इलाजापर्यंत सगळ्याची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग करायची का सुरुवात?

Table of Contents

  सगळ्यात आधी अॅसिडीटी म्हणजे काय? (What is Acidity In Marathi)

  shutterstock

  अॅसिडीटी म्हणजे आम्लपित्त. आयुर्वेदात अम्लगुणोदिक्त पित्त अम्लपित्त असे त्यांना म्हटले जाते. शरीरातील अम्ल गुणाने पित्त वाढले जाते म्हणूनच याला अम्लपित्त म्हणजे अॅसिडीटी असे म्हणतात. अॅसिडीटीचे प्रकार आहेत आर्युवेदात याचा समावेश आहे. उर्ध्वग आम्लपित्त आणि अधोग अम्लपित्त असे त्याचे प्रकार आहेत. उर्ध्वग पित्त झाले तर ते उल्टी द्वारे बाहेर पडते. अशा उल्टीला खूप आंबट वासही येतो. तर अधोग अम्लपित्तामध्य हे प्रमाण कमी असते. तुमची अॅसिडीटी गुद मार्गाने बाहेर पडते. अशी अॅसिडीटी झाली की जुलाब होतात.

  तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होत आहे हे कसे ओळखाल? (Acidity Symptoms In Marathi)

  आता अॅसिडीटी होणे म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणजे अॅसिडीटीची नेमकी लक्षणे कोणती ते देखील जाणून घेऊया.

  अस्वस्थपणा (Discomfort)

  shutterstock

  जर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी काय होऊ लागतं ते म्हणजे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. तुम्हाला काहीही करण्याची इच्छा होत नाही. डोकेदुखी होऊ लागते. सतत डोके ठणकत राहते त्यामुळे कामातून किंवा काही करण्यातून तुमचे लक्ष उडून जाते. जर तुमचा हा अस्वस्थपणा योग्यवळी कमी झाला नाही तर मग तुमची चीडचीड व्हायला सुरुवात होते.

  पोटात जळजळ होणे (Inflammation Of Stomach)

  अॅसिडीटीचा हा त्रास तुम्हाला अधिक काळ होऊ लागला की मग तुम्हाला पोटात जळजळ व्हायला सुरुवात होते. पोटात आग आग झाल्यासारखे होऊ लागते. पोटात आगीचा गोळा सोडल्याप्रमाणे तुमच्या पोटात होऊ लागते. अध्येमध्ये पोटातही दुखायला लागते. 

  आंबट आंबट चव लागणे (Sour Sour Taste)

  अॅसिडीटीचा त्रास झाला की, तुम्हाला घशाशी सारखे आबंट आंबट जाणवू लागते. सतत आंबट ढेकर येऊ लागतात. तुम्ही आवंढा गिळतानादेखील तुम्हाला आबंट चव जाणवू लागते असी जाणीव झाल्यानंतर तुम्हाला काहीही खावेसे वाटत नाही. जर तुम्हाला असे जाणवत असेल तर तुम्हाला देखील अॅसिडीटीचा त्रास झाला आहे.

  घशाकडे जळजळ जाणवणे (Burning Feeling In The Throat)

  shutterstock

  अॅसिडीटी झाल्याचे आणखी लक्षण म्हणजे तुम्हाला काहीही न खाता घशाकडे जळजळ जाणवणे. जर तुम्हाला जेवणानंतर किंवा काहीही खाल्ल्यानंतर जर घशाकडे अशाप्रकारची जळजळ जाणवत असेल तर याचा अर्थ तुम्हाला अॅसिडीटी झाली आहे.

  सतत उलटी सारखे वाटणे (Vomiting Feeling)

  खाल्लेले अन्न न पचल्यामुळे तुम्हाला सतत उलटीसारखे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. अनेकदा अन्न न पचल्यामुळेही असे होते. त्यातच जर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर मग तुम्हाला असा त्रास होणारच काहींना अॅसिडीटी झाल्यानंतर असे होतेच. तुम्हालाही असा त्रास असेल तर तुम्हाला अॅसिडीटी झाली आहे हे समजावे

  छातीत जळजळ होणे (Heartburn)

  shutterstock

  अॅसिडीटीकडे तुम्ही दुर्लक्ष करत राहिलात तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ लागतो. जर तुम्हाला हा त्रास होऊ लागला असेल तर मात्र तुम्हाला याकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे. तुम्ही त्याकडे लक्ष देण्याची फारच गरज आहे.

  ही आहेत अॅसिडीटीची कारणं (Acidity Causes In Marathi)

  आता तुम्हालाही अ्ॅसिडीटीचा त्रास होत असेल तर तुम्हाला या मागची कारणे माहीत हवीत. कारण आपल्यात काही चुकांमुळे आपल्याला अॅसिडीचा त्रास होत असतो. आता जाणून घेऊया अॅसिडीटीची काही प्रमुख कारणे

  रात्री उशिरा खाणे (Eating Late At Night)

  आपल्या शरीराचीही एक यंत्रणा आहे. तुम्ही कधी कोणत्यावेळी काय खायला हवे हे तुम्हाला कळायला हवे. जर तुम्ही नको त्या वेळी नको त्या गोष्टी खात असाल तर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास हो होणारचं. उदा. काही जणांच्या जेवणाच्या वेळा या ठरलेल्या नसतात. कामाच्या वेळा आणि जेवण असे त्यांना जळवून घेा येत नाही. मग अशावेळी दुपारचे जेवण अगदी उशीरा केले जाते. परिणामी रात्री लवकर भूक लागत नाही आणि ज्यावेळी भूक लागते त्यावेळी जेवणाची वेळ निघून गेलेली असते. रात्री उशिरा जेवल्यानंतर ते अन्न पचणे कठीण होते. आणि मग दुसऱ्यादिवशी घशाशी आंबट आंबट जाणवू लागते

  शिळ्या अन्नाचे सेवन करणे (Eating Stale Food)

  shutterstock

  काहींंना उरलेले जेवण दुसऱ्यादिवशी तिसऱ्या दिवशी गरम करुन खाण्याची सवय असते. अशी सवयही तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास देऊ शकते. शिळे अन्न पचायला फारच जड असते. त्याच्या सेवनामुळेच हा त्रास तुम्हाला होतो. विशेषत: शिळ्या अननपदार्थामध्ये जर मासांहाराचा समावेश असेल तर अशा गोष्टी तुम्हाला अॅसिडीटी देऊ शकतात. त्यामुळे शिळे अन्न हे देखील तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास देऊ शकते.

  जेवणाच्या वेळा चुकवणे (Missing Meal Times)

  काही जणांना कधीही काहीही खाण्याची सवय असते. असे करत असताना खाण्याच्या योग्यवेळा त्यांच्याकडून चुकतात. खाण्याच्या योग्यवेळा चुकल्या की, मग अॅसिडीटीचा त्रास सुरु होतो. खाण्याच्या योग्य वेळा म्हणजेच या अशावेळा असतात ज्यावेळी तुमच्या जेवणाचे पचन अगदी सहज होऊ शकते. पण तुम्ही जर तसे केले नाही तर तुम्हाला हमखास अॅसिडीटा त्रास होतोच.

  चुकीचे पदार्थ चुकीच्यावेळी खाणे (Eating Wrong Food At Wrong Time)

  shutterstock

  चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळेदेखील अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. रात्री 8 नंतर स्पाईसी, तेलकट पदार्थ खाणे. असे पदार्थ खाल्यामुळे आणि चुकीच्या वेळी खाल्ल्यामुळे ते पचत नाही आणि त्यामुळे अॅसिडीटीचा त्रास होऊ लागतो.

  तिखट आणि तेलकट पदार्थ (Chili and Oily Food)

  जर तुमच्या आहारात तेलकट आणि तिखट पदार्थांचा समावेश असेल तरी देखील तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो.तुमच्या शरीराला जर असे पदार्थ खाण्याची सवय नसेल तर तुम्हाला ते पचायला जड जातात आणि पर्यायाने तुम्हाला त्यामुळे अॅसिडीटी होते. तुमच्या गळाशी सतत तिखट तिखट येऊ लागतात. डोकं दुखू लागते किंवा पोटात सतत ढवळू लागतं. 

  क्षमतेपेक्षा जास्त खाणे (Overeating)

  shutterstock

  एखादी गोष्ट आवडली म्हणून क्षमतेपेक्षा जास्त खाणेही तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही कारण तुम्ही जर क्षमतेपेक्षा जास्त खाल्ले तरी देखील तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो. क्षमतेपेक्षा जास्त खाल्ल्यामुळे तुमचे अन्न पचत नाही आणि मग तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होऊ लागतो. क्षमतेपेक्षा अधिक खाणेही तुम्हाला त्रासदायक ठरु शकते.

  अॅसिडीटीवर घरगुती उपाय (Acidity Home Remedies In Marathi)

  घरच्या गरी तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही अगदी सोपे घरगुती उपाय करु शकता. पाहुया असेच काही सोपे घरगुती उपाय

  1. थंड दूध (Cold Milk)

  shutterstock

  जर तुम्हाला अॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्हाला दुधाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. हे दूध थंडगार पिण्यासाठी सांगितले जाते. जर तुम्हाला अॅसिडीचा भयंकर त्रास होत असेल अशावेळी तुम्ही जर थंडगार दूध प्यायलात तर अॅसिडीटीमुळे होणारी पोटातील जळजळ कमी होते. शिवाय तुमची अॅसिडीटी दाबून धरण्यासाठी तुम्हाला थंड दूध मदत करते. जर तुम्हाला अॅसिडीचा असा त्रास झाला तर तुम्ही लगेचच थंड दूधाचे प्राशन करा. पण थंड दूध पिताना बाजारात मिळणारे फ्लेवर्ड दूध टाळा. कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी कमी होणार नाही.

  2. व्हॅनिला आईस्क्रिम (Vanilla Ice Cream)

  shutterstock

  आता अनेकांना दुधाचा नुसता वास जरी आला तरी ओकारी येते. अशांनी अॅसिडीटी झाल्यानंतर मस्त व्हॅनिला आईस्क्रिम खावे. त्यामुळे तुम्हाला चाळवलेला अॅसिडीचा त्रास कमी होईल. पोटात थंडावा निर्माण होईल आणि मग तुम्हाला बरं वाटेल. अॅसिडीटी झाल्यावर व्हॅनिला आईस्क्रिम खा असे सांगितले जाते. कारण बेसिक फ्लेवरच्या या आईस्क्रिममध्ये व्हॅनिलाचा ईसेन्स वगळता काहीच नसते त्यामुळे तुमच्या पोटातील पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.

  3. केळं (Banana)

  shutterstock

  जेवणानंतर अनेकदा केळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण केळ अन्नावर प्रक्रिया करायला मदत करते किंवा अन्न खाली ढकलायला मदत करते असे म्हटले तरी चालेल. अॅसिडीटीमध्ये तुमच्या पोटात अनेक गॅसेस तयार झालेले असतात. काहींना अॅसिडीटी झाली की, करपट ठेकर येऊ लागतात. अशावेळी जर तुम्ही एखादं केळं खाल्लं तरी तुम्हाला आराम पडू शकतो.

  4. आवळा (Amla)

  shutterstock

  खरंतरं अॅसिडीटी झाल्यानंतर कोणताही आंबट पदार्थ खाऊ नका असे सांगितले जाते. याचे कारण असे की, त्याच्या आंबटपणामुळे तुम्हाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. पण आवळ्याच्या बाबतीत तसे होत नाही. तुम्हाला अॅसिडीटी झाल्यानंतर तुम्ही आवळा सुपारी किंवा आवळ्याची एखादी फोड जरी तोंडात ठेवली तरी तुम्हाला आराम मिळू शकतो. आवळ्याचा रस अॅसिडीटी कमी करतो. 

  5. जिऱ्याचे पाणी (Cumin Seed Water)

  shutterstock

  तुम्ही घरी असताना तुम्हाला अॅसिडीचा त्रास झाला असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करुन पाहू शकता. पाणी गरम करुन त्यात साधारण एक चमचा जिरे घाला. जिऱ्याचा अर्क संपूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर ते पाणी थंड करुन त्या पाण्याचे सेवन करा. अॅसडीटीमुळे तुमच्या पोटात मुरडा आला असेल किंवा तुम्हाला गॅसेस झाल्यासारखे वाटत असतील तर तुम्ही जिऱ्याचे पाणी अगदी हमखास प्या. तुम्हाला लगेचच बरे वाटेल.

  6. लवंग (Cloves)

  shutterstock

  लवंगाचे भरपूर फायदे आहेत. त्यातील एक फायदा तुम्हाला अॅसिडीटीसाठीही होऊ शकतो. तुम्हाला अॅसिडीचा त्रास होत आहे. असे जाणवायला लागले की, तुम्ही लगेचच दाताखाली एखादी लवंग ठेवा. लवंगाचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास कमी होईल.

  7. नारळाचे पाणी (Coconut Water)

  shutterstock

  नारळाचे पाणीही अॅसिडीटीसाठी चांगले आहे. दूधाप्रमाणेच ते तुम्हाला थंडावा देते. त्यामुळे तुम्हाला असा त्रास होत असेल तर तुम्ही नारळाचे पाणी प्या. नॅचरल कुलर असल्यामुळे तुमच्या पोटातील आग शमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये जास्त असते. साधारण एका नारळाचे पाणी तुम्ही पूर्ण प्या. ते पिताना हळूहळू प्या. तुम्ही एकदम पाणी प्यायला जाल तर तुम्हाला उलटीसुद्धा होऊ शकते. (उलटी झाल्यास उत्तम कारण त्यामुळे तुमची अॅसिडीटी लगेचच बाहेर पडेल.आणि तुम्हाला बरं वाटेल)

  8. आलं (Ginger)

  shutterstock

  आल्याचा एखादा तुकडा किंवा आल्याचे पाणी तुम्ही प्यायल्यात तर तुम्हाला बरे वाटेल. अॅसिडीटी नंतर तुमच्या घशाकडे तिखट असल्यासारखे वाटते किंवा ढेकर येतात. काहींना पोटात दुखायला लागते. काहींना डोकेदुखीचा त्रास होतो. अशावेळी आल्याचा एक तुकडा काम करुन जातो. आल्याचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला बरे वाटते जर गॅसेस पोटात घुटमळत असतील तर त्याचा मार्गही मोकळा होतो

  9. कोकमचा रस (Kokum Juice)

  shutterstock

  काहींना अॅसिडीटी झाल्यानंतर सतत उलटी होत असल्याचे वाटते पण उलटी सहजासहजी होत नाही. अशावेळी तुमच्या घरी जर कोकमाचा आगळ असेल तर तुम्ही तो आंबट रस त्यात मीठ घालून तुम्ही तो अगदी घोट- दोन घोट रस प्यायलात तरी तुम्हाला लगेचच उल्टी होईल. ही उल्टी झाल्यानंतर तुम्हाला लगेचच बरे वाटेल. पण हा प्रयोग तुम्ही घरी असतानाच करा. कारण तुम्हाला उल्टी झाल्यानंतर थोडासा थकवा येईल पण लगेचच बरे वाटले.

  10. बडिशेप (Fennel Seeds)

  shutterstock

  बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्यापैकी एक आहे अॅसिडीटी कमी करणे. तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर जर तुमच्या घशाशी तिखट पाणी येत असेल. खाल्लेले अन्न वर आल्यासारखे होत असेल तर त्या त्रासकडे दुर्लक्ष न करता बडिशेपेचे सेवन करा तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

  अॅसिडीटी संदर्भात तुम्हाला पडतात का हे प्रश्न (FAQ's)

  1. अॅसिडीटी झाल्यानंतर काय खायला हवे ?

  अॅसिडीटी झाल्यानंतर काय खाऊ असा अनेकांना प्रश्न असतो. जर तुम्हाला अॅसिडीटी झाली असेल तर तुम्ही तुम्हाला बरे वाटेपर्यंत तुम्ही काहीही तेलकट, तूपकट, तिखट खाऊ नका. शक्य असेल तर तुम्ही आईस्क्रिम खा. चॉकलेट खाल्ले तरी चालेल. तुम्हाला बरे वाटले असले तरी जेवण अगदी हलके ठेवा. तुमच्या शरीरात जितके पाणी जाईल तितके चांगले. जेवणात तुम्ही साधा वरण भात लिंबू असे खाल्ले तरी तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

  2. लिंबू अॅसिडीटीसाठी चांगले आहे का ?

  अॅसिडीटी झाल्यानंतर शक्यतो आंबट खाण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला लिंबाचे सेवन करायचे असेल तर तुम्ही एखादा ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता ज्यामुळे तुमच्या पोटाला थंडावा मिळेल.

  3. अॅसिडीटी आजार आहे का ?

  अजिबात नाही… अॅसिडीटी हा आजार नाही.काहींना हा त्रास सतत होतो याचा अर्थ असा नाही तो आजारामध्ये मोडतो. याचा एकच अर्थ होतो की, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी या चुकीच्या आहेत. त्यामुळे हा कोणताही आजार नसून हा तुमचा निष्काळजीपणा आहे.

  4. दुधाऐवजी तुम्ही दही खाल्ले तर चालेल का ?

  तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही दुधाऐवजी दही खाल्ले तरी चालू शकेल. दूधावर प्रक्रिया झाल्यानंतर दही बनते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे तुमची पचनशक्ती वाढवू शकतात. जर तुम्हाला दह्याचा त्रास होत असेल तर मात्र तुम्ही दही खाऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला इतर त्रास होण्याची शक्यता आहे.

  5. अॅसिडीटी दरम्यान तुम्ही काय टाळायला हवे ?

  तुम्हाला अॅसिडीटीचा फारच जास्त त्रास झाला असेल तर तुम्ही यादरम्यान तेलकट, तिखट आणि पचायला कठीण असे पदार्थ खायला नको. बर्गर, पिझ्झा, चायनीज, मासांहार, ब्रेड असे पदार्थ तुम्ही या काळात टाळायला हवेत. तरचं तुमची अॅसिडीटी लवकर बरी होईल.